Home Blog Page 197

‘क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन’ (एनजीओ) चे संस्थापक राजेंद्र वखरे ‘सेवा संस्कार २०१९-२१’ पुरस्काराने सन्मानित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी डोंबिवलीत झालेल्या सत्कार समारंभात गेल्या १९९१ पासून सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार, तथा ‘क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन’ (एनजीओ) चे संस्थापक राजेंद्र वखरे यांना ‘सेवा संस्कार पुरस्कार २०१९-२१’ हा मानाचा समजल्या जाणारा ‘जान्हवी मल्टी फाऊंडेशनचा सेवा संस्कार पुरस्कार २०१९-२१’ जाहीर झाला असून, तो आज दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता, स्थळ ‘जान्हवी मल्टी फाऊंडेशन,’ डोंबिवली (पश्चिम) येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून सन्मानित करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासून ‘जान्हवी मल्टी फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे व डॉ. प्रेरणा कोल्हे हे सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.

यावर्षी समाज सेवा व पत्रकारिता या क्षेत्रातून श्री.राजेंद्र श्रावण वखरे यांची निवड करण्यात आलेली आहे. ते सन २०१० पासून ‘क्राईम बॉर्डर’ (साप्ताहिक) चे व श्री स्वामी सखा (मासिकाचे) मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

यासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात विशेष कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारासाठी (जे.एम.एफ ची टीम) निवड करीत असते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी (जे.एम.एफ.) ची टीम परिश्रम घेत आहे.

 

कोणत्याही परवानगी शिवाय अनाधिकृतरीत्या गॅस सिलिंडर भरणारे अटकेत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने गोवंडी शहराच्या पूर्व उपनगरातील शिवाजी नगर भागातून कोणत्याही परवानगीशिवाय अनाधिकृतरीत्या गॅस सिलिंडर भरणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. पोलीसांनी असे म्हटले की, या गोष्टीमुळे स्फोट होण्याचा धोका असल्याचे माहिती असून ही आरोपी हे काम कोणतीही परवानगी घेतल्या शिवाय करत होते.

अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने शिवाजी नगर येथील वर्कशॉप वर छापा टाकला. तेव्हा पोलीसांना तेथे पाच जण हे रेग्युलेटर बदलण्यासह मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडर
मध्ये गॅस रिफिलिंग करत होते. यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी सुद्धा घेतली नव्हती.

पोलीसांना वर्कशॉप मधून १४ भारत गॅस सिलिंडर, १०५ लहान भरलेले सिलिंडर आणि ५४१ रिकामे सिलिंडर त्यांना घटनास्थळी मिळाले. ज्या गोष्टी ते हाताळत होते ते अत्यंत ज्वलनशील होते. मात्र जरा जरी लहान अपघात झाला असता तर तेथे राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण झाला असता.

‘बार्टी’ला निधी कमी पडू दिला जाणार नाही ही वलग्ना, अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या ठाकरे सरकार तसेच सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात.. – अमित गोरखे, प्रदेश मंत्री भाजपा महाराष्ट्र प्रदेश


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यभरात रोष निर्माण झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला आज अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटी पैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी खोटी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे केली असली तरी सहा महिने होऊन देखील केली गेलेली अल्प तरतूद ही आघाडी सरकारची अनास्था स्पष्ट करीत असून मी याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. अत्यल्प निधी मंजूर करणाऱ्या अर्थ विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचित जाती विरोधात असल्याचा माझा स्पष्ट आरोप ठाकरे सरकारवर आहे.

‘बार्टी’ मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण ९१.५० कोटी रुपये आज स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

गेली सहा महिने ‘बार्टी’च्या योजनांची केली जाणारी दुरावस्था पाहता अनुसूचित जाती मध्ये तसेच समाज माध्यमांमध्ये बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यांपैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, यांची काळजी ठाकरे सरकारने घेणे गरजेचे आहे.

राज्य सरकारने केलेली अल्प तरतूद अनुसूचित जातीच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. सरकारने जाणीवपूर्वक गेली सहा महिने निधी मंजूर करण्यात चालढकल केली आहे. सामाजिक न्यायमंत्री त्यांच्याच “घरातील” मालिकेत अडकुन पडल्याने त्यांची धडपड स्वतःचे मंत्रिपद वाचविण्यासाठी सुरू आहे. आघाडी सरकारने आरक्षित वर्गाच्या पदोन्नती मध्ये आरक्षण नाकारले, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला १०० कोटीची घोषणा विधिमंडळात केली परंतु ती अजूनही कागदावरच आहे, ह्या ठाकरे सरकारने आपला डाव अनुसूचित जातीच्या योजना बंद करून त्यातील तरतूद इतरत्र वळविण्यासाठी टाकला आहे असे दिसते .

तरी अनुसूचीत जातीसाठीचा सर्व निधी ,सर्व महामंडळाचा निधी या सरकारने ताबडतोब द्यावा नाहीतर राज्यभर याचे पडसाद उमटतील, असा इशारा भाजपा प्रदेश मंत्री व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे दिला आहे.

 

‘रोटरी हेल्थ सेंटर’ म्हणजे एक समाजोपयोगी ऊपक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन, या क्लबची स्थापना २८ वर्षांपूर्वी झाली आणि तेंव्हापासून हा क्लब सतत समाजोपयोगी काम करीत आला आहे.

