Home Blog Page 266

जागतिक परिचारिका दिनानिमित्त डोंबिवलीतील परिचरिकांचा मनसेकडून सन्मान

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून मनसे नेते आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पाठपुराव्याने आणि मनसे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश गोपिनाथ भोईर व माजी नगरसेविका सरोज प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या अमोघ सिद्धी हॉल डॉन बॉस्को स्कूल या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरील सर्व परिचारिकांचे गुलाबाचे फूल, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उपविभाग अध्यक्ष संदीप भास्कर म्हात्रे, विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, शाखाध्यक्ष कदम, भोईर, नीतीश दिपनाईक, मनविसे शहर सचिव प्रितेश म्हामुणकर महाराष्ट्र सैनिक समीर चाळके, ओमकार उतेकर, तनय दळवी, भूषण घाडी संकेत सावंत, जीत भोईर, मयुरी भोईर, श्रुतिका शिरवाडकर, प्रीती म्हामूणकर, मधुर वालीपकर, समीर जयस्वाल उपस्थित होते.

राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीकरीता आवश्यक सेवेची अट शिथिल करण्याचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीकरिता आवश्यक सेवेची पंधरा वर्षाची अट शिथिल करुन बारा वर्ष करण्याचा तसेच प्रतिनियुक्तीच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राज्य राखीव पोलीस बलातून राज्य (जिल्हा) पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीकरिता पंधरा वर्ष सेवेची अट कमी करण्याबाबत तसेच राज्य राखीव पोलीस बलातील पोलीस कर्मचारी यांच्या सेवाशर्ती अधिक चांगल्याप्रकारे कशा करता येतील यासंदर्भात पोलीस महासंचालक व अपर पोलीस महासंचालक (राज्य राखीव पोलीस बल) यांची एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीला वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, परिपत्रक यांचा अभ्यास व अवलोकन करुन एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सादर केलेल्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अपर मुख्य सचिव (गृह) मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (अपिल व सुरक्षा) आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक (राज्य राखीव पोलीस बल) अर्चना त्यागी, उपसचिव (गृह) व्यंकटेश भट आदी मान्यवर उपस्थित होते. अपर पोलीस महासंचालक (राज्य राखीव पोलीस बल) अर्चना त्यागी यांनी बैठकीत अहवालातील शिफारशींबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी समितीने सादर केलेला अहवाल व त्यातील शिफारशींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या अहवालातील शिफारशीनुसार राज्य राखीव पोलीस बलातून जिल्हा पोलीस दलात दाखल होणेसाठी पूर्वीची पंधरा वर्ष सेवा पूर्ण ऐवजी बारा वर्ष अशी अट करावी. तसेच बदली झाल्यानंतर पहिले पाच वर्ष जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्तव्य करावे लागत आहे. त्यामध्ये बदल करुन हा कालावधी दोन वर्ष करावा असा निर्णय घेण्यात आला आहे.

या समितीने प्रतिनियुक्तीबाबत देखील शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार जे पोलीस अंमलदार विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर गेलेले आहेत त्यांना प्रतिनियुक्तीच्या ठिकाणाहून त्यांच्या मूळ ठिकाणी परत आल्याशिवाय बदलीसाठी विनंती अर्ज करता येणार नाही, तसेच या कमाल कालावधीपेक्षा जितके जास्त वर्ष ते प्रतिनियुक्तीवर राहतील त्यांचा बदलीसाठी तेवढ्या वर्षानंतर विचार करण्यात येईल. या शिफारशीलाही यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच याबाबतचा शासन आदेश तात्काळ निर्गमित करण्याचे निर्देश गृहमंत्री श्री.वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा पाठपुरावा; गृहमंत्र्यांचे मानले आभार

एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयासाठी मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरुन एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांचे मनोबल उंचावणार असून अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांचेही आभार मानले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपला विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपला विभाग अधिक सक्षम करावा अशी महत्वपूर्ण सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पाणीपुरवठा आणि मलनिसारण विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाइन व्हीसीद्वारे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेकडे राज्यातली अनेक महत्वाची काम सुरू असली, तरीही ती पूर्ण करण्याची गती वाढवण्याची गरज आहे. राज्याच्या विकासातील महत्वाचा घटक असलेल्या या प्राधिकरणाने त्यासाठी वेगाने हालचाली करण्याची गरज श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. प्राधिकरणातील काम पूर्ण करण्यासाठी तज्ञ संस्थांची मदत घेणे तसेच एमएसआरडीसीच्या धर्तीवर या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दिलेले काम प्राधिकरण वेळेत पूर्ण करते अशी खात्री पटली तरच राज्यातील महानगरपालिका अनेक काम तुमच्याकडे देतील असा विश्वस श्री. एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला.

