Home Blog Page 67

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळत कर्नाटकातील संघटनांचा उद्रेक शिगेला पोहचला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र-कर्नाटक दरम्यान सीमावाद चांगलाच शिगेला पोहचला असून सातत्याने कर्नाटकधार्जिण्या संघटना महाराष्ट्रविरोधात आक्रमक कारवाया करताना दिसून येत आहे. यापूर्वी कर्नाटकातील ‘कन्नड रक्षण वेदिका’ संघटनेकडून महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. आता अक्षरशः प्रकरणाला हिंसक वळण लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ‘कन्नड रक्षण वेदिका’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला असून, यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे सीमेवरील गावातील मराठी भाषिक देखील आक्रमक होताना दिसत आहे, त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असे चित्र दिसत आहे.

सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरण न्यायालयात पोहोचले असून यावर निर्णय येणे बाकी असताना कर्नाटकातील संघटना कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवत असल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करत या सर्व कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज आहे. ‘कन्नड वेदिका रक्षण’ समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच गदग येथे महाराष्ट्र विरोधी घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केल्याने या भागातील मराठी भाषिकांचा असंतोष उफाळून येण्याची स्थिती आहे, त्यामुळे इथे हिंसक प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीमावाद प्रकरणाला संसदेत उपस्थित करून कर्नाटक सरकारच्या धोरणावर आक्षेप घेतला होता, प्रसंगी दोन्ही राज्यात भाजप सत्तेत असताना वाद निर्माण होण्यावर देखील प्रश्न उपस्थित केले होते, मात्र केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय हे प्रकरण निवळणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकातील संघटनांची मजल इतकी वाढली की, महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये गेलेल्या वाहनांवर चढून निदर्शने करण्यात आली सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्याचा प्रकार घडला, त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण शांततेने व सामोपचाराने सोडविणे आवश्यक आहे. कारण अशीच निदर्शने महाराष्ट्रातून सुरु झाल्यास हे प्रकरण आणखी चिघळणार यात काहीच शंका नाही.

या सरकारी बँकेने ATM मधून पैसे काढण्यासाठी नियमात केला मोठा बदल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कॅनरा बँकेने नियमात काही बदल केले आहेत. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने ग्राहकांसाठी एटीएम रोख पैसे काढणे, पॉइंट ऑफ सेल (पीओएस) आणि ई-कॉमर्स व्यवहारांसाठी तत्काळ प्रभावाने आपल्या दैनिक डेबिट कार्ड व्यवहार मर्यादेत सुधारणा करण्याची घोषणा केली आहे.

क्लासिक डेबिट कार्डसाठी दैनंदिन एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ४०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये करण्यात आली आहे. या कार्डांसाठी (पीओएस) मर्यादा सध्याच्या रु. १,००,००० च्या मर्यादेवरून २,००,००० रुपये प्रतिदिन होईल. एनएफसी (संपर्करहित) साठी, बँकेने रक्कम वाढवली नाही, मर्यादा अद्याप २५,००० रुपये निश्चित केली आहे.

संपर्करहित व्यवहारांना प्रति प्रसंगी ५००० रुपयांपर्यंत आणि दररोज ५ व्यवहारांना परवानगी आहे. कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, कार्ड व्यवहारांवर वर्धित सुरक्षिततेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जारी केलेली डीफॉल्ट कार्डे केवळ एटीएम आणि पीओएसमध्ये घरगुती वापरासाठी सक्षम आहे.

इंटरनॅशनल/ऑनलाइन (ई-कॉमर्स) वापर आणि संपर्करहित वापर कार्यक्षमता (संपर्करहित कार्ड्समध्ये) कार्ड जारी करताना अक्षम केली जाते. एटीएम/शाखा/मोबाइल बँकिंग/इंटरनेट बँकिंग/आयव्हीआरएस द्वारे ग्राहकांना कार्ड चॅनलनुसार सक्रिय/निष्क्रिय करण्याची (एटीएम/पीओएस/ई-कॉमर्स, घरगुती/आंतरराष्ट्रीय, एनएफसी संपर्करहित) आणि मर्यादा सेट करण्याची सुविधा दिली जाते.

गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं अभिनंदन केलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे. या विजयासह गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं अभिनंदन केलं आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

गुजरातमध्ये भाजपाने मिळवलेला विजय विक्रमी आणि ऐतिहासिक असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. “गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती. त्यामुळे जनतेनं भाजपाला भरघोस मतदान केलं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांवरून मोदींना टोलाही लगावला. “गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा” असे ते म्हणाले. “आप पक्षाने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे. ज्यांचं त्यांचं राजकारण सोयीनुसार चालत असतं”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

 

“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; म्हणाले, “अमित शाहांशी..”


