Home Blog Page 308

काेमल रहिवाशी साेसायटीबाबत महाराष्टाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना मुक्त पत्रकार जगदीश काशिकर यांचे निवेदन! त्वरीत कारवाई करण्याची केली विनंती!

काेमल गृहनिर्माण सहकारी संस्था या साेसायटीच्या पदाधिकाऱ्याची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारांवर कायदेशिर कारवाई त्वरीत करावी अशी मागणी जगदीश काशिकर,
कायदा (लॉ)/नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना केली आहे.

काेमल रहिवाशी साेसायटीच्या आजी व माजी पदधिकारयांची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून गुन्हेगारयांवर कायदेशिर कारवाईबाबत निवेदन फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला देऊन अजुन कारवाई झालेली नाही व काेमल रहिवाशी साेसायटीबाबत श्री जगदीश काशीकर पाठपुरावा निगडीत सरकारी प्रशासनाशी/यंत्रणेशी सुध्दा सतत सहा महीन्यापासुन ते करत आहेत व गेल्या तीन वर्षापासुन या साेसायटीबाबत असलेली समस्या ते जनतेसमाेर व मिडीयासमाेर मांडत आलेले आहेत.

आता तात्पुरती जबाबदारी घेऊन व ज्यांनी श्री शांतीलाल जैन यांचे ईतर कमीटी सदस्यांच्या सहाय्याने व्याज माफ केले व ताेच न्याय श्री जगदीश काशीकर यांना ईतर कमीटी व सभासदांच्या सहाय्याने दयायला नकार देऊन श्री शांतीलाल यांचे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला आहे ते साेसायटीचे माजी चेअरमेन श्री विनेश शहा आता आपले घर विकुन दुसरीकडे स्थलातंर करण्याचा प्रयत्न करत आहेत व साेसायटीची आर्थिक परीस्थीती वाईट असतानासुध्दा जगदीश काशीकर यांच्याकडुन दाेन वर्षाचा मेन्टेनन्स बिनव्याजी घ्यायला नकार दिला त्यांनी साेसायटीतील सभासद श्री विनीत चाेक्सी
यांच्या मुलाच्या लग्नासाठी तीन दिवस चालणाऱ्या (२० ते २२ फेब्रुवारी २०२१) लग्न सामारंभासाठी साेसायटीच्या आवारात मंडप घालण्याची परवानगी दिली.

जवळपास ३०-३५ वर्ष जुन्या काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण पुर्वीची ईमारत दुरूस्ती (श्री विनेश शहा कुटुंबीय व श्री विनीत चाेक्शी कुटुबियांवर काही कमीटी सभांसदाकडुन (श्री स्वप्नील सालसकर)/रहीवाश्यांचा आराेप व श्री धर्मेश शहा व श्री जगदीश सटाणेकर – सटाणेकर ज्वेलल्सचे मालक/भागीदार, गिरगाव यांच्या लीगल नाेटीसीला ऊत्तर न देता कमीटी सदस्यांकडुन राजीनामा जी नुकतीच १-२ महीन्यापुरवी बनली हाेती) व साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन (अंदाजे २-४ वर्ष) श्री शांतीलाल जैन (यांचे खाते बंद/हिशेाब करताना अंदाजे १५ ते २० वर्षाचे व्याज घेतले नाही) व त्यांना साथ देणारे ईतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे मला वाटते तरी अधिक माहीतीसाथी मी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) हा फेसबुक ग्रुप मी बनविला आहे ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती व हाच न्याय मलासुध्दा मिळावा व इतर गरजु सभासदांना मिळावा किंवा व्याज माफीचा निर्यय बदलण्यात यावा ही साैसायटी कमीटीकडुन श्री जगदीश काशीकर यांची अपेक्षा कारण हया परीस्थीत ते आपल्या पुढच्या आयुष्याबाबत सन्मानाने जगण्याचा निर्यय घेऊ शकत नाहीत !!

काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २५ वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे कारण आजही ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे तेच साेसायटी चालवत असुन काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी अजुन पुढेे येत नाहीत कारण या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला आहे (अजुन काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नाही) व आज जवळपास पाच महीन्यापासुन साेसायटी कमीटीशिवाय चालत असुन या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटी बनविने हया सर्व घटनेचा खुलासा झाल्यावर बनविणे शकय आहे व हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.

टीप : ह्या बातमीचे संकलन जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ)/नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार यांनी केले असून याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच आहे.

ग्रामीण महिलांच्या प्रश्नांवर संशोधन होणे ही खरी गरज! – धर्मराज हल्लाळे

बबलू कदम, वडवणी प्रतिनिधी : ग्रामीण महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबतच्या समस्या अजूनही शासन, प्रशासन आणि माध्यमांच्या परिघाबाहेर आहेत, त्यावर शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी अधिक गांभीर्याने संशोधन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दैनिक लोकमत लातूरचे वृत्तसंपादक श्री. धर्मराज हल्लाळे यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के एम पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात कोरोना काळात महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. पंजाबराव मस्के पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रस्तुत महाविद्यालयाच्या स्थापनेमागील ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय हीच प्रमुख भूमिका असल्याचे सांगितले आणि महाविद्यालयाची आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले.

या वेबिनारच्या बीजभाषक म्हणून डॉ बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील ताराबाई शिंदे स्त्री अध्यासन केंद्राच्या संचालिका डॉ. निर्मला जाधव यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर प्रखर प्रकाश टाकून शासन, प्रशासन आणि माध्यमांच्या पुरुषप्रधान मानसिकतेत बदल होण्याची गरज व्यक्त केली.
याप्रसंगी संसाधन व्यक्ती म्हणून जी बी पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, उत्तराखंड येथील डॉ. रितू सिंग यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा 2013 ‘यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी दुसऱ्या संसाधन व्यक्ती श्रीमती अशिमा सिंग, माजी संचालिका,भारतीय रेल्वे तंत्रज्ञान आणि परिवहन संस्था, गोरखपूर यांनी भारतीय साहित्यामध्ये रेखाटलेले स्त्री चित्रण यांवर प्रकाश टाकला.
या वेबिनारचे सूत्रसंचालन महाविद्यालयालयीन विशाखा समितीच्या समन्वयक डॉ. मनिषा ससाणे यांनी केले तर डॉ. बी. जी. कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक- विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.

धक्कादायक! हळदी समारंभांतील हत्येचा झाला उलगडा; ‘त्या’ महिलेवर अनैतिक संबधातून केला होता गोळीबार!

अवधुत सावंत, कल्याण, प्रतिनिधी : शेजारी हळदीचा समारंभ सुरू असल्याचा फायदा घेत, अनैतिक संबधातून त्या महिलेवर शेजारच्याच तरुणाने गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपीची आई त्या महिलेला बचावासाठी आली असता आरोपीने स्वतःच्या आईवरही गोळीबार केला. गोळीबारात त्या महिलेचा मृत्यू झाला. तर आरोपीची आई गंभीर जखमी झाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी स्वतःही जखमी होऊन घरावर दरोडा पडल्याचा बनाव केला आहे.

ही घटना कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. पवन म्हात्रे (वय 21 वर्षे), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव असून त्याने कलेल्या गोळीबारात एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीची आई भारती म्हात्रे या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हळदी सभारंभात रचला कट!

