Home Blog Page 205

नोव्हेल’ संस्थेच्या हॉटेल मॅनेजेंट कॉलेज मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांसाठी ‘नोव्हेलस् एन.आय.बी.आर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ निगडी, येथे खानपान सेवा व्यवस्थापन आणि शिष्टाचार ह्या विषयी तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करून विशेष प्रशिक्षण दिले गेले, कोविड महामारीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना गेले दीड वर्ष सर्वतोपरिने अहोरात्र मदत करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन ‘नोव्हेल’ने अभिनव पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली.

पंचतारांकित हॉटेल्समधील प्रमाणांनुसार, पोलीस आयुक्तालयात आलेल्या अतिथिंचे आदरातिथ्य कसे करावे आणि खानपान सेवा पुरवताना कोणते शिष्टाचार पाळण्यात यावेत याबद्दल सहभागी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उत्साही आणि जिज्ञासू कर्मचाऱ्यांनी ही कार्यशाळा उत्तमरीत्या पुर्ण केली. मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून हे कर्मचारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अतिथी सेवेला वेगळ्या उंचीवर नेतील अशी अपेक्षा आहे.

कार्यशाळेच्या अंतिम सत्रात, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. कृष्ण प्रकाश, नोव्हेल ग्रूपचे संस्थापक-अध्यक्ष श्री. अमित गोरखे आणि प्राचार्य श्री. वैभव फंड ह्यांनी प्रशिक्षनार्थिंचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

याप्रसंगी श्री. कृष्ण प्रकाश यांनी आपल्या भाषणात प्रशिक्षण यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल ‘नोव्हेल कॉलेज’चे अभिनंदन केले. अशा कार्यशाळा कर्मचाऱ्यांच्या बहुअंगी विकासाकरता अतिशय उपयुक्त असून, मनोबल वाढविण्यास पूरक ठरतात असे मत त्यांनी मांडले. संस्थेच्या कामावर विश्वास ठेऊन प्रशिक्षणाची जबाबदारी ‘नोव्हेल’ला दिल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार मानून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे एकत्रित काम करण्याचा आशावाद श्री. अमित गोरखे यांनी व्यक्त केला. कार्यशाळेच्या माध्यमातून कोविड योध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली याबद्दल प्राचार्य श्री. वैभव फंड यांनी आनंद व्यक्त केला व प्रशिक्षणार्थींची जिज्ञासू वृत्ती, सृजनशीलता आणि तत्परता ह्या गुणांचे कौतुक केले.

प्रशिक्षणाची संकल्पना पोलिस उपायुक्त मा. श्री. सुधीर हिरेमठ यांची होती तर आयोजनात सहा. सह आयुक्त श्री. नंदकुमार पिंजन यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रशिक्षण देण्याची जबाबदारी प्रा. शंतनु देशपांडे यांनी प्रा. यशवंत सटानकर, प्रा. सतीष ब्राम्हणे व नोव्हेल कर्मचारी वृंदाच्या मदतीने पार पाडली.

 

प्रथम मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा !! ठाकरे सरकार राजकीय दहशतवाद पसरवत आहेत – राधाकृष्ण विखे पाटील

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नारायण राणेंच्या समर्थनार्थ भाजपाचे शिर्डीत आंदोलन

