Home Blog Page 271

कोरोना योद्धेच होता आहेत घायाळ; आठवडय़ाभरात १,२०३ पोलीस बाधित

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईत राज्य पोलीस दलातील कोरोना बाधितांची संख्या वाढली असून गेल्या सात दिवसांत १२०३ पोलीस बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेले अधिकारी, अंमलदार बाधित झाल्याने पोलीस दल अत्यंत चिंतेत आहे. शुक्रवारी राज्य पोलीस दलातील २० अधिकारी, १६० अंमलदार बाधित झाले. त्यापैकी १८ जणांनी पहिली तर २६ जणांनी दुसरी लस घेतली होती.

मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यातील अंमलदार संदीप तावडे यांचा शनिवारी कोरोनाने मृत्यू झाला. त्यांनी दुसरी लस मार्चमध्ये घेतली होती. मुंबई पोलीस दलात ७५ टक्के मनुष्यबळाने लशीची पहिली मात्र घेतली असून दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांवर आहे. राज्य पोलीस दलात आतापर्यंत ४२ हजार १०६ पोलीस बाधित झाले. त्यापैकी ३८ हजार २८६ जणांनी कोरोनावर मात केली. ४३२ जणांचा मृत्यू झाला. तर ३ हजार ३८८ जण सध्या उपचार घेत आहेत.

उपचार केंद्रे पोलिसांसाठी कोरोना उपचार केंद्रांची तजवीज केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर यांनी दिली. सध्या कलिना येथे सुमारे २५० खाटांचे उपचार केंद्र सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शहराच्या पाच प्रादेशिक विभागांत स्वतंत्र उपचार केंद्र उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. पाचही विभागांमध्ये खासगी, शासकीय इमारती उपचार केंद्रांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. केंद्रांमध्ये आवश्यक असलेली यंत्रणा, डॉक्टरांसह आरोग्य सेवकांचे मनुष्यबळ तयार ठेवण्यात आले आहे.

ठाणे येथील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून आईची सावली ह्या बालक आश्रमास मदतीचा हात

संपादक: मोईन सय्यद / ठाणे, प्रतिनिधी

सध्या कोरोना संकटात समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी वैयक्तिक पातळीवर विशेष प्रयत्न म्हणून सरस्वती सेकंडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून आईची सावली ह्या बालक आश्रमास वस्तरुपात मदत करण्यात आली.

टिटवाळा येथील आईची सावली ह्या बालक आश्रमात सुमारे 30 बालके असुन ह्या माध्यमातून त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

‘विद्या विनयेन शोभते’ हे सरस्वती सेकंडरी स्कूलचे ब्रीदवाक्य उपक्रमशील सामजिक कृतीतून माजी विद्यार्थ्यांनी खरया अर्थाने सार्थ केले.

ह्या सामजिक उपक्रमात चिन्मय, गौरी, सर्वज्ञा, करुणा आणि श्रीकल ह्यांनी सढळहस्ते मदतीचा हात पुढे केला.

ह्या मदतीतून 30 बालकांना किमान 2 महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. संस्थेच्या संस्थापक श्रीमती. दीपाताई ह्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.

कोरोना काळात कामधंदा नसल्यामुळे पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

प्रतिनिधी: मिलन शाह, लोणी काळभोर, पुणे –

बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय २८) तिचा गळा दाबून तर मुलगा शिवतेज हनुमंत शिंदे (वय १ वर्ष २ महिने) याचा सुरीने गळा कापून खून केला.

याप्रकरणी दर्याप्पा अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दिली असून लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. कामधंद्यासाठी मागील काही महिन्यांपासून ते कदमवाक वस्ती परिसरात आले होते. येथील एका घरात ते भाड्याने राहत होते. मागील काही दिवसांपासून काम नसल्यामुळे हनुमंत शिंदे बेरोजगार होता. यामुळे त्याला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हे भयानक कृत्य केले. पत्नी आणि लहान मुलाचा खून केल्यानंतर त्याने राहत्या घरात बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

टेम्पो चालकास जबरीने लुटणाऱ्यांना अटक

संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो चालकास जबरीने लुटणाऱ्या ३ जणांना कोनगाव पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल व रोख रक्कम हस्तगत केली आहे.

याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पोमधून आग्रा येथून बटाट्याचा माल भरून कल्याण येथे नाशिक मुंबई रोडने जात असताना सरवलीपाडा येथे त्यांच्या गाडीच्या पाठीमागून मोटार सायकलवरून तीन जणांनी येऊन फिर्यादीस ओरडून ‘गाडी रोक तुमने हमे कट क्यू मारा’ असे म्हणत फिर्यादी आणि साक्षीदार यांना मारहाण करून फिर्यादी यांचा मोबाईल आणि रोख रक्कम जबरीने काढून घेतले व टेम्पोची काच फोडून नुकसान केले असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून ३ जणांना अटक करून त्यांच्याकडून मोटार सायकल, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ३४,८००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.

डोंबिवलीच्या शिवसेना मध्यवर्ती शाखेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ऑक्सिजन बँकेचे उदघाटन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज दि.०८.०५.२०२१ रोजी ऑक्सिजन बँकेच्या उदघाटन प्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ह्या ऑक्सिजन बँकेचे उदघाटन झाले. अत्यावश्यक गरजू लोकांना मोकळ्या हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर युनिट रोलिंग तत्वावर निशुल्क वाटण्यात आले.

यावेळी कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर सौ. विनिताताई राणे, कल्याण लोकसभा युवासेना जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक धनंजय बोडारे, राजेश कदम, सागर जेधे, माजी परिवहन समिती सभापती सुधीर पाटील, उपशहर प्रमुख संदीप चव्हाण, कार्यालय प्रमुख सतीश मोडक, उपशहर संघटक दीपक भोसले, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविताताई गावंड, डोंबिवली विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, डोंबिवली शहर विधानसभा अधिकारी राहुल म्हात्रे, माजी परिवहन सभापती संजय पावशे, परिवहन सभापती मनोज चौधरी, माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील, वसंत भगत, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, विभागप्रमुख अमोल पाटील, कल्याण ग्रामीण संपर्कप्रमुख एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील हे या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते..