Home Blog Page 34

स्पॅम फोन कॉल्स आणि मेसेज होणार AI च्या मदतीने ब्लॉक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोबाईलच्या नको असलेले फोन कॉल्स आणि स्पॅम मेसेजेसमुळे आपण त्रस्त झाला असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. Jio, Airtel आणि Vodafone-Idea या देशातील मुख्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी १ मे पासून त्यांच्या सिस्टीममध्ये स्पॅम मेसेज आणि कॉल्स ब्लॉक करण्यासाठी फिल्टर बसवल्याचे म्हटले आहे. AI (आर्टीफीशिअल इंटीलिजन्स) च्या मदतीने नेटवर्कवरच हे स्पॅम मेसेज आणि फोन कॉल्स ब्लॉक होणार आहेत.

आतापर्यंत आपल्यासा कॉल आल्यावर कळत असे की, हा स्पॅम कॉल आहे. मग आपण तो ब्लॉक करायचो. आता आधीच नेटवर्कवर त्यावर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे स्पॅम कॉल आता तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने कंपन्यांना ३० एप्रिलपर्यंत या संदर्भात मुदत दिली होती.

अर्चना मोहिते या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनात्मक वाद्यवृंदाचं निवेदन करणारी पहिली महिला निवेदिका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

धम्मपद एक धम्मदेसना‘ हा अरविंद मोहिते प्रस्तुत महापुरुषांच्या व राष्ट्रमातांच्या जीवनावर आधारित वाद्यवृंद आहे. या वाद्यवृंदामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महर्षी महात्मा जोतिबा फुले, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गाणी, नृत्य , नाट्य सादर केले जाते आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे निवेदन (प्रबोधन) हे अर्चना मोहिते करतात. अशा प्रकारचे कार्यक्रम करणारे बरेचसे ग्रुप आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे निवेदन (प्रबोधन) करणारी सगळ्यात पहिली व आतापर्यंत कोणीही न ऐकलेली व पाहिलेली पहिली महिला निवेदिका ह्या अर्चना मोहिते आहेत. ह्यांचं निवेदन (प्रबोधन) हे कणखर, तडफदार, लोकांना विचार करायला लावणारं व परिवर्तन घडवून आणणारं आहे. २०१२ मध्ये अर्चना मोहिते यांनी हे प्रबोधन करायला सुरुवात केली व आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ५०० पेक्षा अधिक कार्यक्रम त्यांनी निवेदिका म्हणून केलेले आहेत.

अर्चना मोहिते यांचं असं म्हणणं आहे की, ह्या महापुरुषांनी व राष्ट्रमातांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी मग तो कोणत्याही जाती, धर्माचा असेल स्त्री किंवा पुरुष असेल प्रत्येकासाठी संघर्ष केलेला आहे प्रत्येकाला हक्क अधिकार मिळवून दिलेला आहे मग फक्त एक विशिष्ट समाजालाच याची जाणीव का ? प्रत्येकाला याची जाणीव का नाही ? आणि म्हणूनच प्रत्येकाला या महापुरुषांचे व राष्ट्रमातांचे विचार त्यांनी केलेला संघर्ष व आपल्याला मिळवून दिलेले न्यायिक हक्क अधिकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येकापर्यंत पोहचवण्याचं काम अर्चना मोहिते करत आहेत.

अर्चना मोहिते यांचं असंही म्हणणं आहे की ह्या महापुरुषांनी व राष्ट्रमातांनी आपल्याला न्याय मिळवून दिलेला आहे तर ह्या महापुरुषांनाही न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला त्यांच्या कार्याची जाणीव असली पाहिजे. म्हणूनच तळमळीने अर्चना मोहिते हे प्रबोधनाचं काम ‘धम्मपद एक धमदेसना’ या वाद्यवृंदाच्या माध्यमातून करत आहेत व शेवटच्या श्वासापर्यंत करत राहण्याचा त्यांचा मानस आहे असे त्यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.

महापुरुषांचे व राष्ट्रमातांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या पहिल्या महिला निवेदिका अर्चना मोहिते यांच्या कार्याला जाहीर सलाम व समाजप्रबोधनाचे काम अखंड करत राहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

 

 

कडोंमपा “ह” प्रभागक्षेत्र चे सहाय्यक आयुक्त म्हणून मुरारी जोशी यांनी पदभार स्वीकारला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेली तीस वर्ष कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेले कर्मचारी मुरारी जोशी यांची डोंबिवली पश्चिम येथील “ह” प्रभाग क्षेत्रातील कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून पालिकेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला. डोंबिवली पश्चिम भागामध्ये हा प्रभाग अंतर्गत असून या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे आणि उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवीन असे यावेळी मुरारी जोशी यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.

