Home Blog Page 306

बीड जिल्ह्यातील पुसरा येथील बाबासाहेब जाधव यांना मराठी विषयात अलिगढ विद्यापीठ येथे पीएचडी पदवी प्रदान

बीड, ता. वड‌वणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पुसरा गावचे विद्यार्थी बाबासाहेब सुखदेव जाधव यांनी आपल्या कुटुंबाची परिस्थिती बिकट असताना देखील जिद्द अणि चिकाटीच्या बळावर विश्व दारिद्र्याशी संघर्ष करत देशात चौथ्या स्थानावर आसलेल्या अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय अलिगढ उत्तरप्रदेश येथील आधुनिक भारतीय भाषा विभाग, मराठी संकुल येथे मराठी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘वडार समाजाचे मराठी साहित्यातील चिञ एक अभ्यास. या विषयावर आपले संशोधन कार्य पुर्ण केली आहे.

जाध‍व यांना मार्गदर्शक म्हणून डॉ़ ताहेर पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. बाबासाहेब सुखदेव जाधव हे महाराष्ट्रातले पहिलेच संशोधक आहेत. ज्यांनी मराठी विषयात अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय, अलिगढ. येथून डाॅक्टरेट मिळवली. त्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. उत्तर प्रदेश मधील अलिगढ मुस्लीम विद्यापीठ अलिगढ येथील आधुनिक भारतीय भाषा विभागाचे चेअरमन प्रो. क्रांती पाल, मराठी विभाग प्रमुख डॉ. ताहेर पठान, कश्मीरी विभागाचे प्रमुख प्रो. एम.ए झरगर. बेंगाली विभाग प्रमुख डॉ. अमिना खातून, प्रो. ए नुजूम, प्रो. सतिशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथी मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रो. सतिश बडवे यांनी कौतुक केले. तसेच प्रा.दासू वैद्य, प्रा. रमेश जाधव, डॉ. कैलास अंभूरे यांनी ही कौतुक केले व पुसरा गावचे सरपंच हरी पवार व गावातील ग्रामस्तांनी देखील जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

नव्या कोरोना रूग्णांची फुफ्फुसं होतायेत लवकर खराब! रूग्णांच्या छातीच्या एक्स-रे ची स्थिती अतिशय वाईट!

मुंबई, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या हळुहळु वाढू लागली आहे. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या छातीचा एक्स-रे रिपोर्टमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. या एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुफ्फुसांची अतिशय वाईट अवस्था पाहायला मिळत आहे. रूग्णांची फुफ्फुस पांढरी झाली आहेत, अशा दावा वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे केला जात आहे.

२०२० मध्ये कोरोना व्हायरस या विषाणूने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जगभरात या विषाणूंने अनेकांना प्रभावित केले होते. या विषाणूच्या भितीपायी देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. परंतु, कालांतराने रूग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेच पुन्हा एकदा भर पडली आहेत. त्यातच आता उपचारासाठी येणाऱे रूग्ण अतिशय नाजूक अवस्थेत असल्याचेही दिसून येत आहेत. याचाच अर्थ आताचा कोरोना विषाणू हा कित्येक पटीने शक्तिशाली असून झपाट्याने मानवी शरीरावर घातक करू लागला आहे.

यासंदर्भात बोलताना कोहिनूर रूग्णालयातील छातीरोग तज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांनी सांगितले की, ‘‘आधी रूग्णाच्या फुफ्फुसात हळुहळु बदल दिसून येत होतो. परंतु, आता फुफ्फुस लवकर खराब होत आहेत. हे विषाणू सर्व आजारांपेक्षा भयंकर असून फुफ्फुस खराब झाल्यावर रूग्ण उपचारासाठी येत आहेत. अशावेळी रूग्णांवर उपचार करणं डॉक्टरांसाठी अवघड होत आहे. रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचे एक्स-रे रिपोर्टमध्ये फुफ्फुसाची स्थिती खूपच वाईट आहे. या रूग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यातील बहुतेक रूग्ण वयोवृद्ध आणि कुठला ना कुठला आजार असणारे आहेत.’’

‘‘ताप, सर्दी, घशात खवखव हिच लक्षणं कोरोना रूग्णांमध्ये दिसून येत आहे. परंतू अजूनही लोक या लक्षणांमध्ये दुर्लक्ष करतात. अनेक लोक विनामास्क रस्त्यांवर फिरत आहे. फक्त लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार वाढतोय. याशिवाय मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदय आणि किडनीचे विकार असणाऱ्या रूग्णांना या विकाराचा धोका सर्वाधिक असल्याने या नव्या कोरोना विषाणूंपासून वाचवण्यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे,’’ असेही डॉ. सदावर्ते म्हणाले.

मनमानी कारभार करणाऱ्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांकडुन होणार चौकशी?

