Home Blog Page 44

राज्यातील ३० टक्के फिडर सौरऊर्जेवर आणणार – देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील ३० टक्के फिडर हे आमचं सरकार सौरऊर्जेवर आणणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांना शेती करताना होणारी गैरसोय दूर होईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कन्हैया ऍग्रो कंपनी’च्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

औद्योगिक सुरक्षेच्या जागृतीसाठी डोंबिवलीत आयोजलेल्या भव्य रॅलीत कंपनी मालकांसह ३०० कामगारांचा सहभाग..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात औद्योगिक सुरक्षा सप्ताह दि.४ ते १० मार्च पर्यंत सुरू असून ५२ व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहनिमित्त कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (कामा) आणि औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचनालाय यांच्या संयुक्त माध्यमातून डोंबिवलीत गुरुवारी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
.

राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त कामा अर्थात ‘कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’ आणि ‘औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचलनालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत गुरुवारी भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत कामा संघटनेचे सदस्य तथा कंपनी मालकांसह जवळपास ३०० कामगार सहभागी झाले होते. ४ ते १० मार्चपर्यंत औद्योगिक सुरक्षा सप्ताह चालू आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यात काम करत असताना कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर कारखान्यातील यंत्रसामुग्री व महागड्या मशिनचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी डोंबिवली एमआयडीसीच्या फेज-१ व फेज-२ मधील अनेक कारखान्यांत सुरक्षितता कशी करावी, आग लागल्याच्या घटना घडल्यास कश्याप्रकारे उपाययोजना करून स्वतःचा जीव वाचवता येईल, या संदर्भात कारखान्यांमध्ये पोस्टर व स्लोगन सारखे जागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे ‘कामा’ संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.

‘कामा’ च्या कार्यालयापासून काढलेली ही रॅली औद्योगिक विभागांतील सर्व रस्त्यांवर फिरून पुन्हा तिचे ‘कामा’ च्या कार्यालयात विसर्जन करण्यात आले. ‘इवोनिक कॅटलिस्ट’ आणि ‘घरडा केमिकल्स’ या दोन कंपन्यांच्या गेटवर सभा घेण्यात आल्या व चहापाण्याची सोय करण्यात आली होती.

तत्पूर्वी कामाच्या सभागृहात आयोजित केलेल्या सभेत औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाचे सहाय्यक संचालक विनायक लढि यांच्यासह कामाचे पदाधिकारी संजीव काटेकर, उदय वालावलकर, विकास पाटील, मनोज जालन, मुरली अय्यर, आदींनी उपस्थित कामगारांना सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले. औद्योगिक कारखान्यांमधील विविध यंत्रे आणि त्यांचे क्लिष्ट प्रक्रियांशी संबंधित तेथील कामगारांच्या सुरक्षिततेची व जीविताची सुरक्षा आपण समजून घेणे आवश्यक आहे. कामगार ज्या कंपनीमध्ये, ज्या यंत्रावर, ज्या परिस्थितीमध्ये, जे काम करत असतो, ते आपले काम, यंत्र व त्याचे तंत्र व्यवस्थित शास्त्रीयदृष्ट्‌या बारकाव्यानिशी समजून घेणे हेच औद्योगिक सुरक्षेचे समीकरण असल्याचे ‘कामा’ संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

नरवीर तानाजी – सुर्याजी मालुसरेंच्या साखर गावात शिवजन्मोत्सव साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवरायांच्या शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या पोलादपूर तालुक्यातील सुभेदार नरवीर तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज असलेल्या साखर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात स्वराज्य युवा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. उमरठ येथील सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधी स्थळावरुन साखर येथील सूर्याजी मालुसरे यांच्या समाधी पर्यंत शेकडो तरुणांच्या उपस्थितीत पहाटे शिवज्योत आणण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार आणि कीर्तनकार हभप डॉ. प्रविण महाराज दुशिंग पाटील (औरंगाबाद) यांचे शिवकार्याचा वेध घेणारे वीररसपूर्ण कीर्तन झाले. आजची तरुण पिढी बिघडलीय अशी खंत अलीकडे समाजात व्यक्त केली जाते, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरी होणारी शिवजयंती तरुणच साजरी करतात, त्याचबरोबर देशाची सीमांचे सरंक्षण करणारे तरुणच आहेत. मात्र आई वडिल संस्कार करण्यात कमी पडत आहेत. शिक्षण घेण्याच्या अन देण्याच्या पध्दतीत बदल झाला असला तरी महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासाचे बाळकडू त्यांना सतत पाजत जा. असे आवाहन कीर्तनातून डॉ. प्रविण महाराजांनी केले. किर्तनास सुप्रसिद्ध स्वरगंधर्व कैलास महाराज पवार, गायन सम्राट संजय महाराज हजारे, रायगड भूषण पखवाज वादक सुनिल मेस्त्री, विठ्ठल मांढरे, जयराम चोरगे, अनिल दाभेकर, आनंद घाडगे यांनी साथ दिली. याप्रसंगी श्री सद्गगुरू भावे महाराज वारकरी समाजाचे गुरुवर्य हभप रामदादा घाडगे, पोलादपूर तालुक्याचे माजी सभापती नारायण अहिरे, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश कोळसकर या मान्यवरचा विशेष सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते ज्ञानोबा मालुसरे, विनायक मालुसरे, सरपंच पांडुरंग सुतार, प्रमुख संयोजक पांडुरंग शं. मालूसरे, विनायक ज. बांद्रे, पोलादपूर शिवसेना नेते आणि ज्येष्ठ सामाजिक नेते कृष्णा कदम, भरत चोरगे, दीपेश मालुसरे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराम बांद्रे, दगडू शं. मालुसरे, संतोष तु. मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र मालुसरे, सुनिल बांद्रे, नारायण चोरगे, रूपेश सोनाटे, संदीप मालुसरे, राकेश चोरगे, नितेश ल. मालुसरे, वैभव सोनाटे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलादपूर शिवसेना तालुका प्रमुख अनिल मालुसरे तर सूत्रसंचालन नारायण चोरगे गुरुजी यांनी केले. पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक आणि शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.

