Home Blog Page 310

मिरा भाईंदर महानगरपालिकेवर कॉंग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार – सत्यजित तांबे

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे बुधवार 17 फेब्रुवारी रोजी मिरा भाईंदर शहराच्या दौऱ्यावर होते, दौऱ्याच्या सुरवातीलाच शहरात त्यांचे आगमन झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी काशिमिरा येथील शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करून सुरवात केली, त्यानंतर मिरारोड येथील काँग्रेस कार्यालयात शहरातील नामांकित साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह आयोजित चर्चासत्रात सहभाग नोंदविला, यावेळी बोलताना ठाणे, नवी मुंबई ह्यासारख्या शहरांमध्ये सांस्कृतिक व कला क्षेत्राची एक चांगली चळवळ सुरु असते मात्र मिरा-भाईंदरमध्ये साधं नाट्यगृह सुध्दा नाही, अशी खंत उपस्थित विविध क्षेत्रातील कलाकार मान्यवरांनी सत्यजित तांबे यांच्या समवेत चर्चा करतांना मांडली.

शहरातील मिरारोड येथे महामार्गावर असलेला जुना पेट्रोल पंप येथे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात केंद्र सरकारला धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शहरातील नागरिकां समवेत संवाद साधला असता नागरिकांनी देखील मोदी सरकार विरोधात आपल्या तीव्र भावना व असंतोष व्यक्त करून काँग्रेसच्या घोषणामध्ये सामील होऊन नागरिकांनी आपले दुःख बोलून दाखवले.

सुपर १००० द्वारा संगठन मजबूत करण्यासाठी कामाला लागा, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आदेश!

भाईंदर पूर्व, गोडदेव नाका येथील शुभम हॉल येथे मिरा भाईंदर युवक काँग्रेस व ओवळा माजीवडा युवक काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीस काँग्रेसचे नेते माजी विधानपरिषद सदस्य मुझफ्फर हुसैन, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक प्रदेश उपाध्यक्ष ब्रिज दत्त, युवक ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष गिरी, जिल्हाध्यक्ष प्रमोद जयराम सामंत, गटनेते, नगरसेवक झुबैर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत, नगरसेवक अश्रफ शेख, नगरसेविका गीता परदेशी यांच्या सह मोठ्या संख्याने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची आता काही खैर नाही! पोलीस करणार अटक!

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी : मुंबई पोलिस आता मुंबईमधील रस्त्यावर, घरोघरी भीक मागणाऱ्या भिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मुंबई पोलिसांकडून भिक्षेकरी पकडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यांवरील भिकार्‍यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे.

भिक्षेकरी पकड मोहिमेंंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवरील भीक मागणार्‍या लोकांना मुंबई पोलिस ताब्यात घेणार आहे. फेब्रुवारीपासून या मोहिमेला सुरवात करण्याचे आदेश पोलिस सहआयुक्त विश्‍वासराव नांगरे पाटील यांनी दिले आहेत. त्यांची कोविड चाचणी करून त्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये करण्यात येईल.

भीक मागणे हा कायद्याने गुन्हा असून याचे पालन मुंबई पोलिस आता काटेकोरपणे करणार आहेत. मुंबईमध्ये दिवसेंदिवस भिक्षेकरांची संख्या वाढत आहे आणि या वाईट परिस्थितीला देखील आपला व्यवसाय बनवणार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या मोहिमेला सुरुवात केली आहे.

मुंबईतील पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पथकाकडून करण्यात आली. आझाद मैदान पथकाने त्यांच्या हद्दीतील १४ भिक्षेकर्‍यांना ताब्यात घेऊन त्यांची कोविड चाचणी करून त्यांना चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये पाठविण्यात आले. भीक मागण्यासाठी विशेष करून लहान मुलांचा वापर केला जातो. काही वेळेला मुले चोरून त्यांना भीक मागायला प्रवृत्त केले जातें.

