Home Blog Page 304

वसई कोव्हीड लसीकरण केंद्रावरच उडाला सामाजिक अंतराचा फज्जा ! लसीकरण केंद्रच बनले करोनाचे आमंत्रण केंद्र?

वसई, आकाश पोकळे : वसई विरार मध्ये करोना लसीकरणाची सुरवात चालू आहे. मात्र येथेच कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. “लोकां सांगे ब्रम्हज्ञान; आपण कोरडे पाषाण” अशी अवस्था वसई-विरार आरोग्य विभागाच्या लोकांची आहे असे बोलले जात आहे.

वसई पूर्वेकडील वाळीव येथील वरुण इंडस्ट्रीयल इस्टेट येथील लसीकरण केंद्रावर करोनाची लस देण्याचे कार्य सुरु आहे. मात्र येथे लसीकरणाच्या दरम्यान नागरिकांमध्ये एक वित येवढ देखील अंतर राखले जात नाही. तसेच कित्येक नागरिक तोंडावर मास्क न लावता सर्रास वावरताना दिसत आहे.

येथे सुरक्षा रक्षक असुन देखील दोन व्यक्तींच्या मध्ये सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, येथे लोकं करोनाची लस घेण्यासाठी आले आहेत की कारोनाला आमंत्रण देण्यासाठी येत आहेत? येथे सामाजिक अंतराचे उघड उघड उल्लंघन केले जात असून देखील येथील आरोग्य अधिकारी काय करीत आहेत? या आरोग्य केंद्रावर सामाजिक अंतर का पाळले जात नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.

बालाजी गार्डन सोसायटीचा कचरा महापालिकेने उचलण्यास बंद केल्याने रहिवाश्यांनी विचारला जाब..

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

डोंबिवली जवळील कोपर येथील बालाजी गार्डनमध्ये ९ सोसायट्या असून जवळपास ५२२ सदनिका आहेत. या सोसायटीचा ओला कचरा १०० किलो पेक्षा अधिक होत असून ही घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार सोसायटीकडून त्यांची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे कल्याण – डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्यांचा कचरा गेल्या तीन-चार दिवसांपासून उचलला जात नाही व त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. आमदार पाटील यांनी रहिवाश्यांना घेऊन डोंबिवली विभागीय कार्यालयात घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेतली.

घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार ज्या सोसायटीचा कचरा १०० किलो पेक्षा अधिक होत असेल त्यांची विल्हेवाट सोसायटीनेच लावायची आहे. कोपर येथील बालाजी गार्डन या सोसायटीचा कचरा देखील १०० किलो पेक्षा अधिक होतो. परंतु सोसायटीच्या आवारात कचरा विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. गेल्या दोन दिवसात पालिकेने कचरा उचलला नाही याचा जाब विचारण्यासाठी रहिवाशी डोंबिवली विभागीय कार्यालयात आले होते.यावेळी रहिवाश्यांबरोबर मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील ही उपस्थिती होते.

यावेळी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधाकर जगताप, राजेश सावंत, संजय रोकडे आणि सोसायटीतील रहिवासी यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. बालाजी गार्डनमध्ये एकूण नऊ सोसायटी असून सदानिकांची संख्या ५२२ इतकी आहे. या सोसायटीतील रहिवाश्यांची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे. सोसायटी वर्षाला ५५ लाख रूपये मालमत्ता कर महापालिकेला भरते. गेल्या दोन-तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निर्देशानुसार ओला आणि सुका कचरा वर्गीकरण पालिकेच्या गाडय़ांकडे दिले जाते. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून महानगरपालिकेने कोणतेही पूर्वसूचना न देता सोसायटीतील कचरा उचलणे बंद केले आहे.

सध्या कोरोना महामारीची परिस्थिती आहे. या परिस्थितीत कचरा न उचलणो म्हणजे कोरोना किंवा इतर रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. सोसायटीतील लहान मुले, वृध्द आणि गरोदर स्त्रिया यांना देखील ह्या दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. सोसायटीतील कुणीही व्यक्ती आजारी पडल्यास त्यांची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेची असेल असा इशारा त्यावेळी सोसायटीच्या वतीनें महापालिकेला देण्यात आला. सध्या कोरोना परिस्थिती असल्याने आर्थिक व मानसिक दबावाखाली सर्व रहिवासी असून त्यात महापालिकेने कचरा उचलणे बंद केल्याने रहिवासी आणखीनच विवंचनेत पडले आहेत. दर वर्षाला मालमत्ता कर न चुकता भरतो तरीही हा अन्याय का ? असा सवाल रहिवाश्यांनी निवेदनातून विचारला आहे.

या यासंदर्भात रामदास कोकरे यांना विचारले असता ते म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार पर्यावरण ना हरकत दाखला मिळाला आहे त्या सोसायटीनेच ओला कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. ही सोसायटी कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही ती त्यांची चूक आहे. पुढील काळात सोसायटीनेच कचऱ्याची विल्हेवाट लावावी असे ही ते म्हणाले. तसेच कोकरे यांनी उद्यापासून सोसायटीचा कचरा उचलला जाणार आहे. सात दिवसांनी एक बैठक घेण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.

