Home Blog Page 253

नाथपंथी गोसावी समाजाची झोळी रीकामीच

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: गणेश नवगरे

गोसावी समाज हा पुर्वाकाळापासुन भिक्षुकच आहे. दारोदारी भिक्षा मागणे हा व्यवसाय असुन डवरी गोसावी यांचा दारोदारी जाऊन अमोषा वाढ माई, त्याच बरोबर मंदीरासमोर गाय ऊभीकरुन दिवसभर ऊना पावसात पोटाची खळगी भरण्यासाठी उभे रहावे लागते त्याच बरोबर नाथपंथी गोसावी समाज हा किंगरी वाजवत दशक्रियावीधी उत्तर कार्य करुन देणारे, परंतु लॉकडाऊनचे जाचक नियम असल्या कारणाने या समाजाला कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीन झाले आहे. तर गोधंळी गोसावी यांचा मुळ व्यवसाय गळ्यात संभळ बांधुन लग्नाचे, देवीच्या नावाने जागरण गोंधळ घालुन भवानीमातेच्या आशिर्वादाने सुखी घर संसार नांदावा म्हणुन देवांचे गोधंळ घालणे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लॉकडाऊनमुळे नियमांचे ऊल्लंघन न करता या नाथपंथी गोसावी समाजाला दारापासुन घरापर्यंत मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या समाजाचे आरक्षण हे NT(B) या प्रवर्गात येत असून त्यात कित्येक भटकंती करून आपली उपजिविका भागविणारया जाती उपजातींचा समावेश असून आरक्षण फक्त अडीच टक्के असल्यामुळे सरकारी नोकरदार हे मोजकेच आहेत, हा समाज मोठ्या प्रमाणात असूनही विखूरलेला असल्यामुळे याला कोणत्याच राजकीय पक्षाचे नेतृत्व नाही त्यामुळे केंद्र सरकार, अथवा राज्यसरकारने या समाजासाठी जातीने लक्ष देवून विषेश पॅकेजची व्यवस्था करणे फार गरजेचे आहे जेणेकरुन या समाजातल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न सुटेल.

पर्यावरण नष्ट करून सरकारी जमिनी हडपणाऱ्या दलाल, भूमाफियांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका;  तब्बल 15 बर्षांनी कांदळवन  संरक्षित वन घोषित, जेष्ठ पत्रकार व पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते धीरज परब यांच्या लढ्याला अखेर यश!

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर प्रतिनिधी

मीरा भाईंदर मधील सरकारी जमिनीवरील १ हजार ३६ हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र मा . उच्च न्यायालयाच्या २००५ सालच्या आदेशा नुसार १५ वर्षांनी का होईना अखेर प्रशासनाने राखीव वन म्हणून संरक्षित केले आहे . मीरा भाईंदर मधील सरकारी जागेतील कांदळवन हे संरक्षित वन जाहीर झाल्याने नोट आणि वोट ला चटावलेल्या लांडग्यांची कोल्हेकुई सुरु झाली आहे . निसर्ग नष्ट करून सरकारी जमिनी हडपणाऱ्या दलाल – माफियांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दणका बसल्याने काही नगरसेवक , माफिया व दलालांनी खोटे कांगावे सुरु केल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार व पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते धीरज परब यांनी केला आहे .

समुद्र व खाडी किनाऱ्यावरील कांदळवन हे निसर्गाचे लाभलेले अनमोल असे वरदान आहे . ह्या कांदळवन मध्ये जैव विविधता आहे तसेच एक निसर्ग चक्र पूर्ण करण्याचे काम ह्या कांदळवन मधून होते . देशाच्या संविधानात सुद्धा ह्या नैसर्गिक पर्यावरणाच्या संरक्षणाची नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकावर दिली आहे . कायदे नियमात सुद्धा कांदळवन संरक्षित आहे . देशाच्या सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई सह अनेक राज्यातील उच्च न्यायालयाने सुद्धा कांदळवन चे महत्व ओळखून त्याच्या संरक्षणा साठी सातत्याने आदेश दिलेले आहेत .

