Home Blog Page 12

*वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांना जाहीर पाठिंबा.*

अहमदपूर
मासूम शेख

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार बालाजी पाटील चाकूरकर यांना पुरस्कृत केले आहे परंतु हे करताना अहमदपूर चाकूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम व निरीक्षक यांनी बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नावाने पुरस्कृत केल्याचे पत्र जाहीर केल्यामुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांना सामूहिकरीत्या पाठिंबा जाहीर केला आहे.
हा पाठिंबा जाहीर करत असताना चाकूर वंचित चे तालुकाध्यक्ष रामेश्वर हाके पाटील व उपाध्यक्ष रंगनाथ वाघमारे यांनी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना व पक्षश्रेष्ठींना सवाल विचारला की प्रत्येक निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता त्यांच्यावर भाजपामधील आयात केलेले उमेदवार लादले जातात आम्ही मात्र चार वर्षे अकरा महिने पक्षाचे निष्ठेने काम करतो परंतु उमेदवार देताना आम्हाला विचारात घेतले जात नाही अशी नाराजी व्यक्त करत त्यांनी विनायकराव पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. अहमदपूर तालुका वंचित चे महासचिव मौलाना हाफिज बिलाल यांनी अहमदपूरच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सदस्य परमेश्वर आबा घोगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अहमदपूर चाकूरचे पदाधिकारी रामेश्वर भाऊसाहेब हाके पाटील, रंगनाथ बळीराम वाघमारे, मुस्तफा गुडसाब दापकेवाले, फिरोज गैबी साब सय्यद, कांबळे बाबासाहेब कचरू, नवनाथ हाके, सचिन महालिंगे अहमदपूर वंचित चे पदाधिकारी रहमानखान पठाण, रमेश हनुमंते ,भिमराव कांबळे, संतोष गायकवाड, बालाजी थिटे, चंद्रकांत कांबळे, मौलाना बिलाल हुसेन साहब आदी पदाधिकारी उपस्थित होते

*महात्मा फुले महाविद्यालयात पंडित नेहरू यांची जयंती साजरी*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आधुनिक भारताचे शिल्पकार तथा पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर हे होते तर चंद्रकांत धुमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे सहसंयोजक डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

*भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत अहमदपुरात पत्रकार परिषद* *आमदार बाबासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे केले आवाहन*

अहमदपूर:-
मासूम शेख

236 अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे बाबासाहेब पाटील हे उमेदवार आहेत त्यामुळे भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे व अहमदपूर चाकूर तालुक्यातील भाजप प्रेमी मतदारांनी ही बाबासाहेब पाटील हेच आपले उमेदवार आहेत असे मानून त्यांनाच मतदान करावे असे आवाहन केले.
या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे संकल्प पत्राचे विमोचन ही करण्यात आले त्यात सन्मान योजना 12 हजार होती ते 15 हजार एवढे करण्याचे ठरवले आहे तर शेतीवरील कर्जमाफी करण्याचेही ठरवले आहे असे एकूण 25 मुद्दे या संकल्प पत्रात आहेत त्या पत्राचे विमोचन यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेला भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ,भारत चामे, त्र्यंबक गुट्टे, अशोक केंद्रे, राजकुमार मजगे, वसंत डिगोळे, गोविंद गिरी व तसेच अहमदपूर तालुकाध्यक्ष प्रताप पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे असेही सांगण्यात आले की ज्या लोकांनी आदेश पाळला नाही त्या नेते व कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समितीने बरखास्त केले आहे त्यात गणेश हाके, बब्रुवान खंदाडे, बालाजी पाटील चाकूरकर, रेखाताई तरडे, सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, बालासाहेब होळकर, हेमंत गुट्टे ,हनुमंत देवकते ,बालाजी गुट्टे ,माणिक नरवटे ,संतोष कोटलवार, आदींना निलंबित करण्यात आले आहे असेही ते शेवटी म्हणाले

*मतदार संघातील सामान्य नागरीकांना दिलेल्या धोक्यासाठी उत्तम पर्याय म्हणून मी उभा आहे -* *अहमदपूर-चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार माधव जाधव यांचे प्रतिपादन* *माधव रंगनाथ जाधव यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली व जाहीर सभा*