मंत्रीमहोदयांनी केलेल्या सूचनेनुसारच अनेक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपन्यांच्या सहकार्याने यापुढे काम करण्याचे प्राधिकरणाने निश्चित केले असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी, शहा कन्सल्टन्सी, प्राइमो कन्सल्टन्सी, पुराणिक व्हेंचर्स, एमएसपी इंटरनॅशनल यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांची मदत घेणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तसच कंत्राटी पध्दतीने अभियंते आणि उप-अभियंते यांची रिक्त पदे भरून हा विभाग गतिमान करणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

या बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे मंत्री श्री. गुलाबराव पाटील, या खात्याचे राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे, नगरविकास विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, नगरविकास विभागाचे सचिव श्री. महेश पाठक आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

भाजपाच्या माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांच्या प्रयत्नाने सागाँव- सागर्ली भागातील पाणी प्रश्न सुटणार

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील सागाँव-सागर्ली येथील सागावेश्वर मंदिर जवळ २० हजार दशलक्ष पाणी साठवणूक क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. कोरोनाचे संकट पाहता यावेळी मोजक्याच कार्यकर्त्यांनासह हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी भाजप च्या माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील, नामदेव पाटील, सुहासिनी राणे, पूनम पाटील, जनार्दन भोईर, भाऊ ठाकूर, प्रफुल पठारे, ऋषिकेश देशमुख, उमेश भंडारे, वसंत सुखदरे, छाया कांबळे, दिलीप पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता मागील अनेक वर्षांपासून माजी नगरसेविका डॉ.पाटील ह्या महानगरपालिकडे पाठपुरावा करत होत्या. माजी नगरसेविका सुनीता पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पुढील वर्षभरात प्रभागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी निघेल असे यावेळी डॉ.सुनीता पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच अमृत योजना अंतर्गत व कल्याण-डोंबिवली (मुंबई महानगर प्रदेश) मध्ये अनेक कामं मंजूर करवून घेउन बरीच कामे जलद गतीने होत आहेत. बरीचशी कामे प्रगतीपथावर आहेत त्याबद्दल माजी नगसेविका डॉ. सुनीता पाटील, पालकमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.

लोकल ट्रेनमध्ये आवश्यक सेवा पुरवठादाराखेरीज इतरांना परवानगी देणार नाही; महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली माहिती

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई हायकोर्टाने मंगळवारी स्पष्ट केलं की मुंबईतील लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेलमध्ये प्रवास करण्यावरील सध्याचे निर्बंध या टप्प्यावर शिथिल केले जाणार नाहीत कारण अद्याप कोविड कोरोनाची प्रकरणे पसरत आहेत.

कार्यवाह सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी खंडपीठाला माहिती दिली की शहरातील आघाडीचे आरोग्य कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांना शहरातील लोकल गाड्या, मेट्रो किंवा मोनोरेलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सहकारी बँका कर्मचारी युनियनने (सीबीईयू) दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून हे निवेदन देण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या कामात लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेल सेवांच्या मार्गाने प्रवास करण्याची परवानगी मिळावी यासाठी राज्य शासनाकडे निर्देश मागितले.
सीबीईयूचे वकील ए.एस पीरझादा यांनी खंडपीठाला सांगितले की, गेल्या वर्षी पूर्ण ताळेबंद असताना त्याच्या ग्राहकांना लोकल गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली. त्यांचे म्हणणे आहे की त्यांचे ग्राहक आवश्यक बँकिंग सेवा करीत आहेत.

पीरजादा पुढे म्हणाले की, सध्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचार्‍यांना वाहतुकीच्या या पद्धतींमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आणि अशा प्रकारे, सहकारी बँकांच्या तसेच खाजगी बँकांच्या कर्मचार्‍यांनाही लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. यावर काकडे यांनी खंडपीठाला माहिती दिली की राष्ट्रीयकृत बँकांच्याच नव्हे तर केवळ सरकारी कर्मचार्‍यांनाच परवानगी दिली जात आहे.
ते म्हणाले, “राज्यात कोविड चे संक्रमण अद्यापही पसरले आहे. आम्ही आत्ता इतर कोणासाठीही गाड्या उघडू शकत नाही.”

दरम्यान, आणखी एक याचिका नमूद केली गेली आहे ज्यात अधिवक्ता के.आर.तिवारी यांनी खंडपीठाला वकिलांना स्थानिक गाड्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्याची विनंती केली.
ते म्हणाले की, गेल्या वर्षी न्यायालयात जाण्यासाठी वकिलांना स्थानिक गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.