Home Blog Page 29

हजारो वारकरी, टाळकरी आणि मृदुंगधारी यांच्या उपस्थितीत आज होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या आगरी कोळी आणि वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा हजारो वारकरी, टाळकरी आणि मृदुंगधारी यांच्या उपस्थितीत आज सात जून रोजी सायंकाळी दिवा येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

बेतवडे माय सिटी मागे उसरघर गावाजवळ मानपाडा दिवा रोड येथे हे भवन होणार असून, सात जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे देखील या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासाठी आगरी कोळी आणि वारकरी भवन भूमिपूजन सोहळा समिती गठित करण्यात आली असून या समितीच्या वतीने डोंबिवली येथे सोमवारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत या विशेष भवनाची निर्मिती कशासाठी करण्यात येणार आहे याची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रमाकांत मढवी, जयेश महाराज भाग्यवंत , गणेश महाराज ठाकूर, राजेश मोरे,शरद पाटील, नितीश ठोंबरे, दीपेश म्हात्रे, गुलाब वझे, अर्जुन पाटील, महेश पाटील, नितीन पाटील, रवी मट्या पाटील, हनुमान महाराज, प्रकाश महाराज इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

या भूमिपूजन सोहळ्यासोबत पुरातन खिडकाळेश्वर मंदिराचे सुशोभीकरण आणि दिवा भागातील विकास कामांचे व इतर कार्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आळंदी येथे चार वर्ष वास्तव्य करावे लागते. त्याचे विकेंद्रीकरण व्हावे व दूरस्थ प्रशिक्षणद्वारे व संगणक प्रणालीचा उपयोग करुन दृश्यात्मक प्रशिक्षण ‘गुगल’ किंवा ‘झूम’ मीटिंग द्वारे देण्यात येईल. यासाठी या भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. असे जयेश महाराज भाग्यवंत यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

आगरी समाजातील परंपरा, रुढी, संस्कृती यांचे जतन व्हावे व भविष्यात नव्या पिढीला वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण मिळावे याकरिता हे वारकरी भवन निर्माण करत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदर डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी आगरी कोळी समाजाच्या साठी अध्यात्मिक पवित्र वास्तू निर्माण करुण दिल्याबद्दल दिपेश म्हात्रे यांनी धन्यवाद दिले आहे.

आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते चार स्विमिंग पुलांच्या कामाचे झाले भूमिपूजन!

मीरा भाईंदर शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या चारही स्विमिंग पुलांचे बांधकाम एका वर्षात पूर्ण होणार! आयुक्तांची ग्वाही

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून येथील विद्यार्थी, तरुण, नागरिक यांच्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात ४ ठिकाणी ऑलम्पिक साईज जलतरण तलावाचे भूमिपूजन रविवार 4 जून रोजी आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. हे तरण तलाव पुढील एका वर्षात बांधून तयार होणार आहेत.

मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांची मागणी व गरज लक्षात घेता पुढील एका वर्षात हे बांधकाम पूर्ण होईल, ठरलेल्या मुदतीत काम करून स्विमिंग पूल प्रत्यक्षात एका वर्षात सुरु करण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन करेल, असे मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले.

त्यामुळे पुढील वर्षी मीरा भाईंदरच्या नागरिकांना मोठे स्विमिंग पूल उपलब्ध होणार आहेत. हे स्विमिंग पूल प्रत्यक्षात तयार होतील तेव्हा या जल तरण तलावांमध्ये नागरिकांना पोहण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी उपक्रम हाती घेतले जातील व स्विमिंग अकादमी सुरु केली जाईल असे आमदार प्रताप सरनाईक यांनी घोषित केले.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्याने त्यांनी राज्य सरकारकडून ४० कोटींचे अनुदान या कामासाठी मंजूर करून आणले होते. त्यातून ४ ठिकाणी ऑलम्पिक साईज जलतरण तलाव (स्विमिंग पूल) बांधले जाणार आहेत.

काल रविवारी सायंकाळी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ काशीमीरा येथील महानगरपालिकेच्या उद्यानासाठी आरक्षण क्रमांक ३६८ या जागेवर ऑलम्पिक साईज तरण तलाव व आवश्यक सुविधेची इमारत बांधणे, प्रभाग १२ परिसरातील उद्यानाच्या आरक्षण क्रमांक २३० या भूखंडावर ऑलम्पिक साईज तरण तलाव व आवश्यक सुविधेची इमारत बांधणे, आरक्षण क्रमांक २४२ जागेवर ऑलम्पिक साईज तरण तलाव व आवश्यक सुविधेची इमारत बांधणे, प्रभाग क्रमांक ३ मधील सचिन तेंडुलकर मैदानावरील आरक्षण क्रमांक १२२ शेजारील जागा येथे ऑलम्पिक साईज तरण तलाव व जिम बांधणे या कामाचे भूमिपूजन झाले.