लोकांची सहानुभूती मिळवून जास्त पैसे मिळावे म्हणून नुकतच जन्मलेल्या बाळाला हे लोक उपाशी ठेवतात, ते बाळ सतत रडत राहावे, म्हणून त्याला नाहक त्रास देतात. त्या बाळाची पिळवणूक होत असते. काही लोकांसाठी भीक मागणे हा व्यवसाय बनला आहे. दिव्यांग असल्याचे नाटक करून किंवा एखादा गंभीर आजार असल्याचे खोट सांगून लोकांकडून पैसे घेतले जातात. पैसे कमवण्यासाठीचा हा सर्वात सोयीस्कर मार्ग काहींसाठी झाला आहे.

भीक मागणे ही इतकी वाईट अवस्था आहे, की आपल्या शत्रूवरही अशी वेळ येऊ नये असे म्हटले जाते; पण त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. आदेश आल्याबरोबर पोलिसांनी युद्ध पातळीवर कारवाई सुरू केली आहे. तसेच येणार्‍या दिवसात सुद्धा अशाच प्रकारे धडक कारवाया मुंबई पोलिसांकडून सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नांगरे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सर्वसामान्य उपेक्षित जनतेला सत्तेत आणण्यासाठी परिवर्तन आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाऊ! – आमदार इम्तियाज जलील

लातूर, प्रतिनिधी : लातुर जिल्ह्यातील उदगीर येथे जिल्हा परिषद व पंचायत सिमितिचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांची सभा संपन्न झाली या सभेत बोलताना आमदार इम्तियाज जलील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलले की, दलित-मुस्लिम-ओबीसीच्या परिवर्तन आघाडीला भविष्यात चांगले दिवस येणार असून महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष व नेता यांना सत्तेतुन दूर करण्यासाठी व सर्वसामान्य उपेक्षित जनतेचे सरकार स्थापनेसाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे तसेच सत्ते पासून नेहमीच वंचित असलेल्या दलित-मुस्लिम-ओबीसी समाजाला सत्तेत आणण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी, एमआयएम, शेतकरी संघटना, अवामी विकास पार्टी, आरपिआय, ऐक्यवादी यांच्या परिवर्तन आघाडीला आता महाराष्ट्रात चांगली संधी आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्रात सर्वांना सोबत घेऊन जाऊ असे उद्गार एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यानी काढले आहेत.

हाळी हंडरगुळी येथे जिल्हा परिषद उमेदवार मनीषा अजय मुंडकर यांच्या जाहिर सभेत आमदार इम्तियाज जलील बोलत होते. जिल्ह्यातील परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतानी विजय करा! असे आव्हान आमदार इम्तियाज जलील यांनी यावेळी केले. या जाहीर सभेत मंचावर महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. अण्णाराव पाटिल बसवंत आप्पा उबाले एमआयएमचे लातूर जिल्हा अध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन, सनाउल्ला खान, अफजल कुरैशी, मुजीब हमदुले, सय्यद अनवर, उदगीर विकास आघाडीचे एड. प्रभाकर काळे, महाराष्ट्र विकास आघाडी लातूर शहर अध्यक्ष इस्माईल फुलारी, युवा जिल्हाअध्यक्ष नाजमा शेख, एमआयएमचे अहमदपुर शहरअध्यक्ष जिलानी मनियार, खुरेश एजाज, कुरेशी ज़हीर, हाळी हंडर गुळीचे इरफ़ान डांगे, शादुल्ला शेख व इतर अनेक हजारों कार्यकर्ते उपस्थित होते.

अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) तर्फे नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोज 14 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे होणार!

नागपूर, प्रतिनिधी : पारंपरिक पद्धतीच्या शेती बरोबरच पुरक शेती देखील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते याचे महत्त्व लक्षात घेऊन माजी विधानपरिषद आमदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांनी त्यांच्या नागपूर येथील अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF) येथे, ‘काळीमिरी, महुगुणी, बांबू, ऊस, धान, गहू, तूर, मूग, अळशी, आंबा, सीताफळ, संत्री, मोसंबी, एरंडेल यांची नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड करण्यासंदर्भात’, विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार असतील. तसेच या कार्यक्रमास माजी मंत्री, आमदार रणजित कांबळे व आमदार आशिष जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहील.
त्याच बरोबर भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) चे मसाले विभागाचे माजी प्रमुख डॉ. एम एन वेणूगोपाल हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमात सहभाग घेतील.