ग्लोबल वॉर्मिंग मुळे एकीकडे समुद्र व खाड्यातील पाण्याची पातळी वाढत चालली असून त्सुनामी , चक्रीवादळ सुरु आहेत . जेणे करून जमिनीची धूप थांबवण्यासह त्सुनामी , वादळ पासून किनारपट्टी क्षेत्रातील नागरिकांसाठी कांदळवन हे मोठे नैसर्गिक संरक्षक कवच आहे . मुसळधार पावसात हीच कांदळवन स्वतःच्या उदरात पावसाचे प्रचंड पाणी साठवून ठेवते . जेणे करून नागरी वस्तीला पुराचा धोका कमी करण्याचे काम हे कांदळवन करते . नागरी व औद्योगिक वस्ती मधून प्रक्रिया न करताच दूषित पाणी हे थेट कांदळवन व खाडी पात्रात आणि समुद्रात सोडून प्रचंड जलप्रदूषण महापालिका आणि नगरसेवकां मार्फत चालवले जात आहे . हे जलप्रदूषण कमी करण्याचे काम सुद्धा कांदळवन करे . हवेतील कार्बन सारखे घातक विषारी वायू अन्य झाडां पेक्षा जास्त प्रमाणात शोषून घेण्याचे काम कांदळवन करते .

परंतु मीरा भाईंदर मधील काही नगरसेवक , राजकारणी आणि पालिका प्रशासना सह काही दलाल व माफियांनी स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय फायद्या साठी नैसर्गिक कांदळवन आणि जिवन वाहिन्या असलेल्या खाड्या नष्ट करण्याचे काम गेल्या काही वर्षां पासून सातत्याने चालवले आहे .

शहरातील बहुतांश कांदळवन आणि बहुतांश नैसर्गिक खाडय़ा नष्ट झाल्या असुन मोर्वा सारखी एखादीच खाडी देखील अस्तित्वासाठी झगडत आहे. दुर्दैवाने या कांदळवन व खाडय़ा नष्ट करण्यात सर्वात मोठा वाटा हा येथील पालिका आणि लोकप्रतिनिधींचा आहे हे नमुद करावे लागेल. नोट आणि वोट साठी हपापलेल्यांना शहराचं आणि निसर्गाचं काय वाटोळं होईल याच्याशी सोयर सुतक नाही.

कांदळवन , खाडी पात्र आणि परिसर संरक्षित व संवेदनशील असताना देखील त्यात बेधडकपणे भराव व बांधकामे केली गेली. या बांधकामांना संरक्षण देण्या पासुन सर्व काही सुविधा पालिका आणि लोप्रतिनिधींनी पुरवल्या. नाल्यातुन तसेच खाडी किनारी वसलेल्या वस्तीतला कचरा थेट खाडीत व कांदळवनात टाकला जातोय. मलमुत्र आणि सांडपाणी थेट कांदळवन व खाडीत सोडले जात आहे. खाडीचा नाला करुन टाकला आहेच पण सर्वानी मिळुन खाडयांचं बारसं नाला म्हणुनच उरकुन टाकलं आहे.

मासेमारी बंद झाली आणि मिठ पिकवण्यासाठी भरतीचे शुध्द पाणी बंद झाल्याने पारंपारिक मासेमारी , मीठ व्यवसाय तर संपवण्यात आलाय. पण शहरा पाठोपाठ आता गावात पाणी शिरु लागले आहे. शहर बुडालं तर आपलं राजकारण आणि अर्थकारण देखील बुडेल अशी धास्ती लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासह दलालांना वाटु लागली आहे. त्यामुळेच जागरूक ग्रामस्थ व नागरिकांनी मध्यंतरी खाडय़ा मोकळया करण्यासाठी तक्रारी करून देखील एकही खाडी परिसरातील बेकायदा भराव व बांधकामांवर कारवाईची हिंम्मत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ने दाखवली नाही .

खऱ्या अर्थाने भराव व अतिक्रमण हटवण्याची ठोस कारवाई दिसत नाही तो र्पयत तरी शहराच्या ह्या जिवन वाहिन्या खाड्याना जिवनदान मिळेल अशी सुतराम शक्यता नाही. या मध्ये संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, दलाल यांना देखील आरोपीच्या पिंजरायात उभे करावे लागणार आहे. त्याशिवाय ह्यांचे नोट आणि वोटचे सुत्र मोडले जाणार नाही.

मीरा भाईंदर हे खाडय़ांचं व कांदळवनचे शहर आहे. कांदळवन आणि अंतर्गत आलेल्या ह्या खाडय़ां मुळेच पुर्वी कितीही पाऊस पडला तरी पाण्याचा निचरा सहज होत असल्याने पुरस्थिती उद्भवली नव्हती. याच कांदळवन आणि खाडय़ांवर जैवविधिता आणि निसर्ग अवलंबुन होता.