अहमदपूर:-
मासूम शेख

मतदार संघातील दोन्ही पाटलांनी सामान्य जनतेला दिलेला धोक्यासाठी मी एक उत्तम पर्याय म्हणून निवडणुकीला थांबलो असुन अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहमदपूर-चाकूर मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने मला प्रचंड मतांनी निवडुन द्यावे असे प्रतिपादन अहमदपूर-चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार माधव जाधव यांनी जाहीर सभेत केले.
ते येथील निजवंत नगर येथे दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जाहीर सभेच्या सुरुवातीला सकाळी 11 वाजता निजवंते नगर अहमदपुर येथुन शहरातुन मुख्य रस्त्यावरुन भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नंतर या भव्य रॅलीचे जाहीर सभेत रुपांतर झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी ह.भ.प. मारोती महाराज धुळगुंडे लेंडेगावकर उपस्थित होते तर यावेळी व्यासपीठावर गिरीधर पौळ उपसरपंच खंडाळी, शिवकुमार हिप्परगे सरपंच परचंडा, विश्वनाथ कोळसुरे संस्थापक अध्यक्ष कुणबी सेना, लातुर, धोंडीराम मुठ्ठे, तानाजी कवडे, तालुका कार्याध्यक्ष लहुजी सेना, चाकुर, इब्रोज पटवेगर, माधव जाधव यांचे आई-वडील, बंधु माणिकराव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहीर सभेत पुढे बोलताना माधव जाधव म्हणले की, जाहीरनामा मी प्रत्येक घरोघर पोहचविला आहे. जाहीरनाम्यात एमआयडीसी मध्ये सोयाबिन प्रोसेसिंग असेल, उसावरचा गुळ उद्योगाचा असेल, तुरीचे डाळमीलचा उद्योग असेल, कच्चा माल जो उपलब्ध आहे तो पक्का कसा करता येईल, पक्क्या मालासाठी गुंतवणुक करणारे व्यापारी उपलब्ध करुन देणार आहे, यातुन बेरोजगार तरुण, तसेच महिलांना रोजगार मिळणार आहे, आदरणीय खंदाडे साहेब हे तळागाळातील सामान्य कुटुंबातुन आलेले आहेत. आमदार राहिलेले आहेत. आणखीणही त्यांची तळागाळाशी नाळ जुडलेली आहे, आणि त्यांना सर्वसामान्यांचा आवाज ओळखु येतो, ऐकु येतो, माधव जाधव कडे एक उत्तम पर्याय म्हणून आज जनता बघत आहे. जनतेला कळुन चुकलय की या दोन्ही पाटलांना सोडून माझ्या सोबत सर्वसामान्य जनता राहणार आहे. प्रस्थापित आमदारांनी 3500 हजार कोटीचा निधी आणला पण हा निधी कमिशन खाऊन या निधीचे वाटोळे केले. तालुकयातील कोणत्याच गावाला रस्ता व्यवस्थीत झाला नाही ना कुठलाच विकास झाला नाही. मतदारांनी जर मनात आणुन मला आमदार केले तर निधीतुन कमीशन खाणारा आमदार माधव जाधव होणार नाही. मी पुरोगामी विचाराचा आहे पुरोगामी विचारामध्ये कधीच भारतीय जनता पार्टी बसत नाही. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल त्यांना मी भविष्यात पाठींबा देणार आहे. आणि मी त्याच विचारात राहणार आहे. अजिबात भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार नाही. मी माझ्या आई वडिलांना देव मानतो माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो की कोणाच्या विरोधात उभा राहिलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा घेऊन पुढे आलोय माधव जाधव हा माधवराव जाधव किंवा साहेब होणार नाही सर्व सामान्यांना सहज उपलब्ध होणारा मी लोकप्रतिनिधी आसणार आहे. आमचे कुटुंब पुर्वी हैद्राबाद येथे राहत होते आम्ही अत्यंत हालाखीच्या परिस्थितत जिवन जगले असुन माझे आई वडील तर विट भट्टीवर मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. सन २०१७ मध्ये सन्मानिय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातुन जि.प मतदार संघ खंडाळीतुन निवडणुक लढवुन जिंकुन येऊन पाच वर्षे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचे प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन मांडून प्रामाणिक पणे ते सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगीतले. मला कोणावर टिका करायची नाही, माझ्यावर सोशल मिडिया मधुन माझ्यावर काहीजन वैयक्तिक खालच्या दर्जाची टिका टिप्पनी करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर टिका न करता हिम्मत असेल तर कॉलेज रोडवरील माझ्या स्वराज ट्रॅक्टरच्या कार्यालयात येवून बोलावे. मी उत्तर देण्यास समर्थ आहे. माझा सगळ्यात मोठा आधार माझे आई वडील माझा पाठीराखा भाऊ. मला निवडून आणायला सामान्य जनतेचे असंख्य हात आहेत. अहमदपूर-चाकूर तालुक्याची जनता सर्वसामान्याच्या पाठीमागे उभे राहाणार आहे. बारा बलुतेदार आठरा पगड जातीतील लोकांचे एैरणीवरील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचवण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहण्यासाठी ताकत मला सर्वसामान्य जनतेनी दिली असुन निवडूण देण्याचे ठरवले आहे मी पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन जनतेसाठी उभा आहे म्हणुन निवडणुक विभागाच्या बॅलेट यंत्रावर माझा 18 हा क्रमांक आला आहे आणि भारतीय समाजातील 18 पगड जातीसाठी मी कार्य करणार करणार आहे या योगायोगाला सत्यात उतरवण्यासाठी मला येणाऱ्या 20 तारखेला रोड रोलर हे बटन दाबुन प्रचंड मतांनी विजयी करा असेही आवाहन शेवटी माधव जाधव यांनी केले.
अध्यक्षीय समारोप ह.भ.प. मारोती महाराज धुळगुंडे लेंडेगावकर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रताप गवळे यांनी मानले. या जाहीर रॅली व जाहीर सभेस अहमदपूर-चाकूर मतदार संघातील असंख्य जनता, कार्यकर्ते उपस्थित होते