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र-कर्नाटक वाद मागील काही दिवसांपासून उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापुरातील काही गावांवर दावा सांगितला होता. बोम्मई यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यातच महाराष्ट्रातील ट्रकवर बेळगावात हल्ला करण्यात आला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून चर्चा केली होती. मात्र, यानंतरही मुख्यमंत्री बोम्मई यांनी अडमुठेपणाची भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा वाद सोडवण्यासाठी गृहमंत्री शाह यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, याबाबत माध्यम प्रतिनिधींनी बोम्मईंनी विचारले असता ते संतापले. म्हणाले, “कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी बोलणं झालं आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच, अमित शाहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही,” असे ठामपणे बोम्मईंनी सांगितलं.

“नड्डा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितलं आहे,” अशी माहिती देत बोम्मई यांनी म्हटलं, “महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांचे संरक्षण करण्याबाबत सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आहे,” असंही बोम्मई यांनी सांगितलं.

 

भाजपसाठी धोक्याची घंटा, मीच उमेदवार आहे समजून मतं द्या असं आवाहन करूनही हिंदी पट्ट्यातील मतदार मोदींना नाकारतोय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजपसाठी गुजरातचा विजय आणि हिमाचल प्रदेश तसेच दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत बसलेला धक्का ही नवी भविष्यातील आव्हानांचीही चिन्हं आहेत. याचा परिणाम येत्या वर्षभरात नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर तर होईलच, शिवाय लोकसभा निवडणुकीपर्यंतही त्याचा परिणाम होणार आहे. विशेषत: भविष्यातील सामाजिक-राजकीय रणनीतीवरही याचा परिणाम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गुजरातमध्ये जादू कायम असल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे. मात्र इतर राज्यांमध्ये म्हणजे दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत.

हिंदी पट्ट्यातील भाजपचा पराभव

योग्य सुसंवाद आणि नेत्यांची अनुपस्थिती, धोरण आणि हेतू यांचे निकाल कसे लागतात, हे निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनांचा परिणाम केवळ गुजरात मध्ये मर्यादित राहतो, तर दुसऱ्या राज्यांमध्ये त्याचा पूर्ण अभाव आणि परिणाम जाणवतो हे इतर राज्यांमधील निकालांवरून स्पष्ट होतंय. गुजरातमध्ये सातव्यांदा निवडणूक जिंकून भाजपने इतिहास रचला असला, परंतु हिमाचलमधील तीन दशकांची प्रथा बदलण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आले आहे.

गुजरातमध्ये २७ वर्षे उलटल्यानंतरही भाजपने ऍन्टी इन्कम्बन्सीला वर्चस्व दिसले मात्र दुसरीकडे, हिमाचल प्रदेशमध्ये ती अवघ्या पाच वर्षांत भाजप आणि मोदी ब्रँड ऍन्टी इन्कम्बन्सीची शिकार ठरत आहे. दिल्ली महानगरपालिकेतील सत्ता जाणं हा देखील त्याचाच भाग आहे. विशेष म्हणजे लवकरच मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकात निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि या राज्यांमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड यश मिळालं आहे. विशेष म्हणजे ते स्वतः या राज्यातील निवडणुकीत प्रचारात झोकून देतील असे संकेत देण्यात आले आहेत. म्हणजे जिथे काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरते तिथे भाजपचा पराभव होतो हे देखील अनेकदा अधीरेखित झालं आहे. त्यामुळे ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

३ पैकी दोन पराभव झाकण्याचा आटापिटा

वास्तविक देशातील तीन महत्वाच्या निवडणुकीत भाजप दोन निवडणूका हरले म्हणजे येथील असलेली सत्ता गमावली आहे. अगदी हिमाचलमध्ये तर मीच उमेदवार आहे असं समजा आणि मतदान करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर सभेतून केलं होतं. याचा अर्थ लोकांनी भाजपचे उमेदवार नाकारले आणि त्यांनी मोदींना मतदान केलं नाही असाच साधा सरळ अर्थ निघतो. मात्र तो पराभव झाकण्यासाठी केवळ गुजरातवर चर्चा घडविण्यात आली. गुजरातमध्ये भाजपाचीच सत्ता येणार होती आणि नसती आली तरी मोदी-शहांनी तिथे इतर कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊच दिलं नसतं हे न कळण्याइतके राहुल गांधी राजकीय दृष्ट्या वेडे नाहीत. कारण गुजरातमध्ये सत्ता नसेल तर ते पंतप्रधान पदाच्या चर्चेतून बाहेर जातील आणि ते तसं होऊ देणार नाहीत याची राहुल गांधींना खात्री होती, परिणामी ते भारत जोडो यात्रेमध्ये केंद्रित राहिले आणि प्रियांका गांधींना हिमाचल प्रदेशची जवाबदारी दिली होती. त्याचा परिणामही दिसला आहे.