Home Blog Page 181

“झुंड” चित्रपटाच्या आशयामधून प्रेरणा घेऊन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या/खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

“झुंड” चित्रपटाच्या आशयामधून प्रेरणा घेऊन अधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी वर्ग, यांच्यासाठी छोटेखानी स्वरूपात आयोजिलेल्या “झुंड” या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काढले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमधून क्रीडा प्रतिभा निवडून त्यांना संधी निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांनी अशाप्रकारे अधिकारी वर्गासाठी एक सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन केले होते. या चित्रपटाच्या खेळापूर्वी झुंड चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी नागराज मंजुळे यांनी चित्रपट निर्मितीबाबतच्या आपल्या उद्देशाची माहिती आयुक्त व उपस्थित अधिकाऱ्यांना दिली आणि चित्रपटाच्या खास शो प्रदर्शनाबाबत आयुक्तांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडा विषयक बाबींना प्रोत्साहन देणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नेहमीच कटाक्ष ठेवला असून आता कोरोना साथीचे स्वरूप निवळल्यानंतर कल्याण डोंबिवलीच्या महापालिका अधिकाऱ्यांना इतर विकास कामांबरोबरच, क्रीडा बाबींवर लक्ष घालण्यासाठी त्यांनी संधी निर्माण करण्यसठि उद्युक्त केले आहे.त्याचप्रमाणे महापालिकेच्या सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या क्रीडा गुणांचा विकास करण्याकरिता ‘सावळाराम महाराज म्हात्रे’ क्रीडा संकुलाचा कायापालट करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे . खंबालपाडा येथे एक अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून त्यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम बुद्धिबळ इ. विविध प्रकारच्या खेळांच्या सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहेत, त्याचप्रमाणे महापालिकेच्या आरक्षित जागेत एक इनडोअर कबड्डी स्टेडियम व बारवी येथे एक फुटबॉल स्टेडियम तयार करण्यात येणार आहे. नागरिकांच्या शारीरिक आरोग्य व क्रीडा गुणांच्या विकासासाठी महापालिका क्षेत्रात कबड्डी करिता किमान ५० कबड्डी कोर्ट, ३ फुटबॉल. ५ क्रिकेट, २५ व्हॉलीबॉल, १० खो-खो साठीची मैदाने विकसित करण्याचा मानस आहे, जेणेकरून नागरिकांची खेळाप्रती आवड वाढीस लागून कल्याण-डोंबिवली हे शहर खेळाडूंचे शहर म्हणून ओळखले जावे असा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मानस आहे. तसेच खेळाडूंना खेळासाठी मैदाने पूर्ण वेळ उपलब्ध व्हावीत याकरिता खेळाच्या मैदानावर कोणतेही राजकीय समारंभ, लग्न समारंभ आयोजित न करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहे.

खेळाडूंच्या, क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी तसेच नागरिक अग्रस्थानी ठेऊन सेवा देण्यासाठी अधिकारी वर्गास प्रोत्साहित करण्याकरिता “झुंड” चित्रपटाच्या खास शोचे आयोजन करण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे महापालिका सचिव संजय जाधव व आयुक्तांचे स्वीय सहाय्यक उमेश यमगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सिद्धेश राणे जिल्हाध्यक्ष तर ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष पदावर कुणाल काटकर विजयी!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीत पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, सेक्रेटरी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.

मुळात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा युवक काँग्रेसच्या सर्वच पदांकरिता ही निवडणूक घेण्यात आली असली तरी पक्षांतर्गत वाद पेटू नये म्हणून युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल मात्र अद्यापही गुलस्त्यातच ठेवण्यात आलेला आहे.

या निवडणूक प्रक्रिये अंतर्गत मिरा भाईंदर शहरातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन तसेच मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पार पडलेल्या निवडणुकीत मिरा-भाईंदर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सिद्धेश प्रकाश राणे यांनी 3509 मतं मिळवून 3472 मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवला तर ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष म्हणून कुणाल काटकर यांनी एकूण 2289 मतं मिळवून 1756 च्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला.

या निवडणुकीच्या माध्यमातून दोन सर्वसामान्य घरातील युवकांना मिरा-भाईंदर शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगत या दोघांनीही आपल्या विजयाचे श्रेय माजी आमदार मुझफ्फर हुसैन, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत व संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीला दिले आहे.

मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष पदावर सिद्धेश राणे आणि ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष पदावर कुणाल काटकर यांची निवड झाल्यामुळे शहरातील काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या दोघांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या उज्वल राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“सदर निवडणुकीत मतदारसंघातील व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या मोलाच्या साथीमुळे, घेतलेल्या परिश्रमांमुळेच हा विजय आपल्याला बहुमताने मिळवता आला आणि म्हणूनच हा विजय आज आपण साजरा करत आहोत, खरंतर हा विजय फक्त माझाच नसून मतदारसंघातील, शहरातील काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आणि सर्व युवा मतदारांचा आहे, तसेच निवडणूकीच्या सुरवातीपासूनच सर्वांकडून मिळालेल्या सहकार्य, प्रेम आणि आशीर्वादासाठी मी संपूर्ण काँग्रेस परिवाराचा कायम ऋणी आणि कृतज्ञ आहे” – कुणाल काटकर (युवक काँग्रेस अध्यक्ष, ओवळा-माजिवडा विधानसभा)

मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकार मागे हटले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

* मास्क न घातल्यास दंड नाही.

* आतापर्यंत वसूल केलेला सर्व दंड परत करावा लागेल.

* दोषी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बीएमसी मार्शल, आयुक्त इक्बाल चहल, सुरेश काकाणी यांच्यावर आयपीसी ३८४, ३८५, ४२०, ४०९, १२० (बी), १०९, ५२ इत्यादी कलमांखाली कारवाई केली जाईल.

* ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ (एआयएम) आणि ‘इंडियन बार असोसिएशन’ (आयबीए) यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले.

* मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे आदेश बेकायदेशीर असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.


           एडवोकेट निलेश ओझा
                 राष्ट्रीय अध्यक्ष
          इंडियन बार एसोसिएशन

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मध्ये मास्क न घातल्यास दंड आकारण्याची कोणतीही तरतूद नाही. परंतु महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पदाचा गैरवापर करत महाराष्ट्रातील नागरिकांना मास्क न घातल्याबद्दल २०० रुपये आणि नंतर ५०० रुपये दंड ठोठावण्याचा बेकायदेशीर आदेश जारी केला.

लसीच्या सक्तीच्या आदेशाविरुद्ध जनहित याचिका (पीआयएल) सुनावणी सुरू असताना ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ही याचिका श्री. फिरोज मिठीबोरवाला आणि श्री. योहान टेंग्रा यांनी दाखल केला होता.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना आदेश देण्याचा अधिकार नसून त्यांचे सर्व आदेश बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

याचिका कर्त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की बेकायदेशीरपणे दंड वसूल करणे ही खंडणी आहे आणि दोषी अधिकारी आयपीसी ३८४, ३८५, ४२०, ४०९, १२० (बी), ३४, १०९ इत्यादी कलमांनुसार जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत. नंतर, महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशांमधून मास्कचा दंड काढून टाकण्यात आला आहे.

या बेकायदेशीर वसुलीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल, सुरेश काकाणी यांनी साथ दिली आणि त्यांनी दंड वसूल करण्याचे कंत्राट अन्य लोकांना दिले.

मुंबईकरांना मूर्ख बनवून आतापर्यंत १२० कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. त्याविरोधात अनेक आंदोलने झाली. हे सर्व दंड परत करण्याचे आदेश देण्यासाठी पुढील आठवड्यात एक नवीन जनहित याचिका दाखल केली जाणार आहे, असे इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता नीलेश ओझा यांनी सांगितले.

 

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे महिलांकरीता भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन

मिरा भाईंदर: 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस असतो प्रत्येक महिलेच्या सन्मानाचा, अभिमानाचा, त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानचा. जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचे प्रमुख उद्देश हेच की स्त्रियांना सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांची जाणीव करून देणे. घर, व्यवसाय, नोकरी अशा विविध लढाया सांभाळत स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपला अनोखा ठसा उमटवत आहे. परंतु हे सर्व लीलया पार पाडत असताना तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत किंवा काही स्त्रियांना परिस्थितीमुळे दुर्लक्ष्य करावे लागते.

सर्व लढवैय्या स्त्री ने स्वतःच्या आरोग्याबाबतही सजग व्हावे म्हणून शक्ती जनरल युनियन, रुद्रा फाउंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे मीरा भाईंदर शहरात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानाचा कालावधी हा ८ मार्च २०२२ सकाळी १०.०० ते सायंकाळ ४.०० वाजेपर्यंत असेल. या शिबिरांतर्गत महिलांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.

मोफत वैद्यकीय सल्लामसलत, मोफत स्त्रीरोग तपासणी, मोफत रक्त तपासणी (रक्तातील साखर, सीबीसी, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, थायरॉईड, मूत्रपिंड आणि यकृत कार्य)
मोफत BMD चेकअप
मोफत त्वचा / केस / वजन कमी करणे / आहार आणि पोषण उपचार, मोफत होमिओपॅथिक सल्लामसलत, मोफत अस्थमा तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत कॅन्सर मॅमोग्राफी, मोफत फिजिओथेरपी

मिरा भाईंदर शहरातील गरजू महिलांनी या आरोग्य शिबीर मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अन्नू पाटील यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: श्रीमती अन्नु पाटील
अध्यक्षा : शक्ती जनरल कामगार यूनियन/
रूद्रा फ़ाउंडेशन
महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस.
राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी.

दिनांक- ८ मार्च २०२२
वेळ- सकाळ १० ते संध्याकाळ ४ वाजेपर्यंत
स्थळ- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, सेक्टर ४, शांती नगर, स्टेशन रोड, मिरारोड (पूर्व)

केंद्र सरकार कडून महाराष्ट्र राज्याला ३५५ कोटींचा राष्ट्रीय आपत्तीनिधीतून निधी मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत महाराष्ट्र राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी १,६८२.११ कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली.

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये वर्ष २०२१ मध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी या पाच राज्यांना १,६६४.२५ कोटी आणि पुद्दुचेरीला १७.८६ कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे.

केंद्राकडून मंजूर अतिरिक्त मदत केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मध्ये राज्यांसाठी जारी केलेल्या निधीपेक्षा अधिकचा निधी आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.