Home Blog Page 298

अखेर सचिन वाझेंना अटक..आतापर्यंत नेमकं घडलं काय.. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

सचिन वाझे यांना काल रात्री उशिरा एनआयए कडून अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊया..

मुकेश अंबानी यांच्या एंटिलिया निवास स्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो जीप आढळली. नंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत आढळून आला. हे प्रकरण मग विधानसभेत विरोधकांनी उचलून धरले. यात नाव समोर आलं ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे. सचिन वाझे यांना काल रात्री उशिरा एनआयए कडून अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय घडलं ते आता जाणून घेऊया.

स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ

भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबईतील एंटिलिया या निवासस्थानाजवळ उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकांचा साठा सापडला. या स्फोटकांसह एक चिट्ठीही सापडली. त्यामधून घातपाताची धमकी दिल्याची माहीती समोर आली.

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. मुकेश अंबानी यांच्यासारखे मोठे उद्योजक सुरक्षित नाहीत. त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटीनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयए कडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सोबतच या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की , “मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर रात्री एक वाजता गाडी पार्क झाली. तीन वाजता ड्रायव्हर मागच्या गाडीतून पळून गेला. एकच गाडी नव्हती. स्कॉर्पियोपाठोपाठ आणखी एक गाडी आली. दोन्ही गाड्या ठाण्यातून आल्या. ही गाडी तिथे पार्क होती, तिची ओळख पटल्यानंतर सर्वात आधी मुंबई पोलीसांचे सचिन वाझे तिथे पोहोचले. कोणी पोहोचण्याच्याआधी ते आले. क्राईम पोलीस आहे. मग स्थानिक पोलीस आले. मग सचिन वाझेंना आयओ म्हणून अपॉइंट केलं. तीन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी एका एसीपी यांना आयओ म्हणून नेमलं. सचिन वाझेंना का काढलं? हे मला समजलं नाही. पण यात योगायोग आहे. माझ्याकडे सीडीआर आहे. गाडीमालकाने गाडी चोरी झाल्याची तक्रार केली. ती गाडी उद्योगपती मुकेश अंबानीच्या घराबाहेर उभी होती. त्यांनी आपल्या जबाबात एक टेलिफोन नंबर सांगितला आहे. या नंबरचा एका नंबरशी संवाद ८ जून २०२०, २५ जुलै २०२० त्यानंतर अनेक वेळा झालेला दिसतोय. हा नंबर आहे सचिन हिंदुराव वाझे यांचा !! ज्या दिवशी ही गाडी ठाण्याला बंद पडल्यानंतर गाडी मालक ओला टॅक्सी घेऊन क्रोफोर्ड मार्केटला गेला. तिथे पोलीस आयुक्तांचे ऑफिस आहे. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण? हा माझा प्रश्न आहे. हे जर शोधून काढलं तर सोपं आहे. ओला टॅक्सी मध्ये बसून गेला त्याचा रेकॉर्ड आहे. ओला च्या ड्रायव्हरने त्याला पाहिलंय, तो कोणाला भेटला हेही पाहिलंय. अश्या परिस्थितीत एव्हढे योगायोग कसे काय हेच समजत नाही.

वाझे ठाण्यात राहणारे, ज्याची गाडी अंबानी च्या घरासमोर पार्क केली होती तोही ठाण्यात राहणारा, घटनेच्या कितीतरी दिवसांपूर्वी त्यांचं फोनवरून संभाषण झालं आहे. म्हणजे ते एकमेकांना ओळखतात. खूप मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. ती गाडी दिसल्यावर पहिल्यांदा तिथे वाझे पोहोचले स्थानिक पोलीस नाही, क्राईम पोलीस नाही तर ते पोहोचले. हे धमकीचं पत्र वाझेंनाच मिळालं, त्यांनीच तिथे डिलिव्हर केलं. मग त्यानंतर योगायोग पहा. टेलिग्राम चॅनल तयार होत. जैश-उल-हिंद नावाने पत्र दाखवलं जात, जणू खंडणी मागण्याकरताच हे करण्यात आलं. मात्र जैश-उल-हिंद म्हणतं हे आमचं पत्रच नाही. खूप मोठी शंका या प्रकरणात तयार झाली आहे. म्हणून माझी मागणी आहे, हे पुरावे शंकेला वाव देणारे आहेत. ही टेरर ऍक्टिव्हिटी आहे. कारण जिलेटीन होतं. जैश-उल-हिंदचं नाव पुढे आलेलं आहे व उडवून देण्याची धमकी आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी एनआयए द्यावी. हे योगायोग काय आहेत, याची चौकशी एनआयए ने करावी, अशी माझी मागणी आहे.”

मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला

या प्रकरणात खळबळ उडाली ती मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर. हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत आढळला. या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख यांची पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. ज्यावेळी एटीएसचं पथक मनसुख यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरेन यांच्या कुटुंबियांनी केला होता. अखेर विमला यांच्या फिर्यादीवरून मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची क्राईमब्रँच मधून बदली करण्यात आली आहे. आता ह्या प्रकरणात एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आलं. १९ मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे. काल सचिन वाझे यांनी सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली

दरम्यान या प्रकरणात चर्चेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची क्राईमब्रँच मधून बदली करण्यात आली. वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली. पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदली संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत.

सचिन वाझेंच खळबळजनक व्हाट्सएप स्टेटस

काल समोर आलेल्या सचिन वाझे यांच्या व्हाट्सएप स्टेटसने एकचं खळबळ उडाली. ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे. आता माझ्याकडे पेशन्स नाहीत’, अशा आशयाचं व्हाट्सएप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं होतं. सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हाट्सएप स्टेटस मध्ये म्हटलं की २००४ मध्ये त्यांना सीआयडीने अशाच चुकीच्या पद्धतीने अटक केलं होतं. माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मला फसवलं होत. मात्र त्यावेळी माझ्याकडे १७ वर्षाच्या अपेक्षा आणि नोकरी बाकी होती आणि पेशन्स देखील होते. मात्र आता माझ्याकडे ना १७ वर्षाचं आयुष्य आहे ना सहनशक्ती आहे ना नोकरी आहे. त्यामुळे जगाला ‘गुड बाय’ म्हणायची वेळ आली आहे, असं सचिन वाझेंनी म्हटलं. १७ वर्षांपूर्वी मला फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता. तो आता दुसऱ्यांदाही होत आहे. ही स्टोरी चुकीची आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबावापोटी आणि मीडिया ट्रोल मुळे होत आहेत. ४ आणि ५ मार्च रोजी मी साऊथ मुंबई मध्ये होतो आणि मनसुख हिरेन ठाण्यात होता आणि त्याचा मृतदेह मुंब्र्यात मिळाला, असंही वाझेंनी म्हटलं..

सचिन वाझे यांना अखेर अटक

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या एंटिलिया निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पियो गाडीत स्फोटकं आढळली होती. या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची खात्रीलायक माहिती एनआयए कडून देण्यात आली. अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून खडसावून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी ११ वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज (१४ मार्च) सकाळी ११ च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे..

महिलांच्या डब्यात शिरून मोबाईल हिसकावून पसार! आंबिवली रेल्वे स्थानकातील घटना

महिलांच्या डब्यात शिरून मोबाईल हिसकावून पसार.. आंबिवली रेल्वे स्थानकातील घटना

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली)

महिलांच्या सुरक्षितेकरता रेल्वे प्रशासनाने योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. महिलांच्या डब्यात पोलीस कर्त्यव्यावर असल्यास चोरीचे प्रकार होत नाहीत. परंतु महिलांच्या डब्यात पोलीस नसल्याने याचा फायदा चोरटे घेत आहेत. लोकल फलाटावर आल्यावर महिलांच्या डब्यात शिरून महिलेच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून चालू गाडीतून उडी मारून पसार झाल्याची घटना आंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी १० तारखेला ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,ठाणे येथील वैशाली नारायण घरत (२१) या १० तारखेला सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आसनगाव ते कल्याण असा अप सीएसटी लोकल गाडीचे गार्ड बाजूकडील दुसरे वर्गाच्या महिलांच्या डब्यातून बसून प्रवास करत होत्या. लोकल आंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्र.२ वर सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास थांबली असताना अनोळखी इसमाने सदर डब्यात चढला. त्याने फिर्यादीच्या डाव्या हातातील १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन खेचून चालू लोकल गाडीतून फलाटावर उडी मारून पसार झाला. या घटनेमुळे महिलाच्या डब्यात पोलीस कर्त्यव्यावर असावे अशी मागणी होत आहे.

मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई शांततेत व समन्वयाने जिंकू! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी व्यक्त केला विश्वास!