जीवन वाचवा ! ! सर्वसामान्यांचे प्राण वाचवा ….. ! ! ! सर्वसामान्य माणसाला न्याय जिवंत असेपर्यत मिळणार की मुत्युनंतर …… ?

जीवन वाचवा ! ! सर्वसामान्यांचे प्राण वाचवा ….. ! ! ! सर्वसामान्य माणसाला न्याय जिवंत असेपर्यत मिळणार की मुत्युनंतर …… ?

काेमल रहिवाशी साेसायटीबाबत महाराष्टाचे मा. मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे निवेदन व त्वरीत कारवाईसाठी विनंती !!

काेमल रहिवाशी साेसायटी पदधिकारयाची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारयावर कायदेशिर कारवाई त्वरीत करावी व श्री विनेश शहा कुटुंबीयांच्या आतंकाची/हुकुमशाहीची/हीटलरशाहीची चाैकशी करावी !!!!

श्री विनेश शहा कुटुंबियांनी बाेलवली/जाहीर केली रविवारी मिटींग !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, मुंबई, महाराष्ट्र

श्री विनेश शहा कुटुंबियांनी बाेलवली/जाहीर केली रविवारी दिनांक २८-०२-२०२१ राेजी काेमल रहिवाशी साेसायटीची मिटींग साेशल डीस्टन्सच्या नियमांचे पालन करून कारण ही फकत १४ सभासदांची रहीवाशी साेसायटी आहे व काही गैरहजर असतील तरी आपण आता बघुया श्री विनेश शहा कुटुबिंय सर्व सभासदांची चर्चा करून श्री जगदीश काशीकर यांची समस्या साेडवणार का ? नवीन प्रश्नांवर चर्चा हाेणार का ? नवीन साेसायटी कमीटी बनवण्याचा प्रयत्न करणार का ? ज्यांनी लिगल नाेटीस पाठविली आहे त्यांच्या प्रश्नांना ऊत्तरे देऊन आराेप स्वीकारणार किंवा नाकारणार ? गेली पाच महीेने साेसयटी कमीटीशिवाय कशी सांभाळली व काही महत्वाचे निर्यय घेतले असल्यास किंवा घ्यावयाचे असतील त्यांची माहीती सर्व सभासदांना जे मिटींगमध्ये हजर असतील त्यांना व जे गैरहजर असतील त्यांना देणार का ? विवीध समस्यांनी सध्या गाजत असलेल्या काेमल रहीवाशीची समस्या सुटण्यासाठी सर्व सभासदांची भुमीका काय असेल हे येणारया काही दिवसात स्पस्ट/दिसुन येईल !!

आता तात्पुरती जबाबदारी घेऊन व ज्यांनी श्री शांतीलाल जैन यांचे ईतर कमीटी सदस्यांच्या सहाय्याने व्याज माफ केले व ताेच न्याय श्री जगदीश काशीकर यांना ईतर कमीटी व सभासदांच्या सहाय्याने दयायला नकार देऊन श्री शांतीलाल यांचे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला आहे ते साेसायटीचे माजी चेअरमेन श्री विनेश शहा आता आपले घर विकुन दुसरीकडे स्थलातंर करण्याचा प्रयत्न करत आहेत व साेसायटीची अार्थिक परीस्थीती खराब असतानासुध्दा (साेसायटीमध्ये १२ तासासाठी सुरक्षारक्षक सुध्दा नाही) श्री जगदीश काशीकर यांच्याकडुन दाेन वर्षाचा मेन्टेनन्स बिनव्याजी घ्यायला नकार दिला व काही सभासद त्यांना मुर्ख जाहीर करून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत आहेत.

जवळपास ३०-३५ वर्ष जुन्या काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण पुर्वीची ईमारत दुरूस्ती (श्री विनेश शहा कुटुंबीय व श्री विनीत चाेक्शी कुटुबियांवर काही कमीटी सभांसदाकडुन (श्री स्वप्नील सालसकर)/रहीवाश्यांचा आराेप व श्री धर्मेश शहा व श्री जगदीश सटाणेकर – सटाणेकर ज्वेलल्सचे मालक/भागीदार, गिरगाव यांच्या लीगल नाेटीसीला ऊत्तर न देता कमीटी सदस्यांकडुन राजीनामा जी नुकतीच १-२ महीन्यापुरवी बनली हाेती) व साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन (अंदाजे २-४ वर्ष) श्री शांतीलाल जैन (यांचे खाते बंद/हिशेाब करताना अंदाजे १५ ते २० वर्षाचे व्याज घेतले नाही) व त्यांना साथ देणारे ईतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे मला वाटते तरी अधिक माहीतीसाथी मी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) हा फेसबुक ग्रुप मी बनविला आहे ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती व हाच न्याय मलासुध्दा मिळावा व इतर गरजु सभासदांना मिळावा किंवा व्याज माफीचा निर्यय बदलण्यात यावा ही साैसायटी कमीटीकडुन श्री जगदीश काशीकर यांची अपेक्षा कारण हया परीस्थीत ते आपल्या पुढच्या आयुष्याबाबत सन्मानाने जगण्याचा निर्यय घेऊ शकत नाहीत !!

काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २५ वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे कारण आजही ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे तेच साेसायटी चालवत असुन काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी अजुन पुढेे येत नाहीत कारण या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला आहे (अजुन काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नाही) व आज जवळपास पाच महीन्यापासुन साेसायटी कमीटीशिवाय चालत असुन या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटी बनविने हया सर्व घटनेचा खुलासा झाल्यावर बनविणे शकय आहे व हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.

लेखक : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, मुंबई, महाराष्ट्र

टीप : ही बातमी लोकहीत न्युजच्या संपादकांनी संपादित केलेली नाही. याची सर्वस्वी जबाबदारी लेखकाची आहे.

कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जात, धर्म, पंथ एक मानतो मराठी!
कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

रिक्षा प्रवासी वाहतुकीला नियम तर परिवहन बसमध्ये का नाही?

0

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

नियम व कायदे सर्वांना समसमान असावे याचा विसर बहुदा परिवहन व्यवस्थापन, वाहतूक पोलीस व पालिका प्रशासनाला पडला आहे असे दिसून येत आहे. एकीकडे कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेताना बेफिरपणे मुखपट्टी न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. तर रिक्षात ही फक्त दोन प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असताना दोन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्यास त्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र परिवहन बसेस मध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी वाहतुकीस परवानगी असताना याला नियमाचे पालन न करणाऱ्या बसेस मधील प्रवासी व बसचालक व बसवाहकावर का कारवाई केली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. रिक्षा प्रवासी वाहतुकीला नियम तर परिवहन बसमध्ये का नाही ? असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे.

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधीतींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतर (Social Distancing) असावे म्हणून रिक्षात फक्त दोनच प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर परिवहन बसेसमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी वाहतुकीस परवानगी आहे. रिक्षाचालकांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र परिवहन बसेसमध्ये प्रवासी वाहतुकीचे नियम पाळले जात नाही. अश्या बसेस मधील बसचालक व बसवाहकावर का कारवाई केली जात नाही असा सवाल रिक्षाचालकांनीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पडला आहे. तीन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना गेली अनेक दिवस वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत. मात्र परिवहन बसेसकडे वाहतूक पोलीस का लक्ष देत नाही याबाबत आश्चर्य वाटत आहे. बसेस मध्ये प्रवाश्यांची गर्दी पाहून या गर्दीत कोरोना चिरडून मेला, आता कोरोनां पसरत नाही का ? अश्या शब्दात प्रशासनाची नागरीकांकडून खिल्ली उडवली जात आहेत. तर खाजगी बसेस मध्येही नियमाचे पालन होत नसताना दिसते.

प्रतिक्रिया

डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने परिवहन व्यवस्थापनाला पत्र दिले आहे. परिवहन बसेसमध्ये जास्त गर्दी झाल्यास बसचालक आणि बसवाहकांवर कारवाई केली जाईल. तरी प्रवाश्यांनी सोशल डिस्टनसिंग ची काळजी घेत नियमाचे पालन केले पाहिजे.
राजश्री शिंदे
सहाय्यक पोलीस निरीक्षक (वाहतूक शाखा)

परिवहन बसेसमध्ये जास्त गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे निर्देश दिले आहेत. मात्र रिक्षाचे भाडे परवडत नसल्याने नागरिकही बसमध्ये प्रवास करतात.आता प्रत्येक बसमध्ये दोन बसवाहक देणार असून यातील एक बसवाहक बसमध्ये नियमाप्रमाणे प्रवासी बसवतील.
मनोज चौधरी
परिवहन समिती सभापती

सामान्य नागरिकांवर प्रशासन नियम लादते, परंतु सोयी देत नाहीत. बसेस जास्त नसल्याने गर्दीत होणारच. आता परिस्थिती अशी आहे कि बसमध्ये गर्दी तर रिक्षात जास्तीचे भाडे आकारले जाते. रोजीरोटी कमवणाऱ्या लोकांना घराबाहेर पडावेच लागते. म्हणूनच बस ची संख्या कमी आणि सेवा नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकतर सेवा नाही त्यात सामान्यांसाठी नियम पण सोयी नाही असे सरकारचे नियम आहेत का ?
सचिन गवळी
पाम संघटना पदाधिकारी

परिवहन बसेसमध्ये नियमांचे पालन करून गर्दी करू नये असे रिक्षा युनियनने वाहतूक पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार वाहतूक पोलीस यात लक्ष घालून वेळप्रसंगी कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.
काळू कोमास्कर
लाल बावटा रिक्षाचालक – मालक संघटना (अध्यक्ष)