Home Blog Page 255

मंडणगडतालुक्यात कडक लॉकडाऊन प्रशासनाचे ऊत्तम नियोजन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: गणेश नवगरे

मंडणगड:गणेश नवगरे.कोरोनोच्या दुस-या लाटीमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या तालुका प्रशासनाचे आढावा बैठकीमध्ये सर्वच प्रशासनाचे विभागावांर नाराजी व्यक्त केली असताना त्यावेळी देखील पोलीस खात्याबाबत कोणतीही तक्रार किंवा चुक आढावा बैठकीत मिळालेली नव्हती त्यानुसार तालुक्यात खुप उत्तम प्रकारे पोलीस खात्याने आपली जबाबदारी पार पाडलेली असतानाच जिल्हाधिकारी यानी नुकतेच घोषित केलेल्या जिल्हयाचे कडक लाॅकडावूनची अमलबजावणी करताना पोलीस निरीक्षक श्री सुशांत वराळे यांनी आपले 27 पोलीस व 19 होमगार्ड यांचे सोबत नगरपंचायत मंडणगड यांचे साथीने आज पहील्याच दिवशी अतिशय उत्तम प्रकारे संपूर्ण शहर पूर्ण बंद ठेवून केलेल्या अमलबजावणीमुळे तालुक्यातील वाढत्या कोरोनो रूग्ण संख्येला नक्कीच आळा बसेल म्हणून जनमानसांतुन पोलीस खात्याचे व नगरपंचायतीचे कौतुक केले जात आहे. पुढील दिवसांतही असेच नियोजन करून तालुक्याचे वाढत्या रूग्णसंख्येच्या संकटातून दूर करण्यासाठी अशीच महेनत घ्यावी अशी मागणी तालुक्यातील जनमाणसांतून होत आहे.

मंडणगड शहरामध्ये व तालुक्यातून येणारे नागरीकांचे सुरक्षीततेसाठीव कडक लाॅकडावूनच्या अमजबजावणीसाठी पोलीस निरीक्षक श्री वराळे यांनी तालुक्यात रायगड जिल्ळयाचे बाजूस म्हाप्रळ या ठिकाणी महाड तालुक्याचे बाजूस लाटवण या ठिकाणी तसेच मंडणगड शहरातध्ये दापोलीस फाटा भिंगळोली गावाचे प्रवेशव्दारावर तसेच पालवणी फाटयावर असे ठिक ठिकाणी नाके लावून अनावश्यक फिरणारे नागरीकांना शहरात येणे जाणे पासून रोखण्याचे काम करीत असतानाच स्वतः पोलीस निरीक्षक सर्वच नाक्यांवर गस्त घालीत असून नगरपंचायत च्या मदतीने शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावून संपूर्ण शहर बंद ठेवण्याचे उत्तम नियोजन केले आहे. यामुळे तालुक्यात वाढती कोरोना रूग्ण संख्येस नक्कीच आळा बसेल व तालुक्यात वाढणारी कोरोनोची साखली तोडण्यास यांचे नियोजनाचा नक्की फायदा होईल अशी आशा सर्व सामान्य नागरीकांमधून व्यक्त केली जात आहे.

या नियोजनाला तालुक्यातील जनतेस व्यापा-यांनीही उत्तम प्रतिसाद दिला असून असाच पुढे काहीवस प्रतिसाद देवून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच वाढतील रूग्णसंख्या रोखीला सहकार्य करावे असे आवाहन श्री सुशांत वराळे यांनी सर्वसामान्य जनतेला तसेच व्यापा-यांना केले आहे.

१९ हजार लाचप्रकारणी फरारी पोलीस नाईक विलास सोनवणे एसीबीच्या जाळ्यात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जळगाव मध्ये धरणगाव येथे नेमणूकीस असलेला पोलीस नाईक विलास सोनवणे याने लाचेची मागणी केल्या प्रकरणी अ‍ॅंटीकरप्शन विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून तो फरार होता फिर्यादीस शिक्षा होणार नाही अशा पद्धतीने कागदपत्र तयार करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्याच्या मोबदल्यात १९ हजार रुपयांची विलास सोनवणे याने लाच मागितली होती.

या प्रकरणी पोलीस नाईक विलास सोनवणे याच्या विरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला होता. पोलीस नाईक विलास सोनवणे याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला दि.८ मार्च २०२१ रोजी भाग ५ गु.र.न. ११९/२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम ७ व भा.द.वि. ३९२, २०१, १८६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस नाईक विलास सोनवणे फरार होता. दि. २७ मे रोजी एसीबी जळगाव युनीट मधील धडाकेबाज पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील यांना सदर आरोपी जळगांव शहरातील बहिणाबाई उद्यान परीसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार हे.कॉ. दिनेशसिंग पाटील यांनी आपले कौशल्य वापरुन फरार पोलीस नाईक विलास सोनवणे यास शिताफीने आपल्या जाळ्यात ओढून ताब्यात घेत वरिष्ठांसमक्ष हजर केले.पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे यास आज जळगाव शहरातून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत.

