Home Blog Page 83

महिलेकडून विनयभंगाची तक्रार दाखल होत जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी सध्या कमी न होता दिवसागणिक आणखीणच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वी ठाणे येथील ‘विवियाना मॉल’ मधील चित्रपटगृहात गोंधळ घालत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहेर हुसकावून लावले होते. प्रसंगी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. सदर प्रकरणी न्यायालयाने आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असता जामीनावर सध्या त्यांची सुटका झाली आहे. आता नव्याने आव्हाड अडचणीत आले आहे ते एका महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे, याप्रकरणी पुन्हा एकदा आव्हाडांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कळवा खाडी पुलाचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जितेंद्र आव्हाड तसेच तक्रारकर्ती महिला देखील उपस्थित होती. सदर महिला ४० वर्षीय असून त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहे. यावेळी बाजूला व्हायला सांगताना या महिलेला जितेंद्र आव्हाडांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे महिलेचे म्हणणे आहे, त्यामुळे मुंब्रा पोलीस स्थानकात जितेंद्र आव्हाडांविरोधात कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

एकंदरीतच केवळ आठवडाभरातच दुसऱ्यांदा जितेंद्र आव्हाडांवर गुन्ह्याची नोंद झाल्याने ते चांगलेच चर्चेचा मुद्दा बनले आहे. यावेळी एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्याने हे प्रकरण जितेंद्र आव्हाडांना अडचणीत आणण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आव्हाडांच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिमेला नक्कीच धक्का पोहचणार असून, काळिमा फासला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी राष्ट्रवादीच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया येते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

भारत जोडो, पदयात्रा नसून एक जनचळवळ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुनियोजित असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. राज्यात या यात्रेचा महाराष्ट्रातून प्रवासाला प्रारंभ मराठवाडा विभागातून सुरु झाला असून देगलूर येथून सुरु झालेली ही यात्रा सध्या नांदेडला पोहोचली आहे. यात्रेदरम्यान एक दिवसाची विश्रांती घेताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नांदेड मधील ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. प्रसंगी, बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजराती नेत्यांचे धनाजी आणि संताजी आहे.

“राहुल गांधी यांना यात्रेदरम्यान अनेक लोक येऊन भेटत आहे ज्यांचा प्रत्यक्षपणे राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही तरीही त्यांच्या भावना सरकारबाबत तीव्र आहे. या सर्व बाबींचा विचार करता देशात किती अत्याचारी सरकार अस्तित्वात आहे या बाबीची कल्पना येते”, असे पटोले म्हणाले. पुढे बोलताना पटोले म्हणाले, खुद्द माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ‘भारत जोडो’ यात्रेचे कौतुक करत आहे, त्यामुळे ही पदयात्रा नसून एक जनचळवळ बनली आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केले.

येत्या काही दिवसांत ही पदयात्रा शेगांव येथून प्रवास करणार आहे त्यावेळी शेगांवला होणारी सभा महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे चित्र पालटवेल असा आशावाद यावेळी नाना पटोलेंनी व्यक्त केला. यावेळी नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना बंगाल येथील निवडणुकीचा दाखला दिला, याप्रसंगी दाढी वाढविणे हा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. राहुल गांधी यांना वेळ मिळत नसल्याने ते दाढी करत नाही, मात्र देशाच्या पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या वेळी रवींद्रनाथ टागोर सारखी दाढी वाढवली होती, परंतू तिथे हरल्यावर पुन्हा जुन्या शेपमध्ये दाढी आणली. अरुणाचल प्रदेश मध्ये चीनने काही गावे बळकावली असून सरकारी संपत्ती विकल्याने मोदी रोज अडीच किलो शिव्या खातात, अशा कठोर शब्दात टीका पटोलेंकडून करण्यात आली.

एकंदरीतच ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने विरोधक राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरण्यात कुठलीही कसर सोडताना दिसत नाही आहे. लवकरच ही यात्रा विदर्भात येणार असून यावेळी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विदर्भातील असल्याने ते काय मत मांडतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे, विदर्भात या यात्रेला आणखी प्रतिसाद मिळण्याचा अंदाज बोलला जात आहे.

