Home Blog Page 35

डोंबिवली पोलीसांनी ९५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करत रिक्षा व मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी येथील ‘बंदिश पॅलेस’ हॉटेल शेजारी चोळेगाव तलावाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला ऑटो रिक्षा क्र. एमएच ०५ / सीजी-७९८२ ही हॅन्डल लॉक करुन पार्क करून ठेवलेली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून नेल्याची तक्रार रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २१/०४/२०२३ रोजी गुन्हा रजि क्र. १४६ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्ह्याच्या तपासादरम्यान सपोनि. योगेश सानप, पोहवा. सरनाईक, पोअं. सांगळे यांनी नमुद गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजुबाजुच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन संशयीत आरोपी हे नमुद गुन्ह्यातील ऑटो रिक्षा क्र. एमएच ०५ / सीजी – ७९८२ ही चोरी करून घेवून जाताना दिसुन आल्याने सदर आरोपींना गुप्त बातमीदार व तांत्रिक मदतीच्या आधारे पिसवली, कल्याण येथुन नमुद गुन्ह्यातील ऑटो रिक्षाचे पार्ट विक्री करत असताना ताब्यात घेतले. त्यांचेकडे नमुद गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांचेकडे अजुन एक आर-१५ यामाहा कंपनीची मोटार सायकल क्र. एमएच ०१/डीएच – ५३६३ देखील मानपाडा पोलीस ठाणे हददीतुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर दोन आरोपींकडुन डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि.क्र. १४६/२०२३ कलम ३७९.३४ भादंवि व मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.क्र. ८४९/२०२३ कलम ३७९ भादंवि असे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात डोंबिवली पोलीसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, यांच्या मार्गदर्शनाखाली डोबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, पोअं. नितीन सांगळे, पोशि. निलेश पाटील, गिरीश शिर्के यांनी कामगिरी केली आहे.

 

दीड कोटीच्या हस्तिदंतासह दोघे पोलीसांच्या जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाची धडक कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

तामिळनाडू राज्यातून ठाण्याच्या कोपरी परिसरात दीड कोटीच्या हस्तिदंतासह दोन आरोपी गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. दोन्ही आरोपीकडून दोन हत्तीचे हस्तिदंत हस्तगत करण्यात आले आहेत. तर या दोघांना न्यायालयात नेले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. हत्तीचे दोन हस्तिदंत एका बॅगमध्ये घेऊन ते दोघे विक्री करण्यासाठी ठाण्याच्या कोपरी भागात आले. दरम्यान या विक्री-खरेदी व्यवहाराची माहिती गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला खबऱ्यांमार्फत मिळाली होती.

पोलीसांनी खातरजमा करीत कोपरी परिसरात महामार्गावर हस्तिदंत घेऊन येणाऱ्या व खरीदी करणाऱ्या ग्राहकांची वाट पाहताना पोलीस पथकाच्या दोघे दृष्टीस पडले. युनिट-५ च्या पथकाने त्यांना हेरले आणि संशयावरून त्यांना हटकले असता त्यांचा संशय खरा ठरला व दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व त्यांच्याकडील दोन हस्तिदंताचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर दोन हस्तिदंताची किंमत दिड कोटीची असल्याची माहिती आरोपींनी पोलीसांना दिली. या दोघा आरोपीना न्यायालयात नेले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटक दोन्ही आरोपींची पोलीस पथक सखोल चौकशी करीत आहे व हस्तिदंत कुणाला विकण्यासाठी आणलेले होते. याबाबत पोलीस अधिक चौकशी व तपास करीत आहे.

 

कल्याण खडकपाडा येथे अद्यावत ‘ओएसिस हॉस्पिटल’ चा उद्घाटन समारंभ संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण शहराचा विकास होत आहे तशी लोकवस्ती देखील वाढताना दिसत आहे. लोकवस्ती वाढल्यानंतर काही गोष्टींची आपल्याला गरज पडत असते ज्या मधली एक गरज म्हणजे वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटल. प्रत्येकाची इच्छा असते की हॉस्पिटलची पायरी कधीही चढायला लागू नये पण काही वेळा एक अद्यावत हॉस्पिटल परिसरात जवळ उपलब्ध असावे जेणेकरून इमर्जन्सी च्या वेळी कुठेही लांब जायला लागू नये.


