Home Blog Page 79

सत्र न्यायालयाकडून सचिन वाझेला जामीन मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात आरोपी असल्याने त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ऍन्टिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.

तर दुसरीकडे ‘ईडी’ने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती.

आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान ‘ईडी’ला सांगितलं होतं.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सचिन वाझे याच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ‘ईडी प्रकरणात वाझेला अटक करण्यात आलेली नाही असं सांगत वाझे पुराव्यांशी छेडछाड किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार नसल्याची हमी वकिलांनी न्यायालयाला दिली.

सत्र न्यायालयाने वाझे यांना जामीन मंजूर केला मात्र माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात आरोपी असल्याने त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे असे नोंदवले.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्यावरून महाविकास आघाडी धोक्यात – खासदार संजय राऊत


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘भारत जोडो’ यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून आम्ही त्यांच्याशी सहमत नाही असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, मात्र भाजपा यावरून राजकारण करीत आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणाऱ्या स्थेथॉस्कोपचा अविष्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

अमरावती येथील फार्मसी महाविद्यालयातील हा विद्यार्थी असून त्यांने हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्थेथॉस्कोपसारखे साधन तयार केले असून, या शोधाबद्दल त्याला राज्यस्तरावरील एक लक्ष रूपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात समारंभपूर्वक पुरस्कार कुशकुमार यांना प्रदान करण्यात आला. नावीन्यपूर्ण शोधाबाबत राज्यस्तरावर २१ उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यात कुशकुमार याला ‘आरोग्य हेल्थकेअर सेक्टर’ मध्ये प्रथम पुरस्कार देवून राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

कुशकुमार ठाकरे हा अमरावतीच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने ‘पर-क्ल्यू’ हे
स्थेथॉस्कोपचे काम करणारे साधन निर्माण केले आहे. या संशोधनाला कुशकुमार याचा वर्गमित्र असलेल्या मनीष पुथरन यांचे मोलाचे सहकार्य व शिक्षिका डॉ. शारदा देवरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

ज्याप्रमाणे घरच्या घरी शर्करापातळी मोजण्यासाठी ग्लुकोमीटरचा वापर होतो, त्याचप्रमाणे ‘पर-क्ल्यू’ (परफेक्ट क्ल्यू) हे साधन वापरून हृदयाचे ठोके मोजण्याबरोबरच हृदयविकाराची पूर्वकल्पनाही मिळणार आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने उपचार घेता येतील. या साधनात रक्तदाबाची दैनंदिन नोंद होऊन त्याचा महिनाभराचा डेटाही सेव्ह व्हावा, यादृष्टीने आम्ही ते अधिक अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कुशकुमार आणि मनीष यांनी सांगितले. त्यामुळे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाताना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.

मोदी सरकार स्टार्टअप सारखे उपक्रम राबवून नवनवीन संशोधनाला प्राधान्य देत असल्याने विद्यार्थी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर देत असल्याचे गवरमेन्ट फार्मसी कॉलेजच्या शिक्षिका डॉ.शारदा देवरे यांनी सांगितले. अमरावतीच्या या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे उपकरण भविष्य काळात निश्चितच समाजोपयोगी ठरेल असे वाटते.

 

शेकडो कर्मचाऱ्यांचा एलॉन मस्कच्या कडक धोरणा विरोधात ट्विटरला रामराम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे गेले काही दिवस या कंपनीत रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरमधून एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून शेकडो कर्मचारी स्वत:च नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत.

“कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा”, असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता. या इशाऱ्यानंतर जवळपास ८० टक्के कर्मचारी नोकरी सोडू शकतात, असे एका अहवालातून समोर आले आहे. एलॉन मस्क यांच्या ईमेलनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असून १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे.

या पार्श्वभूमीवर आठवडाभर कंपनीचे ऑफीस बंद ठेवण्याचा निर्णय मस्क यांनी घेता आहे. २१ नोव्हेंबर पर्यंत ट्विटरचे ऑफीस बंद राहणार आहे.

 

पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण करत ‘इसरो’ची ऐतिहासिक कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘इसरो’च्या श्रीहरीकोटा केंद्रावरून आज पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. ‘स्कायरूट एरोस्पेस कंपनी’च्या या रॉकेटचं नाव ‘विक्रम सबऑर्बिटल’ असं आहे. ‘स्कायरूट एरोस्पेस’ ही कंपनी स्टार्ट अप योजने अंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला ‘इसरो’ आणि ‘इन स्पेस’ या केंद्रानेही मदत केली.

‘विक्रम सबऑर्बिटल रॉकेट’ने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी झेप घेतली. निश्चित केलेल्या लक्ष्यानुसार, ५४५ किलो वजनाचं हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. या रॉकेटला दिलेलं :विक्रम एस’ हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून दिलं गेलं आहे अशी माहिती देण्यात आली.