राहुल गांधी सोबत ‘भारत जोडो यात्रा’ मध्ये सामील झाला जनतेचा प्रचंड मोठा जनसागर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ नांदेड जिल्ह्यातून निघून हिंगोली जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापाशी आली त्यावेळेस जनतेचा प्रचंड मोठा जनसागर या यात्रेत सामील झाला होता. आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी यांची गळाभेट घेऊन शिवसेनेचा भारत जोडो यात्रेला पूर्णपणे पाठिंबा आहे हे उपस्थितांना दर्शविले. राहुल गांधी यांची काल सकाळी सहा वाजल्यापासून पदयात्रा हिंगोली जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाली होती. या पदयात्रेत ज्या जिल्ह्यातून राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा जाऊ शकत नाही. त्या त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून पदयात्रेचे स्वागत करण्यासाठी पदयात्रेमध्ये सहभागी होण्याकरता लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत होते.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाला प्रतिसाद देण्याकरता हजारोंच्या संख्येने वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोंढे येत असताना दिसत होते. लातूर हा मराठवाड्यातील एक भाग असल्याने लातूरमधूनही हजारो कार्यकर्ते या पदयात्रेसाठी येताना दिसत होते. नांदेड वरून हिंगोली येथे प्रवेश करत असताना त्या ठिकाणी भारत यात्रेचे भव्य प्रवेशद्वार उभे करण्यात आले होते. बहुतांशी लोकांनीं आपल्या पारंपारिक कला सादर करून राहुल गांधीचे स्वागत केले .कला पथके हि आपली पारंपारिक कला सादर करत होते.

कलापथकांना विचारल्यानंतर तुम्हाला कोणी बोलवले व का असे विचारले, तरीही त्यांनी सांगितले आम्ही स्वत: होऊन या भारत जोडोचे स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत. राहुल गांधी यांची सर्वसामान्य माणसाबद्दलची तळमळ आम्हाला दिसत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य संगीत लोककला सादर करणारे दिसत होते. जनतेचा जो अफाट जनसागर लोटला होता हा जनसागर कोणत्त्यांयाही आमिषाला बळी पडून आला नव्हता. तर तो आपल्या देशाच्या प्रेमासाठी येथे आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला विचारल्यानंतर त्यांच्यामध्ये एकच भावना होती की ‘जो आम्हाला तारू शकतो असा हा आमचा नेता पायी येतोय, त्याच्या हाकेला साद देणे, त्याला प्रतिसाद देण्याची सर्वत्र भावना दिसत होती.

हिंगोलीच्या प्रवेशद्वारापासूनच महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधील शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे हिंगोली पासून सहभागी झाले आणि या दोघांची गळाभेट झाली. राहुल गांधी व आदित्य ठाकरे यांची गळाभेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आणि आता आपल्या देशातील तरुण जागा झाला आहे यातून दिसून येत होते.

लाखोच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा मार्गावरती प्रचंड गर्दिचे लोंढे दिसत होते. खेड्यापाड्यातून आलेले असंख्य लोकं दिसत होती. आणि ह्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे हे देखील जाणवले. त्याच बरोबर या भारत जोडो यात्रेत स्वखुशीने सर्वच वयोगटातील लोक सहभागी झाले आहे हे विशेष आहे.

 

केतकी चितळेने जितेंद्र आव्हाड अटक प्रकरणात उडी घेत पोलीसांना दिले पत्र..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे येथील विवियाना मॉल मधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा सुरु असलेला शो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बंद करण्यात आला होता. प्रसंगी प्रेक्षकांना जबरदस्तीने चित्रपटगृहाबाहेर हुसकावून लावण्यात आले होते. तसेच एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात चित्रपटगृहात हा सर्व प्रकार घडवून आणल्याने याप्रकरणी काल वर्तकनगर पोलीस स्टेशनकडून जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली होती. दरम्यान जितेंद्र आव्हाड अटक प्रकरणात मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने उडी घेत वर्तकनगर पोलीसांना पत्र लिहिले आहे. सदर पत्र तिने आपल्या वडिलांकरवी पोलीस स्थानकात पाठविले आहे.

यावेळी पत्रात केतकीने नमूद केले आहे की, पोलीसांकडून आव्हाडांवर लावण्यात आलेली कलम पुरेशी नाही कारण चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती तेव्हा त्याची पत्नी देखील सोबत होती आणि तिला देखील मारहाण झाली होती. त्यामुळे कलम ३५४ जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या साथीदारांवर लावण्यात यावे अशी मागणी यावेळी केतकीने केली आहे. सदर हल्ला प्रकरण हे सुनियोजित होते त्यामुळे कलम १२० (ब) देखील लावण्याची मागणी केतकीकडून करण्यात आली आहे. हे सर्व न झाल्यास आम्ही हायकोर्टात जाऊन कलम वाढविण्याची विनंती करू असा थेट इशाराच केतकीने देऊन टाकला.

केतकी चितळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा वाद तसा जुनाच आहे, यापूर्वी केतकीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली होती परिणामी तिला जेलमध्ये सुद्धा जावे लागले होते. नव्याने आता जितेंद्र आव्हाड प्रकरणी केतकीने पुन्हा एका नव्या वादात उडी घेतल्याने हे प्रकरण कुठल्या दिशेला जाते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो; संजय राऊतांचं सूचक विधान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज सकाळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांशी शक्यताही व्यक्त केली आहे.

“गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख अधिक”

“अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत.त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झालाय. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त आहे”, असं संजय राऊत यावेळी बोलताना  म्हणाले.