Home Blog Page 245

फडणवीसांच्या मागण्या महत्वाच्या; राज्यपालांचे मुख्यमंत्रांना योग्य कारवाईचे निर्देश

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, विधानसभा अध्यक्ष निवडीची आठवण करुन दिली आहे. येत्या ५ आणि ६ जुलैला विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यपालांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्यांच म्हणत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यपाल म्हणतात, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ २३ जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य ती कारवाई करुन, याबाबत मला कळवा” असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या शिष्टमंडळाने २३ जून रोजी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या. त्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. सरकारी पक्षाचे कार्यक्रम होतात, पण कोरोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचं घेतलं जातं. अधिवेशन दोन दिवसांचं आणि जिल्हा परिषद निवडणुका मात्र होतात, त्याला कोणता डेल्टा प्लस नाही ना कोणता व्हायरस. ज्या पद्धतीचे घोटाळे बाहेर येत आहेत, विद्यार्थी, महिला, आरक्षण याचा आक्रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिवेशनापासून पळ काढला जात आहे, हे अधिवेशन घेण्याची मागणी आम्ही केली. जास्तीत जास्त कालावधीचं अधिवेशन घ्यायला लावावं, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांचं पद रिक्त ठेवता येत नाही. अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर ते तसंच ठेवता येत नाही अस संविधान सांगत. मात्र तरीही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही. अध्यक्षपद रिक्त ठेवणं हे संविधानाच अवमुल्यन करण्यासारखं आहे. महाराष्ट्रात संविधानिक कारभार होत नाही हे तुम्ही राष्ट्रपतींना कळवा, अशी मागणी फडणवीस यांनी राज्यपालांकडे केलीय.
ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळ गेलं. ४० ते ५० वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलं नाही. आरक्षणाचा मार्ग निघेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं सरकारने सांगितलं होतं, पण त्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यापालांना विनंती केली आहे की या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात.

नरेंद्र मोदी व भाजपने बंजारा समाजाची फसवणूक केली ! – नाना पटोले

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय जनता पक्षाने धनगर, मराठा समाजाची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक बंजारा समाजाचीही केली आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो, असं लेखी आश्वासन दिलं होतं. पण आजपर्यंत त्यांनी त्यांचा तो शब्द पाळला नाही. बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या दैवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन इथं राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आलं. बंजारा टायगर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आ.राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ.राजू वाघमारे, आदी उपस्थित होते.

बंजारा टायगर फोर्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून नाना पटोले म्हणाले की, स्व.वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक साहेबांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी राज्यात ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करून राज्याला प्रकाशात आणले, वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती झाली. बंजारा समाजाने राज्याला दिशा दाखवून दिली. बंजारा समाज हा आत्मसन्मासाठी लढणारा, देशहितासाठी काम करणारा समाज आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस पक्षात विलीन झाली. टायगरला इलाका नसतो आणि पंजा फक्त टायगरकडे असतो आणि आता टायगर (वाघ) काँग्रेसमय झाला आहे, असा मिश्किल टोला पटोले यांनी लगावला.

डॉक्टर्स डे निमित्त मिरारोड वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणा-या कार्यक्रमांचे आयोजन

संपादक: मोईन सैय्यद / मिरारोड प्रतिनिधी

मुंबई: गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी डॉक्टरांनी आपले आयुष्य धोक्यात घालून अनेकांना जीवदान दिले आहे. कोविड काळात डॉक्टरांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी वॉक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड येथे राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. सुमारे १०० डॉक्टर्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कायर्क्रमातंर्गत समाजाप्रती नि: स्वार्थ सेवा दिल्याबद्दल डॉक्टरांना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश जाधव यांची विशेष उपस्थिती होती.