उत्तन पासुन पेणकरपाडा आणि चेणे – वरसावे र्पयतच्या अनेक खाडय़ा व उपखाडय़ा तसेच कांदळवन हे वाढत्या शहरीकरणासह झालेले बेकायदा भराव व बांधकामांचे अतिक्रमण, कोणतीही शास्त्रोक्त प्रक्रिया न करताच सोडले जाणारे सांडपाणी – मलमुत्र, आजुबाजुच्या वसाहती मधुन टाकला जाणारा व नाल्यातुन वाहुन येणारा कचरा या मुळे नामशेष होत आहेत.

वास्तविक नैसर्गिक कांदळवन व खाडय़ा ह्या कायद्याने संरक्षित आहेत. याची जागा मालकी सुध्दा सरकारची आहे. तसे असले तरी लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन यांची सुध्दा जबाबदारी तेवढीच आहे. परंतु दुर्दैवाने एकाही नगरसेवक , अधिकाऱ्याने कांदळवन व खाडय़ां कडे ढुंकुनही पाहिले नाही. नव्हे बघुन देखील काणाडोळा केला.

आज र्पयत कांदळवन , खाडी व परिसरात दिवसाढवळया होत असलेले भराव आणि बेकायदा बांधकामे काही अशीच झालेली नाहीत. यात दलाल , भुमाफियां पासुन लोकप्रतिनिधी, प्रशासना सह स्थानिक जागरुक म्हणवणारी मंडळी सुध्दा जबाबदार आहेत. कांदळवन व खाडी परिसर असताना देखील भराव करुन बेकायदा खोल्या बांधल्या गेल्या. जागा वा खोल्या विक्री आणि खरेदी केल्या गेल्या आहेत. यातुन करोडो रुपयांची उलाढाल झाली. भराव व बांधकामे होताना संबंधितांचे खिशे भरले गेले.

बांधकाम होताच त्याला घरपटट्टी, नळ जोडणी, शिधावाटप पत्रिका, मतदार यादीत नाव , फोटोपास व वीज जोडणी पासुनच्या सर्व काही सुविधा लोकप्रतिनिधी व प्रशासनासह त्यांच्या दलालांनी पुरवल्या. कारण कांदळवन व खाडीपात्र असुनही बांधकामे करुन या सर्व सुविधा मिळणे सोपे नाही. भ्रष्टाचाराची साखळीच यातुन चालत आली आहे. या दलालांच्या सुध्दा मुसक्या आवळल्या पाहिजेत.

आज र्पयत कांदळवन व खाडीपात्र परिसरात अनेक बेकायदा बांधकामे झाली असताना एकही बांधकाम तोडुन भराव काढुन पुर्वी सारखी नैसर्गिक स्थिती केल्याचे उदाहरण नाही. एकाही माफिया, दलाल आणि वरदहस्त असलेल्या नगरसेवक , अधिकाऱ्यावर कठोर फौजदारी कारवाई नाही. ज्यांनी सरकारी जमीन विक्री व खरेदी केली, बांधकाम – भराव केला, जे रहात आहेत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला जात नाही.
कारण शहर, कांदळवन , खाडी व निसर्गा पेक्षा यांना आपली काळ्या धनाची डबकी भरण्यातच स्वारस्य आहे. यातुनच यांच नोट आणि वोटचं भ्रष्टचक्र अबाधित सुरु आहे.

बेकायदेशीर भराव आणि बांधकामां सोबतच या वस्त्यांचे मलमुत्र, सांडपाणी व कचरा देखील खाडय़ां मध्येच जातोय. पालिकेचे नाले देखील सांडपाणी व कचरा वाहुन आणणारे प्रदुषणकारी मार्ग ठरलेत. कायद्याने गुन्हा असुनही सांडपाण्या बद्दल तसेच कचराया बद्दल महापालिका आणि नगरसेवक चिडीचूप आहेत .

सांडपाणी व कचरा साचुन झालेल्या गाळात कांदळवन झपाटय़ाने वाढते. पण या मुळे खाडीचे पाणी अडत नसुन पाणी अडतेय ते कचरा , भराव आणि बांधकामां मुळे हे देखील आता प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर लक्षात आलेले आहे. आता पर्यंत काही लोकप्रतिनिधी व प्रशासना कडुन सोयीस्कररीत्या कांदळवन मुळे पाणी अडत असल्याचे कांगावे केले जात होते. कारण दिशाभुल करुन खाडयां मधील व कांदळवन मधील बेकायदा बांधकामांना मलिद्यासाठी पाठीशी घालण्या साठी हे कांगावे केले जात आहेत .

