Home Blog Page 270

दुरुस्ती व प्रलंबीत सर्व कामे २५ मे च्या अगोदर मार्गी लावा – पालकमंत्री एकनाथ शिंदे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पावसाळा जवळ आला आहे.२५ मे च्या अगोदर सर्व रस्त्यावरील खड्डे, प्रलंबित कामे
मार्गी लावा अशा सुचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून २०२१ पुर्वतयारी बाबींच्या पूर्वतयारीची ऑनलाईन आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषदादा पवार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, ठाणे महानगर पालिका आयुक्त बिपीन शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, पोलीस आयुक्त सदानंद दाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांसह सर्व महानगरपालिकांचे आयुक्त व विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सहा महानगर पालिकांचे आयुक्त यांच्याकडून मान्सुन पुर्व तयारी ऑनलाईन आढावा घेतला व संबधिताना सुचना केल्या. प्रलंबीत कामे, नालेसफाई, रस्तावरील खड्डे, यांची कामे त्चरीत मार्गी लावा. आपत्ती काळात मदतीसाठी बोटी भाड्यांनी घेऊन ठेवणे असेही ते बोलले.

कोरोनाचा प्रादुभार्व असल्यामुळे पावसाळ्यात विज खंडीत होणार नाही यासाठी विद्युत विभागाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना सेंटरची पावसामुळे काही नुकसान होणार नाही यांची काळजी संबधीतानी घ्यावी. अती धोकादायक इमारतीमधून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा सुचना पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कडे एमआयडीसी भागात लसीकरणाची शिवसेनेची मागणी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एमआयडीसी (निवासी) भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक नागरिक बाधित होत आहेत तर कित्येक नागरिकांचे कोरोना मुळे निधन झाले आहे. या भागातील कोरोनाचा संसर्ग अटोक्यात यावा यासाठी महापालिकाद्वारे लसीकरण करण्याची मागणी एमआयडीसी शिवसेना शाखेच्या वतीने खासदर डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

एमआयडीसी निवासी विभाग आणि आसपासच्या ग्रामीण भागात कोरोनाची झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक गंभीर रुग्णांचे निधन झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून एमआयडीसी आणि आसपासच्या परिसरातील ग्रामीण भागासाठी लसीकरण केंद्र त्वरित सुरु करावे अशी मागणी एमआयडीसी निवासी शिवसेना शाखेच्या वतीने विभागप्रमुख धर्मराज शिंदे यांनी खासदर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत शनिवारी निवेदन देण्यात आले.

ठाण्यात जेष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन लसीकरण सुविधा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोज 100 नोंदणीकृत नागरिकांनाच घेता येणार लस..

विवियाना मॅालच्या पार्किंगमध्ये महापालिकेचे नियोजन..

ठाणे येथीललसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांची कोणतेही गैरसोय होवू नये यासाठी ठाण्यात विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. येत्या दोन दिवसात हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असून या केंद्रावर रोज नोंदणी केलेल्या केवळ १०० ज्येष्ठ नागरिकांनाच सकाळी १० ते १ या वेळेत लस देण्यात येणार आहे.

शहरात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ सुविधा सुरू करण्याच्या सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतखाली काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सर्व पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय गटनेते यांच्या बैठकीतही चर्चा झाली होती.

या लसीकरण केंद्रामध्ये गाड्यांना येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडस लावण्यात येणार आहेत. त्यामुळे बाहेर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच लसीकरणानंतर निरीक्षणासाठीही पार्किंगमध्येच व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

लसीकरण केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुविधा, अर्ध्या तासाच्या विश्रांतीसाठी व्यवस्था आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था केली जाणार आहे. ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी, तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे.

मुरबाड तालुक्या मध्ये कोविड-१९ लसीकरण चा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुरबाड तालुक्या मध्ये ८ जानेवारी पासून कोविड-१९ च्या लसीकरणासाठी सुरवात झाली त्यात पहिला टप्पा १५,१०७ तर दुसरा टप्पा १७,०५५ ऐवढी संख्या लसीकरणासाठी पूर्ण झाली असून पुढील लसीकरण चालू राहणार आहे असे डॉ. बनसोडे तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना दिली. मुरबाड मधे सात आरोग्य केंद्रामध्ये हे लसीकरण करण्यात आले. ग्रामिण रुग्णालय मुरबाड पहिला टप्पा ४,६४४ तर दुसरा टप्पा १,१५१, प्राथमिक आरोग्य केंद्र किशोर पहिला ट्प्पा १,६२० दुसरा टप्पा ५९, प्रा.आरोग्य केंद्र सरळगाव १,६३७ दुसरा टप्पा १५०, प्रा.आरोग्य केंद्र शिवले पहिला टप्पा १,२९९ दुसरा टप्पा ७४, आरोग्य केंद्र शिरोशी पहिला टप्पा ८६२ दुसरा टप्पा ८४, मोरोशी प्रा.आरोग्य केंद्र पहिला टप्पा ५९१ दुसरा टप्पा/४६, धसई प्रा.आरोग्य केंद्र पहिला टप्पा १,३७७ दुसरा टप्पा १२४, म्हसा आरोग्य केंद्र पहिला टप्पा १,४०४ दुसरा टप्पा १६२, तुळई प्रा. आरोग्य केंद्र १,०३३ दुसरा टपा १२४, अशी लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे यांनी यावेळी बोलताना प्रसार माध्यमांना दिली.

स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशात काही दिवसांत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे.
देशात १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहेत.
अशातच ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस उपचारासाठी वापरण्यात येत आहे. ‘स्पुटनिक व्ही’ मुळे भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता तिसरी लस मिळाल्यामुळे भारतासाठी हा दिलासा ठरणार आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने कोरोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६० हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे. कॉंग्रेसचे नेते मल्लुकर्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘स्पुटनिक व्ही’च्या लसींचे दीड लाख डोस भारतात पोहोचले असल्याची माहिती दिली. तसेच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडानेही भारतात उत्पादनांसाठी स्थानिक कंपन्यांशी करार केला आहे असे सांगितले.