Home Blog Page 124

प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी महागड्या गिफ्टचं ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’ ठेवल्यामुळे अलगद अडकला पोलीसांच्या जाळ्यात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रेयसीला प्रभावित करण्यासाठी प्रियकराने व्हॉट्सअ‍ॅपवर खास महागड्या गिफ्टस्‌चे स्टेटस ठेवले होते. विशेष म्हणजे, चोरीच्या रक्कमेतून प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देऊन त्याचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर ठेवल्याने चोरटा प्रियकर सहजरित्या अंबरनाथ पोलीसांच्या तावडीत अडकला आहे. राज आंबवले असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव असून आरोपीने गुन्हा कबूल करताच त्याला अटक करून २ सप्टेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले आहे व न्यायालयाने आरोपीस ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपीला मालकाने कामावरून काढलं होते

अंबरनाथ पश्चिम भागातल्या रेल्वे स्थानकानजीक सुनील महाडिक यांच्या मालकीचे ‘ओम श्री साईराम’ नावाने पूजेचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात आरोपी राज आंबवले कामाला होता. मात्र काही महिन्यापूर्वी त्याने पैश्याची अफरातफर केल्याने त्याला सुनील महाडिक यांनी कामावरून काढून टाकले होते. त्यातच २४ ऑगस्ट रोजी सुनील महाडिक यांनी घाऊक विक्रेत्याकडून पूजेचे साहित्य घेतले होते. त्याच विक्रेत्याला देण्यासाठी रोकड दुकानाच्या गल्ल्यात ठेवली होती. मात्र त्या दिवशी घाऊक विक्रेता रोकड घेण्यासाठी आला नसल्याने सुनील महाडिक रोकड गल्ल्यात ठेवून घरी गेले. मात्र २५ ऑगस्ट रोजी दुकानात आले असता त्यांच्या दुकानाची ग्रील कापलेली आणि कुलूप तोडलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले. तर गल्ल्याची चावीने उघडून त्यामधील दोन लाख रोकड शिवाय एक सोन्याची चेन चोरून नेल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर महाडिक यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात रोकड व सोनसाखळी चोरीला गेल्याची अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दिली.

गल्ल्याची चावी कुठे ठेवायचे, हे केवळ आरोपीलाच माहीत

दुकान मालक सुनील महाडिक यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या आरोपी राज आंबवले याने त्याच्या व्हॉट्सऍप स्टेटसवर गर्लफ्रेंडला नवीन महागडा आयफोनसह नवीन ऍक्टिव्हा घेतल्याचे तीन-चार दिवसापूर्वीचे फोटो स्टेटसवर अपलोड केले होते. त्यानंतर महाडिक यांनी राज याच्या मोबाईलमधील स्टेटस पाहताच महाडिक यांना संशय आला. विशेष म्हणजे सुनील महाडिक यांच्या दुकानाच्या गल्ला चावीने उघडून चोरी झाली. आणि मालक गल्ल्याची चावी कुठे ठेवायचे, हे केवळ आरोपी राज आंबवले यालाच माहीत होते. त्यामुळे महाडिक यांनी अंबरनाथ पोलीसांकडे याबाबतचा संशय व्यक्त करताच पोलीसांनी राज आंबवले याला अंबरनाथ मधून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, मालकाने कामावरून काढल्याचा राग मनात धरून आणि प्रेयसीला महागडा फोन, दुचाकी भेटवस्तू देण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्याने अंबरनाथ पोलीसांनी दिली आहे. गुन्हा कबूल करताच राज अंबावले याला अटक करून २ सप्टेंबरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी, आता खिशाला बसणार आणखी झळ !!


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रेल्वेचे ‘कन्फर्म’ तिकीट रद्द केल्यास, भारतीय रेल्वेकडून त्यावर ‘शुल्क’ आकारले जाते. मात्र, आता ‘कन्फर्म’ रेल्वे तिकीट रद्द करण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे. कारण, आता कन्फर्म रेल्वे तिकिट रद्द करणे अधिक महाग होणार आहे. कारण, रद्द केलेल्या तिकिट शुल्कावर आता वस्तू व सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या टॅक्स रिसर्च युनिटने याबाबत ३ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, आता रेल्वे तिकीट रद्द केल्यास, तसेच हॉटेल बुकिंग रद्द करण्यावर ‘जीएसटी’ आकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

किती जीएसटी आकारणार ?

अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, रेल्वे तिकीट बूक करणे, म्हणजे एकप्रकारे एक करार आहे. यात सेवा पुरवठादार म्हणजे रेल्वे किंवा हॉटेलकडून ग्राहकांना सेवा प्रदान करण्याची ऑफर दिली जाते. मात्र, प्रवाशी तिकीट रद्द करून, हा करार संपुष्टात आणतात. अशा वेळी करार मोडल्याने प्रवाशांना रेल्वेला तिकिट रद्दीकरण शुल्क म्हणून, अल्प भरपाई द्यावी लागते.

आता तिकिट रद्दीकरण शुल्क हे करार रद्द करण्याच्या विरोधात दिलेले ‘पेमेंट’ आहे. त्यामुळे आता त्यावर ‘जीएसटी’ आकारला जाणार आहे. कोणत्याही वर्गाच्या रेल्वे तिकिटावरील रद्दीकरण शुल्कावर त्या वर्गासाठी बूक केलेल्या तिकिटांप्रमाणेच ‘जीएसटी’ भरावा लागणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे..

रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या ४८ तास आधी ‘कन्फर्म’ तिकीट रद्द केल्यास, एसी फर्स्ट क्लासवर २४० रुपये, एसी टियर-२ वर २०० रुपये, एसी टियर-३ व चेअर कारसाठी १८० रुपये, स्लीपर क्लासवर १२०, तर द्वितीय श्रेणीच्या तिकिटांवर ६० रुपये तिकीट रद्द केल्याबद्दल शुल्क आकारले जाते.

ट्रेन सुटल्यानंतर १२ तासांत तिकीट रद्द केल्यास २५ टक्के तिकीट भाडे आकारले जाते. कन्फर्म तिकीट ट्रेन सुटल्यानंतर ४ तासांत रद्द केल्यास, भाड्याच्या ५० टक्के ‘कॅन्सलेशन चार्ज’ आकारला जातो.. प्रथम श्रेणी, एसी डब्याच्या तिकिटांच्या बुकिंगवर ५ टक्के ‘जीएसटी’ कर आकारला जातो. त्यामुळे या वर्गासाठी तिकीट रद्दीकरण शुल्कावरही ५ टक्के ‘जीएसटी’ शुल्क असेल असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

नारायण राणेंनी थेट उंदराशी तुलना करत आदित्य ठाकरेंवर केली जहरी टीका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजप नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद तसा जुनाच आहे, अनेकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व राणे व त्यांचे दोन पुत्र यांच्यादरम्यान शाब्दिक चकमकी घडतच असतात. महाविकास आघाडी असतानापासून नारायण राणे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर सडकून टीका करत आहेत. आता नारायण राणे यांच्या नव्या विधानाने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकत्याच केलेल्या विधानात नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांची तुलना थेट उंदराशी करून टाकली सोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष बांधणीसाठी विविध भागात शिवसंवाद यात्रा करत आहे, नेमके याच मुद्द्याला धरून नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सहाय्याने टीव टीव करत हा उंदीर राज्यभर फिरत असल्याची जहरी टीका राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. सोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत ते स्वकर्तृत्वावर राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, दसरा मेळावा आयोजित करण्याचा अधिकार केवळ एकनाथ शिंदे यांना असून, त्यांनी बोलावल्यास मी नक्की या मेळाव्याला येईल.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले की, केवळ बाळासाहेबांच्या नावावर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळाले होते, परंतु आता निवृत्त झालेल्यांना बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांनी घरी बसावे. अशा लोकांची स्वकर्तृत्वावर सरपंच देखील होण्याची लायकी नाही, असा खरमरीत टोला देखील नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

गुरुजन गौरव पुरस्कारासाठी SNDT चे प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांची निवड

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मुंबई: वृंदावन फाऊंडेशन विवेक व्यासपीठ, पुणे यांच्यातर्फे आयोजित ‘गुरुजन गौरव सोहळा’ २०२१ – २२ येत्या १८ सप्टेंबर रोजी पुणे येथे पार पडणार आहे.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांची यंदाचा ‘गुरुजन गौरव’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांचा तब्बल २० वर्षांपेक्षा जास्त काळ शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा अनुभव आहे.

शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सई ताम्हणकरला शेफाली वैद्य देणार का दणका ? गणेशोत्सवाच्या जाहिरातींवरून वादाला सुरुवात


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गणपती उत्सवाच्या औचित्यावर रिलायन्स मार्टतर्फे करण्यात आलेल्या एका जाहिरातींवरून वादंग निर्माण झाला आहे. रिलायन्स मार्टकडून विविध वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेल्या जाहिरातीवर हिंदुत्त्ववादी मंडळींनी टीका करायला सुरुवात केल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नव्या वादाला तोंड फुटलॆ आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका जाहिरातीत सईने टिकली न लावता गणपती बाप्पांचे स्वागत केल्याचे ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले असून त्या ट्विटसोबत #nobindinobusiness असा हॅशटॅग लावला आहे. शेफाली वैद्य यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला असून पूर्वीचा अनुभव पाहता शेफाली वैद्य आता सई ताम्हणकरला दणका देणार का ? याची चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे #nobindinobusiness प्रकरण ?

मागील वर्षी २०२१ च्या दीपावलीच्या काळात काही मोठ्या ब्रँडनी त्यांच्या जाहिरातीसाठी बिंदी न लावलेल्या मॉडेल्सचे फोटो जाहिरातीसाठी वापरले होते. त्यावर शेफाली वैद्य यांनी आक्षेप घेत हिंदू सण उत्सवांच्या जाहिरातींमध्ये वापरण्यात येणाऱ्या मॉडेल्सनी बिंदी लावलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली होती. शेफाली वैद्य यांनी घेतलेल्या या भूमिकेला सर्व स्तरांमधून मिळणार मोठा पाठिंबा पाहता अखेर सर्व संबंधित कंपन्यांनी जुन्या जाहिराती मागे घेत बिंदी लावलेल्या नव्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या आणि ब्रॅण्ड्सला दणका देणाऱ्या शेफाली वैद्य आता सई ताम्हणकरला देखील दणका देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.