नोट आणि वोट ची दलाली बुडून आपलं पितळ उघडं पडलेलं पाहुन काही लोकप्रतिनिधीं, आणि दलाल प्रवृत्ती नी आता उलटय़ा बोंबा सुरु केल्या आहेत. कांदळवन , खाडी परिसरातील अतिक्रमण बद्दल अवाक्षर देखील काढले जात नाही या वरुन त्यांचे नोट आणि वोट चं तंत्र स्पष्टच होतं.

आता र्पयत अतिक्रमण, कचरा व काळकुट्ट दरुगधीयुक्त सांडपाण्या मुळे खाडितील मासळी नष्ट झाली. मीठ पिकवणो बंद झाले. पाणी वाहुन नेणाराया या जीवनदायीनी खाडय़ा नष्ट झाल्याने शहरात आणि गावात सुध्दा पावसाळ्यात पाणी साचु लागले आहे. खाडय़ा नष्ट करण्यासह कांदळवनात चाललेले वारेमाप बेकायदा भराव, बेकायदा बांधकामे देखील पुरस्थितीचे कारण आहेत.

२००५ साली मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन व त्या पासूनच्या ५० मीटर चा बफर झोन संरक्षित करून कांदळवन वन म्हणून संरक्षित करायचे आदेश दिले होते . इतकेच नव्हे तर कांदळवन क्षेत्रात झालेले बेकायदा भराव , बांधकामे काढून पूर्वीची नैसर्गिक स्थिती निर्माण करण्याचे सुद्धा आदेश त्यावेळी दिले गेले होते . तब्बल १५ वर्षा नंतर आता कुठे शहरातील कांदळवन ला राखीव वनाचे संरक्षणाचे कवच लाभले आहे . ह्या मुळे काही नगरसेवक , दलाल , माफिया व अधिकारी यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे . वन जाहीर झाल्याने ह्यांची नोट आणि वोट ची लागलेली लांडगेतोड चटक ला वेसण बसणार आहे . जेणे करून हे दलाल कम माफिया बेफाम होऊन देशाचे संविधान , कायदे – नियम आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे आदेश सुद्धा चुकीचे ठरवण्याचे कारस्थान अशी कोल्हेकुई करत करू लागले आहेत .

कोरोनाबाधित महिलेच्या हृदयातून काढली चक्क ७ सेंटिमीटरची गाठ; मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार!

संपादक: मोईन सय्यद / मीरारोड, प्रतिनिधी

कोरोना पॉझिटिव्ह आणि हृदयासंबंधी विकार असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेच्या हृदयातून चक्क ७ सेंटिमीटरची गाठ काढण्यात मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया चालली. कोरोना संसर्गामुळे या महिलेला दम्याचा त्रास जाणवत होती त्यातच हृदयात असलेली ही इतकी मोठी गाठ काढणे हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते. परंतु अशा स्थितीत केवळ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या महिलेला नव्याने आयुष्य मिळाले आहे.
मुळची कोल्हापूरची असणारी योगिता पाटील हिचा नुकताच विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनी तिला अचानक श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला. वैद्यकीय चाचणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. औषधोपचारानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. श्वास घेता येत नसल्याने या महिलेला ऑक्सिजनची गरज असल्याने कुटुंबियांनी तिला तातडीने मीरा रोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात हलवले.

मीरा रोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरँसिस सर्जन डॉ. उमेंद्र भालेराव म्हणाले की, “ज्या वेळी या महिलेला रूग्णालयात आणण्यात आले होते तेव्हा या महिलेला श्वास घेताना त्रास जाणवत होता आणि पायाला सूज होती. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. अशा स्थितीत डॉ. अनुप टकसांडे यांनी या महिलेची इकोकार्डिओग्राफी तपासणी केली. या चाचणीत महिलेच्या हृदयाच्या उजव्या वरच्या भागात ७ सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची गाठ असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे हृदयाव्दारे शरीरातील अन्य अवयवांना होणाऱ्या रक्तप्रवाहात अडचणी येत होत्या. फुफ्फुसाला योग्यपद्धतीने रक्तपुरवठा होत नव्हता. मायक्सोमा नावाचा हा हृदयाचा ट्यूमर होता. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रूग्ण दगावू शकतो.”

डॉ. भालेराव पुढे म्हणाले, “कोविड-१९ संसर्ग असल्याने या महिलेवर स्टिरॉइड्स आणि रेमेडसवीरद्वारे उपचार करण्यात आले आणि जेव्हा कोविडचा संसर्ग बरा झाला त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे २१ एप्रिल रोजी तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेवर पाच दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले म्हणूनच कोरोनाच्या कालावधीत हृदय व फुफ्फुसासंबंधी काही लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.”

