Home Blog Page 57

दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाची सोनसाखळी केली लंपास..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक येथील लॅमरोड भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळय़ातील सुमारे सव्वा लाखाची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिला रमेशचंद्र अग्रवाल (वय: ७० वर्षे) राहणार साईशांती भवन, लॅमरोड यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिला अग्रवाल या रविवारी सायंकाळच्या सुमारास शेजारी राहणाऱ्याच्या घरी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने त्या पायी जात असताना पाठीमागून आलेल्या मोपेड दुचाकीवरील एकाने त्यांच्या गळयातील वजनी पॅण्डल असलेली सोनसाखळी असा सुमारे १ लाख २५ हजार रूपये किमतीचा ऐवज हिसकावून नेला. याचा अधिक तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत असे प्रसिध्दी माध्यमांना सांगण्यात आले.

 

आदित्य ठाकरे आक्रमक; भाजप नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या प्रकरणी आदित्य ठाकरे कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच न्यायालयात जाणार असल्याचं सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
समजते.

दिशा सालियान प्रकरणी सातत्यानं होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणी टीकेचा सामना करावा लागत आहे. भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना या प्रकरणावरुन वारंवार टार्गेट केलं जात आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांकडून जबाबदार धरले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी याआधी यावर कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आता ते आरोप करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसते. ते आता याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं समोर आलं आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने फोन येत होते आणि एयू म्हणजे आदित्य ठाकरे असा असल्याचा आरोप केला होता. शेवाळे यांच्या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून सत्ताधाऱ्यांविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून ते दिशा सालियान प्रकरणात त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहेत.

“एका ३२ वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं आहे, त्यामुळे बदनामीचे प्रयत्न सुरु आहेत,” अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली होती. नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी लक्ष करण्यात आलं होतं. त्यांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि रिया चक्रवर्तीच्या फोन कॉलमधील एयू नावावरुन हिवाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच दिशा सालियान प्रकरणाची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरेही आता आक्रमक झाले असून त्याकरिता कायदेशीर सल्ला घेत आहेत.

 

ब्रह्मकुमारी संस्थेच्या घाटकोपर विभागाचा ४७ वा वार्षिक उत्सव संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक संस्थेचा वार्षिक उत्सव नुकताच डोंबिवली येथील ‘हेरिटेज हॉल’ मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाची ‘सूनहरा बचपन’ या संकल्पनेवर रूपरेषा आखण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली व घाटकोपर उपविभागाच्या ब्रह्मकुमारी केंद्राने केला होता. गेली ४७ वर्ष अध्यातमिक कार्य ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने समाजात सुरू आहे .या वार्षिक दिनाच्या निमित्ताने राजयोगिनी ब्रह्मकुमारी डॉ.नलिनी दीदी (दीदी मां) यांचा सत्कार करुन त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये ब्रह्मकुमारी नलिनी दीदी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाने उच्च पातळी गाठली. दीदीं मां यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले असून वयाची ६५ वर्ष त्यांनी निस्वार्थी, निर्लसपणे मानवाची सेवा आत्मियतने, काळजपूर्वक अध्यातमिक वाढीसाठी केली. डॉ नलिनी दीदी (दीदी मां) या मुंबईतील मध्यवर्ती राजयोग केंद्राच्या संचालक आहेत. या संस्थेच्या वार्षिकोत्सव दिनी लोकप्रिय अध्यातमिक गुरू ब्रह्मकुमारी नियतकालिकेच्या स्तंभलेखिका राजयोगी ब्रह्मकुमार निकुंज यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ‘जान्हवी मल्टी फाऊंडशन’चे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, वपोनि सचिन सांडभोर आणि इतर मान्यवरांचा सत्कार सदर कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घाटकोपर उपविभागाच्या सहसंचालक आणि डोंबिवली केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकू दीदी यांनी केले.

 

आगरी वधू-वर परिचय मेळावा डोंबिवलीत मोठ्या उत्साहात संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आगरी वधू-वर मेळावा डोंबिवली येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर प्रांगणात आज नुकताच संपन्न झाला. या परिचय मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प प्रकाश महाराज, प्रथम महापौर आरती मोकल, ऍड. तुप्ती पाटील, ठाण्याचे मा. नगरसेवक रमाकांत पाटील, माजी सभापती चद्रकांत पाटील, काळू कोमास्कर, शरद पाटील, बाळासाहेब खारीक, दत्ता वझे, ह.भ.प हनुमान पाटील, इत्यादी मान्यवर या वधू-वर मेळाव्यास उपस्थित होते.

गावांचा विकास झाल्यामुळे आगरी समाजातील अनेकांचे स्थलांतर झाले आहे. लोक एकमेकांना भेटत नाहीत. विवाह जुळणे कठीण बाब झाली आहे. असे ह.भ.प प्रकाश महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले. बहुसंख्य भूमिपुत्र समाज जमीन विकून उध्वस्त झाला आहे. परिणामी त्याची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे मुलांची लग्न करण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागत आहे. अश्या समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला असल्याचे सगळ्या मान्यवर वक्त्यानी सांगितले.

तर, ऍडव्होकेट तृप्ती पाटील म्हणाल्या कि, आगरी समाजातील तरुण-तरुणींना स्टेजवर जाण्यासाठी संकोच वाटतो. तो दूर व्हावा यासाठी येथे वधू-वरांचा परिचय मेळावा आयोजित केला आहे. मागील वर्षी आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला होता. यंदा देखील आमदार राजू पाटील यांनी प्रत्येक जोडप्याला प्रोत्साहन पर भेट म्हणून प्रति जोडपे एक लाख रुपये देण्याची ग्वाही केली आहे. आगरी समाजात ही एक प्रकारची क्रांती आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मंगळ ग्रह शुभ आहे. त्याची भीती बाळगु नका. मध्यस्थी करणारे फसवणूक करतात. त्यास आळा बसावा यासाठी या परिचय मेळाव्याचे आणि वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले. या मेळाव्यात दोनशे तरूण-तरुणी सहभागी झाले होते. अशी माहिती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजक काळू कोमास्कर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

 

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणीवर भर द्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूकता, प्रशिक्षण आणि चाचणी या तिन्ही बाबींचा अवलंब करावा अशा सूचना नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन यांनी दिल्या. गोपाल कृष्णन यांनी प्राधिकरणाचे संचालक गुणवत्ता हमी तपासणारे अधिकारी हरींदर ओबेरॉय संचालक पश्चिम विभाग प्रीती चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी आज वांद्रे-कुर्ला संकुलातील अन्न व औषध प्रशासन कार्यालय आणि प्रयोगशाळेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.


अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केंद्रीय पथकाचे स्वागत केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (विधी) चंद्रकांत थोरात सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई शशिकांत केकरे, अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक संगीता ठाकूर व इतर अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त आणि प्रयोगशाळेतील सहयोगी कर्मचारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान या संकुलात अन्न व औषध प्रशासनाचे कामकाज कसे चालते, तसेच प्रयोगशाळेत येणारे नमूने कशा पध्दतीने तपासले जातात याची पाहणी त्यांनी केली. प्रशासनाच्या चौथ्या मजल्यावर प्रयोगशाळेकरिता नव्याने बांधकाम सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच अत्याधुनिक प्राणी गृह, अन्न तपासणी केंद्र, अन्न दर्जा तपासली जाणारी प्रयोगशाळा येथे भेट दिली.

या भेटीदरम्यान अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळेच्या संचालक ठाकूर यांनी मुंबई, नागपूर व औरंगाबाद प्रयोगशाळेबाबत सादरीकरण केले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपाल कृष्‍णन, यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. सह आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई केकरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले