Home Blog Page 192

ठाणे शहराच्या आधुनिकीकरणात ठाण्यातील आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनरचे भरीव योगदान

संपादक:मोईन सय्यद/ठाणे प्रतिनिधी

ठाणे : इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स या सेवाभावी संस्थेच्या ठाणे चॅप्टरची म्हणजेच ठाणे, मुंबई ,नवी 9मुंबई शहरातील गृह तसेच कार्यालयांची सजावट करणाऱ्या आर्किटेक्टस, इंटिरियर डिजायनर्र्स, ट्रेड व या व्यवसायासंबंधित सभासद यांच्या पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती केलेल्या कार्यकारिणीचा स्थापना समारंभ नुकताच ठाणे शहरात पार पडला.

तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख आता गगनचुंबी इमारती, मेट्रो, प्रशस्त मॉल्स, फ्लायओव्हर, तारांकित हॉटेल, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था अशी झाली असून या सर्व जडण घडणीत ठाण्यातील आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनर यांचा सिंहाचा वाटा आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनरच्या ठाणे चॅप्टरची सभा ठाण्यामध्ये झाली असून या संघटनेचे माजी चेयरमन व जेष्ठ आर्किटेक्ट श्री संजीव ठाकूर यांनी आढावा घेतला. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीचा बांधकाम क्षेत्राला सुद्धा मोठा फटका पडला आहे या सर्व आव्हानाचा सामना करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्सची ठाणे चॅप्टर ही संघटना नव्या चेहऱ्यांना घेऊन सज्ज झाली आहे.

यावेळी या संघटनेचे नवनियुक्त चेयरमन व जेष्ठ आर्किटेक्ट श्री संदीप नरेश जोशी म्हणाले, ” पुढील दोन वर्षांसाठी आम्ही कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये आमची संघटना आर्किटेक्चर व इंटिरिअर क्षेत्रात येणाऱ्या युवा पिढीकडे जाणार आहे कारण आमचे क्षेत्र हे क्रिएटिव्ह क्षेत्र असून आमच्या क्षेत्रातील ठाण्यातील दिग्गज आर्किटेक्ट्स या युवापिढीला योग्य मार्गदर्शन करू शकतील. म्हणूनच आम्ही संवाद या उपक्रमाचे आयोजन करणार आहोत. तसेच आर्किटेक्चर व इंटिरियर क्षेत्रातील व या व्यवसायामधील आमचे सहकारी आमचे प्रायोजक ईंटीरियर वस्तू बनविणारे कारखानदार यांच्या कारखान्यांना भेट देणार आहोत. याकरीता आम्ही विविध वर्कशॉप घेणार आहोत व तसेच पहिल्यांदा कल्चरल व स्पोर्टस कमिटीची स्थापना केलेली आहे, असे अनेक उपक्रम आम्ही येत्या दोन वर्षात राबविणार आहोत.

इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ही राष्ट्रीय संस्था असून भारतातील सुमारे आठ हजार पाचशे आर्किटेक्टस, इंटिरियर डिजायनर्स, ट्रेड मेंबर्स हे यात सहभागी आहेत तसेच संपूर्ण भारतात ३३ चॅप्टर कार्यरत असून आर्किटेक्चर व इंटिरिअर डिजायनर्स च्या क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी ही संस्था प्रयत्नशील असते.”
या सभेचे ठळक वैशिष्ट म्हणजे या सभेला इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आर्किटेक्ट जबीन झकारियास खास कोचीवरून ठाण्यामध्ये आल्या होत्या. त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व आर्किटेक्टना, डिजायनर्स व ट्रेड मेंबर्सना संबोधित व मार्गदर्शन करताना सांगितले, “भारतीय इंटिरियर डिझायनर्स संस्थेची स्थापना १९७२ साली झाली असून सदस्यांमध्ये चांगल्या व्यावसायिक आणि व्यापार पद्धती आणि नैतिकता स्थापित करण्यासाठी आणि इंटीरियर डिझाइन व्यवसायाची प्रतिमा ठळक करण्यासाठी झाली आहे तसेच परदेशातील तत्सम संस्थांशी माहितीची देवाणघेवाण या माध्यमातून आम्ही करीत आहोत.

