Home Blog Page 189

औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट करता दादरा नगर हावेली आणि दमण दिव येथून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेला मद्याचा दारूसाठा केला जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य उत्पादन शुल्क या विभागाचे आयुक्त सन्माननीय श्री.कांतीलाल उमाप साहेब तसेच संचालक सन्माननीय श्रीमती.उषा वर्मा, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद या विभागाचे विभागीय उप-आयुक्त सन्माननीय श्री.प्रदीप पवार साहेब व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद श्री.सुधाकर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक औरंगाबाद यांनी रात्रगस्ती दरम्यान मिळालेल्या खात्रीलायक गुप्त बातमीनुसार नारेगाव येथील सरकार मान्य देशी दारू दुकाना समोरील सरकारी रोडवर नारेगाव ते वरुड रोड ता.जि.औरंगाबाद येथे एक अज्ञात इसम आपल्या चारचाकी वाहनातून दुसऱ्या एका वाहनात विदेशी दारू ‘फॉर सेल दादरा नगर हावेली अँड दमण दिव’ राज्याकरिता विक्रीस असलेल्या दारूचा मद्यसाठा देणार असल्याच्या खात्रीलायक बातमीच्या अनुषंगाने दोन पंचा समक्ष सदर ठिकाणी निरीक्षक भरारी पथक व ‘क’ विभाग यांच्या संयुक्त पथकाने छापा मारला असता सदर ठिकाणी एक चारचाकी वाहनातून सदर मद्यसाठा रस्त्यावर टाकून आरोपी वाहनासह फरार झाले.

सदर मुद्देमाल तपासला असता तो ‘ओन्ली फॉर सेल दादरा नगर हावेली अँड दमण दिव’ करिता असलेला व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला मद्यसाठा प्रथम दर्शनी दिसून आला तो येणे प्रमाणे विदेशी दारू ‘रॉयल स्टॅग’ १८० मि.ली च्या एकूण २४० सीलबंद बाटल्या, ‘इंपेरियल ब्लू’ १८० मि.ली च्या एकूण २०४ सीलबंद बाटल्या, ‘मॅकडॉवेल नं १’ व्हीस्की १८० मि.ली च्या एकूण १०० सीलबंद बाटल्या, ‘बडव्हायजर बियर’ ५०० मि.ली क्षमतेच्या एकूण ४८ सीलबंद बाटल्या असे एकूण १,००,८००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर साठा जप्त करून अज्ञात इसमा विरुद्ध म.द.का अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर कारवाई श्री.विजय रोकडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, भरारी पथक, व ‘क’ विभाग औरंगाबाद, श्री.शरद रोटे, श्री.रमेश विठोरे, दुय्यम निरीक्षक, श्री.प्रवीण पुरी, श्री. गणेश नागवे सह.दुय्यम निरीक्षक जवान सर्वश्री, श्री.युवराज गुंजाळ, श्री.रवींद्र मुरडकर, श्री.सुभाष गुंजाळे, श्री.शारेक कादरी वाहन चालक श्री.संजय गायकवाड व श्री.अमोल अन्नदाते यांनी पार पडली. पुढील तपास श्री.व्ही.व्ही.रोकडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, औरंगाबाद हे करत आहेत.

 

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट ! भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांचा ठाकरे सरकारवर आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाची आर्थिक कोंडी करून ओबीसी आरक्षणास कायमचा सुरुंग लावण्याचा आणि त्याद्वारे ओबीसीं चे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे. हा कट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे उघड झाला आहे, अशी टीका भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत निवेदनाद्वारे केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी उमेदवारांसाठीच्या आरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर जाणीवपूर्वक चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी या समाजाचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणे आवश्यक होते. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगास ठाकरे सरकारने निधी व अन्य कोणत्याही प्रकारचे सहकार्य न केल्याने आयोगाचे कामकाजच सुरू झाले नाही. काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच न्यायालयाने निर्धारित करून दिलेली प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबवून आरक्षण मिळूच नये यासाठीच सरकारने आयोगाची कोंडी केली, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील ओबीसी समाजाची माहिती गोळा करून त्यांच्या राजकीय मागासलेपणाचा अभ्यास व त्यानुसार अहवाल सादर करण्यासाठी ४३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आयोगाने जुलैमध्येच राज्य सरकारला पाठविला होता, पण सरकारने त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याने आरक्षणासंदर्भात आवश्यक माहिती गोळा करण्याचे कामच सुरू झाले नाही. राज्य सरकारने आदेश दिल्यास एक महिन्याच्या आत हा अहवाल देण्याची तयारी असल्याचे आयोगाने गेल्या ऑगस्टमध्येच स्पष्ट केले होते. मात्र सरकारने त्यावरही काहीच कार्यवाही न केल्याने आरक्षण गमावण्याची वेळ ओबीसी समाजावर आली, असे ते म्हणाले.

