Home Blog Page 94

शिंदे सरकार शॉक देण्याच्या तयारीत; सणासुदीच्या तोंडावर वीज दरवाढ अटळ !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे सरकार झटका देण्याची तयारी करत आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार पुन्हा एकदा वीज दरवाढीने सर्वसामान्य ग्राहकांना धक्का देणार आहे. वीज नियामक आयोगाने विजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या दरात वाढ करण्यास मान्यता दिली असून आता दरवाढ अटळ आहे.

राज्यातील जनतेला पुन्हा वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपनी महावितरणला वीज दरवाढ प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले. तर महावितरणने वीजदर वाढवल्याने कंपनीचे आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण देत आहे. मात्र या नावाने महावितरण आधीच ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्क आकारत आहे.

कृषी क्षेत्रातून महावितरणला ४५ हजार ७०० कोटी रुपये येणे बाकी आहे. पथदिव्यांसाठी ६ हजार ५०० कोटी, पाणीपुरवठ्यासाठी १८०० कोटी आणि घरगुती वीज वापरकर्त्यांकडून १९०० कोटी थकीत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील ७५० कोटींची थकबाकी अजूनही आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने गेल्या काही दिवसांपासून दरवाढ करण्याची तयारी केली आहे.

राज्यात वीज दरात १० ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने यापूर्वीच घेतला आहे. लवकरच दरवाढ होणे जवळपास निश्चित आहे. वीज खरेदी खर्चात वाढ करण्यासाठी महावितरणने १५०० कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी २०२१ मध्येच संपला आहे.

त्यामुळे महावितरणने १ एप्रिल २०२२ पासून वाढीव खरेदीसाठी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. सध्या हे शुल्क प्रति युनिट १.३० रुपये आहे. आता पुढील महिन्यात महावितरण ६० ते ७० पैशांनी वाढणार आहे. त्यामुळे इंधन शुल्काचा दर २ रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

घरफोडी व फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक; ४५ तोळे सोने व रोख रक्कम असे एकुण २८,५०,०००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करत अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेवुन आरोपी नामे आकाश संजय शिलावट राहणार नाशिक रोड, नाशिक याने तिच्याकडुन सुमारे १२.५० तोळे सोन्याचे दागिने घेतले. याबाबत अशोक चिमाजी ठाकरे वय ४२, राहणार रूम नं ०३, ए-बालाजी अपार्टमेंट महालक्ष्मीनगर, अंबड, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात भादवि कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपी आकाश संजय शिलावट राहणार नाशिक रोड याचेकडुन १२.५ तोळे सोने त्याची एकूण किंमत ६,००,०००/- जप्त करण्यात आलेले आहे.

अजून एका घटनेत आनंद गोविंद रायकलाल वय ६२, राहणार रोहान १८, वाईड आर्केड, तिडके कॉलनी, अंबड, नाशिक यांचे राहते घरात १६ ऑगस्ट रोजी रात्री ००:४५ वा चे दरम्यान घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी कशाने तरी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करून कोणी तरी अज्ञात चोरट्याने घरातील ३२ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरफोडीतील अज्ञात आरोपीबाबत पोलीस उमाकांत टिळेकर, योगेश शिरसाट यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, पोलीस उप-निरीक्षक संदिप पवार, मुकेश गांगुर्डे, संदिप भुरे, प्रविण राठोड, तुळशीराम जाधव, किरण सोनवणे, किरण गायकवाड, हेमंत आहेर, राकेश राऊत, वाघचौरे, जर्नादन ढाकणे, प्रशांत नागरे, मोतीराम वाघ यांनी मिळून सापळा रचुन घरफोडीतील आरोपी ताब्यात घेवुन गुन्हा उघड केला.

घरफोडी करणारे आरोपी अदाय उत्तम जाधव (वय: २६ वर्षे) राहणार. दत्तनगर अंबड नाशिक, संदिप सुधाकर अल्हाट वय २४ राहणार. कांबळे वाडी, भिमनगर, सातपुर नाशिक, बाबासाहेब गौतम पाईकराव (वय: २८ वर्षे), राहणार. कांबळेवाडी, सातपुर, नाशिक, विकास प्रकाश कंकाळ (वय: २१ वर्षे), राहणार. कांबळेवाडी, सातपुर, नाशिक यांचेकडुन १६,००,०००/- रूपयांचे किंमतीचे घरफोडीचे गुन्हयातील ३२ तोळे सोने व सोने विक्री करून त्यामोबदल्यात प्राप्त ६,५०,०००/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उप-आयुक्त विजय खरात, वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निर्वाळकर यांच्या मार्गर्शनाखाली गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खतेले, पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार, पोलीस शिपाई रंगे हे करत आहेत.

