Home Blog Page 80

वारंवार मेंदुचे झटके येणाऱ्या 72 वर्षीय महिलेवर मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये यशस्वी उपचार!

मुंबई: डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने स्कार एपिलेप्सी असलेल्या 72 वर्षीय महिलेला नवे आयुष्य दिले आहे.

ज्या रुग्णाला वारंवार मेंदुचे झटके येतात त्यांना उजव्या बाजूच्या वरच्या अंगात वारंवार मुंग्या येणे, अंग बधीर होणे, चिडचिड आणि अस्वस्थता होणे ही लक्षणे सुधारण्यासाठी रुग्णालयात त्वरित उपचार देण्यात आले. आता, रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि तिची दिनचर्या पुर्ववत झाली आहे.

मिरारोड येथील रहिवासी असलेल्या श्रीमती मिहिरा कुमारी या गृहिणीस अचानक उजव्या बाजूस वरच्या अंगाला मुंग्या येणे आणि उच्च रक्तदाबासह बधीरपणाची लक्षणे दिसू लागली. या रुग्णाला पुढील उपचारासाठी मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिचा जीव वाचला.

डॉ. पवन पै, सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड सांगतात की, “रुग्णाला उजव्या वरच्या अंगात मुंग्या येणे आणि बधीरपणा जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर, तिला इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम (ईईजी) वर फोकल सेन्सरी सीझर आढळून आले. तिच्या मेंदूच्या एमआरआयमध्ये मेंदूच्या डाव्या बाजूला मागील भागात रक्तस्रावाचा एक डाग दिसून आला ज्यामुळे संवेदना होतात. तिला स्कार एपिलेप्सी असल्याचे निदान झाले. या रुग्णाच्या आधीच्या रक्तस्रावामुळे मेंदूतील डागामुळे मेंदूला इजा झाल्याचे दिसून आले”

डॉ. पै पुढे म्हणाले, “तिच्यावर इंट्राव्हेनसद्वारे दुसऱ्या अँटी-एपिलेप्टिकवर उपचार करण्यात आले, ज्यामुळे तिच्या संवेदनाक्षम झटक्यांमध्ये सुधारणा झाली. तिचे ईईजी सामान्य होते. म्हणून ऍन्टी-एपिलेप्टिकच्या तोंडावाटे औषध देण्यात आले. पण त्याच दिवशी, तिला चिडचिडेपणा आणि अस्वस्थतेसह हातपाय हालचालींसह सामान्यीकृत झटका आला आणि चक्कर आल्यानंतर ती दीर्घकाळ तंद्रीत होती. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. यानंतर तिसरे इंट्राव्हेनस अँटी एपिलेप्टिक सुरू करण्यात आले. ईईजी पुन्हा करण्यात आले आणि त्यात काही बदल आढळून आले. सीटी ब्रेनमध्ये नवीन इन्फार्क्ट किंवा रक्तस्त्राव दिसून आला नाही. तिचे सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) विश्लेषण सामान्य होते.”

9 नोव्हेंबर रोजी, तिला गुंगी येत असलाने औषधांमध्ये बदल करण्यात आला जेणेकरून तिला अधिक सतर्क राहता येईल. 10 नोव्हेंबर रोजी, ती अधिक सतर्क झाली आणि हात पाय हलवण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्णाला वॉर्डमध्ये हलवण्यात आले आणि 12 नोव्हेंबरला तिला डिस्चार्ज देण्यात आला. तिच्यावर योग्य वेळी उपचार न केल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला असता आणि वारंवार चक्कर येण्यामुळे कायमचे नुकसान झाले असते. तिला अँटी-एपिलेप्टिक्स नियमितपणे सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे आमच्या नव्याने सुरू झालेल्या एपिलेप्सी क्लिनिकमध्ये उपचारापूर्वी आणि उपचारानंतरच्या काळजीने रुग्णाला तातडीने व्यवस्थापित करण्यात आले. क्रिटिकल केअर, बहुविद्याशाखीय दृष्टीकोन आणि त्वरित निदान यांसारख्या कौशल्यामुळे रुग्णावर एकाच छताखाली सहज उपचार करण्यात मदत झाली.

