Home Blog Page 11

*महात्मा फुले महाविद्यालयात स्व. अशोकराव पाटील एकंबेकर यांना अभिवादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयात किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर प्रो. डॉ.अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी स्व. अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या जीवन व कार्यावर यथोचित मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.के. मोरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी डॉ. सतीश ससाणे , प्रो.डॉ. नागराज मुळे , डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. संतोष पाटील , प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

*पंचायत राजमधून यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली**- *प्रोफेसर अनिल मुंढे*

अहमदपूर:-
मासूम शेख

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात करून महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला नवी दिशा देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे संयोजक प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर प्रो. डॉ. अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पुढे बोलतांना प्रो. डॉ. अनिल मुंढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे शिल्पकार तर होतेच पण देशावर संकट आल्यानंतर हा सह्याद्रीचा वाघ हिमालयाच्या रक्षणासाठी धावून गेला, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय तसेच साहित्यिक कार्यावर ही प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.के. मोरे यांनी केले तर आभार संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी.डी. चिलगर यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, प्रो. डॉ. नागराज मुळे , डॉ. सतीश ससाणे, डॉ. डी. एन. माने ,डॉ. सचिन गर्जे, डॉ.प्रशांत बिरादार, प्रा. प्रकाश गायकवाड, डॉ. सीमा उपलवार , प्रा. के. आर. कदम , प्रा. प्रतीक्षा मंडोळे, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापूरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*236अहमदपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील तिसऱ्यांदा विजयी.*

अहमदपूर :-
मासूम शेख

२०२४ च्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे विक्रमी मताधिक्यांनी विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे विनायकराव जाधव – पाटील यांचा त्यांनी ३१ हजार ६६९ मतांनी पराभव केला.जनसुराज्य शक्तीचे गणेश हाके हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
२३ नोव्हेंबर रोजी शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.अहमदपूर चाकूर तालक्याचा समावेश असलेल्या या मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रांवर २३८०७४ इतके मतदान झाले होते.मतमोजणीस २७ फेऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या.पहिल्या फेरीपासून सातव्या फेरीपर्यंत जनसुराज्य शक्तीचे उमेदवार गणेश हाके हे आघाडीवर होते.आठव्या फेरीपासून विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे गणेश हाके यांचे मताधिक्य तोडून १३३५ मतांनी आघाडीवर राहिले ते शेवटपर्यंत २७ व्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य ३१६६९ मताधिक्य वाढतच गेले.शेवटी त्यांनी विजयाला गवसणी घातली.विजयी उमेदवार बाबासाहेब पाटील यांना ९६९०५ , त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री विनायकराव जाधव-पाटील यांना ६५२३६ तर जनसुराज्य शक्तीचे गणेश हाके यांना ६२४४७
मते मिळाली आहेत.

*आ. बाबासाहेब पाटील यांचा सुसंवाद दौरा उत्साहात संपन्न!*

अहमदपूर
मासूम शेख

आज दिनांक 15/11/2024 रोजी आ. बाबासाहेब पाटील यांचा शेनकूड, टाकळगाव, सुनेगाव (शेंद्री), सुमठाणा, वंजारवाडी, धसवाडी आणि खंडाळी आदी गावांमध्ये सुसंवाद दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नागरिकांच्या अलोट गर्दीतून विजयाचा गुलाल आ. पाटील यांच्याच वाट्याला येणार, याचे संकेत मिळत असून ही त्यांनी आजवर केलेल्या कामाची फलश्रुती आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, माजी जि. प. सदस्य अशोकराव केंद्रे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव खांडेकर, विशंभरराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुजिब पटेल जहागीरदार, तानाजी राजे, माधव नागमोडे, डॉ. फुजल जहागीरदार, रामभाऊ नरवटे, सूर्यकांत चिघळे, ॲड. मुजमिल हाश्मी, अय्याज भाई शेख, बाबू भाई रुईकर, गैबीसाब हाळणीकर, भैया भाई सय्यद, हसनभाई पैलवान, इलियास भाई सय्यद, जमीर सौदागर, श्याम भगत, विकास बोबडे, बापू कज्जेवाड, चंद्रकांत गंगथडे, अजिज काझी, हुसेन शेख, एजाज मुंजेवार, एम. डी. इरफान, युवराज बदने, अनंत होळकर आदी उपस्थित होते.

*महात्मा फुले महाविद्यालयात गुरुनानक व बिरसा मुंडा यांची जयंती साजरी*

अहमदपूर
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक व थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या गुरुनानक व बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुरुनानक व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार वामणराव मलकापूरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.