Home Blog Page 61

“मराठा आंदोलनातील केसेस मागे घेतल्या तसं ‘भीमा कोरेगाव’ प्रकरणातील केसेसही मागे घ्या”; रामदास आठवले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसवर भाष्य केलंय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार आहे. ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या आंदोलकाच्या केसेस मागे घेतल्या तसंच भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेस देखील मागे घ्या, अशी विनंती करणार आहे”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

“सभेला परवानगी द्या”

१ जानेवारीला भीमा कोरेगाव हा संघर्षशिल दिवस आहे. याची सुरुवात बाबासाहेबांनी केली होती. महार समाजाच्या इतिहासाची ती आठवण आहे. लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी तिथे जमतात. आधी फक्त आमची सभा तिथं होत असंत पण आता खूप जणांची होते. पण प्रशासनाने निर्णय घेतला आहे की त्या परिसरात आता सभा घेता येणार नाही तो योग्यच आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण बाहेर सभा घ्यायला परवानगी द्या, अशी मागणी आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही आठवले बोललेत. चंद्रकांतदादा राज्यातील सिनियर नेते आहेत. पण त्यांच्या या वक्तव्याशी कुणीही सहमत नाहीये, असं आठवले म्हणाले. चंद्रकांतदादांनी भीक हा शब्दप्रयोग केला. त्यामुळे लोकांना त्याबद्दल रोष आहे. मात्र त्यांनी आता माफी मागितली आहे. मी देवेंद्रजी यांच्याशी बोललो की ३०७ मागे घ्या. आता ते मागे घेतले आहेत. हा विषय लांबावणं योग्य नाही. सर्वांनी शांती ठेवणे आवश्यक आहे, असंही आठवले म्हणाले.

मविआच्या महामोर्चावर आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आघाडी ही सध्या एकत्र आहेत. निवडणुकीदरम्यान एकत्र राहतील का नाही माहीत नाही. त्यांना आमदार सांभाळता आले नाहीत. म्हणून आता मोर्चे काढतात. राज्यपाल यांच्या वक्तव्यबद्दल आम्ही नाराजी व्यक्त केली आहे, असंही आठवले म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अल्पसंख्याक समुदायाच्या योजनांच्या पुस्तीकेचे प्रकाशन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा एकत्रित समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन आज अल्पसंख्याक हक्क दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॅा.अनुपकुमार यादव उपस्थित होते.

मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, जैन, शीख, पारसी आणि ज्यू या अल्पसंख्याक समूहांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थींना व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. पुस्तिकेत विविध योजनांची माहिती, लाभार्थींची पात्रता आदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

 

कल्याण-शिळ रस्ता रुंदीकरण कामाने घेतला आणखी एका मोटारसायकल स्वाराचा बळी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण शिळ रोड रस्ता रुंदीकरण करताना कल्याण-शिळरोड वरील शंकरानगर, विलास स्मृती इमारतीच्या समोर सोनारपाडा, दिनांक १८/१२/२०२२ रोजी पहाटे ३:३३ मिनिटाने मोटारसायकलस्वार मनोज कुमार नामक व्यक्ती (राहणार डोबिवली, पलसर गाडी नंबर एमएच०५/सीडी-६९२८) याचा जागेवरच मृत्यू झाला. याच्या मृत्यूस कल्याण-शिळ रोड रूंदीकरण करण्याचे काम घेणारी ‘साकेत इंफ्रास्ट्रचर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. गुरुनामे व साईट इंजिनिअर श्री. कमलेश चौधरी हेच जबाबदार आहेत कारण ही जमीन रस्ता बाधित शेतकरी श्री.गणेश म्हात्रे यांच्या मालकीची असून सर्व्हे.नंबर ७७/२ या जमिनी मध्ये विनापरवागी प्रवेश करुन बेकायदेशीर खोदकाम करवून माती चोरून नेली याप्रकरणी दि.१७/१२/२०२२ रोजी संध्याकाळी ४:३० वाजता ‘साकेत इंफ्रास्ट्रचर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. गुरुनामे व साईट इंजिनिअर श्री. कमलेश चौधरी यांची भेट घेऊन आपण केलेल्या कृत्याचा जाब विचारला असता जोपर्यंत जमीनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमच्या मालकीची जमीनीत कुठलेही काम करु नये व आमच्या मालकीच्या जमीनीतुन माती घेऊन गेला आहात ती माती टाकून जमीन पुर्वरत करा अन्यथा रस्ता रोको अनंदोलन करण्यात येईल असे बजावत सज्जड इशारा श्री गणेश म्हात्रे यांनी कॉन्ट्रॅक्टरला दिला होता.

त्यानंतर त्याच खोदकाम केलेल्या रस्त्यावर काही अंतर पुढे रात्रीची वेळी रस्ता बंद असल्याची कोणतीही सिग्नल यंत्रणा न लावल्यामुळे पुढे रस्ता खोदकाम माहिती होत नसल्याने मध्येच अचानक रस्त्यावर सिमेंट ब्लॉक रोडवर ठेवून त्याला रिबीन लावलेली होती त्यावर कुठलेही रेड लाईट अलर्टचा वापर नसल्याने रस्त्यावरील सिमेंट ब्लॉक अचानक समोर आल्याने हा दुदैवी अपघात झाला.

या संपूर्ण घटनेला जबाबदार ह्या दोन्ही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा यामुळेच निष्पाप व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाला आहे. म्हणून या दोन्ही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा भारतीय दंड संहिता ३०४ नुसार गुन्हा दाखल करावा व जमिनीत बेकायदेशीर प्रवेश केल्याने व माती चोरून नेल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता ४४७ व ३७८ नुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री गणेशजी म्हात्रे, सरचिटणीस श्री. जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष श्री. नवनीत म्हात्रे, खजिनदार श्री.महेंद्र म्हात्रे यांनी पोलीस व पालिका प्रशासनाकडे केलेली आहे.

तलवारीने हल्ला चढवत ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण पेटले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची काल रणधुमाळी थांबली आहे. प्रचार संपताच अंतर्गत गटबाजी समोर आलेली पाहायला मिळाली आहे. बीडच्या दगडी शाहजानपूर इथे ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. काल सायंकाळच्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाच्याने मामावर चक्क तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आलाय.

पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याअगोदरच पोलिसांनी भाच्याला पकडले. त्यामूळे मोठी दुर्घटना टळली. प्राप्त माहितीनुसार, शिवाजीराव चव्हाण असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तलवारबाजी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मामा चव्हाण आणि भाचा जाधव या दोघांची भेट बीड येथील राजीव गांधी उद्यानासमोर झाली. शाब्दिक बाचाबाचीतून हाणामारी जुंपली भाचा धोंडीराम जाधवने मामावर तलवारीने वार केला तेवढ्यात जवळच चौकात उभे असलेल्या दोन पोलीस हवालदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानी तलवार जप्त केल्याने अनर्थ टळला. सध्या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

शिंदे गटाचा शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयावर ताबा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर येथील विधिमंडळ पक्ष कार्यालयावर आज शिंदे गटाने रीतसर ताबा घेतला असून त्यातून नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतील शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाला सिल ठोकण्यात आले होते. मात्र नागपूरच्या कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला असून ठाकरे गटाला नवीन जागी जावे लागेल.

ठाकरे गटाला बराक क्रमांक पाच मधील पाच आणि सहा अशा खोल्या कार्यालयासाठी देण्यात आल्या असून त्यावर ते काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल, सोमवार पासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.