अहमदपूर:-
मासूम शेख
सद्यस्थितीला देश आणि विदेशामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी बाल वयातच चिकित्सकपणे सर्व विषयाचा अभ्यास करावा असे आग्रही प्रतिपादन प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी श्री सागर खर्डे यांनी केले .
ते दि.15 रोजी यशवंत विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर हे होते.
या वेळी व्यासपीठावर
प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट भगवानराव पौळ, प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे ,पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी प्रा. शिवशंकर पाटील, खयूम शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सागर खर्डे पुढे बोलताना म्हणाले की स्वप्न मोठे पहा, ते पूर्ण करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती ठेवून त्याचा पाठलाग करा, 50% वाला विद्यार्थी सुद्धा जिद्द, चिकटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशस्वी होतो. न्यूनगंड बाजूला ठेवा, विनम्रतेने अभ्यास करा जाहीर आवाहन केले.
डॉक्टर अशोक सांगवीकर यांच्या भाषणाने अध्यक्षीय समारोप करण्यात आला.
या समयी उपमुख्याध्यापक माधव वाघमारे, प्रा. शिवशंकर पाटील यांचे व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सृष्टी बेरळकर, सोहम देशमुख यांचे मनोगत पर भाषणे झाली,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार डॉ. शरद करकनाळे यांनी मांनले.
यावेळी दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आय पी एस अधिकारी सागर खर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.