मला अचानक झटका आला, तो काही मिनिटांपर्यंत सून्न करणारा होता. उजव्या हाताला मुंग्या येणे आणि बधीरपणा यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मी बेशुद्ध झाली आणि गोंधळ उडाला. त्यानंतर दोन दिवस काय झाले ते मला आठवलेही नाही. त्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर अशक्तपणामुळे मला नीट चालता येत नव्हते. याचा माझ्या जीवनमानावर परिणाम झाला. मला माझी रोजची कामे सहजतेने करता येत नव्हती. पण, मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये वेळेवर दाखल केल्याबद्दल मी माझ्या कुटुंबीयांचे आभार मानते. माझे प्राण वाचवल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते. मी माझी सामान्य दिनचर्या पुन्हा सुरू केली असून कोणत्याही अडचणीशिवाय दैनंदिन क्रिया पुरेववत करू शकत आहे. आता मला मेंदुचे झटके येत नाहीत अशी प्रतिक्रीया रुग्ण श्रीमती मिहिरा कुमारी यांनी व्यक्त केली.

बांधकाम धारकांकडून खंडणी मागणाऱ्या दोन ‘बोगस’ पत्रकारांना भाईंदर पोलिसांकडून अटक!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधि: पत्रकार असल्याची बतावणी करून अनधिकृत बांधकाम धारक, दुकानदार आणि बार मालक यांच्याकडून वसुली करणाऱ्यांचे पेव सध्या मिरा-भाईंदर शहरात फुटले आहे. कुठल्याही वर्तमानपत्राचे किंवा न्युज चॅनेलचे ओळखपत्र मिळवायचे आणि शहरात पत्रकार असल्याची बतावणी करून लोकांकडून वसुली करायची हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.

असाच एक प्रकार भाईंदर पश्चिमेकडील शिवसेना गल्लीत घडला असून एका घराच्या दुरुस्तीचे बांधकाम चालू असताना “आम्ही न्युज-24 चे पत्रकार आहोत तुझ्या बांधकामाची तक्रार करू” अशी भीती दाखवून परवेज खान नावाच्या व्यक्तीकडून 4000 रुपये उकळणाऱ्या दोन भामट्यां पत्रकारांना भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार परवेज जलील खान यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम चालू होते, त्यावेळेस दोन भामट्यांनीं आपण न्युज-24 चे पत्रकार असल्याची धमकी देऊन
वीस हजाराच्या खंडणीची मागणी केली. शेवटी 4000 रुपयात तडजोड झाली असता आरोपी राहुल सिंग आणि अरविंद राजभर यांना शिवसेना गल्लीमध्ये पैसे घेताना भाईंदर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.

अशा प्रकारे पत्रकार असल्याची बतावणी करून मिरा-भाईंदर शहरात नागरिकांना लुबाडणाऱ्या बोगस पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही बोगस पत्रकारांना तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनीच पोसून ठेवले आहे. ते या बोगस पत्रकारांना हाताशी धरून तक्रारी करायला लावतात आणि मग त्यांना पुढे करून पैसे उकळले जातात. अशा प्रकारामुळे काही प्रामाणिक पत्रकारांना मात्र नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मिरा-भाईंदर शहरात तर अशा खंडणीखोर बोगस पत्रकारांची संख्या खूपच वाढलेली दिसत आहे. तर काही जण मुंबई, वसई-विरार सारख्या बाहेरच्या ठिकाणाहून येऊन इथे वसुली करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा बोगस पत्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी आता पत्रकारां कडूनच केली जात आहे.

 

डॉ.सर्वेश शाहू सावंत यांच्या ‘सावंत हॉस्पिटल’ चे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अस्थीरोगतज्ज्ञ डॉ.सर्वेश शाहू सावंत यांच्या ‘सावंत हॉस्पिटल’ चा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. उपस्थित पत्रकारांनी डॉ.सर्वेश यांना त्यांच्या हॉस्पिटल मधील नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये काय व कोणती असा प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की नक्कीच, आजच आपल्या हॉस्पिटल चा शुभारंभ केंद्रीयमंत्री नारायणराव राणे साहेबांच्या हस्ते झाला आहे, आणि जसे नारायणराव राणे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांची डोंबिवलीशी जुनी ओळख, जुनी नाळ जुडलेली आहे ती म्हणजे सर्वथा प्रथम माझे वडील कैलासवासी शाहू सावंत साहेबांमुळे आणि आपल्या डोंबिवलीतली जेव्हढी पण मालवणी कोकणी वर्ग आहे त्यांच्या सगळ्यांवरती ते प्रेम करणारे आणि आहेत म्हणून होतं, आणि त्यांनी आपल्या मी दिलेल्या मी विचारलेल्या किंवा सांगितलेल्या शब्दाचा मान ठेवला आणि एव्हढ्या लांबून माझ्या हॉस्पिटलच्या शुभारंभ करण्यासाठी आले हे मी खरंच माझ्या भाग्याचं समजतो व मी खरोखरंच भाग्यवान आहे असे डॉ.सर्वेश बोलले.