कल्याण आधारवाडी डीबी चौक येथे अद्यावत सुसज्ज असे ४० बेडचे ‘ओएसिस हॉस्पिटल’ आता सुरू झाले आहे. ज्यामध्ये अकरा बेड चे आयसीयू, २ ओ टी व १ लेबर ओ टी, भाजलेल्या रुग्णासाठी स्पेशल वॉर्ड, २४ तास मेडिकल व पॅथॉलॉजी लॅब अशा अत्याधुनिक सर्व सुविधा येथे उपलब्धअसणार आहेत. हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर तर ओ टी चे उद्घाटन आयएमए एक्स प्रेसिडेंट डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अर्जुन भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेवक सुनील वायले, आयएमए प्रेसिडेंट डॉ. ईशा पानसरे, उद्योजक दीपक भंडारी, उद्योजक मच्छिंद्र जाधव आणि अनेक नामवंत डॉक्टर यांच्या उपस्थित झाले.

हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले. फिजिशियन डॉ. दयानंद ढेकणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजेश पाखरे, प्लास्टिक सर्जन डॉ. पराग तेलवणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गणेश शिरसाठ अशा कल्याण मधील चार सुप्रसिद्ध डॉक्टरांनी मिळून ‘ओएसिस हॉस्पिटल’ सुरू केले आहे. विशेष सांगायचं झालं तर गरीब रुग्णांसाठी खास १० बेड राखीव ठेवून कमीत कमी खर्चात त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे यावेळी हॉस्पिटल मॅनेजमेंट कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.

 

काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन यांच्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निरीक्षक पदाची जबाबदारी

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायचूर जिल्ह्यातील सिंद्धनौर विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

सध्या हुसैन प्रचारात सहभागी झाले असून राष्ट्रीय महासचिव एच. के पाटील, सचिव बी.एम. संदीप यांची भेट घेतली. उमेदवार हंपी गौडा , जिल्हा, ब्लॉक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांकडून मतदारसंघातील बूथ कमिटी, मतदान केंद्र आदी कामाचा आढावा हुसैन यांनी घेतला.

महाराष्ट्राच्या राजकारणात मुझफ्फर हुसैन यांचे मोठे योगदान असून पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी त्यांनी विविध पदांवर कार्य करत ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांचा राजकीय अनुभव पाहूनच केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उतरवले आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल ( धर्मनिरपेक्ष) व काँग्रेस या दोन पक्षांमध्ये येथे थेट लढत होत असून भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील ५८- सिंद्धनौर विधानसभा मतदारसंघात थोडा शहरी तर जास्त ग्रामीण भागाचा समावेश असून दोन लाख चाळीस हजार मतदार असून १०७ गावांचा समावेश आहे तर याठिकाणी ८० ग्रामपंचायती आहेत.

प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार हंपी गौडा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी व्यक्त केला आहे.

