Home Blog Page 171

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पकडुन बाजारपेठ पोलीसांनी केले गजाआड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मिळालेल्या माहितीनुसार कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा व आपले शोक पूर्ण करण्याचा उद्देशाने मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जावेद हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी गांधी चौक येथे येणार असल्याची खबर पोलीस नाईक बाविस्कर व पोलीस नाईक राज सांगळे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वपोनि श्री.नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली बाजारपेठ डिटेक्शन ब्रांच चे सपोनि. अरुण घोलप, पोहवा पावशे, शिवा जातक, पोना. सचिन साळवी, बाविस्कर, सांगळे यांनी आरोपी जावेद अस्मात डोन (वय: ३५ वर्षे) राहणार डॉन हाऊस पारसी गल्ली, कल्याण याला सापळा रचून शिताफीने पकडुन त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण ४०,०००/- रुपये किंमतीची ऍक्सेस मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी वपोनि. नरेंद्र पाटील, पोनि. राजेंद्र अहिरे (गुन्हे) सपोनि. अरुण घोलप, पोहवा. पावशे, पोहवा. शिवा जातक, पोना. सचिन साळवी, पोना. परमेश्वर बाविस्कर, पोना. राज सांगळे यांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन चे गुन्हे डिटेक्शन अधिकारी करीत आहे.

 

नवरा बायकोच्या घरगुती भांडणात मद्यधुंद अवस्थेत असलेला दारुड्या नवऱ्याने पोलीसाच्याच कानशिलात लगावली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवरा बायकोच्या घरगुती भांडणात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवऱ्याने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत पोलीसाच्या कानशिलात लगावल्याची घटना आज कोनगाव पोलीस स्टेशन मध्ये घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नवऱ्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला नवरा दरवाज्यावर लाथा मारत असल्याची पोलीसांना फोनवरून तक्रार आली. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्याने नवऱ्याला पोलीस ठाण्यात पकडून आणले असता, मद्यधुंद नवऱ्याने पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत पोलीसाच्या कानशिलात लगावल्याची घटना येथे घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नवऱ्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रितेश चिंदू चव्हाण (वय: ३४, रा. उल्हासनगर) असे अटक केलेल्या नवऱ्याचे नाव आहे.

नवऱ्याला घाबरून बायकोने केला होता पोलीस ठाण्यात फोन

नवरा रितेश हा उल्हासनगर मधील गजानननगर परिसात राहतो. नवरा बायकोमध्ये घरगुती वाद झाल्याने पत्नीने घटस्फोट मिळावा म्हणून न्यायालयात दावा केला होता. तेव्हापासून नवरा बायकोमध्ये वाद आधीच वाढल्याने आरोपीची बायको भिवंडी तालुक्यातील पिपंळघर येथील एका इमारतीमध्ये एकटी राहते. त्यातच बायको आपल्याला सोडून एकटी राहत असल्याचे पाहून रितेश उल्हासनगरहुन २४ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास ती राहत असलेल्या घरी आला. त्यावेळी बायकोने नवरा आल्याचे पाहून दरवाजा बंद केल्याने त्याने शिवीगाळ करत दरवाज्याला लाथा मारण्यास सुरुवात केली. या घटनेने घाबरून बायकोने कोनगाव पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस नाईक पांडुरंग वणवे हे घटनास्थळी येऊन मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवऱ्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यातील दालनातच मद्यपी नवऱ्याने घातला धिंगाणा

पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पवार यांच्या दालनात त्याला हजर करून पवार यांनी त्याच्याकडे नाव, पत्ता विचारला असता त्याने सांगण्यास नकार देऊन पोलीस ठाण्यातील दालनातच धिंगाणा घातला. हे पाहून पोलीस नाईक वणवे यांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र आरोपी नवऱ्याला त्याचा राग येऊन खाकी वर्दीत असलेले पोलीस नाईक वणवे यांना शिवीगाळ व धमकी देत, त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे पोलीस ठाण्यात अधिकच गोधंळ उडाला होता.

मद्यपी नवऱ्याची रवानगी पोलीस कोठडीत

त्यानंतर पोलीसांनी नवऱ्याला ताब्यात घेऊन पोलीस नाईक वणवे यांच्या तक्रारीवरून विविध कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आज (२५ एप्रिल) आरोपी नवऱ्याला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.

 

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील विनापरवाना रात्रभर चालणारे अनधिकृत ढाबे त्वरित बंद करा अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली सह आसपासच्या शहरांमध्ये सुरू असणारे अनधिकृत ढाबे त्वरित बंद करण्याची आग्रही मागणी हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने केली आहे.कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकांनी आज कल्याणात बैठक घेतली.

