Home Blog Page 318

कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे पण त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही! : डॉ. हर्षवर्धन (केंद्रीय आरोग्यमंत्री)

कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही असं मत भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केलं आहे. सरकार सावध असल्याचंही त्यांनी सांगितलं.

युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजात) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत याविषयी सखोल चर्चा केली.

कोरोनाच्या या नव्या प्रजातीच्या माहितीनंतर इंग्लंडवरुन येणारी सर्व विमाने रद्द करावीत आणि आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करावे अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याचं WHO ने बीबीसीला सांगितलं.

सध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.

पण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही असे असले तरी भारतातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

कोविड -19 पेक्षा हि जास्त खतरनाक कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे संपूर्ण युरोपमध्ये उडाली खळबळ!

युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजात) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत या विषयी सखोल चर्चा केली आहे.

कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत असल्याचे बोलले जात आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याची माहिती WHO ने दिली आहे.

सध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही.

युकेमध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडसह लंडनमध्ये सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. हे लॉकडाऊन कठोर स्वरूपाचं आहे. वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे.

कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे युरोपात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे. रविवारी (20 डिसेंबर) नेदरलँड्सने युकेमधून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली असून ही बंदी 1 जानेवारीपर्यंत लागू असेल.

युकेमध्ये नव्या प्रजातीचा व्हायरस निर्माण झाल्याचं समजताच नेदरलँड्सने हा निर्णय घेतला आहे. नव्या विषाणूचा धोका किती प्रमाणात आहे याचा अभ्यास करण्यात येईल, हा धोका कमी कसा करता येईल, याचे प्रयत्न करण्यात येतील, असं नेदरलँड़्स सरकारने म्हटलं.

युकेमधून युरोपात दाखल होऊ शकणाऱ्या या व्हायरससंदर्भात युरोपियन महासंघातील सदस्य देशांसोबत चर्चा करणार असल्याचंही नेदरलँड्सने म्हटलं. या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीने WHO च्या साथरोगतज्ज्ञ मारीया व्हॅन केरखोव्ह यांच्याशी चर्चा केली.

“कोरोना साथ सुरू झाल्यापासूनच या विषाणूने आपल्या स्वरुपात बदल केल्याचं जगभरात आढळून आलं आहे,” असं केरखोव्ह यांनी सांगितलं. व्हायरसच्या नव्या प्रजातीबाबत आपण युके सरकारसोबत संपर्कात आहे, या विषाणूबाबत सखोल चर्चा केली जात आहे, असं WHO ने म्हटलं आहे.

व्हायरसच्या म्यूटेशनबाबत युके सरकारने माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना इतर देशांना याबाबत माहिती देत राहील. या व्हायरसचा अभ्यास सुरू आहे. दुसरीकडे, युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या विधानामुळे खळबळ माजली आहे. नवी प्रजात ही जुन्या प्रजातीपेक्षा 70 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, असं जॉन्सन म्हणाले.

पण अधिकाऱ्यांच्या मते, याबाबत अद्याप सखोल पुरावे उपलब्ध नाहीत. नव्या प्रजातीच्या संसर्गाने मृत्यूदर जास्त असल्याचा किंवा नवी प्रजात लशीला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असल्याचंही अद्याप स्पष्ट नाही, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

इंग्लंडचे मुख्य आरोग्य अधिकारी याबाबत सांगतात, “सध्याची परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाच्या नव्या म्यूटंटबाबत कोणतेही अंदाज आपण सध्यातरी लावू शकत नाही.” विषाणूंच्या स्वरुपात बदल होणं ही गोष्ट नवी नाही. पण ही बदललेली प्रजात कशा पद्धतीने वागते, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे यामध्ये जास्त महत्त्वाचं असल्याचं डॉ. केरखोव्ह सांगतात.

महाराष्ट्र शासनाने आदिवासी आणि दलित लोकांच्या विकासासाठी निधी द्यावा : सोनिया गांधी

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक पत्र लिहिलं आहे. राज्यातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी लागणारा निधी द्यावा, अशी मागणी सोनिया गांधींनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

भविष्यात आदिवासी आणि दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची खात्री करावी, असं सोनिया गांधींनी पत्रात म्हटलं आहे. सोनिया गांधींनी हे पत्र लिहिल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोनिया गांधी यांनी पाठवलेल्या पत्राबाबत म्हटलं की, “महाराष्ट्रातील नागरिकांच्या हिताचे मुद्दे जर काँग्रेस पक्षाकडून उपस्थित केले जात असतील, तर त्याचं स्वागत करायला हवं. यात कुठेच ‘प्रेशर पॉलिटिक्स’ नाहीय.”

तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. “हे महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे. हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे,” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

तत्पूर्वी, राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींच्या (ST) नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत SC आणि ST समाजाच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. यादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशीही काँग्रेस अध्यक्षा गांधी यांनी चर्चा केली.

त्यानंतर याबाबतचं पत्र सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवल्याची माहिती एच. के. पाटील यांनी दिली आहे. या पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची आठवण करून दिल्याचं सांगितलं जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या आग्रहामुळे भाजपचं सत्तासमीकरण जुळत नव्हतं. त्यावेळी शरद पवार आणि संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले होते. पण ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देताना काँग्रेस-राष्ट्रवादीने एक किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्रॅम) ठरवला आणि तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली होती.

खरंतर, काँग्रेसने या आघाडीत सामील होण्यासाठी स्वारस्य दाखवलं नव्हतं. पण पुढे तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तिन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’ हाच पाया म्हणून ओळखला जातो.

