Home Blog Page 68

शिंदे गटातील खासदार भाजपाच्या तिकिटावर लढणार ? भाजपाचा शिंदे गटाला प्रस्ताव, या खासदारांच्या नावांची होतेय चर्चा.


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा अवकाश आहे, मात्र सत्ताधारी भाजपने अनेक लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाने त्यांचा खासदार नसलेल्या असलेल्या १६ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. यासाठी भाजपाने शिंदे गटासमोर भाजपाच्या तिकिटावर ओढण्याचा प्रस्ताव ठेवला या बदल्यात विधानसभेला जास्तीचा जागा देण्यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

भाजपाने महाराष्ट्रातील कल्याण, मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, पालघर, शिर्डी, बुलढाणा नाशिक, मावळ, यवतमाळ, रामटेक या शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. त्याचवेळी मोदींच्या लोकसभा विजयात कोणतेही विघ्न नको यासाठी भाजपाने शिंदे गटासमोर त्यांचे काही खासदार भाजपाच्या तिकिटावर लढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यात पालघरचे गावीत, बुलढाण्याचे जाधव, मावळचे बारणे, रामटेकचे तुमणे यांचा समावेश आहे. अर्थात शिंदे गटाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण लोकसभा निवडणुकीत मोदींची असलेली लोकप्रियता फायद्याची ठरण्याची शक्यता लक्षात घेता शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी उत्सुक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही गावित यांनी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आता शिंदे गट असा प्रवास केलेला आहे. त्यामुळे भाजपाच्या प्रस्तावर खासदार शिंदेना होकारासाठी गळ घालण्याची शक्यता आहे.

भाजप पद्धतशीरपणे शिंदे गटाला सुरंग लावत असुन काही खासदार आपल्या तिकिटावर लढवत शिंदे गटाची बार्गेनिंग पावर कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. राज्यात आजघडीला जरी शिंदे सरकार असले तरी सत्तेची धुरा फडणवीसांच्या हाती असल्याचे अधोरेखित झाले आहे. महत्वाची खाती स्वतः कडे ठेवत शिंदे गट केवळ नामधारी बनला आहे आता लोकसभेच्या बदल्यात जास्त विधानसभा जागा देण्याचा प्रस्ताव एक भुलथाप ठरण्याची जास्त शक्यता आहे.

 

३० संघटनांनी घेतला बेमुदत संपाचा निर्णय; महाराष्ट्राच्या वीज उद्योगाच्या खासगीकरणाला कडाडून विरोध..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘अदानी इलेक्ट्रिकल’ या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील वीज कंपनीला समांतर नवीन लायसंसी स्थापित करुन गडगंज १००० कोटी रूपया पेक्षा जास्त महसुल मिळवणारा प्रदेश उदा: नवी मुम्बई, पनवेल, उरण, ठाणे, मुलुंड,भांडूप, तळोजा क्षेत्रातील हे असा ५ लाख वीजग्राहकांचे क्षेत्र महावितरण कंपनी ऐवजी अदानी इलेक्ट्रिकल कपंनीला हस्तांतरीत व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करून तसा परवाना मागितला आहे. खाजगी कॉर्पोरेट घराण्याने पुर्णतः औद्योगिक विकास झालेल्या व भविष्यात होणाऱ्या विभागावर जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने समांतर लायसंसीची मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला.