गेली २ वर्षे आधीच कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोणतेही उत्पन्न नसतानाही लाईट बिल, कामगारांचा पगार, शासनाचे विविध कर आणि परवाना नूतनीकरण शुल्क हॉटेल व्यावसायिकांना भरावेच लागले आहे. तर कोवीड निर्बंध पूर्णपणे उठवल्याने हॉटेल व्यावसायिकांचा आर्थिक गाडा चालण्यास आताशी कुठे हालचाल सुरू झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत कल्याण-डोंबिवलीसह इतर शहरात सुरू झालेल्या अनधिकृत ढाब्यांनी हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे आवाहन उभे केले असल्याचे यावेळी बोलताना विविध हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

तर आम्ही सर्व जण शासनाचे रीतसर सर्व कर, देयके भरत आहोत. याउलट कोणतेही शासन शुल्क किंवा परवानगी न घेता अनधिकृत ढाबे सर्रासपणे राजरोज दिवसरात्र सुरू असून त्यांना कोणाचे संरक्षण आहे ? असा संतप्त सवाल हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला. तसेच या अनधिकृत ढाब्यांमुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

आम्ही दिसायला जरी मोठे हॉटेल व्यावसायिक दिसत आहोत, तरी अनेक जणांचा रोजगार व  सरकारी कर भरून सर्व नियमावली पाळतो. जे अनधिकृत ढाबे आहेत त्यांच्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होतोय, हे ढाबे तातडीने बंद करावेत, एवढीच आम्हा हॉटेल व्यावसायिकांची कळकळीची विनंती आहे असे उल्हासनगर हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सचिव श्री. नरेश कंडारे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी हॉटेल व्यावसायिकांचा व्यथा मांडली.

 

अट्टल घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीला बाजारपेठ पोलीसांनी शिताफीने पकडुन केली उत्कृष्ट कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सविस्तर वृत्त असे की कल्याण मधील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसा व रात्री एकटा संधीचा फायदा घेऊन अट्टल घरफोडी व चोरी करणारा मोगा नावाचा अट्टल आरोपी हा घरफोडी करण्याच्या उद्देशाने बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरत असल्याची बातमी पोलीस नाईक सचिन साळवी यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वपोनि श्री. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ डिटेक्शन ब्रांच चे सपोनि. अरुण घोलप व त्यांच्या डिटेक्शन टीमचे पोहवा. पावशे, अनिल जातक, सचिन साळवी, बाविस्कर, सांगळ यांनी आरोपी संदीप बबन घोगरे (उर्फ मोगा) राहणार: भाऊ म्हात्रे चाळ, शंकर मंदिरा जवळ, काळा तलाव कल्याण याला शिताफीने पकडुन त्याचे कडून घरफोडी गुन्हा रजि नं. ९७/२०२२, कलम ४५४, ४५७, ३८० च्या घरफोडीतील एकूण २८,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, सदर आरोपीने अजून कुठे घरफोडी व चोरी केली आहे या बाबत बाजारपेठ पोलीस सखोल तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी वपोनि श्री. नरेंद्र पाटील, पोनि. राजेंद्र अहिरे (गुन्हे), पोनि. सुधाकर खोत, सपोनि. अरुण घोलप, पोहवा. पावशे, पोहवा. जातक, पोना. सचिन साळवी, पोना. परमेश्वर बाविस्कर, पोना. राज सांगळे यांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोहवा. पावशे करीत आहे.

 

कल्याण ग्रामीण आणि पूर्वेकडील लोडशेडींग विरोधात शिवसेनेचा जाहीर मोर्चा… अधिकाऱ्यांच्या दालनातील लाईट, पंखे, एसी केले बंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आधीच असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा अक्षरशः आगीमध्ये तेल टाकण्याचे काम करत आहे. परिणामी नागरिकांच्या संयमाचा कडेलोट होऊ लागला आहे. आज सकाळी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण भागातील संतप्त नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागात तब्बल ६-६ तास वीज पुरवठा खंडित होत आहे. कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागात लाईट नसल्याने पाण्याचेही हाल होत आहेत. आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची अवस्था म्हणजे आगीतून फोफाट्यात अशी झाली आहे. त्यामूळे अखेर आज कल्याणातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर शिवसेना आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी भर दुपारी धडक दिली. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, सेना पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिक, महिला आणि लहान मुले या मोर्चात सहभागी झाले होते.

दरम्यान यावेळी शिवसेना आणि संतप्त नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनातील लाईट, पंखे आणि एसी यंत्रणा बंद करून आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ग्रामीण भागातील हे अघोषित भार नियमन बंद करण्याची मागणीही शिवसेनेकडून यावेळी करण्यात आली.