मृत महिला व आरोपी तरुण शेजारीच राहत असून या दोघांमध्ये काही महिन्यांपासून अनैतिक संबध होते. मात्र, आरोपी पवनचा संशय होता की, तिचे इतरही पुरुषांसोबत अनैतिक संबध आहेत. त्यामुळे त्याने तिचा काटा काढण्याच्या ठरवले होते. त्यातच आरोपीच्या घराशेजारी रात्री बाराच्या सुमारास हळदी समारंभ सुरू होता. त्यामुळे गावातील नागरिक या कार्यक्रमात व्यस्त होते. याच दरम्यान सुरू असलेल्या हळदी कार्यक्रमापासून काही अंतरावर असलेल्या घरात पवनने महिलेवर गोळीबार केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपीची आई गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपीने रचला होता दरोड्याचा बनाव

आरोपीने कुटूंबाबर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा बनाव करत जखमी झाल्याचे दर्शवत सोमवारी दि. २२ रोजी सकाळी रुग्णालयात आई सोबत तोही उपचार घेत होता. सुरुवातीला पोलिसांना आरोपीने दिलेल्या माहितीत घरातील दागिने अज्ञात दरोडेखोराने लुटल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी घरी तपास केला असता दागिने सुरक्षित असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा जखमी पवनवर संशय अधिक बळावल्याने त्याची कसून दोन तास चौकशी केल्यानंतर अखेर पोलिसांनी या गुन्ह्यांची २४ तासात उकल करत आरोपी पवनला ताब्यात घेतले. तर अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची माहिती कल्याण पोलीस परिमंडळचे-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली असून या हत्येमागे नेमके काय कारण होते याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक महेंद्र चकोर करत आहेत.

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! प्रा. सुशीलाताई मोराळे, मोहन जाधव यांच्याकडून अपघातग्रस्त राठोड कुटुंबाचे सांत्वन

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! प्रा. सुशीलाताई मोराळे, मोहन जाधव यांच्याकडून अपघातग्रस्त राठोड कुटुंबाचे सांत्वन

बबलू कदम, वडवणी, ता. प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील बिचकुलदरा तांड्यातील एक ऊसतोड मजुर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच गढी कारखान्यावर ऊस तोडत होता.चार महीने ऊसतोड करुन तो कुटुंबासह घरी परतत असताना माजलगाव पिंपळनेर बीड रस्त्यावरील मुगगाव – पाटेगाव शिवारात शिवरस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली पडुन त्याचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वडवणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक कार्यकर्त्या तथा ऊसतोड मजुरांच्या नेत्या प्रा. सुशिलाताई मोराळे, मोहन जाधव यांनी पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी चव्हाण सर, माकपचे कॉ. किरण ढोले, कॉ. रवी उरूनकर, एसएफआयचे जिल्हा सचिव लहू खारगे, तालुका अध्यक्ष ऋषीकेश कलेढोन, विजय टकले, अमोल राठोड आदी उपस्थित होते.

टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील अनेक ऊस तोड मजुरांचे कुटुंब गाव, घर व नातेवाईक सोडून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच परराज्यात जातात. वडवणी शहरापासून ३ कि.मी.आंतरावर असलेल्या बिचकुलदरा तांडा येथील विजय खिरू राठोड हा तरुण ऊसतोड मजूर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच जय भवानी साखर कारखाना गडी या ठिकाणी कुटुंबासह ऊसतोड करीत होता. गेल्या 16 फेब्रुवारी रोजी तो मजूर ऊस तोडीचे काम संपवून कुटुंबासह घरी परतत असताना बीड-पिंपळनेर-माजलगाव या मधल्या रस्त्यावरून गावी येत असताना या शिवारात ट्रॉक्टरच्या ट्रॉली खाली सापडल्याने त्याचा चिरडून मृत्यू दुर्दैवी झाला. या दुर्दैवी तरुणाच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची असून त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे.

गरीब कुटुंबातील तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वडवणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या गरीब कुटुंबाला शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या! चाहत्यांमध्ये पसरली शोककळा!

मिलन शाह, पुणे : प्रसिद्ध टिकटॉक स्टार, अभिनेता समिर गायकवाड यांनी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (रविवारी) वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत घडली आहे. अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास केसनंद रस्त्यावरील मिकासा इमारतीत टिकटॉक स्टार अभिनेता समिर गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत समीरला रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. समीरने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सोशल मीडीयावर समिरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या  आत्महत्येमुळे शहरासह राज्यभरातील चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.