त्याचप्रमाणे डोंबिवली पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी धुळीचे साम्राज्य आहे. हा प्रभाग धुळ मुक्त करण्याचा आपला मानस असून आपल्याला कमी कालावधी मिळालेला असला तरी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन. असा निर्धार जोशी यांनी व्यक्त केला आहे. अनधिकृत विभाग, फेरीवाला पथक प्रमुख आणि वरिष्ठ लिपिक म्हणून मुरारी जोशी यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेमध्ये काम केले आहे. स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे , पुंडलिक म्हात्रे, सहाय्यक आयुक्त साबळे, लाल बावटा रिक्षा यांचे अध्यक्ष कॉम्रेड काळु कोमास्कर तसेच अनेक मान्यवरांनी सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरारी जोशी यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

पर्यावरणवादी युवा संस्था फॉर फ्युचर इंडियाच्या स्वच्छता मोहिमेत अभिनेत्यांचा सहभाग!

भाईंदर, प्रतिनिधी: वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण दूत हर्षद ढगे यांनी For Future India, मिरा भाईंदर महानगपालिका व मॅन्ग्रोव्ह फॉउंडेशन यांच्या मार्फत उत्तन समुद्रकिनारी भव्य स्वच्छता अभियान आयोजित केले होते. या स्वच्छता मोहिमेत मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते डॉ. गिरीश ओक, अभिनेत्री प्रिया मराठे, अभिनेते शंतनू मोघे, इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आणि जूनियर मिस्टर बीन म्हणून प्रसिद्ध जतीन थानवी, मिस वर्ल्ड -फिटनेस फिजिक श्वेता राठोड प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

“वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. तरी पृथ्वीवरील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करणे” या संकप्लनेला साथ देत अभिनेत्यांनी आपला सहभाग उत्तन समुद्रकिनारी भव्य स्वच्छता अभियानत नोंदवला.

भव्य स्वच्छता अभियानत २५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग दाखवत १० टनहुन अधिक प्लास्टिक कचरा काढला. अगदी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला होता. फॉर फ्युचर इंडिया संस्थे सोबत, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, मिरा भाईंदर स्वच्छता विभाग, दिव्य प्रकाश प्रतिष्ठान, शोध फाउंडेशन, रॉबिनहुड आर्मी, ऑक्सफोर्ड आंतरराष्ट्रीय शिक्षण सेवा, ओशियन ओव संस्थेसोबतच अभिनव कॉलेज, ठाकूर कॉलेज, डी. टी. एस. एस. कॉलेज, एस. एन. कॉलेज, अथर्व कॉलेज, नालंदा कॉलेज, लधिदेवी कॉलेज, DGMC कॉलेज महाविद्यालयांच्या विध्यार्थ्यानी सुद्धा सहभाग घेतला होता.

यावेळी मिरा भाईंदर महानगपालिकेचे उप आयुक्त श्री. रवी पवार, फॉर फ्युचर इंडियाचे संस्थापक व अध्यक्ष हर्षद ढगे, वन विभागाचे वनपाल श्री. सचिन मोरे, मनीषा गाडेकर, बीट अधिकारी ज्ञानेश्वर म्हस्के, फॉर फ्युचर इंडियाचे ध्रुव कडारा, गणेश नारकर, कुंदन सोळंकी, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन चे अमेय भोगटे, सुमित धोत्रे, लवेश उपस्थित होते.

भारतात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची तोफखाना रेजिमेंटमध्ये नियुक्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय सैन्य दलात विविध रेजिमेंट्समध्ये आता महिला अधिकारी उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. महिला अधिकाऱ्यांच्या या धैर्याला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे. भारतीय लष्कराच्या तोफखान्यातील इतिहासात पाहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

‘ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी’ चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच महिला अधिकाऱ्यांची आज तोफखानाच्या रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट मेहक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे, लेफ्टनंट अदिती यादव आणि लेफ्टनंट पवित्र मुदगील अशी या महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पाच महिला अधिकार्‍यांपैकी तीन चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या तुकड्यांमध्ये आणि इतर दोन पाकिस्तानच्या सीमेजवळील “आव्हानात्मक ठिकाणी” तैनात आहेत.