Home Blog Page 281

९ लाख कामगारांच्या खात्यात पैसे जमा; ठाकरे सरकारची वचनपूर्ती..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात १५०० रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत

राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गोरगरीब बांधकाम कामगारांना आर्थिक मदत जाहीर राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार आता नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांची संख्या दीड लाखाच्या आसपास असून त्यापैकी ९ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्य सरकारच्या वतीने अर्थसाह्य देण्यात आले आहे. मागील चार दिवसांमध्ये कामगार विभागाच्या वतीने १३७ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

राज्यात कोविड संकट असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत, बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात १५०० रुपयांचे अर्थसाह्य त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्य सरकारच्या कामगार विभागाच्या वतीने हे पैसे थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

सॅनिटायजर्स आणि आणि मास्कचे पोलिसात वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून डॉक्टर्स, परिचारिका, समाजसेवक, जागरूक नागरीक, पत्रकार आणि पोलीस हे कोरोना योद्धा म्हणून काम करत आहे. नागरिकांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या या कोरोना योद्धांचे नागरिक मनापासून आभार मानत आहेत.

डोंबिवलीतील समाजसेवक ऍड. प्रदीप बावस्कर, निलेश गांधी, हिम्मत म्हात्रे, संतोष बावस्कर यांनी पोलिसांच्या दिवसरात्र मेहनतीच्या कार्याला सलाम म्हणून विष्णूनगर पोलीस ठाण्याला भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांची भेट घेऊन पोलिसांसाठी १०० मास्क आणि
सॅनिटायजर्स दिले.

लसीकरणात महाराष्ट्राने रोवला मैलाचा दगड; दीड कोटी नागरिकांचे झाले लसीकरण पूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात ऑक्सिजन वापरासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित..

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे आव्हान..

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट राज्याने ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयांनी नंदूरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. त्यातील महत्त्वाचे मुद्दे :

जागतिक निविदा…

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उलब्धतेसाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्याद्वारे ४० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १३२ पीएसए, २७ ऑक्सिजन टॅंक, २५ हजार मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन आणि १० लाख व्हाईल्स रेमडेसिवीर या साहित्यासाठी ही जागतिक निविदा काढली आहे.

लसीकरण..

दि. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी १२ कोटी डोसेस लागतील. त्याच्या उपलब्धतेविषयी आरोग्य विभागामार्फत सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

लसीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून एवढ्या मोठ्या संख्येच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे. ही लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठविला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे १ मेपासून लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

ऑक्सिजनची उपलब्धता..

राज्यात सध्या १६१५ मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे.

नंदूरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात आली असून ५० रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले जाते. ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसत असून अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आतापर्यंत १०० पीएसए प्लांटसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत असे यावेळी बोलताना प्रसारमाध्यमांना सांगितले.

परमबीर सिंग यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप गुन्हा दाखल करण्याची मागणी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसूलीचा आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा दावा अकोला येथील पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या ठाण्यातील गैरकारभाराचा सर्व प्रकार घाडगे यांनी पत्राद्वारे थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांसमोर ठेवला आहे. या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर आरोप करत या सगळ्या प्रकाराची चौकशी होऊन सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरीक्षक घाडगे यांनी केली आहे.

तर या अगोदरही परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारे एक पत्र मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने लिहिले होते. दरम्यान, या पत्रामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंग यांच्यावरील आरोप-
1. रिव्हॉल्वरच्या परवान्यासाठी परमबीर सिंग हे प्रकाश मुथा या व्यक्तीमार्फत दहा ते पंधरा लाख रुपये घेत असत.

2. बिल्डरांची देवाण-घेवाण तसंच सेटलमेंट करण्याचे काम परमबीर सिंग करत होते. जो अधिकारी परमबीर सिंग यांचे बेकायदेशीर काम करण्यास मनाई करत असे, त्याची बदली नियंत्रण कक्षात केली जात होती किंवा त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असत.

3. परमबीर सिंग यांनी बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला. यासाठी त्यांनी एक एजंट राजू अय्यर याची नेमणूक केली. राजू अय्यर याच्याकडे पैसे जमा झाल्यानंतर बदल्या होत असत.

4. परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूर येथे एक व्यवसाय आहे. त्यात परमबीर सिंग यांनी दोन हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यात त्यांना ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची गोपनीय माहिती मिळाली असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

5. परमबीर सिंग यांनी ६३ कोटी रुपयांचा बंगला वजा फ्लॅट घेतला आहे.

6. परमबीर सिंग यांनी प्रत्येक झोनच्या डीसीपीकडून दिवाळीला भेट म्हणून 40 तोळे सोन्याची बिस्किटसह पोलीस आयुक्तांकडून वीस ते तीस तोळ्याची सोन्याची बिस्कीटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून ३०-४० तोळे सोन्याची बिस्किटे घेतली आहेत, असा आरोप पत्रामध्ये करण्यात आला आहे.

7. परमबीर सिंग यांच्या पत्नीचं इंडिया बुल लोअर परेल येथे कार्यालय आहे. पत्नीच्या माध्यमातून परमबीर सिंग यांची इंडिया बुल येथे ५००० कोटींची गुंतवणूक आहे.

8. परमबीर सिंग ठाणे आयुक्त असताना बिल्डर जितू नवलाणी यांच्याकडे १००० कोटींची गुंतवणूक वेगवेगळ्या व्यवसायात केली. या अगोदर देखील परमबीर सिंग यांच्यावर मुंबईतील एका पोलिस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केले होते.

एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण, महाराष्ट्राची दमदार कामगिरी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. दि. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून आज २६ एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६१५५ लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल.