Home Blog Page 128

पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यासाठी अमोल मिटकरींनी दिली खुली ऑफर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी हल्ली चांगलेच चर्चेत आहे, नुकत्याच राज्य अधिवेशनात झालेल्या घोषणाबाजी, सत्ताधारी-विरोधक धक्काबुक्की प्रकरणात अमोल मिटकरी हे अग्रणी होते. आता मिटकरी यांनी सूचक विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची जणू खुली ऑफरचं दिली आहे. नुकत्याच केलेल्या भाष्यात मिटकरी म्हणाले की, भाजप हा असा पक्ष आहे जो पक्ष वाढविणाऱ्यांचे पंख छाटण्याचे कार्य करतो. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश करावा. नेमका हा प्रकार रोहिणी खडसे यांच्या लक्षात आला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ खडसे व गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष राज्यात मजबूत झाला आहे, परंतु त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. यामुळे रोहिणी खडसे जश्या वेळीच सावध झाल्या, नेमके तश्याच प्रकारे पंकजा मुंडे यांनी देखील भूमिका घेत राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा. मिटकरी यांच्या विधानावर पंकजा मुंडे व अन्य भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया येते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या अट्टल दाखलेबाज गुन्हेगारास गुन्हे शाखा घटक-३, कल्याण पोलीसांनी शिताफीने केले जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या अट्टल दाखलेबाज गुन्हेगारास कल्याण घटक-३,च्या गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केली आहे.

डोंबिवली पोलीस स्टेशन येथे दि.२२.०८.२०२२ रोजी गुन्हा रजि. नं ३०३/२०२२ भादंवि कलम ४५४, ३८० खाली दाखल करण्यात आला होता व नमूद गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक-३, कल्याण चे पोलीस करत होते.

सदर गुन्ह्याच्या घटनास्थळा वरून सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे तपास करत असताना आरोपी सद्यस्थितीत मुंब्रा येथे असल्याचे पोलीसांना आढळून आले. पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा परिसरात शोध घेत असताना भोलेनाथ नगर, मुंब्रा जवळ येथून अब्रार अकबर शेख (वय: २४) या गुन्हेगारास सापळा रचत अटक केली. सखोल चौकशी अंती सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

सदर चोरीच्या प्रकरणी त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेल्या मालापैकी ५५,०८०/- रु. रोख रक्कम व ५,०००/- इतर साहित्य तसेच वापरत असलेला मोबाईल १०,०००/- रु. किंमतीचे १ मोबाईल हँडसेट असा एकूण ७०,०८०/- रु. किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला. तसेच सदर गुन्हेगारास पुढील कारवाईसाठी व तपासासाठी डोंबिवली पोलीस ठाण्यात त्याची रवानगी करण्यात आली आहे. सदर आरोपी विरोधात यापूर्वी नागपाडा, आगरीपाडा, मुंब्रा, कळवा, नयानगर, डी.बी.मार्ग, जे.जे.मार्ग, अलिबाग, पेण, एन.एम.जोशी मार्ग व विष्णुनगर पोलीस ठाण्यात जवळपास २५ चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक उपनिरीक्षक संजय माळी, पोहवा सचिन शिंपी, सचिन साळवी, अनुप कामत, वसंत बेलदार, साबळे, विलास कडु, सचिन वानखेडे, महिला पोहवा मेघा जाने, पोशि विनोद चन्ने, मिथुन राठोड व उमेश जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 

गणेशोत्सवा निमित्त चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मोफत एसटीची सुविधा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली येथील शिवसेनेचे लोकप्रिय खासदर डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर शाखा यांच्या वतीने गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविक चाकरमान्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली येथून मोफत एसटी सेवा पुरवण्यात आली आहे.

या एसटी बसेसना सायंकाळी चार वाजता शिवसेनेचे लोकप्रिय खासदर डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे झेंडा दाखवून मार्गस्थ करणार आहेत. या एसटी गाड्या डोंबिवली येथील हभप सावळाराम क्रिडा संकुल येथुन डोंबिवलीतील विविध भागांसाठी १४० एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली येथुन एकूण २९० एसटी बसेस ची सोय करण्यात आली आहे तर कल्याण पूर्व साठी ८० बस आणि दिवा वासीयांसाठी ९० बस देण्यात आल्या आहेत.

एकूण १५००० चाकरमानी भाविक भक्तगण यंदा कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याकरिता कोकणात मोफत जाण्यासाठी या बसेसच्या सोयीचा लाभ घेतील असे वर्तवले जात आहे.

 

२ वर्षाकरीता तडीपार केलेल्या गुन्हेगारास टिळक नगर पोलीसांनी केले अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून २ वर्षाकरीता तडीपार केलेल्या एका गुन्हेगारास टिळक नगर पोलीसांनी सिकंदर नुरमहंमद बगाड नावाच्या आरोपीला आज अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त परिमंडळ – ३ कल्याण यांच्या आदेशाने राबविण्यात येत असणाऱ्या ऑपरेशन ऑलआऊट दरम्यान अवैध धंदे, अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच रेकाॅर्डवरील हिस्टरी शीटर गुन्हेगार चेकिंग करणे कामी पोलीस गस्त करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हद्दपार केलेला गुन्हेगार सिकंदर नुरमहंमद बगाड हा फिरोज भंगारवाल्याच्या बाजूस, न्यू गोविंदवाडी, कल्याण, पुर्व येथे लपून बसला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी सदर ठिकाणी सापळा लावून त्यास पकडून त्याने मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ – ३ कल्याण यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्याच्या विरुद्ध म.पो.का.कलम.१४२ प्रमाणे कारवाई केली.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ – ३ कल्याण, श्री.सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.सुनील कुर्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अजय आफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.पांडुरंग पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण बाकले, पोलीस उपनिरीक्षक श्री. अजिंक्य धोंडे, सहाय्यक उपनिरीक्षक श्री. श्याम सोनावणे, पो.ना.गोरखनाथ घुगे, रामेश्वर राठोड यांनी केली आहे.

 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

महाराष्ट्रातील लोकांचा अभिमान असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर मंजूर करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य सरकारने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्र सरकारकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. मराठी भाषा अभिजात दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करते असा निष्कर्ष. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

यासंदर्भात सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेअंतर्गत राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी राष्ट्रपतींना १ लाख २० हजारांहून अधिक पत्रे पाठवली आहेत. याबाबत महाराष्ट्रातील खासदारांनी वेळोवेळी संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यसभेत सांगितले. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर मंजूर करावा, अशी विनंती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.