ठाणे चॅप्टर हा एक देशातील महत्वाचा चॅप्टर असून येत्या काळात ठाणे शहर हे जागतिक पटलावर एक विकसित शहर म्हणून ओळखले जाणार आहे व यात ठाण्यातील आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनर्स यांची महत्वाची भूमिका राहणार आहे.” इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ठाणे चॅप्टरचे जनसंपर्क अधिकारी आर्किटेक्ट श्री श्रेयश आत्माराम सरमळकर यांनी वरील माहिती दिली आहे.

वोक्हार्ट रूग्णालयानं पक्षाघात आजाराच्या जागरूकतेसाठी बनवला सर्व्हायव्हर ग्रुप

संपादक: मोईन सय्यद/मिरारोड प्रतिनिधी

दोन वर्षाच्या कार्यकाळात २३० पक्षाघात रूग्णांवर यशस्वी उपचार

पक्षाघातून बरे झालेले रूग्ण सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून करणार जनजागृती…

मिरारोड : पक्षाघात या आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयाने सर्व्हायव्हर ग्रुप बनवला असून यावेळी खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाघातातून वाचलेल्या ३० हून अधिक रूग्णांनी यात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात पक्षाघात या आजारावर यशस्वीरित्या मात करून आयुष्य़ जगणाऱ्या शीन फिगेरेडो या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

मेंदूला ऑक्सिजन व पोषणमूल्यांचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार झाल्याने किंवा त्या वाहिन्या फुटल्याने पक्षाघात होतो. पक्षाघाताचे दोन प्रकार आहेत. रोहिण्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने इस्केमिक स्ट्रोक येतो. तर रक्तवाहिन्या फुटल्यावर रक्त वाहून जाते आण‌ि त्यामुळे हेमोराजिक स्ट्रोक येतो. सध्या तरूणांमध्ये पक्षाघाताचा धोका वाढताना दिसून येत आहे. धुम्रपान, मद्यपान, मधुमेह, लठ्ठपणा, विनाकारण औषधांचा वापर आणि कौटुंबिक इतिहास हे यामागील मुख्य कारणं आहेत.

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै म्हणाले की, “पक्षाघातामुळे दरवर्षी लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. पक्षाघाताचा झटका आल्यास रूग्णाला ५ तासात उपचार मिळणे गरजेचं असतं. वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावू शकतो. सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत २३० पक्षाघात झालेल्या रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी १४४ पुरूष आणि ८६ महिलांचा समावेश होता. यातील ३१-४० वयोगटातील २३ रूग्ण, ४१-५० वयोगटातील ३६ रूग्ण, ५१-६० वर्ष वयोगटातील ५९ रूग्ण ६१-८० वयोगटातील १०० रूग्ण आणि ८० वर्ष वयोगटातील १२ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहे. पक्षाघाताबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी यातून बरे झालेल्या रूग्णांचा एक स्ट्रोक सर्व्हायव्हर्स ग्रुपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ३० रूग्णांचा सत्कार करण्यात आला. हा कार्य़क्रम दर तीन महिन्यांनी घेतला जाईल. जेणेकरून रूग्ण आपले अनुभव सांगू शकतील.”

स्ट्रोक सर्व्हायव्हर शीन फिगेरेडो म्हणाले, “पक्षाघात होईपर्यंत मला या आजाराबद्दल काहीही माहिती नव्हतं. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला पुन्हा जगण्याची संधी मिळाली आहे. पक्षाघात रूग्णावर वेळीच उपचार होणं गरजेचं आहे, याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी रूग्णालयाने स्ट्रोक सर्व्हायव्हर ग्रुप तयार करून चांगला पुढाकार घेतला आहे.”

मतभेद बाजूला ठेऊन पक्ष संघटना बळकट करा!- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा संपन्न

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा सवांद मेळावा मिरारोड मध्ये पार पडला या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्षजयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षातील मतभेद बाजूला ठेवून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्याचे निमंत्रण पत्रकारांना देखील देण्यात आले होते त्यामुळे या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात पत्रकार देखील उपस्थित होते आणि त्याच वेळी जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्या विरोधात काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली त्यावेळी उपस्थित पत्रकारांकडून त्याचे चित्रीकरण केले जात असताना पत्रकारांना या कार्यक्रमात कुणी बोलावले? असे नेत्यांकडून बोलण्यात आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बाचाबाची सुरू केली त्यानंतर नाराजी व्यक्त करून पत्रकार त्या कार्यक्रमातून निघून गेले. थोड्यावेळाने सगळ्यांना शांत केल्यानंतर हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

संपुर्ण राज्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेत. पालघर नंतर आज मिरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सवांद साधला यावेळी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मत जाणून घेतले. काही दिवसापूर्वी जिल्हाध्यक्षपदी काँग्रेस मधून आलेल्या अंकुश मालुसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच जुन्या कार्यकर्त्यांनी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी समजूत काढून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची नियुक्ती केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे बंधनकारक आहे आता बदल होणार नाही. पक्ष संघटना बळकट करा सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करा असा संदेश जिल्हाध्यक्ष मालुसरे यांना दिला.

शहरातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे त्यावर लवकरच सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून तोडगा काढू व राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे इथे एकत्र मिळून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करू मात्र तसे शक्य न झाल्यास स्थानिक पातळीवर पक्षांना एकत्र करून येणाऱ्या महापालिका निवडणुकी लढू असे मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला शहारत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कशी वाढेल यावर लक्ष द्या. रोज सकाळी उठून प्रदेश कार्यलयात जाऊन एकमेकांच्या तक्रारी करत बसू नका. पक्षांनी जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली आहे, त्यांना सोबत घेऊन काम करा असा सज्जड दम नाराज कार्यकर्त्यांना दिला. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जास्त नाही तरी पण १५ ते २० नगरसेवक निवडून येतील असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

मिरा भाईंदरचे पत्रकार भाविक पाटीलला भाजप नागरसेविका अनिता पाटीलच्या भावाने केली मारहाण!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर :  महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्राचे मिरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील यांना भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाकडून जीवघेणा हल्ला करून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त विलास सानप करीत आहेत.

पत्रकार भाविक पाटीलवरवर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, महाराष्ट्रातील एका नामवंत दैनिकचे मिरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास वृत्तसंकलन करण्यासाठी पेणकर पाडा परिसरातून जात असताना पेणकर पाडा परिसरातील भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांचे भाऊ राजेश चौहान चारचाकी वाहन घेऊन भरधाव वेगाने जात होते.

त्याच वेळी त्याच्या मागून पत्रकार भाविक पाटील हे देखील मोटारसायकल वरून जात होते. पत्रकार भाविक पाटील यांना गाडी मागे घे अश्या उर्मट भाषेत राजेश चौहान यांनी दम द्यायला सुरुवात केली त्यांचा राग अनावर झाला आणि गाडीतून उतरून पत्रकार भाविक पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली यावेळी पत्रकार भाविक पाटील यांनी थांबण्याचा प्रयत्न केला असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या संदर्भात शहरातील सर्व पत्रकार यांनी काशिमिरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची भेट घेतली व संबंधित मारहाण करणारा मुजोर राजेश चौहान यांच्या पत्रकार संरक्षण कायदा, धमकी, शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीवर याअगोदर देखील जमीन बळकावणे, अनधिकृत बांधकाम करणे आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल असून नगरसेविका अनिता पाटील ह्या आपल्या भूमाफिया भावाच्या मदतीने पेणकर पाडा परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे करीत असल्याचे सांगितले जात आहे. पत्रकार भाविक पाटील यांच्यावर झालेला हल्ला जाणीवपूर्वक केला असून अश्या मुजोर आणि सत्तेचा माज असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी शहरातील सर्व पत्रकारांनी केली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त विलास सानप स्वतः करीत असून आरोपी राजेश चौहान याला अटक करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

