Home Blog Page 260

महाराष्ट्रात आता होम आयसोलेशन 100 टक्के बंद! कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

संपादक: मोईन सय्यद / मुंबई प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरश: हाहाकार उडवला. अशावेळी आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून यापुढे महाराष्ट्रात होम आयसोलेशन बंद म्हणजेच गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा इतर राज्यापेक्षा जास्त आहे तिथे होम आयसोलेशन हे शंभर टक्के बंद करण्यात आलं आहे. याबाबतचा निर्णय आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जाहीर केला आहे.

या निर्णयाचा असा अर्थ आहे की, आता यापुढे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याला जरी लक्षणं नसली तरीही त्याला कोव्हिड केअर सेंटरमध्येच राहावं लागणार आहे.

आजच्या 18 जिल्ह्यांच्या ज्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यापेक्षा जास्त आहे सरासरीपेक्षा, त्या जिल्ह्यांच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. एक म्हणजे होम आयसोलेशन हे शंभर टक्के बंद करा आणि कोव्हिड केअर सेंटरची संख्या वाढवा. सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट करा.’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गावागावांमध्ये कोव्हिड केअर सेंटर वाढविण्याचे निर्देश हे केंद्र सरकारनेसुद्धा दिलेल्या आहेत. म्हणून त्यासाठी वित्त मंत्रालयाच्या माध्यमातूनसुद्धा १५ व्या वित्त आयोगाची जो निधी ग्रामीण ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध आहे त्यातून २५ टक्के खर्च हा कोव्हिड केअर सेंटर उभा करण्यासाठी म्हणजे २५ ते ३० बेड निर्माण करण्यासाठी खर्च करता येतील. ही महत्त्वाची सूचना या निमित्ताने देण्यात आली आहे.’ असं राजेश टोपे म्हणाले.

राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

मुंब्र्यातून साडेचार लाखाचे गोमांस (बीफ) जप्त करत दोघांना अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाण्यातील मुंब्रा-कौसा येथून पोलिसांनी १ हजार ९०० किलो वजनाचे जनावरांचे मांस जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे ४ लाख ५६ हजार रुपये इतकी आहे. तसेच दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील कौसा येथे असणाऱ्या साहील सैफ बिल्डींगच्या तळमजल्यावर गळा नं.३ मध्ये अनधिकृतरित्या जनावरांची कत्तल करुन ते मांस विक्रीकरीता ठेवली असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्या अनुशंगाने पोलीसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. साहील सैफ बिल्डींगच्या तळमजल्यावर असलेल्या गळा नं.३ मध्ये सिकंदर मुमताज अहमद खान,आणि मोहमद आसिफ अकरम कुरेशी, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महानगर पालिकेच्या डम्परच्या धडकेत 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; कल्याण पूर्वेकडील हृदयद्रावक घटना

संपादक: मोईन सय्यद / कल्याण प्रतिनिधी: गुलाब शेख

कल्याण येथील कचोरे गावदेवी मंदिर परिसरात क्रिकेट खेळत असताना चेंडू उचलण्या साठी रस्त्यावर धावत गेलेल्या 12 वर्षीय मुलाला मागून येत असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या डम्परने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे खाली पडलेल्या अमितच्या अंगावरून डम्परचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला असता त्याला ताबडतोब उचलून रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 12 वर्षांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.

मिरा भाईंदर महानगपालिकेचे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी केला भाजपमध्ये अधिकृत प्रवेश? विरोधी पक्षांनी केला आरोप!

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी

मिरा भाईंदर महानगपालिकेचे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला असून ते भाजप कार्यकर्त्या प्रमाणे महासभेचे कामकाज करीत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेत्यांसह शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी केला तर भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी वासुदेव शिरवळकर महासभेचे कामकाज पक्षपातीपणे करीत असल्याचा आरोप करून त्यांची बदली इतर विभागात करून त्यांच्या ऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक नगरसचिव पदावर करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकारावरून महापालिकेचे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे की काय? असा सवाल शहरातील राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.