गेल्या ऑगस्टमध्ये या प्रश्नासंदर्भात ठाकरे सरकारने बैठक बोलावली, तेव्हाही सरकारकडे कोणताच प्रस्ताव किंवा तोडगा नव्हता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या बैठकीतच सुचविल्याप्रमाणे, मागासवर्गीय आयोगामार्फत इम्पिरिकल डेटा तयार करून ओबीसींचा राजकीय मागासलेपणा सिद्ध करणे आवश्यक होते. मात्र ही तिहेरी प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी दिरंगाई करून तीन पक्षांच्या सरकारने तिहेरी फसवणूक केली आहे.

राज्यातील महत्वाचे राजकीय व सामाजिक प्रश्न टांगणीवर ठेवून समाजामध्ये अस्वस्थता माजविण्याचा राज्य सरकारचा कट आहे, असा थेट आरोप अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला. आयोगाची कोंडी करून अध्यादेशाद्वारे आरक्षण लागू करण्याचा निर्णय न्यायालयात टिकणार नाही याची जाणीव असतानाही, आरक्षण मिळू नये या भूमिकेतूनच सरकारने तिहेरी फसवणुकीचा कट आखला, असेही ते म्हणाले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करून त्यांचे राजकीय हक्क त्यांना पुन्हा मिळावेत यासाठी भाजप संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

औरंगाबादमध्ये सैराट सिनेमाची पुनरावृत्ती; सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची केली हत्या!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह

औरंगाबाद, ता 5 डिसें : प्रेमविवाह केला म्हणून सख्ख्या भावाने सख्ख्या बहिणीची कोयत्याचे वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादमधल्या लाडगावमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. किशोरी मोटे असं 19 वर्षीय मुलीचं नाव असून तिच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हा आरोपी अल्पवयीन आहे असं समजतं आहे. रविवारी तो लाडगावमध्ये गेला होता त्यावेळी त्याने रागाच्या भरात बहिणीची गळा चिरून हत्या केली.

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून भावानेच सख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. तो मूळचा गोयेगाव येथील रहिवासी आहे. प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आईसोबत तो रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात कोयत्याने बहिणीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे.

सहा महिन्यापूर्वी 19 वर्षीय किशोरीने पळून पुण्यातील आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते औरंगाबादेतील लाडगाव या परिसरात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच किशोरीचा भाऊ हा लाडगावला आला. त्यानंतर बहिणीला तू पळून प्रेमविवाह का केला? असा जाब विचारला. त्यानंतर शाब्दिक वादानंतर राग अनावर झालेल्या भावानेच जवळ असलेल्या कोयत्याने सख्या बहिणीवर सपासप वार केले.

भावाने सख्ख्या बहिणीची हत्या केल्याने परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली असून एकविसाव्या शतकात देखील अशा घटना घडत असल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे.

विकासासाठी राज्यातील १२५ तालुक्यांच्या प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरीत, अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेची अंमलबजाणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘मानव विकास कार्यक्रम’ या अंतर्गत राज्यातील सुमारे २३ जिल्ह्यातील १२५ मागास तालुक्यातील ‘महिला बचतगट’ आणि ‘अनुसूचित जाती जमाती’ चे सक्षमीकरण करण्यासाठी ‘रोजगार निर्मिती’ वर अधिक भर देण्यासाठी ‘विशेष योजना’ तयार करण्यात आली असून त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी आज वितरीत करण्यात आला असून ही विशेष योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या ‘विशेष योजने’ बाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

ही विशेष योजना महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासीचे वन-घन केंद्र, जीवनोन्नत्ती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील मागास तालुक्यातील नागरिकांना रोजगार निर्मितीच्या समान संधी उपलब्ध होणार असून या भागांच्या विकासाला गती मिळणार आहे.