गेले वर्षभर कोरोनाच्या काळात कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची चर्चा फारशी झाली नाही. पण दलित निधीच्या निमित्ताने आता हा प्रोग्रॅम चर्चेत आला आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना पुन्हा या किमान समान कार्यक्रमाची आठवण या पत्राच्या निमित्ताने करून दिल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे.

मिरा भाईंदर शहराकरीता लवकरच सुरू होणार कायमस्वरूपी आरटीओचे उपकेंद्र आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी ठाण्याला जावे लागत होते त्यामध्ये त्यांचा प्रवासाचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होता. घोडबंदर रोड येथे आठवड्यातुन दोन दिवस कॅम्प लावला जात आहे परंतु पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नसल्यामुळे नागरिकांची कामे रखडली जात होती म्हणून मिरा भाईंदर शहरातील नागरिकां करिता कायमस्वरूपी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी गेली अनेक वर्षे केली जात होती.

या मागणीचा विचार करून मिरा भाईंदर शहरासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप-केंद्र सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. या केंद्रात प्रादेशिक परिवहन विभागाशी संबंधित असलेली सर्व कामे करण्यात येणार असल्यामुळे आता मिरा भाईंदरच्या नागरिकांना ठाण्याला जाण्याची गरज भासणार नसल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

प्रवर्तन निदेशालाय(ईडी) ने शिवसेनेचे वादग्रस्त आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि सर्व कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले त्यानंतर चौकशीसाठी त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ताब्यात घेतले आणि अभिनेत्री कंगना राणावत हिने प्रताप सरनाईक यांच्या घरात पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडल्याचे वादग्रस्त ट्विट केल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच पत्रकारांना सामोरे जात आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांत घडलेल्या सर्व घडामोडींचा खुलासा केला. त्याच वेळी सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरात उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली.

मिरा भाईंदर शहराची स्वतंत्र महानगरपालिका असली तरी हे शहर ठाणे जिल्ह्यात मोडते आणि महसूल विभागाशी संबंधित कामकाज असो, न्यायालयाशी संबंधित कामकाज असो, प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा इतर कोणत्याही शासकीय कामकाजासाठी मिरा भाईंदर च्या नागरिकांना ठाण्यालाच जावे लागते. मात्र मिरा भाईंदर शहर ठाणे शहरापासून २५ किलोमीटर लांब असल्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाया जात आहे. तसेच शहराची लोकसंख्या अंदाजे तेरा लाखाच्या आसपास असल्यामुळे या शहराला स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.

गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आठवड्यातील दोन दिवस घोडबंदररोड येथे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत शिबीर आयोजित करून हे काम पार पाडण्यात येत होते. मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्या मागणीमुळे या शहरात कायम स्वरूपी ठाणे प्रादेशिक परिवहन उपकेंद्र सुरु करण्याच्या सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार घोडबंदर येथील बस आगाराला लागून असलेल्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात हे सुरु करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वास्तूचा वापर करून कॅम्पुटर आणि कर्मचाऱ्यांची सोय ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फ़त करण्यात येणार आहे. तसेच पुढील आठवड्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन होणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फ़त मिरा भाईंदर शहरातील घोडबंदर भागात ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप-केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासाठी देण्यात आलेली ही जागा तात्पुरत्या स्वरूपाची आहे. त्यामुळे येत्या दिवसात पालिका प्रशासनाने आरटीओसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षित भूखंडावरील जागेत इमारतीची निर्मिती करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त विजय राठोड यांच्याकडे केली असल्याची माहिती त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

“दीड हजार नागरिकांचे परवाने प्रलंबित-
मिरा भाईंदर शहरातील नागरीकांना वाहन परवाना मिळवण्याकरिता ठाणे आरटीओ कार्यालयात जावे लागते. मात्र, या केंद्रात कामाचा ताण अधिक असल्यामुळे मिरा भाईंदर शहरातील युवकांचे सुमारे दीड हजार परवाने प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे घोडबंदररोड येथे सुरु होणाऱ्या आरटीओच्या उप-केंद्रामुळे ही अडचण दूर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या कोव्हीड-19 योद्ध्ये कामगारांचा म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेने तर्फे सत्कार!

जगदिश काशिकर, मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी जागतिक महामारी कोविड या दीर्घ आजाराशी लढा देत मुंबईकरांची अहोरात्र सेवा केली. कोरोनाच्या संकटात मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावत लोकसेवा केली. त्यांचा कामगार सेनेतर्फे कोविड-19 योद्ध्ये म्हणून सत्कार करण्यात आला.

मुनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या माध्यमातून कोविड-19 चे उल्लेखनीय काम करण्यात आले म्हणून संघटनेच्या माध्यमातून समस्त कामगार वर्गांना कोविड योद्धाचे प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे चांगले काम म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना याच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष बाबा कदम, जनरल सेक्रेटरी सत्यवान जावकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर तसेच संघटनेचे चिटणीस संजय वाघ, महेश गुरव आणि पश्चिम उपनगरातील स्थानिक कमिटी अध्यक्ष दत्ता राव, उपाध्यक्ष चंद्रकांत दिवाळे,सरचिटणीस राजेश इंदुलकर स्थानीक पदाधिकारी आणि कामगार बंधू यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यकारी अभियंता परिवहन पश्चिम उपनगरे या खात्यांचे बोरीवली यानगृहाचे सहायक अभियंता पिंपळे आणि स्थानिक अधिकारी दुय्यम अभियंता दळवी साहेब कनिष्ठ अभियंता यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी व सभासद उपस्थित होते. संघटनेने केलेल्या सन्मानपत्र आदराने कामगार भारावून गेले होते. याप्रसंगी संपूर्ण बोरीवली यानगृह भगवामय झाले होते.