महावितरण ही आशिया खंडातील सर्वात मोठी व अत्यंत कार्यक्षम ठरलेली कंपनी असून केंद्र सरकारने कंपनीच्या एकूण कार्यक्षमता व कारभाराचा विचार करुन अनेक पारितोषिके जाहीर केली आहेत. ज्या कंपनीने २०२१-२२ सालात १३५ कोटी रुपयाचा नफा कमाविला अश्या कंपनीचे महसुलाचा उच्चांक असलेली वा ज्या ठिकाणी कृषी ग्राहकच नाही असा प्रदेश खाजगीकरणाकरीता निवडला आहे. या कृतीला संघर्ष समिती मधिल सर्व संघटनांना तिव्र विरोध आहे. महावितरण कंपनी मिळवत असलेला नफा राज्यांच्या हिताकरीता, विकासारीता वापरला जातो तर अदानी सेवा करण्याकरीता नव्हे तर जास्तीत जास्त नफा कमाविण्याच्या उदेशाने या क्षेत्रात येत आहे. या पद्धतीने खाजगीकरण झाले तर कृषी ग्राहकांना जी स्वस्त दरात वीज देतो ती क्रॉस सबसिडी अदानीच्या भागातील शुन्य झाल्यामुळे त्याचा वीजदर वर परिणाम होऊन वीजेचे दर वाढतील व शेतकरी, घरगुती ग्राहक, दुर्बल घटकांना स्वस्त दरात वीज देणे अशक्य होईल.

खाजगीकरणा सोबतच कृषी कंपनी स्थापनेला विरोध

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कृषी ग्राहयांसाठी स्वतंत्र कृषी कंपनी स्थापन करण्यासाठी माजी ऊर्जा सचिव मा.जयंत कावळे यांच्या अध्यक्षेतेखाली कमिटी स्थापन केली आहे.ज्या माध्यमाने नफा देणारे वीज ग्राहक व तोटा देणारे वीज ग्राहक उदा: कृषीपंप, सार्वजनिक पाणीपुरवठा, दिवाबत्ती, घरगुती ग्राहक व कृषी कंपनीच्या माथी मारण्याचा प्रयत्न करण्याच्या स्पर्धेत येत असणाऱ्या कॉर्पोरेट घराण्याच्या फायद्यासाठी हे नवीन प्रावधान आहे याला आमचा सर्व संघटनांचा तीव्र विरोध आहे.

महानिर्मितीचे लघुजल विद्युत खाजगीकरणाच्या भोवऱ्यात

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निर्माण केलेले विज निर्मिती प्रकल्प पूर्वीचे विघुत मंडळ व आताची महानिर्मिती कंपनी वीज निर्मिती, संचलन व सुव्यवस्था गेले ३५ वर्षाहून अधिक काळ अतिशय चांगल्या पद्धतीने संचलन करत आहे. सध्या हे सर्व नफ्यातील प्रकल्प आहे. या प्रकल्पाची देखभाल, दुरुस्ती व संचलन उत्तम प्रकारे महानिर्मिती कंपनी पुढील काळात करण्याची परवानगी सरकारकडे मागत आहे. असे असताना प्रकल्पाच्या दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली महानिर्मिती कंपनीकडून काम काढून घेऊन खाजगी भांडवलदारांना हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सरकारने छुप्या पद्धतीने सुरू केला आहे. दि.१०.११.२०२२ रोजी ‘दैनिक टाईम्स आफ इंडिया’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केंद्रीय उर्जामंत्री श्री.आर.के.सिंह यांनी भारतातील जवळपास २९ जल विद्युत निर्मिती प्रकल्प सरकारच्या वतीने खाजगी कंपनीकडून काढून घेऊन सरकारच्या वतीने चालवण्याचे धोरण स्वीकारले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मालकीचे असलेले सर्व जलविद्युत प्रकल्प हे निर्मिती कंपनीकडे ठेवावे व ते प्रकल्प जर खाजगी भांडवलदाराला देण्याचा प्रयत्न केला तर त्यास तीव्र विरोध करण्याचा निर्णय ‘संघर्ष समिती’ने घेतला आहे. खाजगी कंपन्यांना महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पास वीज निर्मिती करीता लागणारा कोळसा, अदानीच्या विदेशातील कंपन्या मार्फतच घेण्याचा आदेश सरकारने काढलेला तो कोळसा विदेशातून आयात करू नये. त्यास तीव्र विरोध करण्याचा निर्णय ‘संघर्ष समिती’ने घेतलेला आहे. वरील अत्यंत महत्त्वाच्या मुद्दयावर संघर्ष समिती मध्ये सहभागी संघटना अग्रही असून तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खाजगीकरणाचा एकतर्फी निर्णय सरकार व प्रशासनाने घेतला तर त्या निर्णयाच्या विरोधात संघर्ष समिती मध्ये सहभागी ३० संघटनानी आंदोलन करण्याचा खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

आंदोलनाचे टप्पे.

