Home Blog Page 193

मेहकर येथील डीसीसी बँकेचे मॅनेजर रामराव सूर्यवंशी यांना निरोप समारंभ संपन्न

संपादक, मोईन सय्यद / मेहकर प्रतिनिधी, गुरुप्रसाद मेंटे

भालकी, मेहकर : सीमाभागातील भालकी तालुक्यातील मेहकर येथील डीसीसी बँक मॅनेजर रामराव सूर्यवंशी हे मेहकर येथे दहा वर्ष चांगली सेवा देऊन भातंबरा येते त्यांची बदली झाल्याने त्यांना मेहकर , तुगाव हल्सी, आटरंग, आळवाई, येथील पिकेपीएस सोसायटीचे सर्व चेअरमन, व व्हाईस चेअरमन, व सदस्य व सर्व कर्मचारी यांच्या वतीने मॅनेजर रामराव सुर्यवंशी यांना शाल पुष्पहार श्रीफळ व फेटा देऊन सात्विक सत्कार करण्यात आला.

यावेळी बदली होऊन जाणारे व नवीन येणारे मॅनेजर अण्णाराव बिरादार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी विनायकराव पाटील, अशोकराव पाटील, मारुतीराव मगर, अनिरुद्ध पाटील ग्रामपंचायतीचे, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व गावातील, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार मूर्ती मॅनेजर रामराव सूर्यवंशी, अण्णाराव बिरादार कॅशियर तुकाराम राजनाले, संदीप शिंदे, सेवक नरसिंग पवार सह मेकहर, तुगाव, आटरगा, सोसायटीचे अध्यक्ष सदस्य व सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून मॅनेजर रामराव सूर्यवंशी व सेवानिवृत्त नरसिंगराव पवार यांना सोन्याची अंगठी व शाल पुष्पहार फेटा देऊन सात्विक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक उत्तम वक्ते अशोक बापुराव पाटील व आभार प्रदशन ज्ञानोबा मलकापूर यांनी मानले.

संसर्ग टाळण्यासाठी सहा महिन्यावरील प्रत्येकाने फ्लु शॉट्स घेणं गरजेचं – डॉक्टर

फ्लुच्या संसर्गाचा धोका वाढतोय…

संसर्ग टाळण्यासाठी सहा महिन्यावरील प्रत्येकाने फ्लु शॉट्स घेणं गरजेचं – डॉक्टर

संपादक : मोईन सय्यद /मुंबई प्रतिनिधी गणेश नवगरे

पुणे: इन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनला ‘सिझनल फ्लू’ म्हटले जाते. या ‘फ्लू’ पासून संरक्षण करण्यासाठी लस उपलब्ध असून त्याला फ्लू शॉट्स असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ‘फ्लू’पासून बचावासाठी ही लस अत्यंत प्रभावी हत्यार आहे. ‘फ्लू’ विरोधातील लसीमुळे ‘इन्फ्लूएन्झा’ व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात म्हणून वेळीच फ्लू ची लस घेऊन त्यास प्रतिबंध करण्याचे आवाहन तज्ञ डाँक्टरांनी केले आहे. ताप, अंग दुखणे किंवा इंजेक्शन घेतलेल्या जागेवर सूज येणे यासारख्या दुष्परिणामांमुळे फ्लू शॉट्स घेण्यापासून स्वतःला थांबवू नका कारण ते दुष्परिणाम एक ते दोन दिवसात निघून जातात.

पुण्याच्या अपोलो क्लिनिकचे जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी म्हणाले की, फ्लू तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे कारण लहान मुले, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील व्यक्ती आणि दम्यासारख्या दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये आणखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. फ्लूची लस मिळाल्याने आजाराची गंभीरता कमी होईल आणि फ्लूशी संबंधित हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका देखील कमी होईल. फ्लू लसीकरण तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना गंभीर गुंतागुंतीपासून वाचवू शकते. निरोगी व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते ज्यामुळे न्युमोनिया होतो. जर तुम्हाला आधीच फ्लू असेल तर ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते आणि तुम्हाला कोविड संसर्गास बळी पाडते.

डॉ.बुधवानी पुढे म्हणाले की, फ्लू लस घेतल्याने सह-संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. कारण, फ्लू आणि कोविड -१९ दोन्ही एकाच वेळी होण्याची शक्यता अधिक आहे. जरी ते दोन्ही सांसर्गिक श्वसनाचे आजार असले तरी वेगवेगळे विषाणू त्यांना कारणीभूत ठरतात आणि तुम्ही कितीही निरोगी असलात तरी फ्लू आणि कोविड -१९ च्या लसीकरणानंतर इंजेक्शन साइटवर वेदना आणि सूज, अंगदुखी, ताप येणे,थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून येतात. दुष्परिणामांच्या भीतीमुळे लस घेणे टाळू नका. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लूचे रुग्ण अधिक आहेत. या वर्षात ५,००० हून अधिक फ्लूचे रुग्ण दिसले आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना याचा जास्त धोका असतो.