नगर जिल्ह्याला अनलॉकची कोणतीही सवलत मिळणार नाही!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जिल्ह्याच्या पॉझिटिव्ह दरासह ऑक्सीजन बेडवरील रुग्णांची संख्या चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक असल्याने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू

एकीकडे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आजपासून मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची गती आणि जिल्ह्यात चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण ऑक्सीजन खाटांवर असल्यामुळे जिल्ह्याला आजपासूनच्या अनलॉक मधून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आसपासचे जिल्हे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुले असले तरीही अहमदनगर जिल्ह्यातील अत्यावश्यक व्यवहार मात्र पूर्वीप्रमाणेच सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु राहतील या वृत्ताला संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दुजोरा दिला आहे.

राज्य शासनाने आजपासून १५ जून पर्यंत पंधरा दिवसांपर्यंत लोकडाऊन वाढवला आहे. तसेच राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह दर दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे, तसेच तेथील ऑक्सीजन खाटा चाळीस टक्‍क्‍यांहून कमी भरलेल्या आहेत अशा जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून अत्यावश्यकसह अन्य व्यवसायांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्हे आजपासून खुले राहणार आहेत, मात्र त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे. त्यासोबतच वैद्यकीय आस्थापना व औषधांची दुकानेही सुरु ठेवण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारच्या घोषणेनुसार मंगळवारपासून बदल होईल असे जिल्हावासीयांना अपेक्षित होते, मात्र आजच्या तारखेला जिल्ह्यात १० हजार ८८४ सक्रिय रुग्ण असून चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक ऑक्सिजनच्या खाटा व्यापलेल्या आहेत. तसेच जिल्ह्यात रुग्ण समोर येण्याची सरासरी गतीही दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या नवीन अनलॉक नियमांचा अहमदनगर जिल्ह्याला कोणताही फायदा होणार नसून पुढील पंधरा दिवस आहे त्याच नियमांचे सर्वांना पालन करावे लागणार आहे. या वृत्ताला संगमनेरचे इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दुजोरा दिला आहे.

यंदाची सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: मिलन शाह

सीबीएसई बोर्डाकडून यंदाची बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विविध राज्यातील शिक्षण मंडळांनी घेतला होता.

पण कोरोनाची दुसरी लाट आणि वाढती रुग्णसंख्या पाहता बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सीबीएसईची बारावीची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयातही बारावी परीक्षाप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ३ जून रोजी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारला आपली बाजू सर्वोच्च न्यायालयातही मांडावी लागणार आहे.

सुरक्षेसह हजारोंच्या आरोग्याचीही रक्षणकर्ती, महिला पोलिसाचे करोना रुग्णांसाठी मोलाचे योगदान

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाकाळात कित्येक सहृदयी पोलिसांनी समाजभान जपत नागरिकांची सेवा केली.
मुंबईतील सशस्त्र दलात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या रेहाना शेख यांनी मात्र गेल्या सव्वा वर्षात आपल्या कामासह राज्यभरातील हजारो कोरोनारुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना औषधांपासून सर्व प्रकारची मदत मिळवून देत सेवाव्रताचा नवा आदर्श समोर ठेवला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोलीस दलात कोरोना संसर्ग बऱ्यापैकी फोफावला होता.
याच काळात एका अडलेल्या सहकाऱ्याने त्यांच्याकडे आपल्या वृद्ध आईसाठी रक्तद्रव (प्लास्मा) उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

रेहाना शेख यांचा दांडगा जनसंपर्क आणि मदतीला धावून जाण्याचा स्वभाव यांतून तातडीने या सहकाऱ्याच्या आईला प्लाझ्मा मिळाला. त्यानंतर शेख यांनी करोना रुग्ण आणि त्यांच्या हतबल नातेवाईकांना लागणारी मदत मिळवून देण्याचा चंग बांधला. बाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन, टोसिलीझुमॅब इंजेक्शन आदी औषधे, खाट, प्लास्मा, रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रेहाना यांनी आपला जनसंपर्क कामी आणला.
आपली नोकरी, संसार आणि दुर्धर आजाराने ग्रासलेल्या बहिणीची शुश्रूषा या सर्व आघाड्यांवर पुरून त्यांनी समाजसेवेचा हा गाडा अविरत सुरू ठेवला.

राज्यातील विविध भागांतून त्यांचा फोन चोवीस तास मदतीसाठी खणखणू लागला आणि गरजूंना मदत मिळेस्तोवर त्यांच्यासाठी रेहाना शेख झटत राहिल्या. मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या कोव्हिड कक्षातूनही रेहाना यांना विनंत्या येऊ लागल्या.