अतिधोकादायक इमारतीं, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स तातडीने निष्कासित करा

अतिधोकादायक इमारतीं, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स तातडीने निष्कासित करा

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे महापालिका आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिधोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तातडीने निष्कासित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिले. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या दृष्टीने भुस्खलन होणाऱ्या ठिकाणांच्या नागरिकांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करून त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.

शहरात पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रभाग समितीनिहाय धोकादायक, अतिधोकादायक इमारतीं, नालेसफाई, भूसख्खन होणारी ठिकाणी तसेच पावसाळ्यासंबंधित इतर बाबींचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी आदी उपस्थित होते.

प्रभागसमीती निहाय अतिधोकादायक, धोकादायक इमारतीबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेत उर्वरित अतिधोकादायक इमारती तात्काळ खाली करून तात्काळ तोडून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. तसेच पावसाळ्यात देखील या सर्व इमारतीची पाहणी करून कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सूचना सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.

ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, कळवा, माजिवडा मानपाडा तसेच ठिकाणी पावसाळयात भुस्खलन झाल्यास तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स तात्काळ काढून टाकण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळयात साथीच्या रोगांचा पादुर्भाव होवू नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी, इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवून स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक तसेच नागरिकांना याची माहिती देण्याच्या सूचना देखील महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या. यावेळी अतिवृष्टीच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेवून संपूर्ण यंत्रणा तयार ठेवण्याचे सूचना देखील त्यांनी दिल्या.

शिवसेनेचे युवा नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे जेव्हा बसने प्रवास करतात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांचे काम सुरु आहे. काही ठिकाणी मोठमोठे पूल बनवले जात आहेत. या सर्व रस्त्यांच्या प्रकल्पांपैकी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे रिंग रोड. या रोडचं काम कितपत पोहोचलं हे पाहण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज थेट बसने प्रवास केला. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. श्रीकांत शिंदे यांचा हा साधेपणा याआधीदेखील अनेकदा दिसला आहे. पत्रीपूलचा गर्डर बसवण्याच्यावेळी तर ते रात्रभर तिथेच थांबले होते.

श्रीकांत शिंदेंचा पाहणी दौरा

श्रीकांत शिंदे यांनी पाहणी दौऱ्यानंतर प्रकल्पाच्या कामावर समाधान व्यक्त केलं. या प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. शिंदे यांनी एमएमआरडीए आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बसने दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान प्रवास करीत आतापर्यंत झालेल्या रिंग रोडच्या कामाची पाहणी केली.

या प्रसंगी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश कदम, राजेश मोरे, रवी पाटील आदी उपस्थित होते. पाहणी दौरा दरम्यान अधिकाऱ्यांनी रस्ते कामात बाधितांकडून कशा प्रकारे अडथळे निर्माण केले जात आहेत. तसेच बाधितांचा कसा त्रास सुरु आहे. तरीदेखाल कामात खंड न पाडता आणि लॉकडाऊनमध्येही काम प्रगतीपथावर ठेवून मार्गी लावत असल्याची माहिती दिली.

प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर

“रिंग रोड प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. हे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. रिंग रोडचा मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठीही भूसंपादनाची प्रक्रिया ८० टक्के झाली आहे. या कामाचीही निविदा लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे. याशिवाय दुर्गाडी ते टिटवाळा याठिकाणी रिंग रोडचा एण्ड पॉईंट आहे. या ठिकाणाहून टिटवाळा ते गोवेलीहा हा रस्ता आणखीन जोडण्यासाठी आठवा टप्पाही घेतला जावा, अशी सूचना अधिकारी वर्गास केली”, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

दुर्गाडी ते टिटवाळा फक्त २० मिनिटाचं अंतर होणार’

“मोठा गाव ठाकूली ते दुर्गाडी आणि दुर्गाडी ते टिटवाळा हा टप्पा आधी पूर्ण करुन मगच काटई ते मोठा गाव ठाकूर्ली दरम्यानचे रिंगरोडचे टप्प्याचे काम हाती घेतले जाईल. हा प्रशस्त रिंग रोडचे काम पूर्णत्वास आल्यावर दुर्गाडी ते टिटवाळा हे अंतर कमी होणार आहे. अवघ्या २० मिनिटात दुर्गाडी ते टिटवाळा हे अंतर कापले जाणार आहे. हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाल्यावर सर्वार्थाने वाहतूक कोंडी सूटणार आहे”, असं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.