Home Blog Page 3

पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात नागरिकांसाठी मोफत सिटीस्कॅन आज पासून सेवा सुरू

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील एकमेव पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय येथे सामान्य नागरिकांसाठी आज सोमवार दिनांक 28 एप्रिल पासून मोफत सिटीस्कॅन सेवा सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी सोबत इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. विशेष म्हणजे शासनातर्फे राज्य शासनाच्या विविध रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनची व्यवस्था करून देण्यात येते. त्याच धर्तीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मीरा भाईंदर मधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी सर्व प्रकारची मोफत सिटीस्कॅन सेवा सुरू करण्यात आली आहे.

या सेवेचा फायदा प्रामुख्याने टेंबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या अंतररूग्ण IPD तथा बाह्यरुग्ण OPD रुग्णांसाठी होणार आहे. तसेच जे नागरिक येथे उपचार घेत नसतील पण त्यांना जर सिटीस्कॅन सेवा हवी असेल तर त्यांना देखील अगदी माफक दरात सिटीस्कॅन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदरची सेवा ही दिवस रात्र म्हणजेच 24 ×7 चालू राहणार आहे. सद्यस्थितीला सदर सेवा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून कृष्णा डायग्नोस्टिक याना देण्यात कंत्राट देण्यात आला आहे. या प्रसंगी सदर सीटी स्कॅन मशीनचे विधिवत पूजा करून श्री नरेंद्र मेहता हांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सदर रुग्णालयाचे प्रमुख जाफर तडवी, सदर कृष्णा डायग्नोस्टिकचे संचालक बल्लाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

*शैक्षणिक प्रशिक्षणाने शिक्षक परिपक्व अध्यापन करतो* *डायट च्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांची प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

आज बदललेल्या युगामध्ये सर्वच क्षेत्रात क्रांतिकारक असे स्वरूपाचे बदल झालेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना आधुनिक स्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध प्रकाराची अभ्यासक्रमाची प्रशिक्षण चालविण्यात येत आहेत. त्यात स्टार्स प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी दीक्षा पोर्टलवर ऑनलाईन कोर्स उपलब्ध करून देण्यात आले होते आणि या कोर्सच्या अटी प्रमाणे ऑनलाइन कोर्स केलेल्या पात्र शिक्षकांची पी. एल. सी. प्रशिक्षण तालुकास्तरावर दि.22-3-2025 रोजी पूर्ण करून घेण्यात आले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक परिपक्व होऊन विद्यार्थ्यांच्या समोर अध्यापन करतो असे आग्रही प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉक्टर भागीरथी गिरी यांनी केले.
त्या राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि राज्यस्तरीय गरजाधिष्टीत मिश्र माध्यम अभ्यासक्रम प्रशिक्षण 2024- 25 च्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. जिल्हा प्रशिक्षण समन्वयक डॉ. जगन्नाथ कापसे, यांच्या मार्गदर्शनानुसार व गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या नियोजनानुसार सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका प्रशिक्षण समन्वयक डॉ. कामाक्षी पवार होत्या. व्यासपीठावर सुलभक रत्नप्रभा मंडलवार, सुलभक श्रीमती मनीषा गुणाले, सुलभक शिवकुमार मठपती,सुलभक एस एम महालिंगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की शिक्षकांनी नेहमी स्वतःला अपडेट ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे जाहीर आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप तालुका समन्वयक डॉक्टर कामाक्षी पवार यांच्या भाषणाने झाला.
या शिबिरात मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, प्राथमिक, माध्यमिक विषयाच्या शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभाग घेऊन ऑनलाइन मिश्र माध्यमिय अभ्यासक्रम व्यवसायिक अध्ययन समूह पी एल सी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार मठपती यांनी सूत्रसंचालन माधव मठवाड यांनी तर आभार राम तत्तापूरे यांनी मांनले.
या प्रशिक्षणात सबंध तालुक्यातून 73शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट संधान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीच्या जाचातून मिरा भाईंदरकरांची होणार कायमची सुटका?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात सकारात्मक उत्तर

मात्र आमच्या प्रयत्ना मुळेच हा प्रश्न सुटला असा दावा आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील केला असून श्रेय घेण्यासाठी आमदार व मंत्री यांच्यात झुंपली?

भाईंदर / प्रतिनिधी:
लाखो मीरा भाईंदरकर नागरिकांची ‘इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनी’च्या जाचातून कायमची सुटका होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने गंभीरपणे पावले टाकली आहेत. मिरा भाईंदरचे स्थानिक आमदार व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून याबाबत आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले. मिरा भाईंदरच्या लोकांना इस्टेट इन्व्हेंस्टमेंटचा जो काही जाच आहे तो सोडविण्याकरिता राज्य सरकारकडून आपण निश्चितपणे प्रयत्न करीत आहोत, त्यादृष्टीने निर्देश देण्यात आलेले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर देत तसे निर्देश दिल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना दिली.