*अहमदपूर चाकुर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार__ आ. बाबासाहेब पाटील*

अहमदपूर:
मासूम शेख

अहमदपूर -चाकुर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.मागील काळामध्ये ट्रामा केअर सेंटर, दोन पशुवैद्यकीय रुग्णालय, नगरपालिकेची तीन मजली इमारतीसह १४६ दुकाने असलेली नगरपालिकेचे संकुल, सांगवी राळगा उजना या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प, सिंदगी येथे एक हजार एकरावर उभारलेला नवीन तलाव, अहमदपूर चाकूर तालुक्यातील शाळांचे नूतनीकर, मन्याड नदीवरील आठ बांधा-याची उभारणी असे कोट्यावधीचे काम केले असून येणाऱ्या काळात अहमदपूर शहरात १०० बेडचे नवीन रुग्णालय प्रस्तावित असून चाकूर शहरात ट्रामा केअर सेंटर उभारणार आहे. अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आणि वैद्यकीय शिक्षणासह देशभरात कुठे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत करणार, मतदारसंघातील चाकूर तालुक्यातील शेळगाव, वाढवणा ते धर्माबाद सिमेंट रोड आणि सांगवी, उजना, गंगाहिप्परगा, खंडाळी अंधोरी, किनगाव व रेणापूर या शंभर किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे बांधकामाचे काम करणार. अहमदपूर, चाकूर, नळेगाव, किनगाव मधील बस स्थानकाचा पुनर्विकास करून मतदारसंघात विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिक बसची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अंतेश्वर धरणातून पाईपलाईन द्वारे मतदार संघातील ३० ते ३२ गावातील शेतकऱ्यांना सिंचन आणि पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता करून आठ हजार हेक्टर वरील जमीन सिंचनाखाली आणणार तसेच शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे नियमित वीज देणार. मतदार संघातील शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी किनगाव मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती भवन, युवकांसाठी क्रीडा अकॅडमी, ओपन जिम स्थापन करणार आहे. मतदार संघातील महिला, स्वयंसेवी गटांना शासकीय योजनांशी जोडून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्याचा यासह वृद्ध, अपंग आणि विधवांसाठी पेन्शन योजना द्वारे पेन्शन मिळून देणार असल्याचेही ते शेवटी म्हणाले, या पत्रकार परिषदेस महायुतीच्या नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.