 

पत्रकारांनी त्यांच्या हॉस्पिटल च्या वैशिष्टयाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की हॉस्पिटल हे थोडं आधुनिकरित्या बनवलं असून आजपर्यंत बरीच हॉस्पिटल जशी शक्यतो सगळी सामान्य सेवा पुरवतात त्या सर्वत्र व सर्वच हॉस्पिटल मध्ये सारख्याच असतात. तसं सावंत हॉस्पिटलमधील इंटिरिअर व त्याचा फील आहे तो आपण सर्वसाधारण हॉस्पिटल सारखा ठेवला नसून थोडा वेगळा काही ठेवला आहे की इथे उपचारा करिता आलेल्या रुग्णांना इथे उपचार घेत असताना थोडासा वेगळेपणा वाटावा त्यांना ताजेतवाने असल्यासारखे वाटावे व त्यांनी इथून उपचार घेऊन घरी परतताना त्यांनी प्रफुल्लित, उल्हासित व पुन्हा टवटवीत असल्यासारखे जावं म्हणून त्यासाठी आपण एक वेगळं वातावरण या हॉस्पिटल मध्ये निर्माण केलं आहे. त्यात मॉडर्न टेक्नॉलॉजी मॉडर्न फॅसिलिटी आपण रुग्णांना पुरवणार आहोत.

किती तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धी हॉस्पिटलमध्ये असण्याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की जेव्हढे पण आपलया उपशाखा असतात त्या सगळ्यांचेच डॉक्टर्स आपल्याबरोबर संलग्न आहेत. तर पूर्ण वेळ मी एक अस्थीरोग तज्ज्ञ असून इथे मी आणि डॉ.निर्मल ठाकूर हे एमडी फिजिशियन असल्यामुळे पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहोत असे त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, सीमा सावंत, सर्वेश सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

घरगुती एलपीजी सिलेंडरला ‘क्यूआर’ कोड लागणार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

तंत्रज्ञानाच्या झालेल्या विकासामुळे हल्लीच्या दैनंदिन जीवनात नवनवीन गोष्टीत बदल होत असलेले दिसताना, याचा अन्य फायदा बघता जनतेत जागरूकता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हल्ली डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे आर्थिक व्यवहार करताना मोठी मदत मिळत असून ग्राहकांना सेवा देताना सेवा वस्तूंबाबत पुरेशी माहिती देणे गरजेचे असते. नेमक्या याच मुद्द्याला स्पर्श करताना, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरवर आता ‘क्यूआर कोड’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी तीन महिन्याच्या कालावधीत याबाबत प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे समजते.

सरकारच्या या नव्या निर्णयाचा फायदा बघता, एलपीजी सिलेंडर देण्यात येणाऱ्या ‘क्यूआर कोड’ ला स्कॅन करत ग्राहकांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे जसे की, सिलेंडरचा नेमका डिस्ट्रिब्युटर कोण आहे, तुम्हाला प्राप्त झालेले सिलेंडर कुठल्या प्लांटवर भरण्यात आले आहे. नेमके सिलेंडर कुठून आणण्यात आले आहे, डिलिवरी करणारी व्यक्ती कोण होती इत्यादी. सिलेंडर वर उपलब्ध असलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यास एकूण वजन आणि वैधता इत्यादींची माहिती देखील तपासता येणार आहे.

इथे या नवीन पध्द्तीचा सर्वात महत्वाचा फायदा सिलेंडरची होणारी चोरी, साठेबाजी इत्यादींवर आळा घालण्यासाठी होणार आहे. ‘क्यूआर कोड’ हे सिलेंडर वर लावण्यात आल्यानंतर ते सिलेंडर साठी आधार कार्डच्या रूपात कार्य करणार आहे. ज्याद्वारे सिलेंडरची ट्रॅकिंग देखील करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या नवीन पद्धतीचे अन्य महत्वपूर्ण फायदे असून, ही प्रणाली लागू झाल्यावर याबाबतीत संपूर्ण माहिती पुढे येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एलपीजी सिलेंडर बाबतीत घेण्यात आलेला हा निर्णय मोठा बदल म्हणून सिद्ध होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

 

माजी आमदार विनायक मेटेच्या यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांच्या कारचालकाला अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कारचालकाला अटक करण्यात आली आहे. एकनाथ कदम असे या कार चालकाचे नाव आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते. त्यानुसार या अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरू होती. चौकशीत विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. याशिवाय तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही याप्रकरणी मते घेतली गेली.

या सर्व तपासातून ड्रायव्हर दोषी असल्याचे समोर आले आहे. अपघात चालकाने अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे हा अपघात झाल्याचे सीआयडीच्या चौकशीत समोर आले. यामुळे चालक एकनाथ कदम विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एकनाथ कदम याला अटक करण्यात आली आहे.