राज्यात शिवसेनेचे स्वतःला मोठे नेते समजणारे काही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या स्तरावर जावून टिका टिप्पणी करतात. मात्र ‘भारतीय जनता पक्ष’ कधीच अशा प्रकारे कारवाईचा बडगा दाखवत नाही. आता आम्हाला देखील जून्या रेकॉर्डिंग काढून पुरावे सादर करावे लागतील. तेव्हा पोलीस प्रशासन अशा नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार का ? असा सवाल शिर्डीचे आमदार तथा भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या आंदोलनाच्या वेळी उपस्थित केला.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सवी वर्ष’ की ‘हिरक महोत्सव’ हेच माहीत नसावं ही शोकांतिका असून यावर भाष्य करतांना नारायण राणे बोलले. मात्र सर्वात आधी मुख्यमंत्र्यांनीच माफी मागणे अपेक्षित आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झालीत हेच जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच माहीत नसेल तर प्रथम त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला पाहीजे अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी बोलताना केली.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सवी वर्ष’ असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी ‘हिरक महोत्सव’ हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘अमृत महोत्सव’ असल्याचं सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज ७४ वर्षे पूर्ण करुन ७५ व्या वर्षात हिरक महोत्सवी… नाही अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुनच केंद्रीय मंत्रो नारायण राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखालीच लगावली असती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या विधाना नंतर राज्यात याचे पडसाद उमटून आले. यानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. तर त्याच बरोबर रात्री उशिरा जामीन मंजूर झाला. नारायण राणे यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्ष ऍक्शन मोडवर आला. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यभर आंदोलन छेडणाचा ईशारा दिल्यानं शिर्डीत भारतीय जनता पार्टीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वावाखाली आंदोलन करण्यात आले.

शिर्डीतील प्रांतअधिकारी कार्यलयासमोर राधाकृष्ण विखे पाटलांसह भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक रविंद्र गोंदकर, रविंद्र कोते, ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या उपस्थित महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे सरकारने राज्यात राजकीय दहशतवाद सुरु केला असून पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर करत खोटे गुन्हे दाखल करत आहे. राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच या घटनेची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन शिर्डी प्रांतअधिकारी गोंविद शिंदे यांना देण्यात आले.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची तैयारी सुरू! एकेरी प्रभाग रचनेमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे पत्ते होणार कट?

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मुंबई: कोरोना महामारीमुळे राज्यातील वसई-विरार सारख्या अनेक महानगरपालिकेची मुदत संपली असून देखील निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाची प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह 18 महत्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्याची तयारी आता राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या महानगरपालिकांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

निवडणूक आयोगाने 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना हे पत्र पाठवले आहे यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, मीरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.

या सर्व महापालिकांची लोकसंख्या आणि व्यापकता लक्षात घेता निवडणुका वेळेवर घेण्यासाठी आत्तापासूनच नव्याने प्रभाग रचना करणे आवश्यक असल्याच्या निवडणूक आयोगाच्या महापालिका आयुक्तांना सूचना आहेत.

राज्य सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्य प्रभाग पद्धत लागू केली आहे त्यामुळे राज्यात यापुढे पॅनेल पद्धती बंद होणार असून प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असणार आहे. यापूर्वी काही महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात किमान ३ तर काही महानगरपालिकांमध्ये ४ सदस्य होते.

भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्यातील महानगरपालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने म्हणजेच पॅनेल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचा भाजपला फायदा देखील झाला होता. मात्र आता आघाडी सरकारने एक सदस्य प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात राजकीय पक्षांची त्यातही विशेषतः भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

बहुसदस्यीय प्रभाग रचना संपुष्टात आल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असून एकाच प्रभागात अनेकांची दावेदारी केली जाणार असल्यामुळे सगळ्याच नगरसेवकांना तिकीट देऊन समाधान करणे शक्य नसल्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्याचे एक मोठे आव्हान राजकीय पक्षांसाठी ठरणार आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ३ पक्षांची महाविकास आघाडी झाल्यानंतर पहिल्यांदाच महत्त्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. यात ३ पक्षांचं आघाडी सरकार तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच जनतेकडून काय कौल येतो? तो या ३ पक्षांच्या बाजूने असेल की भाजपाच्या बाजूने? हे दिसून येणार आहे.

एकीकडे काँग्रेसने स्वबळावर महानगरपालिका निवडणुका लढवण्याचं ठरवले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

शिवसेनेने देखील एकाला चलो रे ची भूमिका कायम ठेवल्याने ते या निर्णयावर शेवटपर्यंत कायम राहतात का? आणि यानंतर काँग्रेसला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला किती यश मिळतं हे देखील स्पष्ट होणार आहे. तर भाजपची एकाकी लढत त्यांना किती यश मिळवून देईल हे देखील स्पष्ट होणार असून येणाऱ्या काळात जनतेचा कौल कोणत्या पक्षाच्या बाजूने असेल हे देखील स्पष्ट होणार आहे.

