Home Blog Page 142

महागाईतून जनतेला मिळणार दिलासा; सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर होणार कमी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या कित्येक महिन्यांपासून महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले असून, रोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाल्याचे दृश्य आहे. जीएसटीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार काही बदल करताना अनेक नव्या बाबींचा जीएसटी अंतर्गत समावेश केल्याने महागाईचे चटके सामान्य जनतेला आता रोजचीच बाब बनली आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, अशातच सगळ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून, याअंतर्गत खाद्यतेलाचे दर १० ते १२ रुपायांनीं कमी होणार आहे.

खाद्यतेलाचे प्रक्रियाकर्ते व निर्मिती करणाऱ्यांनी जागतिक स्तरावर झालेल्या खाद्यतेलाच्या दरातील घट याचा नेमका फायदा ग्राहकांना देण्याची तयारी दशविली आहे, त्यामुळे आगामी काळात ऐन सणासुदीला खाद्यतेल १२ रुपायांनीं स्वस्त होणार आहे. दरम्यान रशिया-युक्रेनचे युद्ध व इंडोनेशियने इतर देशांमध्ये पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने तेल दराच्या महागाईचा भडका उडाला होता. भारत खाद्यतेलासोबत तेलबियाण्यांचे आयात करणारा प्रमुख देश आहे, सुमारे दोन तृतीयांश इतके खाद्यतेल व तेलबियाणे भारतात आयात करण्यात येते.

केंद्र सरकारने तेल वितरकांना खाद्यतेल किंमती कमी करण्याचा सल्ला दिला असून, जर खाद्यतेल उत्पादक किंमती कमी करत असेल तर मूळ तेल किंमत कमी करण्यात याव्या, याबाबत सरकार आदेश जारी करणार असून आगामी सणासुदीच्या काळात १२ रुपयांपर्यंत तेलांच्या दरात घट अपेक्षित आहे. याचा फायदा जनतेला त्वरित दिला जाणार असून सध्याच्या पॅकिंग तेलावर एमआरपी पेक्षा कमी नवे दर लागू करण्याचा बदल लवकरच केला जाणार आहे. एकंदरीतच यामुळे सामान्य लोकांच्या खिशाला बसणारी झळ आता कमी होणार असून, सणासुदीला याचा फायदा त्यांना नक्कीच होईल.


अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून बुलढाणा, महाराष्ट्र,विदर्भ या समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य घडले – साहेबराव पाटोळे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अण्णाभाऊ साठे हे देशातील उपेक्षित लोकजीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांच्या व्यथा-वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात अशी त्यांची धारणा होती. अण्णाभाऊंचं साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं.अत्यंत अल्पशिक्षित असले तरी उपजत शाहिरीला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेश उपाध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी लोणार शहरात काढण्यात आलेल्या मिरवणूकीच्या समारोप वेळी केले.

संजय नगर भागात उर्दू शाळा निर्माण करा; समाज बांधवांकडून मुख्याधिकारी यांना निवेदन

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये बँड पथक, लाठीकाठी पथक, मल्लखांब पथकांद्वारे कला प्रदर्शन करण्यात करण्यात आले. या मिरवणूकीत शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. खुशालराव मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, नगराध्यक्षा पूनमताई पाटोळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी, शहराध्यक्ष नितीन शिंदे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन खरात, नगर परिषद उपाध्यक्ष बादशाह खान, गटनेते भूषण मापारी, आरोग्य सभापती संतोष मापारी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद, आबेद खान पठाण, शेख रऊफ शेख महेबुब, रमजान परसुवाले, गुलाबराव सरदार, काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, भरत राठोड, अरुण जावळे, एजाज खान, छगन कंकाळ, प्रवीण नेवरे, शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे, राहुल मापारी, इम्रान खान पठाण, युवा सेना तालुकाध्यक्ष गजानन मापारी, काँग्रेस नेते दौलत मानकर, राहुल मापारी, प्रमोद मापारी, शंकर पाटोळे, रतन पाटोळे, गजानन बाजड, किसन बाजड, गजानन बाजड, श्रावण बाजड, मनीष पाटोळे, ओम पाटोळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

माळीपुरा चौक येथे लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने फराळ व पाण्याची व्यवस्था करण्यात आली, यावेळी लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले व उपस्थितांना फराळ पाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, राहुल सरदार, रहमान नवरंगवादी, विठ्ठल घायाळ, गोपाल तोष्णीवाल, किशोर मोरे व इतर सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य नळाद्वारे जलपुरवठा करण्यात देशात अव्वलस्थानी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जल म्हणजे जीवन व ते प्रत्येक व्यक्तीला मिळावे याकरिता जलवितरण प्रणाली सक्षमपणे राबविणे गरजेचे असते. नेमके याच बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ‘जल जीवन मोहीम – हर घर जल’ या सर्वसमावेशक प्रकल्पाच्या उद्दीष्टपुर्तीचे लक्ष्य ठेवले होते. या अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरी नळाद्वारे जलपुरवठा करण्याचे धोरण देशभरात राबविण्यात येत आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य नळाद्वारे जलपुरवठा करण्यात राज्यांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. राज्यातील ग्रामीण भागातील १ कोटी २ लक्ष लोकांना नळाद्वारे जलपुरवठा करण्यात येत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार जल जीवन मिशन अंतर्गत ३७.१२ टक्के ग्रामीण भागातील घरांना नळजोडणी करण्यात आली आहे. जल पुरवठा करण्यासोबतच अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जल चाचणी करिता प्रयोगशाळांची उभारणी, सध्या जल प्रयोगशाळांच्या बाबतीत राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. जल वितरणासोबत शुध्द पेय जल मिळणे हा सर्वांचा प्राथमिक अधिकार आहे. नेमके याच बाबतीत राज्य प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील ९२ टक्के शाळा व ९३ टक्के अंगणवाड्यांना नळजोडणी करण्यात आली असून ही समाधानकारक स्थिती आहे. पुढील टप्प्यातील लक्ष्य १०० टक्के असून, लवकरच येत्या १ ते २ वर्षात ते पूर्ण होईल अशी आशा करणे गैर ठरणार नाही. सध्याची माहिती ३१ जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार असून, राज्यातील अनेक जिल्हे लवकरच नळजोडणीच्या बाबतीत लक्ष्यपूर्ती करतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सोनिया व राहुल गांधी मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात जाण्याची दाट शक्यता !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनी लाँड्रिंग प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या अडचणीत वाढ होऊन त्यांना अटक होऊ शकते. मंगळवार दि. २ ऑगस्टला ‘ईडी’ ने या प्रकरणी १२ ठिकाणी छापे टाकले. या छाप्याआधी ‘ईडी’ ने २ मोठ्या कॉंग्रस नेत्यांची चौकशी केली. या प्रकरणाचा खुलासा करताना भाजप नेता सुब्रामण्यम स्वामी यांनी, लवकरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी जेल मध्ये जातील व मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना कठोर शिक्षा होईल असे भाकीत वर्तवले.

विदेशी चलनाला भारतीय रुपयांमध्ये केलं रूपांतर

काँग्रेसने आधी यंग इंडिया लिमिटेडचे ५ लाख शेअर भांडवलावर तयार केले आणि नंतर काँग्रेस ९० कोटी रुपयांचे कर्ज एजेएल विकत घेतले आणि त्यात काहीही उरले नाही असे सांगून ते ५० लाख रुपयांना विकत घेतले. राहुल-सोनिया यांना गुन्हेगार ठरवत स्वामी म्हणतात की, एजेएल वर ९० कोटी रुपयांचे कर्ज नव्हते. कंपनीच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग झाले. स्वामींच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी-राहुल गांधी यांनी परकीय चलनात पैसा आणला असावा आणि त्यांनी या फेरफार करून त्याचे भारतीय रुपयात रूपांतर केले.

सोनिया-राहुल जेल मध्ये जाणार : सुब्रामण्यम स्वामी

सुब्रामण्यम स्वामी यांनी सुरु असलेल्या तपासावर समाधान व्यक्त केले आहे. तसेच आतापर्यंत भाजपमध्ये असे काही नेते होते त्यांना सोनिया-राहूल टाळत होते. पण आता व्यवस्थित तपास सुरु असून लवकरच सोनिया-राहुल यांना तुरुंगात जावे लागेल. सुरु असलेल्या युक्तीवादानंतर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यान्वये शिक्षा दिली जाईल. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावल्यापासून हे प्रकरण चर्चेत आले आहे. या पूर्वी राहुल गांधी यांना अनेकवेळा ‘ईडी’ ने कार्यालयात बोलावून तासनतास त्यांची चौकशी केली आहे. सोनिया गांधी यांना देखील तीनदा बोलावून प्रश्नोत्तरे विचारून चौकशी करण्यात आली आहे. तर ही संपूर्ण चौकशी बनावट असल्याचा दावा करत कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर या प्रकरणासंदर्भात दाखल याचिकेत सर्व पुरावे असल्याने ही केस उभी राहिली आहे. या प्रकरणाच्या पुराव्यासाठी अजून काय हवं असं देखील स्वामी यांनी म्हटले आहे.

नेमक प्रकरण काय ?

काँग्रेस पक्षाच्या नेतृवाखाली ‘यंग इंडिअन’ मधील आर्थिक अनियमतेच्या तपासासंदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ च्या निधीची फसवणूक आणि गैरव्यवहार करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. याशिवाय, ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ ने ९०.२५ कोटी रुपयांच्या वसुलीचा अधिकार मिळवण्यासाठी केवळ ५० लाख रुपये दिले होते, जे एजेएल ने काँग्रेसकडे थकवले होते असाही आरोप आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये; वेळापत्रक जाहीर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ची तारीख जाहीर झाली आहे. UPSC ची मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असून UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट <upsc.gov.in> वर या संदर्भात नोटीस जारी केली आहे. या बातमीत खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण UPSC मुख्य २०२२ वेळापत्रक डाउनलोड करू शकता.

ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता, त्यांना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले जाईल. उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र <upedsced.goved.in> वरून डाउनलोड करू शकतात.

UPSC ने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२ ही १६, १७, १८, २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी घेतली जाईल. ही परीक्षा रोज दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होईल असे आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.