Home Blog Page 299

जव्हारच्या आश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती? रक्तस्त्राव व उलट्या झाल्याने प्रकार आला उघडकीस!

अवधुत सावंत, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या साकुर येथील एका आश्रमशाळेतील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून सगळ्यानाच मोठा धक्का बसला आहे.
वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं आहे.
मुलीला अचानक रक्तस्राव आणि उलट्या सुरू झाल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जव्हार तालुक्यातील ८ किमी अंतरावर असलेल्या आश्रमशाळेतील एका मुलीला शाळेत असताना रक्तस्राव व उलट्या होऊ लागल्या.
त्यामुळे तिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर येथे शाळेतील महिला अधिक्षिकांनी उपचारासाठी दाखल केलं.
तिथे तिची गर्भ चाचणी करण्यात आली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
त्या नंतर त्या विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिच्यावर उपचार सुरू असताना तिला पुन्हा खूप रक्तस्राव सुरू झाले.
त्यामुळे तिची प्रकृती खालावत होती म्हणून तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून, तेथे तिची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
त्यात ती विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.
तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

तिच्यासोबत शाळेतील महिला अधीक्षक व मुलीचे पालक आहेत.
साकुर येथील ही आश्रमशाळा पहिली ते बारावी पर्यंतची निवासी कन्या शाळा आहे.
येथे नववी ते बारावीचे वर्ग सुरू असून, वसतिगृहात १५६ विद्यार्थी पट संख्या आहे.
तर शाळेत ११५ विद्यार्थी उपस्थितीत असतात. ही मुलगी ७ फेब्रुवारी रोजी पासून शाळेत उपस्थित आहे.

गावातील एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते परंतु विद्यार्थिनीचे कुणाशी संबंध होते? आणि ती नक्की कुणामुळे गर्भवती झाली? हे अजून स्पष्ट झाले नसून आश्रमशाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थिनी अशा प्रकारे गर्भवती झाल्याने येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षे विषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

API सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन वेळा बदली?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात चर्चेत असणारा विषय मनसुख हिरेन प्रकरण यामध्ये API सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी भाजप पक्षाकडून होत होती. याच दरम्यान सभागृहात गृहमंत्र्यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. मात्र आज सचिन वाझे यांची बदली केली गेली आहे. वाझे यांची बदली क्राईम वरून मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात करण्यात आली होती. मात्र, पुन्हा तेथूनही सचिन वाझे यांची पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत (Special Branch) मध्ये बदली करण्यात आल्याचे समजते.

सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन वेळा बदली करण्यात आली आहे. (SB-1) अर्थात विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली. मात्र असे असले तरी ते पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्रामध्ये सेवेत राहतील. यावरुन त्यांना कोणते अधिकारी पाठिशी घालत आहेत. अशी चर्चा होता असताना पाहायला मिळते.

दरम्यान, अंबानी यांच्या घरासमोर मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास API सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या कारचा मालक मनसूख हिरेन याचा मृत्यू झाल्यानंतर सचिन वाझे हे अडचणीत सापडले आहेत. याशिवाय मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवरच आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणीही केली जात होती.

कोविड लसीकरण केंद्रे आता राहणार २४ तास सुरु!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

वय वर्ष ६० पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींची लसीकरण सध्या सर्वत्र करण्यात येत आहे. याअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ९ मार्च २०२१ पर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ४५ ते ५९ या वयोगटातील सह्व्याधी असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण करण्यात येत असून, या गटातील १५ हजार २७२ व्यक्तींचं लसीकरण ९ मार्च २०२१ पर्यत करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मुंबई मधील खासगी रुग्णालयांना आठवड्याचे सात हि दिवस आणि दिवसाचे २४ तास लसीकरण सुरु ठेवण्याच्या बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या प्रसत्वास केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

रेल्वेत नोकरी देतो असे सांगून लाखोंचा चुना लावणारा रेल्वे कँटीनचा कर्मचारी गजाआड

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

अंबरनाथ – रेल्वेत नोकरी देतो सांगून लाखोंचा चुना लावणारा रेल्वे कँटीनचा कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात बेरोजगारांना चुना लावणाऱ्या भामट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वेत विविध पदावर नोकरी देण्याच्या बहाण्याने बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा चुना लावून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात बेरोजगारांना चुना लावणाऱ्या भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे हा भामटा एका रेल्वे कँटीनमध्ये काम करणारा कर्मचारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कैलास राजपाल सिंग असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे .

रेल्वेचे बनावट कागदपत्र देऊन फसवणूक

बदलापूर शहरात कुमार चव्हाण हा बेरोजगार तरुण राहतो. तो गेल्या काही वर्षापसून नोकरीच्या शोधात असताना त्याची ओळख आरोपी कैलास राजपाल सिंग याच्याशी झाली होती. त्यावेळी या भामट्याने कुमारला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपी कैलास हा आयआरसीटीसीच्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील एका कँटीनमध्ये काम करत होता. त्यातच या भामट्याने बनावट परीक्षा, बनावट नोकरीचे मुलाखत पत्र दिले. त्यांनतर कुमार कडून 5 लाख रुपये त्याने उकळले.

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार

भामट्याने आपली अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून त्याने त्याला बनावट नियुक्तीपत्रही दिले. मात्र, हा सगळा प्रकार बनावट असल्याचे कैलास यांच्या लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याने कुमार याने पोलिसात धाव घेऊन याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांनतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असता आरोपी कैलाश हा प्रत्येक एक ते दोन महिन्यांनी राहण्याचा ठावठिकाणा बदलत होता.

प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारी सामील

पोलीस तपासात भामट्याच्या या प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारी सामील असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. विशेष म्हणजे आरोपी कैलास सिंग हा या अधिकाऱ्यांना नवी गिऱ्हाईकं शोधून द्यायचा, हे अधिकारी बनावट लेटरहेड आणि शिक्के वापरुन फसवणूक करत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. आता पोलीस पथक या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शोधात असून अशाच प्रकारे या त्रिकुटाने अनेक बेरोजगारांना गंडा घातल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आरोपी कैलास सिंगला विरार परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे.

राज्यातील MPSC परीक्षेची तारीख आज जाहीर होणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर असल्याचं गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितले. मात्र हे सांगत असताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरे यांनी प्रकाशझोत टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या ८ दिवसात हि परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. त्यांनतर आता परीक्षेची कोणती तारीख घोषीत होते? याकडे च्या विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचे डोळे लागलेत.
राज्यातील MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. सर्वाधिक पुण्यात विद्यार्थी आंदोलनाचा जोर पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केलेल्या संबोधनात मोठी घोषणा केली. MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख शुक्रवारीच म्हणजेच आज जाहीर होईल आणि परीक्षा येत्या ८ दिवसांच्या आतच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.