Home Blog Page 159

अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपी यांच्यासह ईनोव्हा कार व गुटखा असा एकुण १०,१०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपी यांच्यासह ईनोव्हा कार व गुटखा असा एकुण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल मलकापुर येथे जप्त करण्यात आला. मलकापूर नॅशनल हायवे क्रं. सहा वरून धरणगाव कडून नांदुराकडे इनोव्हा कार मधून अवैधरित्या गुटख्याची तस्करी केली जात असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना मिळाल्यावरून डि.बि. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे व डीबी पथकाला कारवाई संदर्भात सुचना दिल्याने एपीआय सुखदेव भोरकडे, पो.काॅ अनिल डागोर, ईश्वर वाघ, सलीम बर्डे, आसिफ शेख, संतोष कुमावत, प्रमोद राठोड सह डी.बी पथकाने सापळा रचून सिल्वर ग्रे रंगाची टोयाटो ईनोव्हा कार एमएच-४३ एक्स ९१९८ हीला थांबवुन विचारपूस केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू पांढरे पोत्यांमध्ये दिसून आली पोलीस स्टेशनला सदरची गाडी आणून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटका व सुगंधी तंबाखू किंमत ९० हजार रुपये, सिल्वर ग्रे रंगाची टोयाटो ईनोव्हा कार किंमत ९ लाख रुपये, दोन मोबाईल दहा हजार रुपये असा एकूण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला .

कारमधील आरोपी शेख अजीम शेख फकीर मोहम्मद वय २० वर्ष रा. मदिना मस्जीद जवळ, बर्डे प्लॉट, खामगाव ता. खामगाव जि. बुलढाणा, शोयब रफिक गवळी वय १८ वर्षे रा. बर्डे प्लॉट खामगाव. ता. खामगाव जि. बुलढाणा या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भादवी कलम ३२८,२७२,२७३,१८८ सह कलम १३०/१७७,१५८/१७७ मोवाका प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि सुखदेव भोरकडे करीत आहे.

 

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ क्लबचे समाजोपयोगी उपक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन ह्या क्लबला स्थापन होऊन २८ वर्षे पूर्ण झाली. या कालखंडात मिडटाऊन तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले उदा. आदिवासी पाड्यात बंधारा, स्वर्गारोहण रथ डोंबिवली (शव वहिनी), मेडिकल कँप, व्यसनमुक्ती केंद्र इ. तसेच भविष्यातही अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. दर वर्षी नवीन येणारे अध्यक्ष मागिल जे उपक्रम राबविले जात होते त्याप्रमाणे ते राबविले जातात आणि ते काळजीपूर्वक अमलात आणतात व नविन काही समाजपयोगी उपक्रम राबविले जातील यासाठी सर्वसंमतीने आयोजित केले जातात. आजच्यामितिला रोटरीच्या इंटरनॅशनल व स्थानिक लेव्हलवर पल्स पोलिओ चा डोस पाच वर्षांपर्यंत लहान मुलांना न चुकता वर्षातून दोनतीन वेळा दिला जातो त्यास रोटरी इंटरनॅशनलन अनेक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देत असते. रोटरी क्लब चे मेंबर्स एखाद्या उपक्रमाला निधी कमी पडला तर न डगमगता स्वतः निधी उपलब्ध करून देतात हे विशेष आहे. दोन वर्षांपूर्वी रो. अनिल हीरावत यांची संकल्पना आणि रो. संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी हेल्थ सेंटर एका छोट्या जागेत सुरू केलं पण जागा अपुरी पडू लागल्याने यावर्षीचे अध्यक्ष रो. जितेंद्र नेमाडे यांनी गोग्रासवाडी येथे एका प्रशस्त जागेत स्थलांतरित केले असून त्याचा लाभ दरमहा अनेक नागरिक घेत आहेत.

या हेल्थकेअर सेंटर मध्ये रक्त तपासणी, दातांचा आणि डोळ्यांचा दवाखाना, फिजिओथेरपी या सोयी सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत व लवकरच महापालिकेची साथ मिळाली तर एक चांगले रूग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे व तो लवकरच पूर्ण होईल या करता रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे आखणी सुरू आहे, त्याकरिता कडोंमपाकडे बांधीव जागा किंवा मोकळा भुखंड मिळावा म्हणून पाठपुरावा केला जात आहे. सध्या या रोटरी मिडटाऊनचे ६४ सदस्य असून त्याचे सर्वांचे सहकार्य चांगल्याप्रकारे समाजोपयोगी उपक्रमात मिळत असते असे अध्यक्ष रो. जितेंद्र नेमाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

 

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चा २०२२-२३ सालच्या अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा डोंबिवली येथे संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा २०२२-२३ सालचा अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा नुकताच ३० जून २०२२ रोजी गणेश मंदिर हॉल, डोंबिवली येथे संपन्न झाला. याप्रसंगी रो.अजय कुलकर्णी यांनी मावळते अध्यक्ष रो. जितेंद्र नेमाडे यांच्याकडून २९ वे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली, रो. किशोर अढळकर यांनी रो. अतुल कुवळेकर यांच्याकडून सचिव पदाची सूत्रे स्वीकारली तसेच रो. अनिल हिरावत यांनी रो. प्रदीप बुडबाडकर यांच्याकडून खजिनदार पदाची सूत्रे स्वीकारली. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे मुख्य प्रशिक्षक रो. श्रीजीत यांनी रोटरीच्या नवीन सदस्यांना शपथ दिली.

याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या उप प्रांतपाल डॉ. आरती धूत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या सचिव कीर्ती वडाळकर या मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रो. डॉ. लीना लोकरस व रो. डॉ. मकरंद गणपुले यांनी केले. याप्रसंगी अनेक रोटरी सदस्य, त्यांचे कुटुंबीय, रोटरॅक्टर इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फुटबॉल खेळणाऱ्या रोबोटचा बिहारमधील शाळकरी मुलांनी केला आविष्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

परदेशात लोक मोठ्या प्रमणात रोबोट तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. तर, हळूहळू भारतातही हे तंत्रज्ञान अवलंबले जात आहे. आतापर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉस्पिटल्स इत्यादी ठिकाणी रोबोटच्या मदतीने काम सोपे करण्याबद्दल आपण ऐकलं असेल. पण बिहारमधील पाटणा आणि आराहच्या शाळकरी मुलांनी एक जबरदस्त पाऊल उचलत चांगली कामगिरी बजावली आहे. त्यांनी फुटबॉल खेळणारा रोबोट तयार केला आहे. फुटबॉल मैदानावर खेळाडू जसे खेळतात तसे, हा रोबोट मॅटवर फुटबॉल पास करताना, बचाव करताना, मारताना आणि किक मारताना दिसतो. श्रीकृष्ण विज्ञान केंद्रात चालणाऱ्या इनोव्हेशन हबमधील ६ मुलांनी हा रोबोट तयार केला आहे. या मुलांनी काहीतरी नवीन करण्याच्या ध्यासातून फुटबॉल खेळणारा रोबोट तयार केला आहे.

हा रोबोट जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रदर्शित केला जाईल. रोबोटिक्समध्ये रुची असलेल्या या मुलांनी स्वत:ला एक वेगळे स्थान तयार केले आहे. त्यातून रोबोटची रचना केली आहे. ही मुले इयत्ता ११वी आणि १२वी मध्ये शिकतात. विशेष म्हणजे यातील चार मुले सरकारी शाळेतील विद्यार्थी आहेत.

रोबोटची रचना करणाऱ्या टीमचे कॅप्टन हरिओम शरणम सांगतो की, टीममधील सर्व सदस्य रोबोटिक्सच्या क्षेत्रात आपलं करिअर शोधत आहेत.
हरिओमने सांगितले की, विज्ञान केंद्राचे मार्गदर्शक गौरव कुमार आणि इंटरनेट यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी हा रोबोट तयार केला आहे. जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी रोबोट तयार केला. जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी या मुलांच्या मनात रोबोट्स तयार करण्याची भावना निर्माण झाली. या चॅम्पियनशिपच्या एका प्रकारात त्याला रोबो सॉकर स्पर्धेची माहिती मिळाली, त्यानंतर सहा जणांच्या टीमने हा खेळाडू रोबोट तयार करण्यास सुरुवात केली. मार्गदर्शकाच्या नेतृत्वाखाली मुलांनी रोबोटचे कार्य तत्त्व समजून घेऊन रोबोट तयार केला. रोबोट बनवण्यासाठी १० दिवस लागले. तसेच रोबो तयार करण्यासाठी त्यांना सहा ते सात हजार रुपये खर्च करावे लागतात.

मोबाईल फोनवरून नियंत्रित करता येणारा रोबोट..
रोबोटिक्स चॅम्पियनशिप आणि रोबो सॉकर स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना ३० सेमी लांबी आणि रुंदीचा रोबोट तयार करायचा होता. या मुलांनी गेमच्या नियमांनुसार रोबोटला उर्जा देण्यासाठी १२०० एमएएचच्या सहा बॅटरी आणि ५०० आरपीएमची मोटर वापरली आहे.
त्याचबरोबर हा रोबो चालवण्यासाठी Arduino मायक्रो कंट्रोलरचा वापर करण्यात आला आहे.
हा रोबोट मोबाईल फोनद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. यासोबतच फ्लाय स्काय रेडिओ रिमोटने नियंत्रित करता येतो.

जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान दिल्लीत होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत ५३ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत ३०० संघांनी नोंदणी केली आहे. रोबो सॉकर प्रकारात, एका संघाला तीन रोबोट तयार करावे लागतात, ज्यामध्ये एक डिफेंडर, स्ट्रायकर आणि गोलकीपर रोबोट असेल. याशिवाय या चॅम्पियनशिपमध्ये आणखी नऊ श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यात फास्टस लाईन फॉलोअर, रोबो रेस, इनोव्हेशन पर्थ इत्यादींचा समावेश आहे.

कोविडची प्रकरणे वाढत असल्यामुळे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी; कर्नाटक सरकारचा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या देशभरात ओमीक्रॉन बीए.२ या कोरोना संसर्गच्या चौथ्या लाटेत कोविडची प्रकरणे पुन्हा वाढताना दिसत आहेत. विशेषतः दक्षिणेकडील राज्य केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

कार्यालये, शैक्षणिक आणि गृह संकुलासाठी संस्थांसाठी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मास्क लावणे आणि शारीरिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन निर्देशांनुसार लक्षणे असलेल्या सर्वांना रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) करणे बंधनकारक आहे. जर ती सकारात्मक आढळली तर स्वतः क्वारंटाईन व्हावे, असे निर्देश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.