काळी मिरी, महुगुणी व अन्य विशिष्ट मसाल्यांचे पिक घेतल्याने, विदर्भातील शेतकऱ्यांना कसा जास्त फायदा होऊ शकेल व त्याच्या लागवडी पद्धतींबद्दल ते विशेष मार्गदर्शन करतील. सोबतच भारतीय वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी सलीम सय्यद बांबू लागवडीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. पद्मश्री सुभाष पालेकर यांच्या प्रयत्नातून आकारत असणाऱ्या नॅच्युरल फार्मिंग बद्दल हेमंत चव्हाण, SPNF तज्ञ मार्गदर्शन करतील.

या निमित्ताने पंचक्रोशीतील सरकारी कृषी अधिकारी व महसूल विभागातील अधिकारी, सरपंच, उपसरपंच हे सदर महत्वाच्या कार्यक्रमात एकत्रितपणे उपस्थित असतील. येत्या १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता सदर शिबिर, अस्मिता ऑरगॅनिक फार्म (SPNF), छत्रपुर, गाव सराखा बोर्डा, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर येथे संपन्न होणार असून मुझफ्फर हुसैन यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारा हा कृषी विशेष कार्यक्रम निश्चितच शेतकरी-कास्तगारांना अत्यंत महत्वपूर्ण उपलब्धी ठरणार असून शेतकरी आणि शेतीशी संबंधित असलेल्या नागरिकांनी या मार्गदर्शन शिबिरास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेले शेतकरी व कास्तगारांनी अस्मिता हाऊस, श्रीमती शांती सलोनी यांच्याशी 02228111185 या फोनवरून संपर्क साधावा तसेच व्हॉट्सअप/SMS करिता +919324558593 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नरेंद्र जिचकार यांचेशी 9850363244 या क्रमांकांवर नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

तरुणींना चित्रपटात ब्रेक देण्याचा बहाणा करीत त्यांच्या अश्लील चित्रफीत बनविणाऱ्या पॉर्न प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश!

मुंबई, अंधेरी, प्रतिनिधी : चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणींना नवीन चित्रपटात ब्रेक देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अश्लील चित्रफीत काढून प्रसारित करणाऱ्या एका पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश मुंबईतील मालाड पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने केला. या प्रकरणी पोलीस पथकाने पाच आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी मालाडाच्या मालवणी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 292, 293, 420, 34 सह कलम 67 अ माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम सुधारित 2008 सह कलम 2 ग सह 3, 4, 6 आणि 7 स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण अधिनियम 1986 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 6 मोबाईल, एक लॅपटॉप, स्पॉट लाईट, केमेरा, मेमरी कार्ड असा लाखोंचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.

मालमत्ता कक्षाच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींमध्ये फोटोग्राफर 40 वर्षीय, 33 वर्षीय महिला ग्राफिक डिझाइनर, 28 वर्षीय पुरुष लाईटमॅन आणि केमेरा मॅन 26 वर्षीय पुरुष अभिनेता आणि 24 वर्षीय पुरुष अभिनेता यांचा समावेश होता. अटक सर्व आरोपीना 10 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोनि. धीरज कोळी करीत आहेत.

हि टोळी पॉर्न कंपनी चालवीत होती. गरजू मुलींना महिलांना आणि फिल्म इंडस्ट्रीज मध्ये स्ट्रगल करणाऱ्या मुलींना नवीन चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अश्लील चित्रफीत तयार करून त्या प्रसारित करीत होते. सदर चित्रफीत मोबाईल ऍप्सवर प्रसारित करून लाखो रुपयांची कमाई करण्यात येत होती.

मालमत्ता कक्षाला पॉर्न कंपनी हि मढ येथे बंगल्यात पॉर्न शूटिंग करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करून पोलीस पथकाने पाचजणांना अटक केली. या टोळीने पॉर्न कंपनीद्वारे व्हिडियो अपलोड करण्यासाठी सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून लाखोंची कमाई करीत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान अशा प्रकारे अनेक महिलांची आणि तरुणींनींची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.