Home Blog Page 172

राज्य सरकार बोलवणार लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंनाही देणार आमंत्रण..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सारकरकर लवकरच लाऊडस्पीकरच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावणार असून या बैठकीला राज ठाकरे यांनाही बोलवणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून आज वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले की, लाऊडस्पीकरच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते, राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहोत. या सर्वपक्षीय बैठकीनंतर काही संघटनांची बैठक घेणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

कायदा हाती घेतल्यास..

गेल्या काही दिवसांपासून राज्यांत कायदा आणि सुव्यस्स्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, कायदा हातात घेऊ अन्यथा कठोर कारवाई करू असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

वातावरण चिघळवण्यासाठी प्रयत्न सुरू..

गृह खात्याकडे विविध ठिकाणी वाद घडवून आणण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने पोलीसांना आदेश देण्यात आले असून त्यांचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले.

लाऊडस्पीकरचा मुद्दा जुनाच..

लाऊडस्पीकरचा मुद्दा जुनाच असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही निर्णय दिले आहेत. त्याअनुषंगाने सन २०१५ आणि २०१७ मध्ये राज्य सरकारने काही आदेश काढले आहेत. याबाबत लाऊडस्पीकरबाबत काय भूमिका असावी हे नमूद करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

डोंबिवली शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष सुरक्षा जनजागृती मोहीम..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज डोंबिवली शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष सुरक्षा जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये हेल्मेट, सिटबेल्ट व सिग्नल जंपिंग बाबत तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आजच्या विशेष मोहिमेअंतर्गत डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.नवनाथ चव्हाण आणि सहकारी कर्मचारी यांच्या सोबत डोंबिवली पूर्व हद्दीतील टिळक चौक, शेलार नाका, घरडा सर्कल येथे हेल्मेट, सिटबेल्ट न वापरणाऱ्या व सिग्नल मोडणाऱ्या चालकांना थांबवून हेल्मेट, सीट बेल्ट वापरण्याबाबतचे व सिग्नल पाळण्याबाबतचे सूचना फलक हाती देऊन, त्यांच्याकडूनच त्याबाबत वाहतूक सुरक्षा जनजागृती करण्यात आली.



तसेच रोटरी क्लब डोंबिवली सनसिटी यांच्याकडून विना हेल्मेट चालकांना हेल्मेट चे वाटप करण्यात आले.

डोंबिवली वाहतूक उपविभागाकडून आज हेल्मेट, सिटबेल्ट व सिग्नल जम्पिंग बाबत जनजागृती करण्यात आली आहे. यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश गीत्ते यांच्याकडून करण्यात येत आहे.

 

‘खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन मंत्रीच करत आहेत सरकारी पैशांची उधळपट्टी’; प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारवर बोचरी टीका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील मंत्रीच हे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सरकारच्या पैशांची उधळपट्टी करीत असल्याची बोचरी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आज ते नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला. प्रवीण दरेकर म्हणाले की, मंत्र्यांकडूनच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वृत्ती आणि सरकारी पैशाची उधळपट्टी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित थांबवावी. ज्या मंत्र्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी हॉस्पिटलची बिलं घेऊ नयेत. मंत्र्यांनी सर्व बिलं परत करून एक चांगला पायंडा पाडावा, असे आवाहनही त्यांनी विधान परिषदेत केले.

राज्यातील लोडशेडिंगच्या प्रश्नावर ते म्हणाले की, वीज देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली राज्य सरकारने भारनियमन सुरू केले आहे. राज्याच्या बेशिस्त कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात भारनियमन केले जात आहे. फडणवीस सरकारच्या काळात कधीही भारनियमन झाले नाही. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर ढकलायचे असे राज्य सरकारचे धोरण आहे. कोळशाचं खापर केंद्रावर फोडून काहीच होणार नाही. केंद्राकडून राज्याला अतिरिक्त कोळसा दिला जातोय. स्वतः वीजनिर्मितीबाबत राज्य सरकार बेफिकीर आहे. त्यात सर्वसामान्य जनता होरपळत आहे. शेतकऱ्यांना, ग्राहकांना वीज देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. सरकारची पूर्ण पत संपली आहे. ग्राहकांकडून महावितरणने वाढीव सुरक्षा अनामत रक्कम घेऊ नये. राज्य सरकारमध्ये कुणाचा कुणाला समन्वय नाही. अर्थमंत्री हे ऊर्जाखाते काँग्रेसकडे आहे म्हणून त्यांना निधी देत नाहीत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजप तर्फे राज्यभर आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल दरेकर म्हणाले की, राज ठाकरे यांना सभा घेण्याचा अधिकार आहे. सभेला परवानगी द्यायची नाही, ही सरकारची दंडेलशाही आणि धोरण आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. राज ठाकरे यांच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेला भाजपचे समर्थन आहे. जिथे गरज पडेल तिथे भाजपही सहभागी होईल, असे त्यांनी बोलताना स्पष्ट सांगितले.

 

बेवारस स्थितीत आढळलेली दुचाकी कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या पोलीसांनी मालकांस हुडकून केली परत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  काटाई- खोपोली द्रुतगती महामार्गावरील बदलापूर खोणी नाका या परिसरात एक दुचाकी गेल्या काही दिवसांपासून बेवारस अवस्थेत आढळून आली होती. कोळसेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या  कर्मचाऱ्यांना सदर दुचाकी आढळून आली असताना ती दुचाकी ज्या दुचाकी मालकाची आहे त्यांस हुडकून काढून शहर वाहतुक शाखा कोळसेवाडी यांच्या तर्फे संपर्क करून बदलापूर (पूर्व) पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोह. पंढरीनाथ काळे, पोशि. सुनील सांगळे सोबत ट्रॅफिक वॉर्डन मनोज शिरोसे, रामचंद्र उज्जैनकर व शिवाजी पाटील यांच्या हस्ते सदर दुचाकी वाहन मालकांस सोपवण्यात आली म्हणून सदर कोळसेवाडी शहर वाहतूक शाखेच्या कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबतचा दिला अल्टिमेटम ! त्यामुळे राज्य सरकारने घेतला धसका..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्याचं राजकारण चांगलाचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि त्याबाबत राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमची तारीख जशी जवळ येत आहे. त्यापद्धतीने राज्य सरकार तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे येत्या तीन तारखेला राज्यात कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडणार त्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला सतर्केचा इशारा दिला आहे. तर त्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रमुखांची देखील बैठक महासंचालक लवकरच घेणार आहे. या बैठकीत भोंगे आणि लाऊडस्पीकर संदर्भात सर्व मार्गदर्शक सुचनाचे कटाक्षाने पालन करण्याच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गृहमंंत्रालायाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व धर्माच्या लोकांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य राहिल. त्याच पार्श्वभूमीवर अंमलबजावणीच्या दृष्टीनं महत्वपूर्ण चर्चा बैठकीत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. फक्त मुस्लिम बांधवांसाठी नव्हे, तर सर्व धार्मियांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावताना परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. त्यांनी येत्या ३ तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. जर मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत. तर त्या पुढे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जाणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.