२ वर्षांपासून फरार आणि घरफोडीच्या ७ गुन्ह्यात हवा असलेला सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट-३ च्या जाळ्यात..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज दिनांक २५/०८/२०२१ रोजी मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि. ६६५/२०१८ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४,४११,४१४ शस्त्र कायदा ४,२५ सह म.पो.का.क.३७(१)१३५ प्रमाणे दाखल  ८,४३ ९०० रुपयांची डोंबिवलीतील सोनारपाडा येथील डी.एस.एजन्सी नावाचे गोडाऊन चे शटर उचकटून लोखंडी तलवार सोबत बाळगत झालेल्या चोरीच्या  गुन्ह्यातील हवा असलेला फरार आरोपी नामे आकाश ऊर्फ बाटल्या राजू सिंग (वय: २१ वर्ष) राहणार अनंत शिंगटे चाळ, खरवई गाव, रामबाग बदलापूर (पूर्व) यास गुन्हे शाखा युनिट-३ च्या पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात त्यास अटक केली आहे.

अटक आरोपी याच्या गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता त्याच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत.
१) बदलापूर पोलिस ठाणे गु.रजि.६१/२०१८ भादवी कलम ३७९,३४
२) बदलापूर पोलीस ठाणे गु.रजि.१७१/२०१७ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४
३) बदलापूर पोलीस ठाणे गु.रजि.३०/२०१८ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४
४) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.रजि.३२९/२०१७ भादवी कलम ४५४,४५७,३८०
५) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.रजि. १९०/२०१६ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४
६) शिवाजीनगर पोलीस ठाणे गु.रजि.२३५/२०१६ भादवी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल आहेत.
सदर आरोपीवर एकूण घरफोडीचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी हा रात्री घरफोडी करण्यात अत्यंत हुशार आणि चपळ आहे. घरफोडी करताना त्याच्या जवळ तीक्ष्ण धारदार हत्यार बाळगायची त्याला सवय आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार असून घरफोडीचे बदलापूर पोलीस स्टेशनला ३ गुन्हे दाखल आहेत, बदलापूर शिवाजीनगर पोलीस स्टेशन ला ३ गुन्हे दाखल आहेत, आणि डोंबिवली येथील मानपाडा पोलीस स्टेशनला १ गुन्हा दाखल आहे असे एकूण ७ घरफोडीचे गुन्हे दाखल असून सदर आरोपीस आज मा. न्यायालयात हजर केले असता त्यास दि.२७/०८/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पी.एस आय मोहन कळमकर करत आहेत.

प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, पोहवा दत्ताराम भोसले, मिथुन राठोड, अरविंद पवार, संदीप भालेराव, राजेंद्र खिलारे, प्रकाश पाटील,सचिन साळवी, मंगेश शिर्के, गोरक्ष शेकडे, गुरुनाथ जरग, राहुल ईशी, चित्रा इरपाचे, स्वाती काळे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात कल्याण-डोंबिवलीत जोरदार निदर्शने करत शिवसैनिक आक्रमक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून कल्याण-डोंबिवलीतही ठिकठिकाणी शिवसेनेने केलेली आक्रमक निदर्शने पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतून ही याप्रकरणी शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आलेली पाहायला मिळत आहे. डोंबिवली पूर्व येथील इंदिरा चौकात शिवसेना-युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारहाण करत तसेच कोंबड्या हवेत उडवून यावेळी शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.

डोंबिवलीप्रमाणे कल्याण पूर्वेतील गुंजाई चौकातही शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी निदर्शने करण्यात आली. नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून यावेळी शिवसेनेने आपला संताप व्यक्त केलेला दिसून आला.