Home Blog Page 38

राष्ट्रवादी आता केवळ एक प्रादेशिक पक्ष..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष मोर्चेबांधणीला लागले असताना भारतीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष राहणार नसून निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्राबाहेर घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. सीपीआय आता केरळ, मणिपूर आणि तामिळनाडूमध्ये राज्याचा दर्जा असलेला राज्य पक्ष म्हणून गणला जाईल.

हे आहेत राष्ट्रीय पक्षासाठीचे निकष

जो राजकीय लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त मतं प्राप्त करेल अशाच पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या २ टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून ११ जागा जिंकाव्या लागतात.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो.

घड्याळाला अन्य राज्यात बंदी

१९६८ सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका ‘घड्याळ’ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.

आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा

दरम्यान निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. आम आदमी पक्षाला ‘झाडू’ नॅशनल पार्टी म्हणून निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष होण्याच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, असे निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

आमच्यासाठी राम मंदीर हा राजनैतिक नव्हे तर अस्मितेचा विषय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले आणि प्रस्तावित मंदीर प्रकल्पाची पहाणी केली. शिवसेनेच्या गटाला ‘धनुष्य आणि बाण’ चिन्ह मिळाल्याचे चिन्ह प्रभू रामाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत, असे प्रतिपादन करत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी अयोध्येमध्ये हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य महाराष्ट्र भवन उभारले जाईल. अशी घोषणा केली.

“आजचा हा दिवस माझ्यासाठी अभूतपूर्व असा दिवस आहे. मंदीर हा आमच्यासाठी राजकीय नव्हे तर अस्मितेचा विषय आहे. राममंदीर उभारणी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न होते, ते स्वप्न आज येथे प्रत्यक्षात साकारत आहे. हे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्णत्वास नेत आहेत”. अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या दौऱ्याचा काहींना त्रास झाला, कारण त्यांना हिंदुत्वाची ऍलर्जी आहे. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर सर्वांच्या घराघरात, मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीमुळे हे लोक हिंदुत्वाला, हिंदू धर्माला विरोध करत आले आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपाची करडी ‘नजर’ ; मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाणार भाजपचे तीन नेते..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौ-यावर जात आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना आमदार, खासदार, मंत्री तसंच शिवसेना पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत. पण या अयोद्धा दौ-यावर भाजपाची नजर असणार असुन भाजपाचे तीन मंत्री देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळे भाजपाचा एकनाथ शिंदे यांच्यावर कायम वॉच राहणार आहे.

राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले आहेत. पण राजकारणात काहीही होऊ शकते ही शक्यता गृहीत धरून भाजपा कायमचं एकनाथ शिंदे यांच्यावर नजर ठेऊन असते. मुख्यमंत्र्याच्या काही कार्यक्रमात तर शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नसतो पण भाजपाचा कोणतातरी नेता किंवा आमदार कायम असतो त्यामुळे भाजपा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वॉच ठेवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते.

आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी जात असताना भाजपचे नेतेदेखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही अयोध्येमध्ये जाणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेते गिरीश महाजन आणि संजय कुटे हे देखील अयोध्या दौऱ्यावर जातील. संजय कुटे यांची ओळख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्यावर भाजपाचे लक्ष असणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते, कार्यकर्ते अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. अयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेणार आहेत.

शरयू नदीवर महाआरती करून मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची सांगता होणार आहे. शिवसैनिक याआधीच स्पेशल ट्रेनने अयोध्येला पोहोचले आहेत. राज्यात यशस्वी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन गुवाहाटी दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी भाजपाकडून मंत्री रवींद्र चव्हाण आणि मोहित कंबोज हे देखील गेले होते. त्यावेळी यावरुन बरेच तर्कवितर्क लढवले गेले होते.

 

मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स येथे पार्किन्सन्स रुग्णांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी: देशभरात लाखो लोकांना पार्किन्सन्स रोगाने (पीडी) बाधित केले आहे. या प्रगतीशील न्यूरोलॉजिकल स्थितीबद्दल जागरूकता पसरवणे आणि लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोडने पार्किन्सन रोगाने पिडीत ४० हून अधिक रुग्णांकरिता मनोरंजक उपक्रमाचे आयोजन केले आहे. या रुग्णांना त्यांची मोटर आणि नॉन-मोटर कौशल्ये सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या यामागचा मुख्य उद्देश होता.

