Home Blog Page 272

राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात महाभयंकर कोरोना संसर्गाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनते पर्यंत महत्वाची माहिती पोहोचवीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने ‘कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स’ कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रकारांना ‘कोविड फ्रंटलाईन वॉरीयर्स’ अर्थात कोरोना योद्धा पदाचा दर्जा पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार या राज्यांनी दिला आहे. महाराष्ट्राला महनीय पत्रकारांची परंपरा लाभली आहे. ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकार ने पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. लॉकडाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये ही पत्रकारांचा समावेश महाविकास आघाडी सरकार ने केलेला नाही. परिणामी पत्रकार आणि कॅमेरामन फोटोग्राफर यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. अन्य राज्यांत पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वारॉयर्स चा दर्जा दिला असताना महाराष्ट्रात पत्रकारांना रेल्वे प्रवासाची अत्यावश्यक सेवेत नोंद घेतली जात नाही. ही खेदजनक बाब आहे. पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा महाविकास आघाडी सरकारने करू नये. राज्यातील पत्रकारांना कोरोना योध्याचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोनाच्या या बिकट काळात १२४ पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार ने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे तसेच कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला सांत्वनपर ५० लाख रुपये मदत निधी द्यावा त्यासाठी ‘कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्धा’ म्हणून पत्रकारांना दर्जा द्यावा अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्र पाठवून केली आहे.

पालिकेच्या डोंबिवलीतील लसीकरणात भाजपा च्या समीर चिटणीस यांची नियोजनबध्द आखणी; लाभार्थींचा अभिप्राय नोंदवून कौतुक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवलीत गेल्या चार दिवसाने पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून डोंबिवली पश्चिम येथील ‘सावित्रिदेवी बसप्पा हेबळी’ विद्यालयातील लसीकरण केंद्रावर ३२० जणांना लस देण्यात आल्याची माहिती भाजपचे मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यांनी दिली. अनेक लाभार्थ्यांनी सदर लसीकरण केंद्राच्या शिस्तबद्ध व नियोजनबध्द कामाचे अभिप्राय नोंदवहीत नोंदवून कौतुक केले आहे, तर जेष्ठ नागरिकांनी सदर केंद्रातील लसीकरणाच्या नियोजनबद्ध आखणीबद्दल समाधान व्यक्त केले.

बुधवारी सकाळी १२.३० वाजता या केंद्रावर महापालिकेकडून लसीच्या कुप्यांचा पुरवठा करण्यात आला. त्यांनतर उत्तम नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने या सेंटरवर लसीकरण करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर अनेक नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू झाले असून सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे, मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस, मंडळ उपाध्यक्ष अमोल दामले, दिलीप धुरी, सुरेश जोशी, गीता नवले आदी कार्यकर्ते ही लसीकरणाची मोहीम राबवत आहेत. अनेक लाभार्थ्यांनी लस घेतल्यानंतर ताटकळत न ठेवता लसीकरण सेवा उपलब्ध करुन दिल्याने लसीकरण केंद्राबद्दल समाधान व्यक्त केले व लसीकरण नियोजन बध्द होत असल्याने नागरिकांनी अभिप्राय नोंदवही ठेवण्यासाठी आग्रह केला होता. या नोंदवहीत अनेकांनी या केंद्राच्या नियोजनाचे कौतुक केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेने खोळंबा होऊ न देता लस पुरवठा पुर्ववत केल्याने भाजपा मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस यांनी महापालिका आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी आणि पालिका अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

लस वाटपाचा कोपरगावात फज्जा, तरुणाईचा संताप उफाळला !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज कोरोना लस देण्याच्या वेळी आरोग्य विभागाकडून नियोजनाचा अभाव दिसून आल्याने उपस्थित तरुणांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्याने अखेर या ठिकाणी नागरिकांना पांगविण्यासाठी शहर पोलिसांना पाचारण करावे लागल्याची नामुष्की दिसून आली असून या बाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे व कोविड साथीत नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे आवाहन अनेकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.

या बाबत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी दुजोरा दिला आहे. मात्र सविस्तर माहिती,”जाऊद्या” म्हणून टाळली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, नियोजन कोलमडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र त्या ठिकाणी लाठी चार्ज केल्याच्या घटनेला थेट उत्तर देणे टाळले आहे. मात्र अनेक उपस्थितांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान हीच स्थिती तालुक्यातील अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांवर होती.

राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. पण लोकसंख्येच्या प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याने राज्यात काही ठिकाणीच, कमी प्रमाणात या वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पण राज्यातील लसीकरणाच्या अभियानासमोर आणखी एक समस्या निर्माण होत असून त्या काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. अशीच घटना कोपरगाव तालुक्यात घडली असून कोपरगाव तालुक्यात प्रथम आज वय वर्ष १८ ते ४४ नागरिकांना लस देण्याचे आवाहन काल करण्यात आले होते.

त्यासाठी ठिकाणाचे शहर आरोग्य विभागाने नियोजन केले होते व त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात छोटाशा मंडपात सोय करण्यात आली होती. त्या साठी एकूण तीनशे लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र ‘लसी कमी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती’ असे विचित्र चित्र निर्माण झाले होते. त्यासाठी या लस इच्छुकांना संदेश देताना मात्र काही नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भ्रमणध्वनिवरून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष लस देताना व्यवस्था भलत्याच ठिकाणी केलेली होती.मात्र वय वर्ष १८ ते ४४ साठी सोय कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात केली होती. तर लघु संदेश लस देण्याच्या काही मिनिटं आधी देऊन लस धारकांची नावे सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी करून गोंधळ उडालेले दिसून आला. त्या मुळे हा संताप अखेर तरुणाईने आरोग्य विभागाचे नियोजनासाठी लावण्यात आलेले टेबल खुर्च्या उधळण्यापर्यंत हा गोंधळ वाढल्याने अखेर आरोग्य विभागाला शहर पोलिसांना पाचारण करावे लागले. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकाणच्या तरुणाईला आटोक्यात आणले आहे.

