Home Blog Page 185

युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत तर्फे वाहतूक पोलिसांचा सत्कार

मिरा भाईंदर: युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुणजी बकोलीया आणि महिला राष्ट्रीय अध्यक्षा सौ. सुमनजी मौर्य यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्र दगडू सकपाळ व महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. सुवर्णा कदम यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भास्कर बोदडे आणि महाराष्ट्र सहसचिव शामु भिंगारदिवे यांचा प्रमुख उपस्थितीत आणि ठाणे जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील आणि महिला जिल्हाध्यक्ष सौ स्नेहा नडे यांच्या उपस्थितीत ठाणे स्टेशन वाहतूक नियत्रंण पोलिस अधिकारी आणि स्थानिक पोलिस यांचा सत्कार करून पुष्पगुच्छ शाल आणि मास्क वाटप करून कार्यक्रमास सुरुवात केली तसेच गोरगरीब व गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास ASI पवार साहेब ASI कदम साहेब तसेच स्थानिक पोलिस निरीक्षक पांढरे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी स्थानिक पोलिस पाटील,  घोरपडे, ठाकरे, वाघमारे इ. उपस्थितीत होते. या सर्वांचा युनिव्हर्सल ह्युमन राईट्सच्या जिल्हा सचिव दिपाली महाले यांचाही सत्कार करण्यात आला आणि त्यांना विदेशात जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सौ उषा बोरुडे, वर्षा शेट्टी ठाणे जिल्हा सहसचिव शुभम राय ठाणे शहर अध्यक्ष अमोल पोपलघट ठाणे शहर सचिव संतोष चव्हाण, कासारवडवली ब्लॉक अध्यक्ष सुमित सिंह उपस्थितीत होते.

पोळी-भाजी चा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची हत्या..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: टिळक नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत चोरीच्या उद्देशाने जुन्या मैत्रिणीच्या घरी झोपायला आलेल्या मैत्रिणीनेच त्या ५८ वर्षीय महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले असून या महिलेचे शेलार नका येथे स्वतःचे पोळी भाजी केंद्र असल्याचे उघड झाले आहे.

पाथरली येथे राहणाऱ्या ४० वर्षीय सीमा खोपडे या महिलेने टिळक चौक येथे राहणाऱ्या विजया बावीस्कर (५८ वर्षे) यांच्याशी दुपारी संवाद साधला असता मी घरी एकटीच आहे तर रात्री तुझ्याकडे झोपायला येते असे विजया बावीस्कर यांना सांगितले. त्यावर विजया बाविस्कर यांनी होकार दिल्यानंतर रात्री आरोपी सीमा खोपडे ही महिला विजया बावीस्कर यांच्याकडे झोपायला आली होती. रात्री त्याचदरम्यान विजया बाविस्कर यांच्या अंगावरचे दागिने चोरून आरोपी सीमा खोपडे हिने विजया बावीस्कर यांचा गळा दाबून हत्या केली आहे.

या प्रकरणाचा शोध अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे, प्रवीण बाकले, धोंडे, मुंजाल यांनी या गुन्ह्याचा तपास केला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात येत आहे.

 

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत


  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ८ ग, ५ ड व १ अ प्रभागातील इमारतींच्या व चाळींच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई !
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी डोंबिवली पूर्व विभागीय कार्यालयाच्या बाजुला हजेरी शेडसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर उपाध्याय यांचे तळ +३ मजली आर.सी. सी. इमारतीचे चालू असलेले अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. सदर कारवाई ६ फ प्रभागाचे सहा आयुक्त किशोर शेळके, फ व ग प्रभागाचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस अधिकारी व १ पोकलेन, १ जेसीबी, ४ ब्रेकर व १ गॅस कटर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे विभागीय उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५ ड प्रभागाच्या सहा.आयुक्त सविता हिले यांनी कल्याण पूर्व हरिभाऊ पावशे पाडा, काटेमानिवली येथील जगबहादूर यादव यांचे तळ +१ मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी व हातोडयांच्या मदतीने करण्यात येत आहे.

१ अ प्रभागातही सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी विभागीय उपआयुक्त अर्चना दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदरपाडा येथील १४ खोल्यांच्या जोत्यांचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व १ जेसीबीच्या मदतीने करण्यात आली.

नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दिनांक १२/०१/२०२२ रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व डोंबिवली वाहतूक विभाग यांनी संयुक्तपणे डोंबिवली पश्चिम येथे दुपारी व संध्याकाळी असे दोन सत्रात विना गणवेश, विना परवाना, स्टँड सोडून प्रवासी वाहतूक करणे, यासह इतर वाहतूक नियम मोडणारे एकूण ५५ रिक्षाचालकांवर धडक कारवाई करण्यात आली व १,३७,०००/- रुपये दंड आकारण्यात आला आहे.

बेशिस्त रिक्षाचालकावर ही कारवाई यापुढेही दररोज सुरूच राहणार आहे असे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.

कल्याण गुन्हे शाखा घटक-३ ने शिताफीने आवळल्या अट्टल मोटर सायकल चोराच्या मुसक्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.११.०१.२०२२ रोजी गुन्हे शाखा घटक ३ परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पो.कॉ.जरग यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक अनोळखी इसम कटाई नाका, कटाई गाव, डोंबिवली (पूर्व) येथे विना नंबर प्लेट असलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटर सायकलसह उभा आहे. अशी माहिती मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी स्टाफसह जाऊन खात्री केली असता बातमीस अनुसरून नमूद इसम मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आधारकार्ड वरील पत्ता: मनुबाई हाईट्स, बिल्डिंग न.२०२, कल्याण फाटा, ठाणे मुळगांव त्रिपुरा आसाम असे सांगितले. त्यास त्याच्या जवळ असलेली विना नंबर प्लेट असलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटर सायकल बाबत कागदपत्रे हजर करण्यास संगितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून त्यास मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे सदर मोटरसायकली बाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदर मोटर सायकल राबोडी ठाणे परिसरातून चोरी केलेली असल्याबाबत सांगितले. त्याबाबत राबोडी पोलीस ठाणे येथे खात्री करता सदर मोटर सायकल चोरीस गेल्याबाबत गुन्हा रजि.नं. १०/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत खात्री झाली. त्यामुळे त्याच्याकडून मोटारसायकल नंबर एमएच ०४ / केबी ११७० व त्याच्या अंगझडती मध्ये मिळालेला मोबाईल फोन असा एकूण ५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तसेच नमूद आरोपी इसमाकडे अधिक तपास करता त्याने कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन महिन्यांपूर्वी एक मोटरसायकल चोरी केलेली असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने तपास करून कासारवडवली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३८१/२०२१ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे चोरीस गेलेली २०,०००/- रुपये किंमतीची हिरो आय ३ कंपनीची काळ्या निळ्या सिव्हर रंगाची मोटरसायकल नंबर एमएच ०२ / डीटी ९७४९ ही देखील त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे.

अश्या प्रकारे गुन्हे शाखा घटक-३ कल्याण यांनी १) राबोडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १०/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे व २) कासारवडवली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३८१/२०२१ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आणून एकूण ७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपास कामी मिळू आलेल्या मुद्देमालासह राबोडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री.किशोर शिरसाठ, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, पोउनि कवडे, सपोउनि माळी, पोहवा माने, पोहवा जाधव, पोना पोटे, पोकॉ जरग, पोकॉ ईशी यांनी केलेली आहे.