मिरा भाईंदरच्या इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीचा विषय आज विधानसभा अधिवेशनात चर्चेस आला. स्थानिक आमदार व मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेळोवेळी याआधी वेधले होते.

आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीचा विषय आज सभागृहात मांडण्यात आला आहे. या संदर्भात सरकारने एक कमिटी २०२४ मध्ये बनवली होती त्या कमिटीने सरकारला एक अहवाल दिला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने सरकारने असा निर्णय घेतला आहे की, आतापर्यंत असे होते कि इस्टेट इन्व्हेंस्टमेंटची ना-हरकत मिळाल्याशिवाय आपण पुढचे काय करत न्हवतो. आता इस्टेट इन्व्हेंस्टमेंटच्या ना-हरकतीला अधीन राहून आपण सगळ्या प्रकारच्या परवानग्या देत आहोत. इस्टेट इन्व्हेंस्टमेंटची ना-हरकत (एनओसी) याकरिता घ्यावी लागते कारण त्यासंदर्भात कोर्टात एक केस सुरु आहे, कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. परंतु त्याहीसंदर्भात आता आपल्या वरिष्ठ सचिवांना सांगितले आहे कि या केसचा फॉलोअप करून, याठिकाणी हि केस निकाली काढणे आणि हा ‘स्टे’ त्याठिकाणी हटविणे यासंदर्भातील निर्देश विभागाला देण्यात आलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे विशेषतः मिरा भाईंदरच्या लोकांना इस्टेट इन्व्हेंस्टमेंट कंपनीचा जो जाच आहे तो सोडविण्याकरिता आपण निश्चितपणे प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

असे असेल तरी हे प्रकरण आम्ही लावून धरल्यामुळे आता इस्टेट इन्व्हेस्टमेंटच्या जाचक अटीतून मिरा भाईंदरकरानां सुटका मिळणार असा दावा मिरा भाईंदर शहराचे 145 विधानसभा मतदार संघाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
त्यामुळे इस्टेट इन्व्हेस्टमेंट या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात नेहमी प्रमाणे श्रेय घेण्याची चढाओढ लागली असल्याचे दिसून येत आहे.

*ग्रामीण रुग्णालया च्या वतीने यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न*

अहमदपूर :-
मासूम शेख

येथील ग्रामीण रुग्णालय च्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यशवंत विद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आली.
या आरोग्य तपासणीचे उद्घाटन प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी सुडे, डॉक्टर नरहरी सुरनर, सहाय्यक गणेश केंद्रे, श्रीमती रेवता लेहाडे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, प्रर्यवेक्षक राम तत्तापुरे यांच्या सह मान्यवरांची उपस्थितीती होती.
यशवंत विद्यालयातील पाचवी ते सातवीच्या 950 विद्यार्थ्यांचे आणि आठवी ते नववीच्या 1050 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य प्रकाराच्या सल्ला देऊन ज्यांचे गंभीर आजार आहेत त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासणी करण्यासाठी सांगण्यात आले.
प्रास्ताविक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन के डी बिराजदार यांनी आभार श्रीधर लोहारे यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती च्या अध्यक्षपदी चंद्रशेखर भालेराव तर कार्याध्यक्षपदी प्रसाद गायकवाड*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथील संस्कार बुद्ध विहारात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते चंद्रशेखर भालेराव यांची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती च्या अध्यक्षपदी तर कार्याध्यक्ष पदी प्रसाद गायकवाड यांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर कार्यकारणीची ही यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष महेंद्र धसवाडीकर सचिव सुबोध इंगळे सहसचिव अजय (मुन्ना) वाघमारे कोषाध्यक्ष बाबासाहेब कांबळे लेंडेगावकर कार्याध्यक्ष प्रसाद गायकवाड तर सल्लागार समितीमध्ये रामकृष्ण कांबळे माधवराव तिगोटे बालाजी दुगाने सुजित गायकवाड यादवराव वाघमारे उद्धवराव गायकवाड चंद्रकांत कांबळे अनिल तिगोटे ऍड. राजपाल गायकवाड एम एन क्षीरसागर ऍड. अमित गायकवाड लक्ष्मण कांबळे विठ्ठलराव गायकवाड रावसाहेब वाघमारे बालाजी वाघमारे गौतम कांबळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी जयंती मंडळाचे मावळते अध्यक्ष रोहित कांबळे अभिजीत तुरेवाले आकाश भालेराव सोनू कांबळे पिंटू सोनकांबळे विशाल साळवे अमोल कांबळे पंकज भालेराव विशाल सोनकांबळे प्रयोग जोहारे कुणाल वाघमारे सुमित वाघमारे हर्ष कांबळे
यांची प्रमुख उपस्तीथी होती.