आधीच्या महासभेची तहकूब महासभा गेल्या बुधवारी 19 एप्रिल रोजी बोलावण्यात आली होती या महासभेत परिवहन सेवेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी असा ठराव भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी मांडला होता. त्याच वेळी या ठरावाच्या विरोधात भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी देखील ठराव मांडला आणि आपल्याच पक्षाच्या दोन नगरसेवकांनी दोन वेगवेगळे ठराव मांडल्यामुळे या ठरावांवर मतदान घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली आणि या ऑनलाईन महासभेमध्ये सत्ताधारी भाजपचे अनेक नगरसेवक गैरहजर असल्याने बहुमत मिळविण्यासाठी भाजपच्या नेत्यांची एकाच तारांबळ उडाली होती. महासभा चालू असताना महापौर ज्योत्सना हसनाळे अचानक उठून सभागृहात बाहेर गेल्या तर त्यांच्या पाठोपाठ उपमहापौर आणि आयुक्त देखील उठून बाहेर निघून गेले आणि या सगळ्या गोंधळामुळे महासभेत नक्की हे सर्व चालले आहे तरी काय?असा प्रश्न उपस्थितानां पडला.

दरम्यान भाजच्या नेत्यांकडून या महासभेत गैरहजर असलेल्या नगरसेवकांना फोनाफोनी करून ऑनलाईन हजर राहून मतदानात सामील होण्यासाठी फर्मावण्यात आले. परंतु ज्यावेळी महासभा चालू होते त्यावेळी उपस्थित नगरसेवकांची संख्या किती? आणि प्रत्यक्ष मतदानात भाग घेतलेले नगरसेवकांची संख्या किती? हे सांगण्यास नगर सचिव वासुदेव शिरवळकर यांनी मात्र नकार दिला आणि सत्ताधारी भाजपच्या बाजूने संख्याबळ पुरेसे नसताना गैरहजर असलेल्या नगरसेवकांना मतदानात सामील होण्याची संधी नगरसचिव यांनी दिली असा आरोप शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील आणि गटनेत्या नीलम ढवण यांनी केला आहे.

अखेर भाजपच्या दोन्ही ठरावांवर मतदान घेतले असता ठरावाच्या बाजूने 42 तर भाजच्या बंडखोर नगरसेवकांसह शिवसेनेची सर्व मते मिळून ठरावाच्या विरोधात 31 मतं पडली तर काँग्रेसचे 07 नगरसेवक तटस्थ राहिले अशी एकूण उपस्थित नगरसेवकांची संख्या 80 असल्याची माहिती नंतर नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी दिली आहे परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी किती नगर सेवक उपस्थित होते? जे गैरहजर होते त्यांना मतदान करण्याची संधी का देण्यात आली? या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.

मुळात महासभेत जेंव्हा एखादा ठराव मांडला जातो त्यावेळी महासभेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सदस्यांनाच मतदान करण्याची संधी दिली जाते. तात्पुरत्या कामासाठी किंवा अगदी स्वच्छता गृहाचा वापर करण्यासाठी देखील सभागृहाच्या बाहेर गेलेल्या सदस्यांना मतदान सुरू असताना सभागृहात प्रवेश दिला जात नाही किंवा त्यांना मतदानात भाग घेता येत नाही असा सभाशास्त्राचा नियम असताना बुधवारी झालेल्या महासभेत मात्र ऑनलाईन महासभेचा गैरफायदा घेऊन आणि सभागृहाचे नियम धाब्यावर बसवून गैरहजर सदस्यांना मतदान करण्याची संधी देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष शिवसेनेने केला आहे.

नगरसचिव सभागृहात पक्षपातीपणे कामकाज करीत असून सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे कामकाज करीत आहेत यापूर्वी देखील अनेकवेळा नगर सचिव वासुदेव शिरवळकर यांनी सत्ताधारी भाजपला झुकते माप देत त्यांच्या सोयीची भूमिका घेतली आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी तर थेट महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून वासुदेव शिरवळकर यांची बदली इतर विभागात करून त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. आता यावर आयुक्त काय निर्णय घेतात हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.