असाच एक समाजोपयोगी आरोग्य सेवा देणारा उपक्रम म्हणजे ”रोटरी हेल्थ सेन्टर”. हा फेब्रुवारी २०२० मध्ये रो. संजय पाटील, संस्थापक अध्यक्ष यांच्या नेत्रूत्वाखाली व रो. अनिल हीरावत यांच्या संकल्पनेने ह्या क्लबने ३०० स्क्वे. फूट च्या छोट्या जागेत सुरु केला. याला गरजु लोकांचा भरघोस प्रतीसाद मीळाला. या सेंटरमधे पॅथॉलॉजिकल,डायग्नोस्टिक, डेंटल सर्व्हिस, ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर , तसेच जनरल ओपीडी या सेवांचा वाजवी दरामध्ये समावेश आहे.
कोविड च्या साथीमध्ये सुद्धा या सेंटरने भरघोस कार्य केले. आरोग्य सेवेची तीव्र गरज लक्षात घेऊन यावर्षीचे क्लबचे अध्यक्ष जितेंद्र नेमाडे रोटरी हेल्थ सेंटरच्या विस्ताराला प्राधान्य देण्याचे ठरविले आणि रोटरी हेल्थ सेंटरच्या कमिटी मेम्बर्सनी ही हा उपक्रम उचलून धरण्याचे मान्य केले आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे सर्व कमिटी तसेच इतरही सदस्य कामाला लागले आणि आता छोट्या जागेतून हे सेन्टर १२०० स्क्वे. फूट च्या मोठ्या जागेत स्थलांतरित झाले आहे.

या कामी कमीटी सदस्य संस्थापक अध्यक्ष संजय पाटील, रो.अनील हीरावत, रो.अजय कुलकर्णी, रो.जीतेंद्र नेमाडे, रो.डॉ.लीना लोकरस, रो.गुलाब पावळे, रो.संदीप खापरे ह्यांचे सहकार्य लाभले आहे.

आता विस्तारीत सेवेमधे वरील सेवेसोबतच डेंटल,फिजिओथेरपी आणि पुढील काळात डोळयांचा दवाखाना, मेडीकल ऊपकरणे ईत्यादी आरोग्य सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार असून आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. आता जागेची अडचण दूर झाल्याने आणि ह्या सर्व सेवा वाजवी शुल्कात उपलब्ध झाल्याने  अधिकाधिक नागरिकांना ह्याचा लाभ घेता येईल. तसेच  वरील उपचारासाठी अतिशय निष्णात डॉक्टर ही येथे कंन्सल्टंट म्हणून लाभणार आहेत.

या विस्तारीत नवीन जागेचे दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी सध्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मयुरेश वारके यांच्या हस्ते उद्घाटन झाले व माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर हे उपस्थित होते.डोंबीवली मीडटाऊनचे सदस्य, डोंबीवलीतील इतर रोटरीचे सदस्य तसेच परीसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास ऊपस्थीत होते.

 

नोकरीच्या बहाण्याने बोलावून केली होती हत्या; मारेकऱ्या चौकडीला मानपाडा पोलिसांनी शिताफीने केले अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू नव्हे तर खून झाल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांनी नुकताच उघड केला आहे. विशेष म्हणजे साक्षीदार किंवा इतर कोणतेही धागेदोरे उपलब्ध नसतानाही मानपाडा पोलिसांनी केवळ एका कॉलच्या सहाय्याने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

११ सप्टेंबरला दुपारी १२:०० च्या सुमारास खंबाळपाडा परिसरात एक व्यक्ती जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असल्याचे वाहतूक पोलीस बी.एस. होरे यांना आढळून आले होते. कृष्णमोहन तिवारी (वय वर्षे ४७) असे या व्यक्तीचे नाव असून रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यु झाला. मात्र त्याच्याकडे असणाऱ्या आधारकार्ड वरून त्याचे नाव आणि घराचा मिळवत मानपाडा पोलिसांनी घरी चौकशी केली. मात्र पोलीसांना त्यातही विशेष असे काहीच आढळून आले नाही. परंतू त्याच्या मुलीने सकाळी १०:३० च्या सुमारास एक फोन आला आणि त्यानंतर वडील घराबाहेर पडले अशी माहिती पोलीसांना दिली. त्याआधारे पोलीसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवत कॉल रेकॉर्डची माहिती मिळवली आणि आणखी खोलात तपास करत पोलीसांनी या सर्व खुनाच्या हत्येचा उलगडा केला.

मयत कृष्णकुमार हा मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि लॉकडाऊनमूळे कतार मधील नोकरी गमावल्याने तो नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी दिव्यातील एका ‘प्लेसमेंट सेंटर’ कडे त्याने आपली माहिती दिली होती. या ‘प्लेसमेंट सेंटर’ मधील माहितीच्या आधारे आरोपी रिहान शेखने याने त्याला मोबाईलवर संपर्क केला होता आणि नोकरीसाठी त्याला कल्याण पूर्वेच्या कचोरे भागात भेटायला बोलावले. त्यानंतर रिहानने साथीदार सागर पन्नालाच्या सहाय्याने आणि सुमित सोनावणे याच्या रिक्षेत बसवत लूटमार करत त्याचा खून केल्याची माहिती कल्याण झोन-३ चे उपयुक्त श्री. विवेक पानसरे यांनी पत्रकारांना दिली. रिहानने अशाप्रकारे आणखीही काही जणांना लुटले असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली असून त्यादृष्टीने पुढील तपास मानपाडा पोलीसांकडून सुरू असल्याचे सांगितले.

डोंबिवलीचे एसीपी जयराम मोरे, मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक निरीक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, पोलीस हवालदार काटकर, कदम, चौधरी, पोलीस नाईक यादव, घुगे, सोनवणे, भोसले, डी. एस.गाडगे, किनरे, पवार, पाटील, कांदळकर, आर.जी.खिलारे, कोळी, मंझा यांनी हा गुन्हा उघडकीस आणला असे झोन-३ चे डीसीपी विवेक पानसरे यांच्या कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.