मीरा रोडच्या वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे सेंटर प्रमुख डॉ. पंकज धमिजा म्हणाले, डॉक्टर्स हे आपल्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. या कठीण परिस्थितीत जेव्हा आपण सर्व आपल्या कुटुंबाविषयी आणि स्वतःबद्दल काळजी घेत असतो, तेव्हा मात्र डॉक्टर्स त्यांच्या सुरक्षेचा विचार न करता अविरत रुग्णसेवा पुरविण्याचे काम करतात. डॉक्टरांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी या महामारीच्या काळात तणावातून मुक्त राहण्यासाठी रुग्णालयाने हा एक कार्यक्रम आयोजित केला होता. कराओके, स्टँड-अप कॉमेडी अॅाक्ट्स आणि त्यानंतर चाट पार्टी अशा अनेक मनोरंजन कार्यक्रमात डॉक्टर सहभागी झाले होते. रूग्णांच्या रक्षणासाठी त्यांचे कौतुक करून त्यांना रौप्य पदकांनीही गौरवण्यात आले. त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांच विशेष आभार देखील मानण्यात आले.

मीरारोड येथील वॉक्हार्ट हॉस्पीटलचे सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश एल. भालेराव सांगतात – डॉक्टर्स डे निमित्त आमच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळाली. हॉस्पिटलद्वारे आयोजित सर्व उपक्रमांचा आम्ही पुर्णतः आनंद घेतला. यामुळे आम्हाला आमच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःसाठी वेळ काढणे शक्य झाले आणि एकत्र येण्यास आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालविण्यास मदत झाली. साथीच्या आजाराच्या वेळी आम्ही आपली काळजी घेतली तशीच आमच्या सुरक्षेची काळजी हॉस्पीटलने घेतली यासाठी मी वोक्हार्ट हॉस्पीटलचे विशेष आभार मानतो

वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिका वाहतुकीसाठी खुली; मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

बांद्रा कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका आज वाहतुकीसाठी खुली झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यटन, पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही.आर.श्रीनिवास आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उड्डाणपुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, “या परिसरात माझे बालपण गेले. १९६६ पासून आम्ही या परिसरात राहत आहोत. या परिसराशी निगडीत खूप आठवणी आहेत. आता या परिसरात खूप वस्ती वाढली आहे. बीकेसी सारखे संकुलही उभे राहिले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने आता कलानगर जंक्शन येथे आणि परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही.’’

बांद्रा कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा वरळी सागरी मार्ग / एस.व्ही मार्ग, सायन/धारावी रस्ता, बांद्रा-कुर्ला संकुल जोडरस्त्यासहीत इतर दोन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. वाहतुकीच्या वेळेत साधारण १० मिनिटे बचत होणार आहे.या प्रकल्पांत तीन मार्गिका आहेत. पहिली वरळी बांद्रा सागरी मार्गाकडून बांद्रा-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी ८०४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका, दुसरी बांद्रा-कुर्ला संकुलाकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ६५३.४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आणि तिसरी धारावी जंक्शनकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ३४०० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आहे.

या प्रकल्पासाठी १०३ कोटी ७३ लाखांची तरतूद करण्यात आली होती. एकूण तीन मार्गिकेपैकी बांद्रा-कुर्ला संकुल ते बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाणारी मार्गिका २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

त्यानंतर आज दि.२८ जून २०२१ रोजी बांद्रा वरळी सागरी मार्ग ते बांद्रा-कुर्ला संकुल ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड यांना सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान!

संपादक: मोईन सैय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह


मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्वगायिका पलक मुच्‍छल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील सूर्यदत्त समूह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले.

मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाही, तर मातृत्व म्हणजे सहनशीलता, प्रेम व कारुण्यभाव असे सांगताना स्त्रीशक्ती अद्भुत असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.

मनुष्य कितीही यशस्वी झाला, संपन्न झाला व यशवंत झाला तरीही सुख-दुःखाच्या प्रसंगी त्याला आईचीच आठवण येते, असे सांगून माता, मातृभाषा व मातृभूमीचे स्मरण ठेवल्यास प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अधिक प्रगती करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर ल्युसी कुरियन, डॉ स्वाती लोढा, आरती देव, ॲड. वैशाली भागवत, तृशाली जाधव तसेच सूर्यदत्ता समूहाच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनादेखील सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूर्यदत्ता संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ निशिगंधा वाड, विशाखा सुभेदार व वैशाली भागवत यांनी सत्काराला उत्तर दिले. पलक मुच्छल यांनी गीत सादर केले तर उर्वशी रौतेला यांनी गढवाली गाणे गायले.