अनैतिक संबंधाच्या वादातुन झालेल्या खुन प्रकरणातील आरोपींना मानपाडा पोलीसांनी केली ०३ तासात अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील किरवली येथील पुलाची वाडी येथे राहणारे मारूती लक्ष्मण हांडे (वय ५५ वर्षे) यांचे संध्या सिंग नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी लग्न केल्यानंतर ते मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी दर्शन चाळ, कोळेगाव, डोंबिवली (पूर्व) येथे ०१ वर्षांपासून राहत होते. संध्या सिंग हिचे सदर भागात राहणारा वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याचेसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्याचेत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. सदरची बाब मारुती हांडे यास माहिती झाल्यानंतर त्याच्यात व संध्या सिंग यांचे वाद होवू लागले. त्याने अनेक वेळा संध्या सिंग हिला समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु तिचे व वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी यांच्यातील प्रेम सबंध सुरूच होते. त्यामुळे मारुती हांडे हा नेहमी संध्या सिंग हिच्याशी वाद घालू लागला, त्यामुळे संध्या सिंग व वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी यांनी त्यांच्या प्रेमतील अडसर दूर करण्यासाठी मारुती हांडे यास जीवे ठार मारण्याचा प्लान आखला. त्याचप्रमाणे दिनांक २२/०४/२०२३ रोजी मारुती हांडे हा दुपारी त्याच्या घरात जात असताना, वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याने मारुती हांडे याच्या डोक्यात, हातावर, पायावर, स्टंम्पने मारहाण केली त्यावेळी संध्या सिंग हिने मारुती हांडे यास मारण्यासाठी वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याला प्रोत्साहन दिले. वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याने मारुती हांडे याच्या डोक्यात स्टंम्पने जोरजोरात उपट घालून त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर संध्या सिंग हिने वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी याच्या मदतीने मारुती हांडे यास कोळेगावातील ‘ज्ञानदेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल’ येथे दवाउपचारसाठी दाखल केले असता त्यावेळी त्यास कोणी मारले याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना काहीही माहिती दिली नाही, मारुती हांडे यास झालेल्या जखमा ह्या गंभीर स्वरूपाच्या असल्याने त्यास पुढील उपचारासाठी कळवा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय’ येथे पाठविण्यात आले. त्यावेळी संध्या सिंग हिने मारुती हांडे याच्या पत्नीस फोन करून मारुती हांडे यास कोणीतरी जबर मारहाण केली असून, त्यास आम्ही कळवा येथे हॉस्पीटलमध्ये दाखल केल्याची माहिती देवून सदर ठिकाणी बोलावुन घेतले. त्यावेळी मारुती हांडे याची पत्नी, मुलगा व भाऊ असे हॉस्पीटलमध्ये आले असता, संध्या सिंग हिने मारुती हांडे यास कोणी मारले याची काहीएक माहिती न देता जखमीचे केस पेपर मारुती हांडे याच्या पत्नीकडे देवुन हॉस्पीटलमधून गपचुप पोबारा केला.

जखमी मारुती हांडे यास झालेल्या जखमा ह्या गंभीर स्वरूपाच्या असल्याने, त्यास पुढील उपचारासाठी मुंबई येथील ‘सर जे.जे.रुग्णालय’ येथे पाठविण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार चालू असताना तो दिनांक २३/०४/२०२३ रोजी पहाटे ०५.१५ वा. मयत झाला. त्याच्या मृत्युबाबत मानपाडा पोलीस ठाण्याला माहिती मिळताच सदर गुन्ह्याचा प्रकार हा गंभीर असल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि. शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या ०३ टिम तयार करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. संध्या सिंग व वेदांत उर्फ गुड्डू शेट्टी यांचा त्यांच्या पत्त्यावर शोध घेतला असता ते त्यांचे घरी सापडले नाहीत. सदर आरोपींचा वेगवेगळया पध्दतीने शोध घेण्यात आला असून, सदर आरोपी यांचा कोणताही सुगावा किंवा मागमूस नसताना त्यांचा अथक प्रयत्नांनी व कसोशीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवत चौकशी केली असता सदर दोन्ही आरोपी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधात मारुती हांडे हा अडथळा निर्माण करीत असल्याने, त्यांनी त्याचा काटा काढल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुप्रावि (कल्याण) दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ कल्याण सचिन गुंजाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, सपोनि. सुरेश डांबरे, अविनाश वनवे, सुनिल तारमळे, सपोउपनि. भानुदास काटकर, पोहेकाँ. सोमनाथ टिकेकर, सुनिल पवार, संजय मासाळ, शिरीष पाटील, पोना. प्रविण किनरे, अनिल घुगे, गणेश भोईर, पोकाँ. अशोक आहेर, विजय आव्हाड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.