पुण्यातील अपोलो डायग्नोस्टीकचे डॉ. कीर्ती कोटला म्हणाले की, ज्या रुग्णांमध्ये –हदयविकाराच्या समस्या आहेत अशा रुग्णांमधील –हदविकाराचा धोका कमी करण्यासाठी फ्लू शॉट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या रुग्णामध्ये फुफ्फुसाचा आजार जसे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) बिघडण्याचा धोका कमी होतो. अशाप्रकारे सहा महिने आणि त्याहून अधिक वयाचा कोणीही फ्लू शॉट घेऊ शकतो. तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि नंतर लस घ्या

भटके विमुक्त जमातीच्या एक संघ आंदोलन केल्याने शासनाचे नमते पाऊल

संपादक : मोईन सय्यद /मुंबई प्रतिनिधी गणेश नवगरे

भटके विमुक्त जमाती साठी दिलेले प्रतिज्ञापत्र शासन वापीस घेणार! – विजय वड्डेटीवार बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन

न्याय मिळे पर्यंत व असे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या सचिवावर हक्क भंग कारवाई होई पर्यंत आंदोलन सुरूच राहणार संघर्ष वाहिनी

मुबंई: आज जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) सामान्य प्रशासन विभाग पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णयाचे स्वागत

आज मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात पहिले पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली.
मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालावर देखील आज चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
1. राज्यघटनेच्या अनुच्छेद 16 (4) (ए) द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही असे राज्याचे मत असल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना पदोन्नती मध्ये आरक्षण देता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अपुरे प्रतिनिधित्व व प्रशासकीय कार्यक्षमता या दोन निकषांची पूर्तता होत असल्यामुळे राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देता येईल.
2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रमाणेच विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड), व विशेष मागास प्रवर्ग यांचे देखील पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही,असे उक्त समितीच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड), व विशेष मागास प्रवर्ग यांनादेखील पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आरक्षण अधिनियम 2001 प्रमाणे अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) व विशेष मागास प्रवर्ग यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. ते कायम ठेवण्यात यावे,असे मत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमध्ये राज्यातर्फे मांडण्यात यावे.
3. वरील बाबी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यात यावे.
4. सदर प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आवश्यकतेनुसार ज्येष्ठ विधिज्ञांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. असे आज मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आले आहे.

गुन्हे शाखा घटक -३ कल्याण कडून ६ वर्षांपासून फरार असलेला मोक्कातील आरोपी जेरबंद..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण: दि.०९.१०.२०२१ रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गु.र.न. I 108/2015 भादवि कलम 394, 34 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1), (II), 3(2), 3(4) प्रमाणे मधील पाहिजे असलेला आरोपी नामे-सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन वय-31 वर्षे रा. स्वतःचे घर इंदिरानगर,आठाळी रोड,आंबिवली स्टेशन जवळ आंबिवली मुळ राहणार-तहसील पिपरिया राम मनोहर लोहिया वार्ड, होशांगाबाद मध्यप्रदेश हा सहा वर्षांपासून फरार असल्याने तो मिळून येत नव्हता तसेच त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात मालमत्ता व शारीरिक विरोधाच्या गुन्हे दाखल आहेत.

प्रस्तुत गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना हवा असलेला आरोपी याचा पोलीस हवालदार कामत यांनी गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती काढून त्याचा शोध घेतला असता तो खडवली परिसरात येणार असल्याचे खात्रीशीर माहिती काढून सदर ठिकाणी सापळा रचून पाहिजे असलेला आरोपी हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेअंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून १०,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. सदर आरोपी याच्यावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) एम् एफ सी पो.स्टे. I 52/2015 भादवि कलम 394,34 प्रमाणे
2) एम् एफ सी पो.स्टे. I 90/2012 भादवि कलम 394,34 प्रमाणे
3) एम् एफ सी पो.स्टे. I 237/2012 भादवि कलम 394,34 प्रमाणे
4) एम् एफ सी पो.स्टे. I 287/2012 भादवि कलम 394,34 प्रमाणे
5) आर.के.मार्ग पो.स्टे. I 32/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
6) आर.के.मार्ग पो.स्टे. I 41/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
7) आर.के.मार्ग पो.स्टे. I 44/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
8) आर.के.मार्ग पो.स्टे. I 51 /2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
9) आर.के.मार्ग पो.स्टे. I 06/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे
10) मानपाडा पो.स्टे. I 286/2010 भादवि कलम 394,34 प्रमाणे
11) ताडदेव पो.स्टे. I 06/2014 भादवि कलम 392,34 प्रमाणे ताब्यात घेतलेला आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांच्याकडे रिपोर्टसह जमा करण्यात आला आहे.

तसेच प्रस्तुत आरोपी हा आणखी कोणत्या गुन्ह्यात पाहिजे आहे अगर कसे त्या विविध पोलीस ठाण्यात तपास यादी पाठवण्याची तजवीज ठेवली आहे.

प्रस्तुत कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. मोहन कळमकर, पो. हवा/कामत, मंगेश शिर्के, सचिन साळवी , सुरेश निकुळे, राहुल ईशी यांनी केली आहे.

 

अट्टल मोबाईल चोरटा डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या जाळ्यात, ३ लाख ४० हजार किंमतीचे चोरीचे ३१ मोबाईल हस्तगत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली परिसरात चालत्या वाहनातून लोकांचे मोबाईल बळजबरीने चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुफियान उर्फ सद्दो मलिक बागवान असे या अट्टल चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ३१ मोबाईल स्मार्टफोन हस्तगत केले आहेत.

एमआयडीसीतील पिंपळेश्वर मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वॉचमनचा स्मार्टफोन बाईकवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी वॉचमनने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही माहिती किंवा घटनास्थळावरील कोणताही पुरावा नव्हता. त्याचदरम्यान खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीतील साईबाबा मंदिर परिसरात राहणाऱ्या सुफियानला ताब्यात घेत केलेल्या चौकशीत त्यांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच मानपाडा पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ४० हजारांचे ३१ स्मार्टफोन आणि मोबाईल चोरीसाठी वापरण्यात आलेली रिक्षाही जप्त केल्याची माहिती एसीपी जयराम मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तसेच त्याच्यावर कोळसेवाडी, डोंबिवली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असून पोलीस तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, पोलीस नाईक दिपक गडगे, भारत कांदळकर, प्रविण किनरे, पवार, यल्लप्पा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र मंझा यांनी ही दमदार कारवाई केली.