पार्किन्सन रोग (पीडी) हा एक न्यूरोडिजेनेरेटिव्ह डिसऑर्डर आहे जो हळूहळू वाढतो आणि काही काळानंतर त्याची लक्षणे दिसून येतात. एखाद्याला हा आजार असल्यास मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे एखाद्याच्या मोटर कौशल्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. थरथरणे, स्नायुंमधील कडकपणा , चालताना हालचाल करताना अडचणी येणे ही त्याची लक्षणे आहेत. हा रोग डोपामाइन-उत्पादक न्यूरॉन्सवर परिणाम करतो आणि नैराश्य, चिंतेशी संबंधित आहे आणि एखाद्याच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यत्यय आणतो. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोडने रूग्ण आणि काळजीवाहूंना प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी एक सपोर्ट ग्रुप तयार केला आहे. रूग्णांना आणि काळजीवाहूंना मोटर समन्वयाचे महत्त्व आणि रोगाचे पुढील व्यवस्थापन करण्याविषयी शिक्षित केले जावे हे सुनिश्चित करण्यासाठी हॉस्पिटलद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

डॉ पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड, म्हणाले, पार्किन्सन्स रोग (PD) मुळे देशात उच्च मृत्यू आणि विकृती दर कारणीभूत आहेत. जरी तो बरा होऊ शकत नसला तरी डॉक्टरांच्या त्वरित मार्गदर्शनाने त्याचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. रुग्णाला कुटुंबातील सदस्य आणि काळजीवाहू यांच्या मदतीची देखील आवश्यकता असेल. रुग्णाचे आरोग्य, व्यायाम आणि पोषणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रुग्णाप्रमाणेच त्याचे/तिचे कुटुंबही खूप तणावातून जात असते. त्यामुळे या आजाराची सखोल माहिती असणे अत्यावश्यक आहे. रुग्णांना हातपाय आणि बोटांच्या समस्या येतात. स्नायू कडक होतात आणि चालण्याची क्षमता खराब होते. मुद्रा, भाषण आणि लेखन समस्या आणि हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता येते.

डॉ शीतल गोयल, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट वोक्हार्ट हॉस्पिटल पुढे म्हणाले, आमचा सपोर्ट ग्रुप हा संदेश पाठवतो की आम्ही रुग्णांची काळजी घेण्यासाठी तिथे आहोत. सुधार, संतुलन, तग धरण्याची क्षमता, सहनशक्ती, लवचिकता आणि हात-डोळा समन्वय आणि स्नायूंचा ताण आणि कडकपणा कमी करण्यासाठी मजेदार चित्रकला स्पर्धेसह फिजिओथेरपी क्रियाकलाप केला आहे. रेखाचित्रे एखाद्याला आनंदी बनवू शकतात आणि मनःस्थिती वाढवू शकतात. चालणे, संतुलन, पकड मजबूत करणे आणि मोटर स्किल्स सुधारण्यासही मदत करतील. पार्किन्सन रोगाच्या व्यवस्थापनात अलीकडील झालेली प्रगती देखील रुग्णांना त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल. त्यामुळे घाबरू जाऊ नका आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या संपर्कात रहा.

पार्किन्सन्समुळे माझे हात सतत थरथर कापत आहेत आणि मला लिहिता किंवा एखादी वस्तू धरता येत नाही. डॉक्टरांनी आम्हाला अनेक व्यायाम दाखवले आहेत ज्यामुळे मला या समस्या सुधारण्यास मदत होईल. सपोर्ट ग्रुपसह आम्हाला अनेक रुग्ण भेटतात आणि आम्हाला एकमेकांसोबत राहून बरे वाटतेअशी प्रतिक्रिया एका रुग्णाने व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा क्रीडामंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून खेळाडुंचा सत्कार व कौतुक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नुकत्याच तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी (आसाम) येथे सपन्न झालेल्या ४ थ्या आशियाई अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मिळवत भारतीय खेळाडूंनी भारताचे नाव उज्ज्वल केले. मुंबई येथे आशियाई खो-खो स्पर्धेत खेळलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडुंचे महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते, भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडु अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, सुयश गरगटे, अपेक्षा सुतार, प्रियांका इंगळे, गौरी शिंदे, निकिता पवार, प्रशिक्षक महेश पलांडे, डॉ. अमित रावेट यांचा सत्कार करण्यात आला या वेळी डॉ. चंद्रजित जाधव, ऍड. गोविंद शर्मा , सुरेंद्र विश्वकर्मा, पंकज दळवी, तुषार मोरे, विजय बनसोडे उपस्थितीत होते.

यावेळी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या खेळाडुंचे कोडकौतुक तर केलेच व त्याचवेळी या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुध्दा दिल्या. तसेच भविष्यात महाराष्ट्राचे व भारताचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचविले.