संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: नजीरभाई चट्टरकी, सांगली
पनवेल (मुंबई) : सोलापूर येथील जेष्ठ पत्रकार व ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल (Ajfc) पत्रकार संघटनेचे राज्य संघटक मा. शहाजहान आत्तार यांचा आज पनवेल येथे पत्रकार डॉ. मुनीर तांबोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार व मार्गदशक श्री श्रेयष जी आदि मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मुनीर तांबोळी यांनी सततच्या लॉक डाऊन मुळे राज्यातील पत्रकार आपल्या कुटुंबियांसह दयनीय अवस्थेत गुजराण करीत आहेत. पत्रकार यांच्या मगण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कोरोनाच्या भयंकर संकटकाळात ग्रामीण भागातील पत्रकारांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यांच्या मागण्यांसाठी आपण सदैव पाठीशी राहु व मदत करू असे आश्वाशन डॉ तांबोळी यांनी दिले.
शहाजहान आत्तार यांनी आपण पत्रकारांच्या हक्कासाठी वेळ पडलीच तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करू अशी ग्वाही दिली. संपूर्ण राज्यातील सर्वात जूनी ही पत्रकारांची संघटना असून जेष्ठ पत्रकार व Ajfc चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. यासीन पटेल यांच्या मार्गदर्शना खाली कार्यरत आहे.
‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सात ठिकाणी छापेमारी केली. ‘ईडी’च्या या धाडी मुंबई आणि मुंबईच्या बाहेर ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’ घोटाळा प्रकरणात टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’ घोटाळ्या प्रकरणात जे राजकीय नेते अडकले आहेत त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नाव अग्रस्थानी आहे. या प्रकरणात लवकरच अनेक राजकीय नेत्यांना ‘ईडी’ कडून समन्स जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं म्हटलं जातं होतं. या घोटाळ्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिक जाधव यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर ‘ईडी’नेही गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यात ‘ईडी’ने ‘जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना’ जप्त केला. यानंतर इतर साखर करखान्या बाबत ‘ईडी’चा तपास सुरु झाला आहे.
‘ईडी’कडून याच अनुषंगाने धाडसत्र राबवण्यात आलं. ‘ईडी’कडून गुरुवारी सात ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यात. अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची आता छाननी सुरु आहे. यानंतर आता संबंधितांना समन्स पाठवून बोलावलं जाणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण कोर्टात अडकल्यानंतर ‘ईडी’ने आता आपला मोर्चा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याकडे वळवला आहे. या बँक घोटाळ्यात सुमारे ७० वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे आली आहेत. यापैकी काही जणांची चौकशी झाली आहे. लवकरच इतर नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार शिखर बँकेचे अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी को-ऑप बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात या बँकेत कथित २५ हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तर जो जरंडेश्वर कारखाना अवसायनात निघाला, तो कवडीमोल भावाने विकल्याच आरोप आहे, तो कारखाना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकाचा आहे. राजेंद्र घाडगे हे अजित पवारांचे मामा या बँकेचे चेअरमन आहेत. यांच्याच कार्यकाळात ‘ईडी’ने या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती.
भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील केशवसृष्टी परिसरात असलेला खाडीवर नावाचे गाव जिथे जवळपास पन्नास पेक्षा जास्त कुटुंब राहातात. हे गाव मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत असून देखील गेली अनेक वर्षे ह्या गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून आजही ह्या गावचे नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहेत.
वर्ष २०१७ साली येथील स्थानिक नगरसेविका शर्मिला अजित गंडोली यांनी प्रयत्न करून या गावाला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी एक १० हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधली होती. या टाकीमध्ये महानगरपालिकेच्या टँकर द्वारे आठवड्यातून तीन वेळा पाणी टाकून खाडीवर या गावाच्या नागरिकांना पाणी पुरवठा केला जात होता.
वर्ष २०१९ साली टँकर मुक्त मिरा भाईंदर या योजनेमुळे या गावाचा टँकर द्वारे केला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा नगरसेविका शर्मिला अजित गंडोली यांनी प्रयत्न करून मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी टाकून घेतली परंतु या ठिकाणी पाण्याचा दाब कमी असल्यामुळे या गावाला अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे या गावचे नागरिक आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.