प्रत्येक कामाला १० कोटींचा खर्च होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक व मनपा आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, शेकडो नागरिकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. स्विमिंग पूल आणि त्याचठिकाणी अत्याधुनिक जिम्नॅशियम इमारत बांधली जाणार असून ज्यांना पोहायला आवडते, ज्यांना पोहण्याचे प्रशिक्षण घ्यायचे आहे अशा नागरिकांसाठी ही खूप मोठी पर्वणी ठरणार आहे.

व्यायाम करण्यासाठी तिथेच जिम व त्याच ठिकाणी स्विमिंग पूल करून तेथील तरुण व नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याचे सरनाईक यांनी ठरवले असून त्यानुसार कामाची डिजाईन केली गेली आहे.

या भूमिपूजन सोहळ्यात मनपा आयुक्त म्हणाले की, आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून महापालिकेला राज्य सरकारकडून स्विमिंग पूलसाठी निधी आणून दिला. त्यामुळे हे काम सुरु होत आहे. आता मनपा प्रशासन पुढील १ वर्षात चारही स्विमिंग पूल तयार करून ते चालविण्याची व त्याची देखभाल – दुरुस्ती करण्याचे कामही स्वतः महापालिकाच करेल.

नागरिक आणि तरुणांना येथे कोणतीही अडचण येणार नाही. आमदारांच्या सुचनेप्रमाणे येथे रस्ता रुंदीकरण करण्यासाठीही पालिका कार्यवाही करेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

भाईंदर पूर्वेकडील सचिन तेंडुलकर मैदानात स्विमिंग पुलचे भूमिपूजन झाले त्यावेळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की , याठिकाणी पूर्वी डम्पिंग ग्राउंड असलेल्या जागेला आम्ही चांगले मैदान बनवले. हे खेळ आणि कार्यक्रमांचे केंद्र बनले आहे. आता येथे एका वर्षात स्विमिंग पूल होईल तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटची खेळपट्टी बनवली जाईल.

या मैदानात असलेल्या सामाजिक सभागृह स्टेजची उंची २ फुटाने वाढवली जाईल. तसेच या मैदानात ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी दोन स्वतंत्र खास उद्यानांची निर्मिती केली जाईल व त्यासाठी आमदार निधी देण्याची घोषणा आमदार सरनाईक यांनी केली. भाईंदर पूर्वेकडील पाण्याचा प्रश्न सोडवून येथे सामान दाबाने व योग्य प्रमाणात पाणी वितरण करण्याबाबत आयुक्तांनी स्वतः लक्ष द्यावे अशा सूचनाही आमदारांनी जाहीर कार्यक्रमात केल्या.

नवघर, भाईंदर पूर्व भागातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. ४ जून रोजी या चारही स्विमिंग पुल कामांचा श्री गणेशा झाला आहे. मीरा भाईंदर शहराच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची गोष्ट ठरणार असून जलतरण पटू शहरातून भविष्यात घडतील. या ठिकाणी स्विमिंग अकादमी सुरु करण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार सरनाईक यांच्या प्रयत्नाने हायवे जवळ आधी एक जलतरण तलाव बांधून झाला आहे आणि आता आणखी ४ जल तरण तलाव बांधले जाणार असल्याने नागरिकांची स्वप्नपूर्ती पुढील वर्षी प्रत्यक्षात होणार आहे. या कार्यक्रमाला महापालिकेचे प्रमुख अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.

 

शिर्डी येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ‘Kya News’ ऍप चे अनावरण.. 


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अल्पावधीतच आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्रात आपले ठसे उमटवणाऱ्या ‘Kya News’ (Know Your Area) या ऍपचा अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, प्रसिद्ध वृत्तनिवेदक व भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील शिर्डीत पार पडला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी १०० हुन अधिक पत्रकारांची उपस्थिती होती. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी ‘Kya News’ च्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या चारोळ्या. दरम्यान ‘Kya News’ चे देवेश गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधत ऍप विषयी अधिक माहिती दिली. दिवसरात्र एक करून पत्रकार हा बातमी गोळा करण्याचे काम करत असतो. दरम्यान अपुरे मानधन आणि त्यात जाहिरात मिळविण्यात पत्रकारांची होणारी दगदग यामुळे पत्रकारांना कधीकधी नैराश्याला सामोरे जावे लागत असते. या संपूर्ण समस्यांचा गांभीर्याने विचार करून ‘Kya News’ ऍप चे संस्थापक देवेश गुप्ता यांनी संपूर्ण भारतातील पत्रकारांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेल्या ऍप ची निर्मिती केली. त्यामुळे आता Kya News ऍप मध्ये बातम्या टाकल्यावर पत्रकारांना दर महा आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याचे देवेश गुप्ता यांनी सांगितले आहे. बातम्यांना जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे जास्त मानधन असे या ऍप चे मुख्य वैशिट्य आहे. त्यामुळे आता पत्रकारांची आर्थिक बाजू विकसित करण्यामध्ये आमचा खारीचा वाटा असेल असे गुप्ता यांनी या वेळी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.

दरम्यान उत्कृष्ट पत्रकार, प्रसिद्ध वृत्तनिवेदक व भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी उपस्थित समस्त पत्रकारांचे मार्गदर्शन केले आणि ‘Kya News’ च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या.

