Home Blog Page 286

“येरा – गबाळ्याचे काम नोहे” – अजित पवारांचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होतेय. यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच सरकार कधी बदलायचं हे माझ्यावर सोडा असं विधान त्यांनी केलंय. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.

अजित पवार म्हणालेत, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का ? हे सरकार पडणारा अजून जन्माला यायचं. हे ‘कोण्या येरा गबाळ्याचं काम नाही’ अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना फटकारलंय.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या परीक्षा आता जूनमध्ये..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आपले उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

मुलुंड पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत इसमास केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुलुंड येथे ऍक्टिव्हा मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत इसमास मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलुंड पोलिसांनी सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतले आहे.

त्याच्याकडून एकूण २० ऍक्टिव्हा मोटार सायकल (अंदाजे कींमत ८,००,००० /- आठ लाख रुपये) हस्तगत करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. यात त्यांनी स्वतंत्रपणे राज्याला कोरोना लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या आहेत.

काय लिहिलं आहे पत्रात..
गेल्यावर्षी कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे, असं राज यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कोविडच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो ? असा सवाल राज ठाकरेंनी मोदींना विचारला आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळकळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ ही हवीच.

कोरोनामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

*राज ठाकरेंच्या पंतप्रधानांकडे पाच प्रमुख मागण्या..*
१) महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या.
२) राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
३) सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
४) लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
५) कोरोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.

विरार लोकलला आज 154 वर्षे पूर्ण झाली !!!

संपादक: मोइन सय्यद

विरार लोकलला आज 154 वर्षे पूर्ण झाली !!!

१२ एप्रिल, १८६७ रोजी दिवशी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.

महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसऱ्या श्रेणीचा डबा होता. याव्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसऱ्या श्रेणीने प्रवास करायचे. प्रति मैलाचा दर होता ७ पैसे! तिसऱ्या श्रेणीसाठी दर होता ३ पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आज या प्रवासाला लागणाऱ्या वेळापेक्षा कमी वेळात पूर्ण होत असे, कारण मध्ये स्थानके कमी होती. स्थानके अशी होती – नीअल (नालासोपारा), बसीन (आमची वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यामधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रांट रोड.

मात्र आजच्या दिवसापेक्षा रेल्वेच्या इतिहासात १६ एप्रिल १८५३ ला अधिक महत्त्व आहे, कारण या दिवशी ठाणे ते बोरीबंदर ट्रेन – देशातली पहिली ट्रेन – धावली. पण ती लोकल नव्हती. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेचे माजी मुख्य ऑपरेशन मॅनेजर ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘या रेल्वेमार्गावर रोज लाखों प्रवासी प्रवास करतात, पण त्यापैकी अनेकांना आजचा दिवस माहित नसेल. हे दुर्भाग्यपूर्णच आहे.’ मध्य रेल्वेच्या तुलनेत या दिवसाचे महत्त्व रेल्वेच्या इतिहासात तसे कमीच आहे.