संधीवाताचे व्यवस्थापन करताना – डॉ. गिरीश एल भालेराव, वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड

तुम्हाला सांधेदुखी, सांध्याना सूज, सुन्नपणा, स्नायुंमधील ताठरता किंवा दाह जाणवतोय का? सांधेदुखीमुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे करण्यातही अडथळा येतोय का? या सांधेदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण तो संधिवात असू शकतो. होय ते खरंय! घाबरू नका, आम्ही तुम्हाला संधिवात असल्याचे सूचित करणाऱ्या लक्षणांबद्दल सांगतो. ही आयुष्यभराची अट आहे, परंतु आपण ती व्यवस्थापित करू शकता. उतारवयात हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधेदुखी सुरू होणे हे स्वाभाविक आहे. मात्र जीवनशैलीतील काही योग्य बदल केल्यास तसेच आहारावरील नियंत्रण आणि नियमित व्यायाम संधीवातासारख्या आजाराला दूर ठेवू शकतात.

याकडे दुर्लक्ष करणे आयुष्यभराकरिता अपंगत्व आणु शकते. सांधेदुखीमुळे जगभरात मृत्यू आणि रुग्ण दर वाढले आहेत. तुम्हाला माहिती आहे का? संधिवात 100 पेक्षा जास्त रोग आणि संबंधित परिस्थितीचा समावेश करते. संधिवाताचा प्रकार जाणून घेणे, आपल्या परिस्थितीसाठी योग्य प्रकारचे उपचार आणि व्यवस्थापन करण्यात महत्वाचे ठरते.

संधिवाताचे काही सामान्य प्रकार आहेत जसे संधिवात, ऑस्टियोआर्थराइटिस, सोरायटिक आर्थरायटिस, गाउट आणि ल्यूपस ज्यामुळे रुग्णांमध्ये तणाव, निराशा, चिडचिड आणि नैराश्य येऊ शकते. काही प्रकारच्या सांधेदुखीसाठी त्वरित उपचार करणे आवश्यक असते. जर तुम्हाला संधिवात असेल ज्यामुळे कायमस्वरूपी हाडांचे नुकसान होऊ शकते, तर त्वरीत उपचार घेतल्यास हाडांचे कार्य टिकवून ठेवण्यास आणि आरोग्याच्या इतर गंभीर समस्या टाळण्यास मदत होऊ शकते.

संधिवात उपचार कधी सुरू करावे?

संधिवाताची विविध लक्षणे आहेत जी चिंताजनक असून विलंब न करता डॉक्टरकडे धाव घ्यावी लागेल. सांध्यातील वेदना, सूज किंवा जडपणा यासारखी लक्षणे असल्यास दुर्लक्ष करू नका. सांधे जे स्पर्श केल्यावर लालसर किंवा उबदार असतात अतिशय संवेदनशील किंवा कडकपणा जाणवू शकतो. शारीरीक हलचाली करण्यात वेदना तसेच दैनंदिन क्रिया करणे आणि सांध्यामधील दाह अनेक शारीरीक समस्या निर्माण करू शकते.

जर तुम्हाला हाडांसबंधी लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांची भेट घ्या. आधुनिक काळातील दर्जेदार औषधांमुळे संधीवात प्रभावीपणे नियंत्रित करता येतो. त्यामुळे संधीवाताच्या रुग्णांमध्ये व्यंग निर्माण होऊन त्याच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम टाळणे शक्‍य होत आहे संधिवात तज्ञ हे संधिवात आणि हाडे, स्नायू आणि सांधे यांच्याशी संबंधित रोगांचे विशेषज्ञ आहेत. ते आव्हानात्मक निदान करण्यात मदत करतात आणि सर्व प्रकारच्या संधिवात हाताळतात. एकदा निदान झाल्यास डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार योजना दिली जाईल. आपल्याला दररोज आपली लक्षणे व्यवस्थापित करण्यासंबंधी माहिती दिली जाईल. म्हणून, संधिवात असलेल्या लोकांनी आशा गमावू नये आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास जीवनाची गुणवत्ता वाढवता येते.