अवधुत सावंत, प्रतिनिधी :  जागतिक स्तरावर कोरोना सारख्या महाभयंकर महामारीला रोखण्याकरिता लादण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळात गेले वर्षभर ऑनलाइन शाळा सुरू असताना वापरण्यात न येणाऱ्या सुविधांचे शुल्क आकारणाऱ्या, शुल्कासाठी पालकांच्यामागे तगादा लावणाऱ्या, विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकणाऱ्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे आठवढयाभरात विभागीय शुल्क नियमन समित्यांवर नियुक्त्या करण्यात येतील, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी पालकांना सोमवारी दिले.
गेल्या आठवढ्यात राज्यातील पालकांनी शाळांच्या शुल्क वसुलीविरोधात आझाद मैदानावर आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानीही धरणे धरले. त्यावेळी पालकांना सोमवारी चर्चेसाठी वेळ देण्यात आली होती. त्यानुसार शालेय शुल्क वाढीबाबत सोमवारी गायकवाड यांनी पालक, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी, राज्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्याचप्रमाणे मनमानी करणाऱ्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांकरवी चौकशी करण्याचे आश्वासन गायकवाड यांनी पालकांना दिले.
शासनाने काहीच ठोस भूमिका घेतलेली नाही. शासन अध्यादेश काढू शकते. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे उत्तर ही निव्वळ पळवाट आहे. पालक गेले वर्षभर संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांना दिलासा मिळालेला नाही असे इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशनच्या अ‍ॅड.अनुभा सहाय यांनी सांगितले.
राज्यस्तरीय व विभागीय शुल्क नियमन समित्यांची येत्या आठवडय़ात स्थापन करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले. या समित्यांकडे शुल्क वाढीबाबत तक्रारी पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी पालकांना दिल्या. शुल्काबाबत इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करून राज्यासाठी सुसंगत धोरण, स्वयंअर्थसहाय्यीत शाळा संबंधित नियम यांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
शुल्क भरण्यासाठी शाळा सातत्याने तगादा लावतात, अनेक सुविधांचा वापर होत नसतानाही त्याचे शुल्क आकारले जाते, शुल्क भरू न शकणाऱ्या पालकांच्या मुलांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकले जाते, पालकांना दंड आकारला जातो, अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या मागील सत्राच्या गुणपत्रिका अडवून ठेवल्या आहेत, दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यासही शाळांनी नकार दिला आहे, अशा तक्रारींचा पाढा पालकांनी यावेळी वाचला..

ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशनचा सल्ला देऊ नका! केडीएमसी चे डॉक्टरांना निर्देश

अवधुत सावंत, कल्याण / डोंबिवली प्रतिनिधी : लक्षणं असणाऱ्या आणि सहव्याधी (इतर आजार) असलेल्या वृद्ध रुग्णांना डॉक्टरांनी घरच्या घरी विलगीकरणाचा (Home Quarantine & Isolation) सल्ला न देण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. असे गृह विलगिकरणात (Home Isolation) असणारे रुग्ण गंभीर होऊन ते दगावण्याच्या शक्यतेमुळे खासगी डॉक्टरांनी त्यांना होम आयसोलेशन (Home Isolation) चा सल्ला न देण्याचे निर्देश केडीएमसी प्रशासनाने दिले आहेत.

महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांचे निदान लवकर होऊन, त्यांना त्वरित उपचार मिळण्यासाठी तापाच्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट केली जाते. काही व्यावसायिक सहव्याधी असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरणाचा सल्ला देतात. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होऊन हे होम आयसोलेशन त्यांच्या जीववरही बेतू शकते. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी होम आयसोलेशन (Home Isolation) चा सल्ला न देण्याबाबतची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बजाविण्यात आली आहे.

तर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही पालिकेतर्फे देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. साधा ताप आला तरी नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तापाची औषधे आणि गोळ्य़ा घेतात. अशा रुग्णाला कोरोनाची बाधा झालेली असल्यास उपचार मिळण्यास विलंब होण्यासह अन्य व्यक्तींनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देऊ नयेत, औषध विक्रेत्यांनी डॉक्टरचे नाव, पदनाम, रुग्णाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक याची माहिती नजीकच्या नागरी आरोग्य केंद्राला देण्याचे औषध विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. एखाद्या औषध विक्रेत्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिल्याचे आढळून आल्यास अन्न- औषध प्रशासनाच्या(food and drug) सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध विक्रेत्यांना देण्यात आला आहे..

डोंबिवलीतील भोपर गावात अकरा वर्षीय मुलीचा खदानीच्या पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू

अवधूत सावंत, डोंबिवली प्रतिनिधी : डोंबिवलीतील भोपर गावात अकरा वर्षीय मुलीचा खदानीच्या पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना भोपर गावात असलेल्या खदानीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे..
आईसोबत खदानीच्या साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका अकरा वर्षीय मुलीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना डुबरी नजीकच्या भोपर गावात असलेल्या खदानीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. करिष्मा वीरेंद्र यादव (11) असे पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
खदानीत कपडे धुणे बेतले मुलीच्या जीवावर मृत करिष्माचे आई-वडील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी करिष्माही आईसोबत आज दुपारच्या सुमारास डोंबिवलीनजीक भोपर गावात असलेल्या खदाणीवर गेली होती. मात्र त्यावेळी कपडे धुतानाच तिचा पाय घसरल्याने ती खोल पाण्यात पडली. मुलगी खदानीच्या पाण्यात पडल्याचे पाहून आईसह बाजूला कपडे धूत असलेल्या महिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती बुडाल्याने महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत, तिला पाण्यातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी भोपर गावात पाण्याची टंचाई असल्याने खदानीत कपडे धुण्यासाठी या परिसरातील चाळीत राहणाऱ्या महिला जात असतात. विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी उभारल्या जात असून या चाळीत राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकंती करावी लागते. सहाजिकच या भागात राहणाऱ्या गरीब नागरिकांना बाजूला असलेल्या खदाणीच्या पाण्याचा कपडे धुण्यासाठी उपयोग करावा लागतो. धक्कादायक बाब म्हणजे या खदानीत कपडे धुण्यासाठी उतरणार्‍या महिला व मुलींना यापूर्वीही अनेकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या भागात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.