महानगरपालिकेचा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे सध्या या गावचे नागरिक नाईलाजाने परिसरातील विहिरी आणि तलाव यांचे दूषित पाणी पिण्यास अवलंबून आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नगरसेविका शर्मिला अजित गंडोली यांनी खाडीवर या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांचेकडे केली असून त्यांच्या मागणीवर महापालिका काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मिरारोड: सिल्व्हर पार्कमधील एका १८ वर्षीय मुलाची गाडीला ओव्हरटेक करुन कट मारल्याचा शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली या मारहाणीत हटकेश परिसरात सिल्व्हर सरिता येथे राहणारा शुभम शांताराम भुवड नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी नऊ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली, एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काशिमीरा परिसरात आरोपी दुचाकीवरुन जात असताना एका लाल टी-शर्ट घातलेल्या मुलाने त्यांना ओव्हरटेक करून मागे टाकले. त्याने आरोपीच्या बाईकला खूप जवळून कट मारली ज्यामुळे दुचाकीस्वार चिडले. त्यांनी त्या लाल टीशर्ट घातलेल्या मुलाला शोधायला सुरुवात केली.
हटकेश परिसरात लवकरच त्यांना लाल टीशर्टमध्ये दुचाकीस्वार दिसला. त्या नंतर ९ जणांच्या गटाने त्याला पकडून त्याच्यावर निर्घृण हल्ला केला. त्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून निघून. त्यानंतर त्या मुलाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
काशिमीरा पोलिसांनी विनोद उपाध्याय(४४), आकाश हिरवे(२५), कुणाल किणी(३३), सनी उपाध्याय(२५), वसीम अल्ताफ शेख(३२), राजू इर्शाद शेख(३२), सायस मुंढे(१९), जतीन उपाध्याय(२१) या आठ जणांना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर रवी पुजारी नावाचा आरोपी सद्ध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
आरोपी पैकी काहीजण हे घोडबंदर परिसरातील असून वाळू माफिया असल्याचे बोलले जात आहे. त्यांचेवर बेकायदेशीर वाळू उपसा केल्याचे अनेक गुन्हे देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम भुवडवर झालेला हल्ला हा लाल रंगाच्या टीशर्ट घातल्याने चुकीची ओळख झाल्यामुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. ज्या मुलाने आरोपींच्या मोटारसायकलला वेगाने ओव्हरटेक करून अगदी जवळून कट मारली त्याने लाल रंगाचा टीशर्ट घातलेला होता, आरोपी त्या लाल रंगाचा टीशर्ट घातलेल्या व्यक्तीला हटकेश परिसरात शोधत असताना त्या दिवशी शुभम भुवड ह्याने देखील लाल टीशर्ट घातलेला होता.
शुभम आपल्या मित्रा सोबत फॉरचून हाईट्स या इमारतीसमोर आपल्या मित्रासोबत बोलत उभा होता. आपल्या गाडीला कट मारणारा लाल रंगाचा टीशर्ट घातलेला हाच मुलगा आहे असा समज झाल्यामुळे आरोपींच्या टोळक्याने शुभमवर प्राणघातक हल्ला करून ठार केले.
शुभम भुवड नावाच्या मुलावर हल्ला नक्की गफलतीत झाला? की हा हल्ला पूर्वनियोजित ठरवून करण्यात आला? याचा पुढील तपास काशीमीरा पोलीस करीत असून शुभम भुवड नावाच्या १८ वार्षीय मुलाच्या हत्येचे नेमके कारण लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वृत्त प्रसिद्धीसाठी मिळालेली हकीगत अशी की दिनांक ०६.०७ २०२१ रोजी २०:१४ वा विष्णुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर १४६/२०२१ भादवि कलम ४५४, ३८० दखल असून सदर गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद दरवाज्याचे कुलूप लावलेला कोयंडा उचकटून कडी उघडून त्यावाटे घरात प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये ठेवलेले व लॉक न लावलेले लोखंडी कपाटाच्या तिजोरीमधील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण रुपये १,२६,०००/- किंमतीचे अंदाजे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीच्या पायातील एक जोडी मासेळी असा मुद्देमाल घरफोडी करून नेला म्हणून गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास हा विष्णूनगर पोलीस स्टेशन चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिल्लारे, गुन्हा प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा आर डी. पाटणकर, पोहवा के एम. नलावडे, पोशि के ए. भामरे व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने व गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे किसन महादेव व्हनकोरे (वय २५ वर्षे) राहणार धाकटा खांदा, रेल्वेब्रिज व पटरी जवळ, पनवेल, नवी मुंबई हा धाकटा खांदा, झोपडपट्टी परिसरामध्ये रेल्वेब्रिज जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व त्यास वरील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी परिमंडळ-३ कल्याणचे मा. पोलीस उप आयुक्त श्री.विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग श्री.जयराम मोरे व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिल्लारे, गुन्हा प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा के एम. नलावडे, पोहवा आर डी. पाटणकर, पोहवा एस एन.नाईकरे, पोना बी के.सांगळे, पोना टि एच.लोखंडे, पोना एस के.कुरणे, पोशि के ए.भामरे, पोशि एम एस.बडगुजर, पोना एस एस.कांगुने, पोशि व्ही एस.महाजन यांनी सदरची कारवाई यशस्वीपणे पार पाडली.