रोजगार निर्मितीवर अधिक भर देण्यासाठी ‘जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजना’ अंतर्गत ‘विशेष योजना’ तयार करुन त्या राबविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  ‘मानव विकास कार्यक्रम’ या अंतर्गत आर्थिक वर्ष सन २०२१-२०२२ मध्ये ‘जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजना अंतर्गत’ विशेष योजने करिता उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या २३ जिल्ह्यातील सुमारे १२५ तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. वितरीत करण्यात आलेल्या निधीचा विनियोग प्रामुख्याने महिला बचतगट व अनुसूचित जाती-जमातीचे सक्षमीकरण करण्याकरीता करण्यात येणार आहे.

अनुदान व लाभार्थी सहभाग दोन टप्प्यात विभागण्यात येणार

जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजनेंतर्गत ‘विशेष योजना’ प्रामुख्याने महिला बचत गट, लोक संचलित साधन केंद्र, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासीचे वन धन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. या ‘विशेष योजने’साठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी समुहासाठी ७५:२५ तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी समुहासाठी ९०:१० याप्रमाणे अनुदान व लाभार्थी सहभाग दोन टप्प्यात विभागण्यात येणार आहे. विशेष योजनेचे प्रस्ताव तयार करताना ‘शाश्वत विकास ध्येया’ अंतर्गत असलेली विशेषतः गरिबी निर्मूलन, उपासमारीचे समूळ उच्चाटन यांसारखी ध्येय साध्य करण्यात येणार आहेत.

‘मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या २३ जिल्ह्यातील सुमारे १२५ तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

 

गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण कडून डोंबिवली पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील तडीपार खतरनाक नामचीन गुंड जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.३०.११.२०२१ रोजी रात्री ८.०० च्या दरम्यान डोंबिवली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुंड – सनी परशुराम जाधव हा ज्योती नगर झोपडपट्टी परिसरात डोंबिवली पूर्व येथे येणार असल्याची वर्णनासह गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी पोलीस हवालदार – दत्‍ताराम भोसले मुख्यालय ठाणे शहर, यांना मिळाल्याने त्यांनी गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांना फोनद्वारे संपर्क करून कळवल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ एक पथक पोउपनिरी- मोहन कळमकर,सपोउपनिरी- संजय माळी, पोलीस हवालदार-वसंत बेलदार, सचिन वानखेडे, विश्वास माने यांना बातमी मिळाल्या ठिकाणी तात्काळ रवाना केले.

सदर ज्योतीनगर परिसरात पोलीस दबा धरून बसलेले असताना दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम दुर्गा माता मंदिरासमोर फिरत असताना दिसला त्यास पोलीस पकडण्यास जवळ जात असताना त्याला पोलीसांचा संशय येताच तो पळण्याच्या तयारीत असताना त्यास झडप घालून पकडले, त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव सनी परशुराम जाधव (वय ३८) वर्षे रा.ज्योती नगर झोपडपट्टी आयरे गाव डोंबिवली पूर्व, असे सांगितले सदर आरोपीत इसम डोंबिवली पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील धारदार शस्त्राने वार करणारा खतरनाक नामचीन गुंड असून त्याच्यावर ५ गुन्हे दाखल असून त्याची दहशत असल्याने त्यास मा.पोलिस उप आयुक्त सोा,परिमंडळ – ३ कल्याण यांचे आदेशान्वये दि.२४.०८.३०२१ रोजी पासून ठाणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आलेले असताना त्याने सदर आदेशाचा भंग केल्याने त्याच्या वर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण कडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पुढील तपासा करिता डोंबिवली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून सदर तडीपार गुंडावर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांनी कारवाई करून जेरबंद केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.