अवधूत सावंत, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची मा.सर्वोच्च न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढू आणि जिंकू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणासंबंधी मा.सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संदर्भात मराठा समाजातील विविध संघटनांच्या समन्वयकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला व मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीच्या सद्यस्थितीची माहिती देऊन त्यांचे यासंदर्भातील मुद्दे जाणून घेतले.
यावेळी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी यावेळीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेत जे मुद्दे मांडले त्याची दखल घेण्यात आली आहे.
आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ भक्कमपणे शासनाची बाजू मांडत आहेत.
आरक्षणाची हा खटला वेगळ्या वळणावर आला आहे.
खासगी याचिकाकर्त्यांनाही आरक्षणाच्या समर्थनार्थ बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे.
ज्या खासगी याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी शासनाबरोबर संघटनात्मक कार्य पद्धतीने एकेक मुद्दा मांडून तसे समर्थनार्थ आवश्यक पुरावे सादर करावेत.

मराठा समाजाच्या इतर मागण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन आपण हे प्रश्नही सोडवू.

मराठा आरक्षणाच्या खटल्यासंदर्भात खासगी याचिकाकर्त्यांच्या वकिलांची बैठक घेऊन कोणते मुद्दे मांडायचे, पुरावे कशा प्रकारे सादर करायचे यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी सूचना ठाकरे यांनी यावेळी केली. मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणीतील राज्य शासनाच्या मुद्द्यांची दखल घेतली आहे.

जव्हारच्या आश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती? रक्तस्त्राव व उलट्या झाल्याने प्रकार आला उघडकीस!

अवधुत सावंत, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या साकुर येथील एका आश्रमशाळेतील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून सगळ्यानाच मोठा धक्का बसला आहे.
वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं आहे.
मुलीला अचानक रक्तस्राव आणि उलट्या सुरू झाल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जव्हार तालुक्यातील ८ किमी अंतरावर असलेल्या आश्रमशाळेतील एका मुलीला शाळेत असताना रक्तस्राव व उलट्या होऊ लागल्या.
त्यामुळे तिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर येथे शाळेतील महिला अधिक्षिकांनी उपचारासाठी दाखल केलं.
तिथे तिची गर्भ चाचणी करण्यात आली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
त्या नंतर त्या विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिच्यावर उपचार सुरू असताना तिला पुन्हा खूप रक्तस्राव सुरू झाले.
त्यामुळे तिची प्रकृती खालावत होती म्हणून तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून, तेथे तिची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
त्यात ती विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.
तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

तिच्यासोबत शाळेतील महिला अधीक्षक व मुलीचे पालक आहेत.
साकुर येथील ही आश्रमशाळा पहिली ते बारावी पर्यंतची निवासी कन्या शाळा आहे.
येथे नववी ते बारावीचे वर्ग सुरू असून, वसतिगृहात १५६ विद्यार्थी पट संख्या आहे.
तर शाळेत ११५ विद्यार्थी उपस्थितीत असतात. ही मुलगी ७ फेब्रुवारी रोजी पासून शाळेत उपस्थित आहे.

गावातील एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते परंतु विद्यार्थिनीचे कुणाशी संबंध होते? आणि ती नक्की कुणामुळे गर्भवती झाली? हे अजून स्पष्ट झाले नसून आश्रमशाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थिनी अशा प्रकारे गर्भवती झाल्याने येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षे विषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

API सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन वेळा बदली?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात चर्चेत असणारा विषय मनसुख हिरेन प्रकरण यामध्ये API सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी भाजप पक्षाकडून होत होती. याच दरम्यान सभागृहात गृहमंत्र्यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. मात्र आज सचिन वाझे यांची बदली केली गेली आहे. वाझे यांची बदली क्राईम वरून मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात करण्यात आली होती. मात्र, पुन्हा तेथूनही सचिन वाझे यांची पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत (Special Branch) मध्ये बदली करण्यात आल्याचे समजते.

सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन वेळा बदली करण्यात आली आहे. (SB-1) अर्थात विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली. मात्र असे असले तरी ते पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्रामध्ये सेवेत राहतील. यावरुन त्यांना कोणते अधिकारी पाठिशी घालत आहेत. अशी चर्चा होता असताना पाहायला मिळते.

दरम्यान, अंबानी यांच्या घरासमोर मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास API सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या कारचा मालक मनसूख हिरेन याचा मृत्यू झाल्यानंतर सचिन वाझे हे अडचणीत सापडले आहेत. याशिवाय मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवरच आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणीही केली जात होती.