Home Blog Page 250

दोन भामट्यांनी नितीन गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करीत केली फसवणूक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे भाऊ आहेत. आयकर विभाग जे सोने जप्त करतो ते कमी किंमतीत ओळखीने मिळवून देतो तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, अशी बतावणी
करीत एकाला पाच लाखांचा गंडा घातल्याच्या तक्रारीवरून राजन गडकरी आणि आनंद गडकरी या बाप-लेकाविरोधात विष्णूनगर पोलीसांनी दोघा भामट्यांना
फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून विष्णुनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

अमोल पळसमकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल हे एका बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील नेमाडे गल्ली सुमित्र कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राजन गडकरी यांच्याशी त्यांची ज्योतिष पाहण्याच्या निमित्ताने जून २०१९ मध्ये ओळख झाली.

अमोल हे राजन गडकरी यांच्या घरी गेले असता राजन आणि त्यांचा मुलगा आनंदने त्यांना आमचे स्टेशन जवळ सोन्याचे दुकान आहे. माझे भाऊ नितीन गडकरी हे मंत्री आहेत. आयकर विभाग जे सोने जप्त करतात ते कमी किमतीत तुम्हाला ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रुपये द्या, असे गडकरी पिता-पुत्रांनी पळसमकर यांना सांगितले.

त्यांच्यावर विश्वास ठेवून अमोल यांनी पाच लाखांचा चेक सुपूर्द केला. एक ते दोन महिन्यांत तुम्हाला तुमचे सोने मिळून जाईल, असे राजन गडकरी यांनी सांगितले. परंतु दोन महिने उलटूनही सोने मिळाले नाही. गडकरी यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर लॉकडाऊन लागल्याने अमोल गावी निघून गेले. २५ मे रोजी ते पुन्हा पैसे मागण्यासाठी गडकरी यांच्याघरी गेले असता त्यांचे कुटुंब घर सोडून गेल्याची माहिती शेजाऱ्यांकडून अमोल यांना मिळाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमोल यांनी विष्णूनगर पोलीस ठाणे गाठत गडकरी पिता-पुत्रां विरोधात तक्रार दाखल केली.

या दोघांनी काही जणांना नोकरीचे आमिष दाखवीत फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मात्र या सर्व प्रकराबाबत पोलीसांनी हे कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. तर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

गडकरी कुटुंब बेपत्ता, सुनेची पोलीसात तक्रार..

राजन गडकरी, पत्नी अलका, मुलगा आनंद आणि नातू रुग्वेद, हे २४ मे पासून बेपत्ता झाल्याची तक्रार सून गीतांजली गडकरी यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. लहान मुलाला दवाखान्यात डोस देण्यास घेऊन जातो असे सांगून घराबाहेर पडले आणि ते आले नसल्याचे गीतांजली यानी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

संस्थापक संतोष भगत यांनी केले स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

अबोली महिला रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे.

लॉक डाऊनमुळे असलेले उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अबोली महिला रिक्षा चालक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी याबाबीचा गांभीर्याने विचार करुन स्वखर्चाने नेरुळ, अंबरनाथ, बदलापूर येथील रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करुन दिले.
त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपस्थित होते. ही मदत मिळाल्याबद्दल अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांचे महिला रिक्षा चालकांनी आभार मानले.

‘मुलींना मोबाइल देऊ नका, फोनवर बोलतात अन् मुलांबरोबर पळून जातात’ युपी महिला आयोगाच्या सदस्याचे वादग्रस्त विधान

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मीना कुमारी यांचे हे वक्तव्य मुलींशी संबंधित असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुली मोबाइलवर तासनतास बोलत असतात, त्यामुळे मुलींना मोबाइल देऊ नये, असे विधान मीना कुमारी यांनी केलंय. त्यांनी असेही म्हटले आहे की जर मुली बिघडल्या तर त्यासाठी त्यांची आई पूर्णपणे जबाबदार आहे. मीना कुमारी काही कार्यक्रमानिमित्त बुधवारी अलिगड येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मीना कुमारी म्हणाल्या, की “समाजातील महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीबद्दल स्वतः समाज गंभीर असला पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये मोबाईल एक मोठी समस्या बनली आहे. मुली मोबाईलवर तासनतास बोलत असतात. मुलांसोबत फिरत असतात. त्यांचे मोबाइल तपासले जात नाहीत, कुटुंबियांना याची माहिती नसते. आणि मग मोबाईलवर बोलता बोलताच त्या मुलांबरोबर पळून जातात.

आवाहन करताना त्या म्हणाल्या की मुलींना मोबाईल देऊ नका आणि जर तुम्ही मोबाईल दिले तर त्यांचे पूर्ण निरीक्षण करा. त्या म्हणाल्या की मातांवर मोठी जबाबदारी असते. जर आज मुलींचा नाश झाला तर त्यासाठी आईच जबाबदार आहेत. यावेळी त्यांनी आवाहन केले की मुलींना मोबाईल देऊ नका आणि जर तुम्ही मोबाईल दिले तर मुंलींवर लक्ष ठेवा. त्या म्हणाल्या की आईवर मोठी जबाबदारी असते. जर आज मुली वाईट मार्गाला जात असेल तर त्यासाठी आईच जबाबदार असते.

ठाण्यात मोबाईल चोरांमुळे महिलेचा मृत्यू; आरोपींना अटक!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाण्यात मोबाईल चोरांमुळे रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. हि घटना ठाण्यातील तीन हात नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मोबाईल चोरांना अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, सदर महिला हि ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कामाला होती. ती मैत्रिणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली. त्यांनी मॉलजवळील रिक्षा थांब्यावरून रिक्षा पकडली. रिक्षा तीन हात नाका येथे आली असता, मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सदर महिलेच्या हातातील मोबाइल खेचला. त्यावेळी तोल जाऊन ती महिला रिक्षातून खाली पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मैत्रिणीने तिला रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दोन्ही मोबाईल चोरांना अटक केली.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करणाऱ्यांना अटक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करून वाहतूक करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखा, बोईसर विभाग पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारनाका, ता. डहाणू, जि.पालघर येथे पोलीस संशयित वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान, एका टेम्पोमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा माल मिळून आला.

सदरचा माल हा मानवी आरोग्यास अपायकारक आहे व त्यावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेला आहे हे माहित असतानाही शासकीय आदेशाची अवहेलना करून यातील ३ इसम हे तंबाखूजन्य पदार्थाचा माल विक्री करण्यासाठी वाहतूक करून घेऊन जात असताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून तंबाखूजन्य माल आणि टेम्पो असा एकूण रुपये २१,८,८९६/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.