 

भाजप नेते किरीट सोमय्यांना मोठा झटका; मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायालयीन चौकशीचे आदेश


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजप नेते किरीट साेमय्या यांची चाैकशी हाेणार असून किरीट साेमय्या यांची ही न्यायालयीन चाैकशी हाेणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. या याचिकेची न्यायालयाने दखल घेतली आहे.

राज्यात विराेधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ही माेहीम सुरू केली आहे. किरीट सोमैय्या आराेप करते आणि ‘ईडी’ चाैकशी करते. असा आराेप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ यांचे वकील आबाद पोंडा यांनी यासंदर्भात न्यायालयात जाेरदार युक्तिवाद केला हाेता. यात सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी ही माेहीम उघडली आहे. ते तक्रार करतात आणि त्यानंतर ‘ईडी’ कारवाई करते, असे हे नियाेजनपूर्वक चालू आहे. यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा वकील पोंडा यांनी केला. दरम्यान, आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने मुश्रीफ यांना दिलासा दिला. किरीट सोमैय्या यांच्या न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले.

प्रकरण नक्की आहे काय ?

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या काेल्हापुरातील मालमत्तेवर ‘ईडी’ने छापेमारी केली. तसेच मुश्रीफ यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा हेतुपुरस्सर दाखल करण्यात आल्याचा आराेप मुश्रीफ यांनी केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी मुश्रीफ यांनी याचिकेद्वारे केली आहे. गेल्या सात महिन्यांपासून वेगवेगळ्या घटनांचा विचार करता ‘ईडी’मध्ये अडकवण्याचे प्रकार हाेत आहेत. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा हे षड्यंत्र असल्याचाही दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

यूएस शेअर बाजाराच्या घसरणीचा फटका; शेअर्स मार्केटमध्ये दाणादाण.


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या आठवड्यात तेजीत असलेल्या शेअर बाजारात आज आठवड्याच्या शेवटी दाणादाण उडाली आहे. यूएस शेअर बाजारातील घसरणीचा फटका आज मुंबई शेअर बाजाराला बसला आहे. जागतिक संकेतांमुळे यूएस शेअर बाजारात ही घसरण नाेंदवली गेली. आज बीएसई सेन्सेक्स ८५९.१८ अंकांनी घसरला. म्हणजेच १.४४ टक्के घसरला आहे. ५८,९४७.१० वर आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी देखील २३९.२५ अंकांनी घसरला आहे. म्हणजेच १.३६ टक्क्यांनी घसरून १७,३५०.३५ अंकांवर आला आहे.

शेअर बाजारात प्रामुख्याने अदानी समूहाची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ ५% आणि ‘एचडीएफसी बँक’ २% नी घसरली आहे. केअर रेटिंगमध्ये ‘अदानी एंटरप्रायझेस’चे रेटिंग स्थिर ते नकारात्मक असे बदल घडले आहेत. तसेच ‘एनएसई’ने ते अल्पकालीन देखरेखेखाली ठेवले आहेत. याशिवाय एचडीएफसी बँकेचा डेटा लिक झाल्याची माहिती समाेर आली आहे आणू तशा बातम्या झळकल्या देखील आहेत. बँकेने मात्र याप्रकाराला नकार दिला आहे. या गाेंधळामुळे एचडीएफसी बँकेचे समभाग दाेन टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी समूहाच्या सूचीबद्ध दहापैकी सात समभाग घसरले आहेत.

मागील सत्रात समूहाचे सहा समभाग उच्चांकी पातळीवर बंद झाले हाेते. त्यापैकी चार समभाग वरच्या वळणावर हाेते. शुक्रवारी बाजार उघडताच ‘अदानी ग्रीन एनर्जी’ आणि ‘अदानी ट्रान्समिशन’चे शेअर्स अपर सर्किटवर पाेहाेचले. याशिवाय ‘अदानी टाेटल गॅस’च्या दरातही वाढ नाेंदवली गेली. पण एसीसी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड), अदानी पॉवर, अदानी विल्मार, अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेसमध्ये सर्वाधिक ५.४४ टक्क्यांची घसरण नाेंदवली गेली.