१)  दि.१२ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र व्दारसभा घेणे.
२)  दि.१४ डिसेंबर २०२२ मा.मंत्री, खासदार, आमदार, महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटना, ग्राहक संघटना, शेतकरी संघटना व कामगार संघटना यांना निवेदने व व्दारसभा घेणे.
३)  दि.१६ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र व्दारसभा घेणे.
४)  दि.१९ डिसेंबर २०२२ तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापना बरोबर बेमुदत असहकार आंदोलन.
५)  दि.२३ डिसेंबर २०२२ नागपूर विधानसभेवर मोर्चा.
६)  दि.२९ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र व्दारसभा घेणे.
७)  दि.२ जानेवारी २०२३ रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा.
८)  दि.४ जानेवारी २०२३ रोजी ७२ तासाचा संप.
९)  दि.१६ जानेवारी २०२३ रोजी व्दारसभा घेणे.
१०)  दि.१८ जानेवारी २०२३ ००.०० तासापासून बेमुदत संप.

 

४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुणे व ठाण्याची विजयी सलामी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेला आज सुरवात झाली. या स्पर्धेत पुणे व ठाण्याने विजयी सुरवात केली.

साखळी सामन्याच्या कुमार गटात पुण्याने जालनाचा २२-८ असा एक डाव १४ गुणांनी पराभव केला. पुण्यातर्फे दिनेश म्हस्कर (३.२० मि. संरक्षण, व ३ गुण ), विनायक शिंगाडे (२.३० मी. संरक्षण, व १ गुण ) यांनी चांगला खेळ करत पुण्याला मोठा विजय मिळवून दिला.

मुली गटात ठाण्याने बीडवर १९-९ असा एक डाव १० गुणांनी विजय मिळवला. ठाण्याच्या धनश्री कंक (३ मि. संरक्षण), प्रीती बालगरे (३.२० मि. संरक्षण, व १ गुण ), कल्याणी कंक (५ गुण ) असा बहारदार खेळ केला. बीड तर्फे वैष्णवी ने (१ मि. संरक्षण ) एकतर्फी लढत दिली.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. आदित्य तटकरे म्हणाले, “मैदान कौनसा भि हो हम साथ साथ रहेंगे | आता मोठ्या मैदानावर खेळायचं आहे. अनेकवेळा मातीची मैदान टर्फ ची होतं आहे. मातीत खेळण्याची मजा वेगळी असते. क्रिकेट प्रशासन गावोगावी गेलं. त्यामुळे तळातील मुलं पुढे आली. खेळ देशाला एकत्र ठेवण्याचं काम करू शकतो. राष्ट्रीय पातळीवर आपण चांगली काम करा असे आव्हान त्यांनी खेळाडूंना केले. महाराष्ट्र काय आहे, हे राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवून दाखवून द्या. तुम्ही वर्ल्डकप मिळवण्यासाठी लागणारी ताकत ठेवून खेळा, यश तुमचेच आहे. तुमच्या सर्वांची मेहनत तुम्हाला पदक मिळवून देणार आहे”.

यावेळी उद्योजक पुनित बालन, माजी मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव ऍड. गोविंद शर्मा, सुरेश मगर, अनिल नवघडे, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष विजय मोरे, अलंकार कोठेकर, जिल्हा सचिव आशिष पाटील यांच्या सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

‘महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन’च्या सहयोगी उपाध्यक्षपदी डॉ.चंद्रजित जाधव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहयोगी उपाध्यक्षपदी ‘खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया’चे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांची निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खो-खो पोचवण्यासाठी डॉ.जाधव यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. खो-खो मध्ये नाविन्यपुर्ण प्रयोग करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन’कडून घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी पत्राद्वारे डॉ. जाधव यांची सहयोगी उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. उस्मानाबाद जिल्ह्यातून खो-खो प्रशिक्षक म्हणून त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीला आरंभ झाला. ते स्वतः खो-खोचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा २००९-२०१० चा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुध्दा मिळाला आहे.

उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. राज्य खो-खो असोसिएशनच्या सचिवपदी काम करत असताना खो-खो खेळाला वलय मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका आहे. खो-खो सह बेसबॉल, स्क्वॅश रॅकेट, स्विमिंग या खेळाच्या जिल्हा संघटनांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तवरावर खेळले आहेत.

देशातील मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’ आणि महाराष्ट्रातील ‘शिव छत्रपती पुरस्कार’ही त्यांच्या खेळाडूंनी मिळवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय, राज्य स्पर्धांचे यशस्वीरित्या नियोजन केले जाते. क्रीडाक्षेत्रातील त्यांची कामगिरी बहारदार आहे. खो-खो चा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. डॉ.जाधव यांच्या निवडीनंतर खो-खो चे आधारस्तंभ विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, सचिव ऍड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. अरुण देशमुख, माजी सचिव संदिप तावडे यांच्यासह राज्य खो-खो असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

 

रोहा येथील ४८ व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन व गटवारी जाहीर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ८) सायंकाळी ५ वाजता धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम. बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील संघ रोहा येथे दाखल झाले आहेत.

स्पर्धेसाठी पाच मैदाने बनविण्यात आली आहे. प्रकाशझोतात होणार्‍या सामन्यांचा थरार चार दिवस चालणार आहे. मुला-मुलींचे ४४ संघ, प्रशिक्षक, पंच व असोसिएशनचे पदाधिकारी दाखल होत आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सत्रात सोळा सामने होतील. त्यानंतर शुक्रवारी सकाळ आणि सायंकाळ सत्रात साखळी सामने होतील. ११ डिसेंबरला सायंकाळी अंतिम फेरीचे सामने होणार आहेत. त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. खो-खोचा थरार पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत तटकरे यांच्यासह राज्य खो-खो असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

खासदार सुनिल तटकरे, माजी क्रीडामंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष विजय मोरे, अलंकार कोठेकर, जिल्हा सचिव आशिष पाटील, श्री. कोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंधरा दिवस या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे. आमदार अनिकेत तटकरे यांनी मैदानाची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी चोविस जिल्ह्यांचे संघ संचलन करणार आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन हाईल. यावेळी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, सचिव एड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, उद्योजक पुनित बालन, मधुकर पाटील, सुरेश लाड, श्रीमती उमाताई मुंडे, सुरेश मगर, विनोद पाशिलकर, माजी सचिव संदिप तावडे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी गटवारी जाहीर केली असून ती पुढील प्रमाणे आहे

कुमार गट :
अ – गट : अहमदनगर, औरंगाबाद, सातारा.
ब – गट : उस्माबाद, धुळे, जळगांव.
क – गट : ठाणे, परभणी, बीड.
ड – गट : सांगली, रायगड, हिंगोली.
इ – गट : पुणे, मुंबई, जालना.
फ – गट : मुंबई उपनगर, नंदूरबार, लातूर.
ग – गट : सोलापूर, नाशिक, नांदेड.
ह – गट : रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग

मुली गट :
अ – गट : उस्माबाद, रायगड, नंदूरबार.
ब – गट : नाशिक, पालघर, परभणी.
क – गट : पुणे, धुळे, जळगांव.
ड – गट : ठाणे, जालना, बीड.
इ – गट : सोलापूर, मुंबई, हिंगोली. फ – गट : सांगली, मुंबई उपनगर, लातूर.
ग – गट : सातारा, रत्नागिरी, नांदेड.
ह – गट : औरंगाबाद, अहमदनगर,  सिंधुदुर्ग