Home Blog Page 243

डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मरण सप्ताह दिनानिमित्त भाजपा डोंबिवली पूर्व मंडला तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री.रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री. शशिकांत कांबळे, मंडळ अध्यक्ष श्री.नंदू जोशी, महिला मोर्चा अध्यक्षा कल्याण जिल्हा सौ.रेखा ताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मरण सप्ताह दिनानिमित्त डोंबिवली पूर्व मंडला तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज दि. ४ जुलै २०२१ रोजी उंबारली टेकडी येथे करण्यात आला.

सदर कार्यक्रमास डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष श्री. नंदु जोशी सरचिटणीस व नगरसेवक विशू पेडणेकर, कल्याण जिल्हा युवा अध्यक्ष मिहिरजी देसाई कल्याण जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ. रेखाताई चौधरी तसेच युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पेणकर, नगरसेविका डॉ. सूनिताताई पाटील, शहर उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे, सरचिटणीस मनीषा छल्लारे तसेच संपूर्ण महिला मोर्चा आणि युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या प्रमुख सौ.वर्षा परमार, सौ.पूनम पाटील आणि सहप्रमुख ऐश्वर्या धोत्रे व हेमलता संत या होत्या. या कार्यक्रमास वड, पिंपळ तसेच आंबा असे १०० वृक्ष लावण्यात आले. तसेच टेकडी वर असलेल्या ५० ते ६० झाडांना खत टाकण्यात आले.

मराठा आरक्षणप्रकरणी फेरविचार याचिका लांबणीवर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठा आरक्षण रद्दबातल ठरविण्याचा निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील न्यायमूर्ती अशोक भूषण हे रविवारी निवृत्त होत असल्याने राज्य सरकार आणि आरक्षण समर्थकांच्या फेरविचार याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचा मुद्दा पुन्हा राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यासह अन्य मुद्दय़ांवर भूमिका घेण्यासाठी राज्य सरकार फेरविचार याचिकेवरील निर्णयाची प्रतीक्षा करणार आहे.

याप्रकरणी निकाल दिलेल्या पाच सदस्यीय पीठातील न्यायमूर्ती अशोक भूषण रविवारी निवृत्त होत असल्याने न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने शुक्रवार आठवडय़ाचा शेवटचा दिवस होता. न्यायालयाच्या शुक्रवारच्या कार्यक्रम सूचीवर या फेरविचार याचिकांचा समावेश नव्हता. त्यामुळे आता या फेरविचार याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी घटनापीठात नवीन न्यायमूर्तीची नियुक्ती करण्याचा मुद्दा सरन्यायाधीशांपुढे जाईल. त्यांनी नवीन न्यायमूर्तीची पाच सदस्यीय पीठात निवड केल्यावर फेरविचार याचिकांवर नियमानुसार न्यायमूर्तीच्या दालनात विचार होईल आणि तोंडी सुनावणी घ्यायची की नाही ? यावर निर्णय होईल, असे सर्वोच्च न्यायालयातील संबंधित प्रकरणातील वकिलांनी सांगितले. फेरविचार याचिकांवर सर्वसाधारणपणे न्यायमूर्तींच्या दालनातच सुनावणी होते. ही न्यायालयीन कार्यपद्धती असल्याचे मे.सर्वोच्च न्यायालयातील अँड. निशांत कातनेश्वरकर यांनी नमूद केले.

केंद्र सरकारची फेरविचार याचिका मे.न्यायालयाने फेटाळल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपा नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाकडे तातडीने प्रकरण सोपविण्याची मागणी केली आहे.

डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डयांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्डयांविरोधात मनसेने अनोखे आंदोलन करत सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केला. यावेळी मनसेने स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे भरलेले पाहायला मिळाले. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अद्याप या रस्त्यांच्या कामाला कोणत्याही प्रकारे सुरुवातच झाली नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले.

तसेच पावसाळा तोंडावर असताना यापूर्वीच रस्त्यांची कामे केली जाणे आवश्यक होते. गेल्या ७ वर्षांपासून खासदार याठिकाणचे प्रतिनिधित्व करत असूनही एवढा विलंब का लागत असल्याचा सवाल जिल्हाध्यक्ष भोईर यांनी उपस्थित केला.
त्यामूळे यासंदर्भात मनसेने आज स्वखर्चाने खड्डे भरण्याचे आंदोलन करत सत्ताधारी आणि प्रशासनाचा विरोध केला.