 

कोनगाव पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार चार जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात कोनगाव पोलीसांना यश आले असून त्यांच्याकडून कोनगाव हद्दीतील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांसह हैद्राबाद येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे.

दिनांक २५ फेब्रुवारी रोजी भिवंडी कल्याण रोडवरील पिंपळघर येथील शगुण टेक्स्टाईल मार्केट मधील साडी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील अडीच लाख रुपयांची रोकड घरफोडी केली होती. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार कोनगाव, ठाणे, नालासोपारा, वसई विरार, खालापुर जिल्हा रायगड या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून वाहनांची माहिती गोळा करून तांत्रिक माहीती व गुप्त बातमीदारांमार्फत संशयित आरोपी हुसैन रफिक शेख (वय:३० वर्षे), रशीद रफिक शेख (वय: ३२ वर्षे), दोन्ही राहणार अहमदाबाद हायवे जवळ, चिंचोटी, तालुका वसई, तरबेज दाऊद शेख (वय: ३९ वर्षे) राहणार साकी विहार रॉड, पवई व राफीकुद्दीन झहीरुद्दीन सैय्यद (वय: ३२ वर्षे) राहणार चंद्रानगर, बल्लागुडा, इस्माईलनगर, हैदराबाद, तेलंगणा राज्य यांना अटक करून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. कोनगाव पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली कार व रोख रक्कम असा ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सोबत याच आरोपींनी ७ फेब्रुवारी रोजी कोनगाव पोलीस स्टेशन हद्दीत हरी ओम स्वीट मार्ट दुकानाचे शटर उचकटून घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

मनसे प्रमुखांचे आगामी निवडणुकांसाठी ‘एकला चलो रे’ भूमिकेवर ठाम धोरण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

येत्या काळात महापालिका निवडणुकांची सर्वच पक्षांना प्रतीक्षा लागलेली असताना स्थानिक पातळीवर पक्षाला मजबुती देण्याचे प्रयत्न राज्यातील सर्वच पक्षांद्वारे करण्यात येत आहे. मनसेच्या गोटातून महत्वाची बातमी पुढे आली असून राज ठाकरे यांनी आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतीत सूचना देखील त्यांनी सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना केल्या आहे.

नुकतीच मुंबईच्या रंगशारदा येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांची बैठक पार पडली यावेळी पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ अशी भूमिका राज यांनी मांडली. प्रसंगी मार्गदर्शन करताना विविध विषयांवर चर्चा देखील झाली तसेच सज्ज होण्याचा सल्ला मनसैनिकांना देण्यात आला. सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला, तसेच सध्याच्या व याआधीच्या सरकारला जनता वैतागली असून वेगळा पर्याय देण्यावर यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

तुम्ही तुमचे कार्य करा विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आहे असा ठाम विश्वास देखील यावेळी पदाधिकारी व राज्यभरातील कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी दिला. सध्या शिवसेना पक्षाचे विभाजन झाल्याने तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेबाहेर पडल्याने येत्या काळातील निवडणुकांमध्ये मनसेला यश गाठले अधिक कठीण जाईल, कारण भाजप तसेच शिंदेची बाळासाहेबांची शिवसेना एकीकडे तर दुसरी महविकास आघाडी असे कडवे आव्हान राज ठाकरेंच्या मनसेसमोर राहणार आहे.

मुंबई गुन्हे शाखेने दाऊद टोळीशी संबंधित पाच जणांच्या मुसक्या आवळत केली मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कुख्यात गुंड आणि तस्कर तसेच मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार तसेच प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम सध्या भारताबाहेर आश्रय घेऊन आहे तरी त्याचे हस्तक व या गँगशी संबंधित गुंड सध्याही भारतात सक्रिय आहेत. अशाच गुंडांवर धडक कारवाई करत त्यांना अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर व्यक्तींना खंडणी प्रकरणी अटक झाल्याचे समजते, दाऊदचा हस्तक छोटा शकील तसेच रियाज भाटीला अटक केल्यानंतरची ही मोठी कारवाई समजण्यात येते. यावेळी मुंबई गुन्हे शाखेने एकूण पाच व्यक्तींना अटक केली असून त्यांची नावे पापा पठाण, अमजद रेडकर, फिरोज लेदर, अजय गंडा, समीर खान अशी आहेत.

अटक केलेले सर्व गुंड हे सराईत खंडणीबहाद्दर असून वर्सोवा येथील एका व्यावसायिकाची त्यांनी ३० लाखाची कार तसेच साडेसात लाख रुपयाची रोकड लुटत खंडणी वसूल केली होती. पोलिसांनी खाक्या दाखवताच चौकशीतून सर्व माहिती पुढे आली आहे, सध्या चौकशी सुरु असून आणखी महत्वपूर्ण माहिती या पाच गुन्हेगारांकडून प्राप्त होण्याची शक्यता आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.