प्रयोगशील शेतकरी व सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते सय्यद मुजफ्फर हुसेन यांना राज्यस्तरीय ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार सोहळा संपन्न!

नागपूर, प्रतिनिधी: भारताचे माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार सोहळा 21 मे 2023 रोजी नागपूर येथील प्रगतीशील शेतकरी मुझफ्फर हुसैन यांच्या शेताच्या बांधावर अनेक मान्यवरां सोबतच शेतकऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी व माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या विदर्भ मराठवाड्यातील होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीची चळवळ बळकट व व्यापक करणे गरजेचे असल्याचे मत सत्कारमूर्ती सय्यद मुजफ्फर हुसेन यांनी सत्काराप्रसंगी आपली भावना व्यक्त केली.

याप्रसंगी हिंगणा तालुक्यातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी प्रशांत आनंदराव दुरुगकर आणि लातूर जिल्ह्यातील वलांडी या गावच्या सरपंच राणीताई राम भंडारे यांना उत्कृष्ट सरपंच म्हणून राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न गाव कारभारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात.

आला याप्रसंगी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शेतकरी नेतृत्व प्रकाश साबळे तसेच शेतकरी निवड समितीच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमाताई सवाई, प्रफुल गुडधे, जीया पटेल, रवींद्र दरेकर, नरेंद्र जिचकार, प्रा दिलीपराव काळे, अविनाश पांडे, भैयासाहेब निचळ, नामदेव वैद्य, मिलिंद फाळके, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

कृषी क्षेत्राला विज्ञानाची जोड देऊन या देशातील शेतकरी आणि शेतीला प्रगत करण्याचे महान कार्य स्व. राजीव गांधी यांनी केले. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरावा,

यासाठीच शेतकरी सन्मानाचा उपक्रम हाती घेतल्याचे प्रतिपादन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी केले.

माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांना यंदाचा ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर!

मुंबई, प्रतिनिधी: माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी कृषीविज्ञान प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा राज्यस्तरीय ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सय्यद मुझफ्फर हुसैन यांना जाहीर झाला आहे.

सेंद्रीय शेती व नाविन्यपूर्ण शेती प्रयोग विभागांतर्गत हा पुरस्कार मिळाला आहे. विदर्भ, मराठवाडा दुष्काळी भागातील अल्पभूधारक, शेतकरी व शेती व्यवसाय अडचणीत येत असल्याने कमी भांडवल, कमी खर्चात शेती करून शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन वाढीसाठी बहुमोल मार्गदर्शन कार्य मुझफ्फर हुसैन करीत आहेत. गेल्या १६ वर्षांपासून हे प्रतिष्ठान शेतकरी, शेतमजूर, शेतीशी निगडित प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांच्या कार्याचा गौरव करीत आहे. खासदार स्व. राजीव सातव यांनी ही संकल्पना प्रथम अमलात आणली होती.

 

अमरावती जिल्ह्यातील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड शेतकरी निवड समितीच्या अध्यक्षा पौर्णिमा ताई सवाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. या समितीमध्ये डॉ. दिलीप काळे अविनाश पांडे, अनील ठाकरे, भैय्यासाहेब निचळ, प्रा. अमर तायडे, प्रा. हेमंत डिके, मिलिंद फाळके, जावेद खान, नामदेव वैद्य, जयसिंगराव देशमुख आदींचा समावेश आहे. २१ मे ते २८ मे या कालावधीत सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा त्या त्या ठिकाणी जाऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सेंद्रिय शेती व नाविन्यपूर्ण शेती प्रयोग, प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी, महिला शेतकरी, फळबाग उत्पादक, गाव कारभारी सरपंच, उत्कृष्ट बैलजोडी मालक, कृषीवैज्ञानिक, पशुसंवर्धन,पशु वैद्यकीय संशोधन, उत्कृष्ट दूध उत्पादक, कृषी पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असल्याचे राजीव गांधी कृषीविज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी सांगितले.

सदर पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये डॉ. श्याम देशमुख (पशुवैद्यकीय संशोधन) राणीताई भांडारे (गावकारभारी सरपंच), प्रवीण बारी( फळबागायतदार ), सुयोग गोरले (कृषी पत्रकारिता), अनुप बगाडे ( प्रयोगशील शेतकरी), संगीता ताई दुधे( उत्कृष्ट महिला शेतकरी), विजय भुयार ( उत्कृष्ट दूध उत्पादक), मे. अजिंक्यतारा शेतकरी उत्पादक कंपनी चा समावेश आहे.

सदर पुरस्कार 21 मे रोजी राजीव गांधी पुण्यतिथी दिवशी अस्मिता फार्म, सत्रापुर, ता. रामटेक, जि. नागपूर येथील फार्म हाऊसवर प्रत्यक्ष जाऊन मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत मुझफ्फर हुसैन यांना प्रदान करण्यात येणार असून मुझफ्फर हुसेन यांना कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.