डोंबिवलीतून तलवारी, बटन चाकू पकडले; गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण पोलिसांनी छापामारी ची कारवाई करत डोंबिवलीतून तलवारी, बटन चाकू पकडून सदर प्रकरणी एकास अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, दिनांक ३०.०६.२०२१ रोजी खास बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, इसम नामे संदीप काष्टे व त्याचा मित्र रवि पवार हे घातपात करण्याचे हेतुने तलवारी, चाकु व धारदार हत्यारे जमा करून संदीप काष्टे हा राहत असलेल्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये जमले आहेत. त्या अनुषंगाने लागलीच गुन्हे शाखा युनिट-३ कार्यालय नेमणुकीतील पो.अधिकारी/अंमलदार असे पंचासह मिळालेल्या माहिती प्रमाणे डोंबिवली पुर्व येथे छापामारी कारवाई करणे करिता पाठविले असता सदर ठिकाणी आरोपी रवि राजु पवार हा मिळुन आला सदर ठिकाणी घराची झाडाझडती केली असता,
१) १,०००/- रू एक लोखंडी धारदार तलवार, तिस लोखंडी मुळ त्यास पत्र्याचे आवरण असलेली, तिचे पात्याची लांबी २५ इंच व रूंदी दिड इंच असुन पात्याची पुढील बाजु निमुळती असलेली जुवाकिंसु
२) १.०००/- रू एक कापडाचे आवरण असलेले पत्र्याचे म्यान असलेली लोखंडी धारदार तलवार, तिस लोखंडी मुठ त्यास पत्र्याचे आवरण असलेली, तिचे पात्याची लांबी २५ इंच व रूंदी दिड इंच असुन पात्याची पुढील बाजु निमुळती असलेली जुवाकिंसु
३) २००/- रू एक लोखंडी धारदार फोल्डींगचा पितळी मुळ असलेला चाकु, मुठेची लांबी ८ इंच, पात्याची लांबी ७ इंच व रूंदी दिड इंच असुन पात्याची पुढील बाजु निमुळती असलेली जुवाकिंसु
अशी शस्त्रे मिळुन आली आहेत.

सदर प्रकरणी मिळुन आलेली शस्त्रे जप्त करुन डोबिवली पो.स्टे. येथे फिर्याद नोंद करुन डोंबिवली पो.स्टे. गु.र.नं. १७७/२०२१ शस्त्र अधिनियम कलम ४,२५ सह म.पो.अॅक्ट कलम ३७(१)(३)/१३५ प्रमाणे अन्वये दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपी रवि राजु पवार, यांस गुन्हयात अटक करण्यात आली आहे तसेच सदर गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीस न्यायालयात हजर करण्याची तजवीज ठेवली आहे.

पाहिजे आरोपी संदिप काष्टे याचा शोध सुरु असुन आरोपींनी शस्त्र कोठुन आणली व आरोपीत हे शस्त्रासह काही घातपात, दखलपात्र गुन्हे करणार होते याबाबत गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीस करत आहे.

सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण दायमा, पोउपनिरी. नितीन मुदगुन पोउपनिरी. मोहन कळमकर, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, दत्‍ताराम भोसले, अजित राजपूत, मंगेश शिर्के, सचिन वानखडे, हरिश्चंद्र बंगारा, सचिन साळवी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे.

‘वाहतूक स्वयंसेवक’ संकल्पना डोंबिवली शहरामध्ये कार्यान्वित..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाहतुकीचे नियोजन व्हावे आणि अपघाताची संख्या शून्यावर यावी व वाहतूक नियमांचे पालन व्हावे याकरिता सामान्य नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा यासाठी डोंबिवली शहरात ‘वाहतूक स्वयंसेवक’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पने अंतर्गत जो उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्याचे मूळ उद्दिष्ट वाहतूक नियमन व रस्ता सुरक्षा संदर्भात स्थानिक पातळीवर जनजागृती करणे, लोकसहभागातून वाहतूक नियमन करणे, वाहतुकीची शिस्त राबविणे व समाजाभिमुख कार्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी मा. श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा, मा. श्री.उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाहतूक स्वयंसेवक’ ही संकल्पना शहर वाहतूक उपशाखा डोंबिवली तर्फे राबविण्यात येत आहे. ‘वाहतूक स्वयंसेवक’ संकल्पने अंतर्गत शहर वाहतूक उपशाखा डोंबिवली येथे २२ स्वयंसेवक हे त्यांच्या सुविधे नुसार दोन तास वाहतूक नियमनाकरीता वाहतूक पोलिसांना मदत करणार आहेत.

दिनांक ३०/०६/२०२१ रोजी मा. श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर यांच्या हस्ते डोंबिवलीतील २२ वाहतूक स्वयंसेवकांना ‘वाहतूक स्वयंसेवक’ असे लिहिलेले टी-शर्ट , टोपी व मास्क देण्यात आले असून डोंबिवली शहरात ‘वाहतूक स्वयंसेवक’ ही संकल्पना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

वाहतूक उपशाखा डोंबिवलीचे पोलीस निरीक्षक श्री.उमेश गित्ते यांनी याद्वारे आवाहन केले आहे की, डोंबिवली शहरातील सुजाण नागरिकांनी सदर संकल्पने मध्ये सहभागी होऊन जनजागृती करावी व वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यास सहभागी होऊन मदत करावी.