या बाबत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी दुजोरा दिला आहे. मात्र सविस्तर माहिती,” जाऊद्या…” म्हणून टाळली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,” नियोजन कोलमडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे”. मात्र त्या ठिकाणी लाठी चार्ज केल्याच्या घटनेला थेट “उत्तर देणे” टाळले आहे.मात्र अनेक उपस्थितांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे.

कोपरगाव आरोग्य विभागाच्या कारभाराचा थेट फज्जा उडण्याची हि पहिलीच घटना असली तरी आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची लक्तरे या आधी वेशीला टांगली गेली असून अनेक रुग्णांना कोरोना रुग्ण तपासणी संचचा अभाव, रेमडीसीविर इंजेक्शन, ऑक्सिजन, खाटांची कमतरता यांच्या बाबत सविस्तर वृत्त छापून आले आहे. पुढाऱ्यांची प्रसिद्धीची “अधिकची हौस” दिसून आली आहे. नागरिकांना त्यामुळे मोठी किंमत चुकवावी लागली आहे. आलेल्या नागरिकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेले नव्हत्या. पाण्याची व्यवस्था आदींचा अभाव दिसून आला आहे. ह्या गर्दीमुळे कोरोना प्रसार होण्याची शक्यताच अधिक बळावली आहे. त्याबाबत आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यात नेमके किती कोरोना रुग्ण, किती मृत्यू याचा प्रसिद्धी माध्यमांसकट कोणालाही थांगपत्ता नाही हा या तालुक्याच्या कारभाराचा विशेष असे म्हटले जाते.

दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांना वर्क फ्रॉम होम ची सुविधा राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी धनंजय मुंडेंचे दिलासादायक निर्णय

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना चाचणी उपचार लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागणार नाही

दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट

दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी रांगेत तिष्ठत उभे रहावे लागू नये, तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी निर्माण व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना रांगेत उभे न राहता प्राधान्य दिले जावे, असा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.

तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा देण्याचा निर्णयही मुंडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.

दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवासाची व रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, कोरोना बाधित असल्यास त्यावरील उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, त्यांना रांगेत उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.

या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पत्राद्वारे आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला कळवले आहे.

राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत विविध कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकान्वये राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देत घरातून कामकाजाची (वर्क फ्रॉम होम) मुभा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा संबंधित विभाग/आस्थापनांनी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशित करण्यात आले आहे. असे करताना कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होणार नाही याकडेही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येऊन पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थितीत सूट देण्यासह दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देणे हे दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल विविध दिव्यांग संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच सामाजिक संस्थांनी सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

बनावट आरटीपीसीआर कोरोना स्वॅब स्टिक प्रकरणी सूत्रधारावर गुन्हा दाखल; रॅकेटचा होणार पर्दाफाश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गोरगरिबांना ठराविक रकमेत कोरोनाच्या आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी वापरणाऱ्या जाणाऱ्या स्टिकच्या पॅकिंगचे काम देणारा सुत्रधार हा उल्हासनगरातील रबर कारखानदार निघाला आहे. मनिष केसवानी, असे त्या सुत्रधाराचे नाव असून एफडीएचे (अन्न व औषध प्रशासन) अधिकारी विलास तासखेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनिषवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी मनिष फरार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे परदेशी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट स्वॅब किट आरोपी तयार करत असल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या अटकेनंतर स्वॅब आरटीपीसीआर टेस्टच्या स्टिक बनवण्यामागील रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त अवघ्या २० रुपयांत एक हजार स्टिकच्या पॅकिंगचे काम उल्हासनगर कॅम्प २ च्या खेमानी परिसरात संत ज्ञानेश्वर नगर परिसरात घराघरात महिला, लहान मुले ही हातात हॅन्डग्लोव्ह्ज व तोंडाला मास्क न लावता तसेच सॅनिटायझर न वापरता स्वॅब स्टिकची पॅकिंग करत असल्याचा प्रकार व्हिडिओद्वारे व्हायरल झाला होता.

या कामामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्या स्टिक जमिनीवर ठेऊन त्यांची प्लास्टिकच्या एका पॅकेटमध्ये पॅकिंग केली जात होती. विशेष म्हणजे मनिष केसवानी याने महिलांना अवघ्या २० रुपयात एक हजार स्टिकच्या पॅकिंगचे काम दिले होते.माहिती देताना आरोग्य अधिकारी परदेशी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट स्वॅब किट एफडीए चे अधिकारी विलास तासखेडकर यांच्या तक्रारीत मनिष याने किट बनविणाऱ्या एका परदेशी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून व कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट स्वॅब किट तयार करून घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपी मनिष केसवानी याच्यावर गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस आयुक्त डी. डी .टेळे, उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी संत ज्ञानेश्वर नगरात असणाऱ्या मनिषच्या कारखान्यात व घरावर छापा टाकला. पण तो फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी किंबहूना त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

मनिषच्या अटकेनंतर अनेक प्रश्नांच्या उलगडा होईलच सोबत रॅकेटचा पर्दाफाश होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.